Maharashtra

Kolhapur

CC/14/246

Sheetal Ravsaheb Patil - Complainant(s)

Versus

Manager, HDFC Ergo, General Insu. Co. Ltd. - Opp.Party(s)

A D Kamble

13 Oct 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/14/246
 
1. Sheetal Ravsaheb Patil
At Herwad, Tal. Shirol
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Manager, HDFC Ergo, General Insu. Co. Ltd.
1st Floor, Gemstone, 517/2, New Shahupuri, Nr. CBS,
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
For the Complainant:A D Kamble, Advocate
For the Opp. Party:
Adv.P.R.Kolekar
 
Dated : 13 Oct 2016
Final Order / Judgement

  

न्‍या य नि र्ण य :  (व्‍दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्‍यक्षा) 

1)    तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986, कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे

     तक्रारदार हे हेरवाड, ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर येथील  कायमचे रहिवाशी असून  त्‍यांचा शेती तसेच पोकलँन्‍ड मशिनव्‍दारे कंत्राटावर कामे घेण्‍याचा व्‍यवसाय आहे.   वि.प. ही विमा कंपनी आहे.  तक्रारदाराचे त्‍यांचे मालकीचे एल अॅन्‍ड टी  कोमास्‍तु लि; कंपनीची पी.सी. 130-7 चे पोकलॅन्‍ड मशिन सदर मशिनचा  विमा वि.प. विमा कंपनीकडे दि. 20-12-2012 रोजी उतरविला होता व आहे.  प्रस्‍तुत विम्‍याची वि.प. कंपनीने रक्‍कम रु. 36,25,000/- ची हमी  वि.प. ने स्‍वीकारली होती त्‍यासाठी तक्रारदाराने रक्‍कम रु. 29,906/- चा विमा हप्‍ता वि.प. कडे  भरलेला होता.

          दि. 31-03-2016 रोजी तक्रारदाराचे प्रस्‍तुत मशिनने अचानक पेट घेतला व सदर अपघातात सदर मशिनचे जळून नुकसान झाले.  सदर अपघाताची माहिती तक्रारदाराने वि.प. विमा कंपनीस कळविली असता वि.प. यांनी सर्व्‍हेअर श्री. गजेंद्र कबाडे यांचेमार्फत प्रस्‍तुत जळीत मशिनचा सर्व्‍हे केला. व प्रस्‍तुत मशिनचे जळीतामुळे रक्‍कम रु. 26,91,046/- एवढे नुकसान झालेचा अहवाल दिला आहे.  वास्‍तविक मशिनचे पुर्णत: नुकसान झाले होते.  त्‍यामुळे वि.प. ने रक्‍कम रु. 36,25,000/- तक्रारदाराला देणे आवश्‍यक होते.  परंतु वि.प. विमा कंपनीने जबाबदारी टाळण्‍यासाठी केवळ रक्‍कमरु. 15,11,366/-  (रक्‍कम रुपये पंधरा लाख अकरा हजार तीनशे सहासष्‍ट मात्र) एवढीच विमा क्‍लेमची रक्‍कम तक्रारदाराला अदा केली.  उर्वरीत रक्‍कम रु. 21,00,000/- पेक्षा अधिक रक्‍कम वि.प. कंपनीकडून तक्रारदाराला येणे आहे.  सर्व्‍हेअरने दिले अलवालानुसारही वि.प. कंपनी तक्रारदाराला रक्‍कम रु. 26,91,000/- एवढी रक्‍कम देय लागते.  परंतु वि.प. कंपनीने तक्रारदाराला विमा क्‍लेमपोटी फक्‍त रक्‍कम रु. 15,11,336/- एवढीच रक्‍कम अदा केली व उर्वरीत रक्‍कम देणेस स्‍पष्‍ट नकार दिला आहे.  वि.प. हे तक्रारदार बरोबर झाले विमा कराराप्रमाणे वागलेले नाहीत व तक्रारदाराला भूलथापा लावून तक्रारदाराची दिशाभूल करुन  तक्रारदाराचा देय विमा क्‍लेम पुर्णत: न देऊन वि.प. ने तक्रारदाराला सेवा त्रुटी दिली आहे.  सबब, तक्रारदाराने वि.प. कडून प्रस्‍तुत विमा क्‍लेमची रक्‍कम वसुल होऊन मिळणेसाठी प्रस्‍तुत तक्रार अर्ज या  मे. मंचात दाखल केलेला आहे.   

2)   तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी वि.प. विमा कंपनीकडून विमा क्‍लेमपोटी रक्‍कम रु. 10,00,000/-(रक्‍कम रुपये दहा लाख मात्र) वसूल होऊन मिळावे, कर्ज व्‍याज व व्‍यवसायातील झाले नुकसानीची रक्‍कम रु. 9,00,000/- व मानसिक त्रास, नोटीस खर्च, वकील फी, वगैरेसाठी रक्‍कम रु. 50,000/- वि.प. विमा कंपनीकडून वसुल होऊन मिळावी.  सर्व रकमेवर रक्‍कम वसुल होईपर्यंत द.सा.द.शे. 16 % व्‍याज मिळावे अशी विनंती केली आहे.     

3)    तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी अॅफीडव्‍हीट, नि. 3 चे कागद यादीसोबत नि. 3/1 ते 3/32 अनुक्रमे सन्‍मती सहकारी बँक लि, इचलकरंजी यांचेकडील पावती, कर्नाटक बँक यांचेकडील चेक नं.000008 चा चेक एन.एस. एल. शुगर्स चे पत्र, एच.डी.एफ.सी. बँकेची पावती  एच.डी.एफ.सी. एरगो जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि, ची पेमेंट अॅडव्‍हाईस, एल. अॅन्‍ड टी कंपनीची  डिलीव्‍हरी नोट, उर्वरित विमा रक्‍कम मिळणेसाठी तक्रारदाराने वि.प. यांना दिलेले पत्र, एल.अॅन्‍ड टी. यांचेकडील टॅक्‍स इन्‍व्‍हाईस, वि.प. कंपनीकडील पावती, करंट अॅसेट ग्रुपसमरी, कोटेशन एल. अॅन्‍ड टी कंपनीचे पत्र, एन. एस. एल. शुगर यांचेपत्र, राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे पत्र, एचडीएफसी लि बँकेचे पत्र, एच.डी.एफ.सी. बँकेची पेमेंट पावती, एच.डी. एफ.सी. इरगो जन. इन्‍शुरन्‍स कंपनीची पेमेंट पावती, कोटेशन, तक्रारदाराचे पॅन कार्ड, एल.अॅन्‍ड टी. साईन्‍स यांचे पत्र, एल अॅन्‍ड टी कडील पावती, एल अॅन्‍ड टी कंपनीचा  अटी व शर्ती, वि.प. पत्र, सर्व्‍हीस रिपोर्ट, तक्रारदाराने वि.प. ला पाठवलेली नोटीस रजि. पोस्‍टाची पावती, रजि. पोस्‍टाची पोहाच पावती, वि.प. ना तक्रारदाराने पाठविलेली नोटीस, नोटीस मिळालेची वि.प. ची पोहोच पावती अॅफीडेव्‍हेट, लेखी युक्‍तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने या कामी दाखल केलेले आहेत.                                   

4)   प्रस्‍तुत कामी वि.प. यांनी मेकलॅरीन्‍स यंग इंटरनॅशनल यांचा सर्व्‍हे रिपोर्ट, म्‍हणणे, अॅफीडेव्‍हीट, लेखी युक्‍तीवाद मे. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे वगैरे कागदपत्रे या कामी दाखल केले आहेत. 

              वि.प.ने त्‍यांचे म्‍हणणे/कैफियतीमध्‍ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने  फेटाळलेली आहेत त्‍यांनी तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविलेले आहेत.

(i)  तक्रारदाराचा तक्रार अर्ज व  त्‍यातील कथन मान्‍य व कबूल नाही.

(ii) तक्रारदाराची तक्रार ही खोटी लबाडीची व चुकीची असलेने ती कायदयाने चालणेस पात्र  नाही.  

(iii)  तक्रारदारांचे पोकलँन्‍ड मशिनला दि.31-03-2013 रोजी पेट घेऊन अपघात झाला हे कथन बरोबर आहे.  तथापि सदर अपघातात प्रस्‍तुत मशिन संपूर्णपणे जळाले हे कथन पुर्णत: चुकीचे आहे.  वि.प. ने मशिन जळालेचे समजलेवर प्रस्‍तुत  मशिनचा सर्व्‍हे करणेसाठी श्री. गजेंद्र कबाडे  यांचेमार्फत सर्व्‍हे करुन सदर  मशिनची एकूण नुकसान भरपाई रक्‍कम रु. 15,11,336/-(रक्‍कम रुपये पंधरा लाख अकरा हजार तीनशे छत्‍तीस मात्र)  इतकी निश्चित केली आहे. व तसा सर्व्‍हे रिपोर्टही दि. 23-08-2013 रोजी दिलेला आहे.  तक्रारदाराचे पोकलँन्‍ड मशिन हे सन  2000 सालचे आहे.  वि.प. चे सर्व्‍हेअर मेकलॅरीन्‍स यंग इंटरनॅशनल यांनी सदर  पोकलँन्‍ड मशिनची पाहणी करुन विमा पालिसी अटी व शर्तीप्रमाणे होणारे  रबर प्‍लास्‍टीक व शिटमेटलचे पार्टचा घसारा विचारात घेऊन तसेच होणारे भंगाराची किंमत व पॉलिसीचे  अटीप्रमाणे जादा रक्‍कमेबाबत रु. 50,000/- वजा करुन मशिनची नुकसान भरपाई  रु. 15,11,366/- इतकी करुन तक्रारदाराला रक्‍कम रु. 5,00,000/- चा चेक क्र. 408501 अॅडव्‍हान्‍स व रक्‍कम रु. 15,11,366/-, चेक क्र. 629751 ने तक्रारदाराला अदा केले आहेत.  तक्रारदाराचे कथन की, सर्व्‍हेअर यांनी रक्‍कम रु. 26,91,046/- चे नुकसान झालेचा अहवाल सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये उल्‍लेख असलेचे तक्रारदाराचे कथन खोटे व लबाडीचे आहे.  तसेच वि.प. कंपनीकडून मशिनची संपूर्ण किंमत रक्‍कम रु. 36,25,000/- देणे आवश्‍यक होते हे चुकीचे आहे.  कारण मशिन पुर्णपणे जळालेली नाही ती दुरुस्‍त करता येते. तक्रारदाराने एल अॅन्‍ड टी कंपनीकडून मशिन दुरुस्‍त करुन घेतले आहे.  तक्रारदाराला दुरुस्‍तीसाठी आलेल्‍या खर्चाची सर्व रक्‍कम विमा क्‍लेम रक्‍कम रु. 15,11,366/- वि. प. ने  अदा केली आहे. सबब, तक्रारदाराने केलेली  उर्वरीत रक्‍कमेची मागणी चुकीची व बेकायदेशीर आहे.    

(iv) तक्रारदाराला मशिन दुरुस्‍तीचे कालावधीतील उत्‍पन्‍न मागणेचा अधिकार नाही. 

(v) तक्रारदाराने केलेली चुकीची मागणीचा तक्रार अर्ज हा या मे. मंचात चालणेस पात्र नाही तो खर्चासह फेटाळणेत यावा. अशाप्रकारे आक्षेप वि.प. तक्रार अर्जावर नोंदविलेले आहेत.    

5)   वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करता मे. मंचाने प्रस्‍तुत तक्रार अर्जाच्‍या निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.       

      

­अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार हे ग्राहक सरंक्षण कायदा, कलम  2(i)(d)  नुसार ‘ग्राहक’ या संज्ञेत येतात  काय ?

   नाही  

2

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे

    

वि वे च न

मुद्दा क्र. 1 

 

6)     मुद्दा क्र. 1  चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी देत आहोत.  कारण तक्रारदारने त्‍यांचे तक्रार अर्जात, पुराव्‍याचे शपथपत्रात  व लेखी युक्‍तीवादात कथन केले आहे की, तक्रारदार यांचा शेती  तसेच पोकलॅन्‍ड मशिनव्‍दारे कंत्राटवर कामे घेण्‍याचा व्‍यवसाय आहे.  तसेच तक्रारदाराचे पोकलॅंन्‍ड  मशिन हे एन.एस.एल. शुगर लि,  पवारवाडी, ता. माजलगांव येथे बर्गेश लोडींगसाठी भाडयाने दिले होते ही बाब तक्रारदाराने नि. 3 चे कागद यादीसोबत नि. 3/3 व 3/15  कडे दाखल  एन.एस.एल. शुगर लि, यांचे पत्रावरुन स्‍पष्‍ट होते.  तसेच तक्रारदाराने त्‍यांचे तक्रार अर्जात, पुराव्‍याचे शपथपत्रात अथवा लेखी तोंडी युक्‍तीवादात कुठेही स्‍पष्‍टपणे नमूद केलेले नाही की,  ” तक्रारदार हे सदर मशिनच्‍या उत्‍पन्‍नातून तक्रारदार व त्‍यांचे उदरनिर्वाहासाठी/कौटुंबिक देखभालीसाठी खर्च करत असतात किंवा सदर पोकलँन्‍ड  मशिनचे येणारे उत्‍पन्‍नातूनच  तक्रारदाराचा व त्‍यांचे कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो ”  असे कोणतेही कथन तक्रारदाराने केलेले नाही.  तर तक्रारदाराने प्रस्‍तुत  मशिन व्‍यवसायासाठी खरेदी केलेचे कथन आहे. म्‍हणजेच तक्रारदाराने प्रस्‍तुत पोकलँन्‍ड मशिन हे व्‍यापारी कारणासाठी(commercial purpose) खरेदी केले असून ते एन.एस.एल. शुगर लि  पवारवाडी, ता. माजलगांव येथे भाडेतत्‍वावर कारखाना परिसरातील बगॅस लोडींगसाठी दिले होते हे दाखल कागदपत्रावरुन स्‍पष्‍ट व सिध्‍द होते. म्‍हणजेच तक्रारदार हे ग्राहक सरंक्षण कायदा, 1986  कलम 2(i)(d)  नुसार ‘ग्राहक’ (Consumer)  या संज्ञेत/व्‍याखेत येत नाहीत असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.

d) “consumer” means any person who-

(i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose; or

(ii) 1[hires or avails of] any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who 1[hires or avails of] the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payments, when such services are availed of with the approval of the first-mentioned person;

2[Explanation: For the purposes of sub-clause (i), “commercial purpose” does not include use by a consumer of goods bought and used by him exclusively for the purpose of earning his livelihood, by means of self-employment;]

   सदर कामी तक्रारदाराने सदरचे पोकलँन्‍ड मशिन हे व्‍यवसायासाठी खरेदी केलेचे स्‍पष्‍ट व सिध्‍द झाले आहे.  त्‍यामुळे तक्रारदार हे  ग्राहक सरंक्षण कायदा, 1986  कलम 2(i)(d)   प्रमाणे ‘ग्राहक’  या संज्ञेत येत नाहीत. सबब, आम्‍ही मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर नकारार्थी दिले आहे.

    प्रस्‍तुत कामी आम्‍ही खाली नमूद मे. वरिष्‍ठ न्‍यायालयाचा न्‍यायनिवाडा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे.

2011(I) SCCR 443 – Supreme Court

Birla Technologies Ltd.  Vs Natural Glass and Allied  Industries Ltd,

Head Note: Consumer Protection Act, 1986 Sec. 2(i)(d) (ii) – Deficiency in Service – Goods Purchased for Commercial purpose or service offered for commercial purpose – complaint filed.

Held – Complaint not  maintainable.

   प्रस्‍तुत तक्रार अर्जातील तक्रारदाराने सदर पोकलँन्‍ड मशिन हे व्‍यापारासाठी व्‍यवसायासाठी खरेदी  केले होते हे स्‍पष्‍ट व सिध्‍द झाले असलेने तक्रारदार हे ‘ग्राहक’ या संज्ञेत येत नाहीत त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार अर्ज  हा या मे. मंचात चालणेस पात्र नाही असे या मे. मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  तक्रारदाराचा योग्‍य त्‍या न्‍यायालयात दाद मागणेचा हक्‍क अबाधीत ठेवणेत येतो.  सबब, याकामी आम्‍ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. सबब, आदेश. 

 

                                                    - आ दे श -                    

             

1)   तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येतो. 

2)   खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.

3)  तक्रारदाराचा योग्‍य त्‍या न्‍यायालयात दाद मागणेचा हक्‍क अबाधीत ठेवणेत येतो.

4)  आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.