Maharashtra

Chandrapur

CC/21/231

DHANRAJ SITARAM WARJURKAR - Complainant(s)

Versus

MANAGER, HDFC BANK KHADAKI BRANCH - Opp.Party(s)

09 Mar 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/21/231
( Date of Filing : 09 Dec 2021 )
 
1. DHANRAJ SITARAM WARJURKAR
ZADE PLOT, GHUTAKALA WARD, NEAR SANTOSH KIRANA SHOP , BHADRAWATI
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. MANAGER, HDFC BANK KHADAKI BRANCH
SHOP NO 3 TO 6, GROUND FLOOR, CHS, GURU TEJ BAHADUR, AUNDH ROAD, OPPOSITE LIC OFFICE KHADAKI, PUNE
PUNE
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 09 Mar 2023
Final Order / Judgement

  :::नि का ल  प ञ   :::

(आयोगाचे निर्णयान्वये,सौ. कल्‍पना जांगडे (कुटे), मा. सदस्‍या,)

                    (पारीत दिनांक ९/३/२०२३ )

 

                       

  1. प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ अन्‍वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालिलप्रमाणे. 
  2. तक्रारकर्त्‍याचे दिनांक १८/५/२००५ पासून विरुध्‍द पक्षाकडे ०४४७१०००००२०४२ क्रमांकाचे बचत खाते आहे. तक्रारकर्त्‍याने २००८ पासून वरील खात्‍याला जोडूनच डीमॅट खाते सुध्‍दा उघडले त्‍यामुळे डीमॅट बचत मुच्‍युअल रोखे खरेदी विक्रीची अशी सेवा आहे. विरुध्‍द पक्षाने सन २००९-१० पासून तक्रारकर्त्‍याकडून ISAQMC  या नावाखाली ञैमासीक शुल्‍क घेण्‍यास सुरवात केली. तक्रारकर्त्‍याने ISAQMC बद्दल विरुध्‍द पक्षाकडून माहिती घेतली असता त्‍यांनी म्‍युच्‍युअल फंड  खात्‍याचे ञैमासीक शुल्‍क कपात करीत असल्‍याचे कळले. तक्रारकर्त्‍याकडे असलेल्‍या  डीमॅट खात्‍यात म्‍युच्‍युअल फंड खरेदी विक्री करण्‍याची सुविधा उपलब्‍ध आहे. त्‍यामुळे परत वेगळी सुविधा घेण्‍याची आवश्‍यकता नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास २०१५-२०१६ मध्‍ये ईमेल पाठवून त्‍याच्‍या पुर्वपरवानगी शिवाय उपरोक्‍त सुविधा कशी सुरु केली याबाबत विचारणा केली असता विरुध्‍द पक्षाने त्‍याला उत्‍तर दिले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला स्‍वतः  दिनांक २९/१०/२०२० रोजी भद्रावती-पूणे असा प्रवास करुन विरुध्‍द पक्षाच्‍या बॅंकेत जाऊन तक्रार द्यावी लागली. त्‍यावेळी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून क्‍लोझर ऑफ इन्‍व्‍हेस्‍टमेंट सर्व्हिस अकाऊंटचा फॉर्म भरुन घेतला आणि ISAQMC नावाने कपात करणे थां‍बविले. विरुध्‍द पक्षाच्‍या अधिका-यांनी तक्रारकर्त्‍यास २००९ ते २०२० या कालावधीमध्‍ये  त्‍यांनी कपात केलेली रक्‍कम परत केली जाणार असे सांगितले. परंतु आजतागायत कोणतीही रक्‍कम तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात जमा केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांना कपात करण्‍यात आलेली रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍याबाबत दिनांक १४/१०/२०२१ रोजी रजिस्‍टर पोस्‍टाने स्‍मरणपञ पाठविले. परंतु तरीसुध्‍दा विरुध्‍द पक्षाने ISAQMC या नावाने कपात केलेली रक्‍कम व्‍याजासह परत करणे आवश्‍यक असूनही ती परत न दिल्‍याने तक्रारकर्त्‍यास आर्थिक नुकसान तसेच शारीरिक व मानसिक ञास झाला. कपात केलेली रक्‍कम परत न करुन तक्रारकर्त्‍याप्रती न्‍युनतम सेवा दिल्‍याने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाविरुध्‍द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्‍यामध्‍ये  अशी मागणी केली आहे की, २०२० चे ञैमासीक रुपये २९५/-xx xx* ४= ११८०/-  आर्थिक नुकसान याप्रमाणे १२ वर्षात कपात केलेली रक्‍कम रुपये १४,१६०/- आणि प्रवास खर्च रुपये ३,०००/- तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई आणि तक्रार खर्च विरुध्‍द पक्षाने द्यावे अशी प्रार्थना केली.
  3. तक्रारकर्त्‍याची तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्ष यांना नोटीस काढण्‍यात आली. विरुध्‍द पक्ष हे प्रकरणात उपस्थित राहूनही त्‍यांनी लेखी उत्‍तर दाखल न केल्‍याने दिनांक ११/८/२०२२ रोजी त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण लेखी उत्‍तरशिवाय चालविण्‍याचा आदेश निशानी क्रमांक १ वर पारीत करण्‍यात आला.

 

कारणमीमांसा

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार व दस्‍तावेज यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष बॅंक यांचेकडे दिनांक १८/०५/२००५ रोजी बचत खाते उघडले असून त्‍याचा क्रमांक ०४४७१०००००२०४२  हा आहे. तक्रारकर्त्‍याने २००८ मध्‍ये त्‍या खात्‍याला जोडूनच डिमॅट अकाऊंट उघडलेले आहे. डिमॅट अकाऊंट मध्‍ये म्‍युचअल फंड रोखे खरेदी विक्रीची सुविधा असते/आहे. तक्रारकर्त्‍यास विरुध्‍द पक्ष हे त्‍याच्‍या उपरोक्‍त बचत खात्‍यातून ISAQMC चे नावाखाली रक्‍कम कपात करीत असल्‍याचे निदर्शनास आले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे चौकशी केली तेव्‍हा विरुध्‍द पक्ष हे ISAQMC रक्‍कम म्‍युचल फंड खात्‍याचे ञैमासीक शुल्‍क म्‍हणून कपात करीत असल्‍याचे कळले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे पूर्वीच डिमॅट खाते उघडले असतांना परत म्‍युचल फंड खरेदी विक्री करण्‍याकरिता नवीन सुविधा घेण्‍याची आवश्‍यकता नसतांना सुध्‍दा विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचे पूर्व परवानगीशिवाय २०१२ या वर्षापासून म्‍युचल फंड खरेदी विक्रीची सुविधा सुरु करुन ISAQMC चे नावाखाली तक्रारकर्त्‍याचे बचत खात्‍यातून त्‍या सुविधेबाबतचे ञैमासीक शुल्‍काची रक्‍कम कपात करण्‍यात आली हे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या विरुध्‍द पक्ष बॅकेच्‍या २०१२ ते २०१५ आणि २०२० चे खाते उतारा वरुन निदर्शनास येते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास दिनांक १० जानेवारी २०१९  रोजी ईमेल करुन मागील काही वर्षापासून ञैमासीक रक्‍कम कपात करण्‍याबद्दल विचारणा केली असता विरुध्‍द पक्ष यांनी उत्‍तर दिले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक २९/१०/२०२० रोजी स्‍वतः भद्रावतीवरुन विरुध्‍द पक्ष/बॅंक पूणे येथे जाऊन लेखी तक्रारकेली असता विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याकडून Closure of Investment Services  अकाऊंट चा फॉर्म भरुन घेतला व त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याचे बचत खात्‍यातील ञैमासीक शुल्‍क कपात करण्‍याचे बंद केले. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचे खात्‍यामधून ISAQMC चे नावाखाली ञैमासीक कपात केलेल्‍या शुल्‍काची रक्‍कम परत केली जाणार असे तक्रारकर्त्‍यास सांगितले परंतु ती रक्‍कम तक्रारकर्त्‍याचे खात्‍यात विरुध्‍द पक्ष यांनी जमा न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास परत दिनांक १४/१०/२०२१ रोजी पोस्‍टाने स्‍मरणपञ पाठवून मागणी केली. परंतु विरुध्‍द पक्ष यांनी ती रक्‍कम परत केली नाही. तक्रारकर्त्‍याने पाठविलेले स्‍मरणपञ, प्रकरणात दाखल केलेले आहे. विरुध्‍द पक्ष हे प्रकरणात उपस्थित राहूनही त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे कथन खोडून काढले नाही तसेच त्‍यांचे बचावापृष्‍ठर्थ प्रकरणात कोणताही दस्‍तावेज वा पुरावा दाखल केला नाही.  त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचे पूर्वपरवानगी शिवाय तक्रारकर्त्‍यास म्‍युचल फंड खरेदी विक्रीची   सुविधा दिली व त्‍यानंतर त्‍याची ISAQMC चे नावाखाली ञैमासीक शुल्‍काची कपात केली व ते खाते बंद केल्‍यावर कपात केलेली शुल्‍काची रक्‍कम परत तक्रारकर्त्‍याचे खात्‍यात जमा करण्‍याचे आश्‍वासन देऊनही जमा केली नाही, हे तक्रारकर्त्‍याचे कथन ग्राह्य धरणे योग्‍य आहे. तक्रारकर्त्‍याने पञ पाठवून कपात केलेल्‍या शुल्‍काच्‍या रकमेची मागणी केल्‍यावरही रक्‍कम  जमा न करुन विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याप्रती न्‍युनतापूर्ण सेवा दिल्‍याचे सिध्‍द होते, या निष्‍कर्षाप्रत आयोग आले आहे. तक्रारकर्त्‍याने २००९-२०१० पासून ञैमासीक शुल्‍काच्‍या रकमेची मागणी केली आहे परंतु त्‍याबाबतचा खाते उतारा प्रकरणात दाखल नाही.  त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष यांचेकडून सन २०१२ पासून ISAQMC चे सदराखाली ञैमासीक कपात केलेली शुल्‍काची रक्‍कम तसेच त्‍याला झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्‍कम आणि  तक्रारीचा खर्च मिळण्‍यास पाञ आहे. सबब आयोग खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र.२३१/२०२१ अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचे खात्‍यातून  ISAQMC चे सदराखाली २०१२ ते २९/१०/२०२० पर्यंतची  कपात केलेली रक्‍कम तक्रारकर्त्‍यास परत द्यावी. 
  3. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्‍कम रुपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ३,०००/- द्यावे.
  4. उभयपक्षांना आदेशाची प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावेत.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.