Maharashtra

Dhule

CC/14/61

Nasir Husen Abdul Rasid Beg - Complainant(s)

Versus

Manager, HDFC Life Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

Joshi

05 Dec 2014

ORDER

Consumer Disputes Redressal Forum,Dhule
JUDGMENT
 
Complaint Case No. CC/14/61
 
1. नासीर हुसेन अब्‍दुल रशिद बेग
गल्‍ली नं.११, घरनं.७३७,घड्याळवाली मस्जिदजवळ धुळे
धुळे
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मॅनेजर,एच.डी.एफ.सी.लाईफ इंन्‍शुरन्‍सकं.लि.
पहीला माळा,पटेल प्‍लाझा,रायसोनी हॉस्‍पीटल समोर, एम.जी.रोड,जळगांव
जळगांव
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. S.S. Joshi PRESIDING MEMBER
 HON'BLE MRS. K.S. Jagpati MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.

 

                                  ग्राहक तक्रार क्रमांक  –  ६१/२०१४

                                  तक्रार दाखल दिनांक  – १६/०४/२०१४                             तक्रार निकाली दिनांक – ०५/१२/२०१४

नासिर हुसेन अब्‍दुल रशिद बेग

उ.व.-३४ धंदा – पेंटर काम

रा.गल्‍ली नं.११, घर नं.७३७,

पारधी पिकेट पौलीस चौकीच्‍या मागे,

घडयाळवाली मसजीद जवळ, धुळे.                   . तक्रारदार

        विरुध्‍द

 

  • ,

एच.डी.एफ.सी. लाईफ इंश्‍युरन्‍स

कंम्‍पनी लिमीटेड, शाखा  कार्यालय पहिला माळा,

पटेल प्‍लाझा, रायसोनी हॉस्पिटल समोर ,

  • , जळगांव

नोटीसीची बजावणी

(मॅनेजर हयांचे वर करावी.)                      . सामनेवाला

 

  •  

 (मा.प्रभारी अध्‍यक्ष – श्री.एस.एस. जोशी)

 (मा.सदस्‍या – सौ.के.एस. जगपती)

उपस्थिती

(तक्रारदारातर्फे – अॅड.वाय.बी.जोशी)

(सामनेवालातर्फे – गैरहजर)

निकालपत्र

 (द्वाराः मा.प्रभारी अध्‍यक्ष – श्री.एस.एस. जोशी)

१.   सामनेवाले यांनी चुकीच्‍या नावाने विमा पॉलिसी दिली, ते नांव दुरूस्‍त करून मिळावे या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.

२.   तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीत नमूद केले आहे की, त्‍यांनी सामनेवाले  यांच्‍याकडून दि.२०/०१/२०१२ रोजी एच.डी.एफ.सी. लाईफ संपूर्ण समृध्‍दी ही विमा पॉलिसी घेतली होती.  तिचा क्रमांक १४८७५५६३ असा असून पॉलिसीची मुदत अकरा वर्षे एवढी आहे.  तक्रारदार यांनी पॉलिसीसाठी प्रस्‍ताव अर्ज भरून देतांना योग्‍य ती माहिती दिली आहे. मात्र सामनेवाले यांच्‍याकडून टपालाद्वारे पॉलिसीची प्रत प्राप्‍त झाली, त्‍यावेळी त्‍यात विमाधारकाच्‍या नावाच्‍या ठिकाणी तक्रारदार यांच्‍या नावाऐवजी त्‍यांचे मयत वडिल अब्‍दुल रशिद बेग यांचे नांव लिहिलेले  आढळून आले. सामनेवाले यांची ही चूक ध्‍यानात येताच तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याशी वारंवार संपर्क साधून नावात दुरूस्‍ती करून देण्‍याचे सांगितले.  सामनेवाले यांच्‍या अधिका-यांनीही तक्रारदार यांना आश्‍वासने दिली मात्र प्रत्‍यक्षात नावात दुरूस्‍ती झाली नाही. जोपर्यंत पॉलिसीतील नांवात दुरूस्‍ती होत नाही तोपर्यंत दि.२०/०१/२०१३ चा विमा हप्‍ता भरणार नाही असेही तक्रारदार यांनी कळविले होते. त्‍यानंतरही दुरूस्‍ती होवून मिळाली नाही. पॉलिसीतील विमाधारकाचे नांव चुकीचे आल्‍यामुळे भविष्‍यात विमा लाभापासून वंचित रहावे लागेल असे तक्रारदार यांचे म्‍हणणे आहे. त्‍यामुळे  सामनेवाले यांनी पॉलिसीतील नांव दुरूस्‍त करून द्यावे. तक्रारदार यांचा दि.२०/०१/२०१३ रोजीचा विमा हप्‍ता व २०१४ चा विमा हप्‍ता सामनेवाले यांनी भरावा,  मा‍नसिक व शारीरिक त्रासापोटी रूपये १०,०००/- द्यावे आणि तक्रारीचा खर्च रूपये १०,०००/- द्यावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.

 

 

३.  तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍ट्यर्थ शपथपत्र, पॉलिसी, प्रस्‍ताव अर्ज आदी कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत.

 

 

४.   मंचाची नोटीस मिळाल्‍यावरही सामनेवाले हजर झाले नाहीत व त्‍यांनी खुलासा दाखल केला नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍याविरूध्‍द ‘एकतर्फा’ आदेश पारीत करण्‍यात आला.

 

 

५.  तक्रारदार यांची तक्रार, त्‍यासोबत दाखल केलेली कागदपत्रे आणि तक्रारदार यांचे वकील श्री.वाय.बी. जोशी यांनी केलेला युक्तिवाद पाहता आम्‍ही सदर तक्रारीचे पुढीलप्रमाणे विवेचन करीत आहोत.

६.   तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडून एच.डी.एफ.सी. लाईफ संपूर्ण समृध्‍दी ही विमा पॉलिसी घेतली होती. या पॉलिसीची मुदत ११ वर्षे इतकी होती.  तक्रारदार यांनी पॉलिसी घेतांना प्रस्‍ताव अर्ज भरून दिला होता. त्‍याची छायांकीत प्रत तक्रारदार यांनी दाखल केली आहे.  या प्रस्‍ताव अर्जाच्‍या पान क्र.१० वर विमाधारकाचे नांव नमूद करण्‍यात आले आहे. त्‍या रकान्‍यात नासिर हुसेन अब्‍दुल बशीर असे नाव लिहिलेले दिसते. त्‍याखाली विमाधारकाच्‍या पालकांचे नाव नमूद केले आहे. या रकान्‍यात अब्‍दुल रशीद मोहंम्‍मद बशीर असे नाव लिहिलेले दिसते. प्रस्‍ताव अर्जाच्‍या पान क्र.१५ वर विमाधारकाची स्‍वाक्षरी आहे. त्‍याठिकाणीही विमाधारकाचे नांव नासिर हुसेन अब्‍दुल रशीद असे लिहिलेले दिसते. यावरून तक्रारदार यांनी विमा प्रस्‍तावासाठी अर्ज भरतांना आपले नांव नासिर हुसैन अब्‍दुल रशीद असे लिहिले असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. 

 

 

७.   सामनेवाले यांनी तक्रारदार यांना टपालाद्वारे विमा पॉलिसी पाठविली होती. त्‍याची छायांकीत प्रत तक्रारदार यांनी दाखल केली आहे. विमा पॉलिसीच्‍या या  प्रतीमध्‍ये विमा पॉलिसीचे नांव एच.डी.एफ.सी. लाईफ  संपूर्ण समृध्‍दी असे  नमूद करण्‍यात आले आहे. पॉलिसी क्रमांक १४८७५५६३ असा नमूद असून पॉलिसीचा दिनांक २०/०१/२०१२ असा लिहिण्‍यात आला आहे.  याच प्रतिवर विमा धारकाचे नांव अब्‍दुल रशीद नासिर हुसेन असे लिहिलेले दिसते. 

 

 

८.   तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या वरील दोन्‍ही कागदपत्रांवरून हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे विमा प्रस्‍ताव अर्ज भरतांना त्‍यांचे  नांव नासिर हुसेन अब्‍दुल रशीद असे लिहिले होते. मात्र तक्रारदार यांना प्रत्‍यक्षात  पॉलिसी मिळतांना त्‍यात अब्‍दुल रशीद नासिर हुसेन असे नाव लिहून आले. याचाच अर्थ सामनेवाले यांनी विमा पॉलिसी देतांना त्‍यात विमाधारकाचे चुकीचे नांव नमूद केले. 

 

 

९.   पॉलिसीत चुकीचे नाव लिहून आले आहे हे आढळून आल्‍यावर तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याशी संपर्क साधून पॉलिसीतील नांव दुरूस्‍त करून देण्‍याची वारंवार मागणी आणि‍ विनंती केली. मात्र सामनेवाले यांच्‍या अधिका-यांनी  केवळ आश्‍वासने देवून तक्रारदार यांची बोळवण केली. त्‍यांच्‍या पॉलिसीतील चुकीच्‍या नावाचे दुरूस्‍ती करून देण्‍याचे टाळले. वास्‍तविक पॉलिसीतील विमाधारकाचे नाव चुकीचे लिहले गेले आहे, ही बाब निदर्शनास येताच सामनेवाले यांनी स्‍वतःहून त्‍यात दुरूस्‍ती करून देणे अपेक्षित होते.  मात्र सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्‍या   विनंतीनंतरही त्‍यात दुरूस्‍ती करून देण्‍याचे टाळले ही त्‍यांनी दिलेली सेवेतील त्रुटीच आहे हे दिसून येते. 

 

 

१०.  तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडून स्‍वतःचे नावाने विमा पॉलिसी घेतली होती.  त्‍या पॉलिसीचा लाभ त्‍यांच्‍यासह त्‍यांच्‍या वारसांना मिळायला हवा हाच त्‍यामागे उद्देश होता.  मात्र विमा पॉलिसीत तक्रारदार यांच्‍या नावाऐवजी त्‍यांच्‍या मयत वडिलांचे नांव लिहून आल्‍याने पॉलिसीच्‍या मूळ तत्‍वांना आणि तक्रारदार यांच्‍या उद्देशालाच बाधा पोहचते हे नाकारता येत नाही.  पॉलिसीतील विमा धारकाचे नांव चुकीचे लिहून आल्‍यामुळे भविष्‍यात तक्रारदार आणि त्‍यांच्‍या  वारसांना पॉलिसीतील लाभांपासून वंचित राहावे लागू शकते, ही तक्रारदार यांची  भीती, शंका रास्‍त आहे. त्‍याबाबत सामनेवाले यांनी कोणतेही स्‍पष्‍टीकरण  दिलेले नाही.

 

 

११.  वरील मुद्यांचा विचार करता पॉलिसीतील विमा धारकाचे नाव चुकीचे लिहून आले आहे ते दुरूस्‍त करून मिळावे ही तक्रारदार यांची मागणी अगदी योग्‍य असल्‍याचे आणि सामनेवाले यांनी ही चूक निदर्शनास येताच दुरूस्‍त करणे आवश्‍यक होते असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.  याच कारणामुळे तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्‍यात यावी एवढेच नव्‍हे तर केवळ सामनेवाले यांच्‍या दुर्लक्षामुळे, टाळाटाळीमुळे त्‍यांना सदरची तक्रार दाखल करावी लागली, त्‍याचा खर्च सहन करावा लागला आणि परिणामी मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागले, त्‍याची भरपाईही त्‍यांना मिळायला हवी असे या मंचाचे मत आहे.  म्‍हणून आम्‍ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.

 

 

 

 

आ दे श

 

१.  तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 

२. सामनेवाले यांनी या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून पुढील तीस दिवसांच्‍या आत,

 

    (अ)  तक्रारदार यांनी घेतलेल्‍या एच.डी.एफ.सी. लाईफ संपूर्ण समृध्‍दी           इन्‍शुरन्‍स प्‍लॅन पॉलिसी क्र.१४८७५५६३  मधील विमाधारकाच्‍या              नावाची दुरूस्‍ती करून द्यावी.

 

    (ब)  तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रूपये २,०००/- आणि तक्रारीचा            खर्च रूपये १,०००/- द्यावा. 

 

    (क)  तक्रारदार यांच्‍याकडून जानेवारी – २०१३ व जानेवारी – २०१४ हे               वार्षिक हप्‍ते भरून घेवून त्‍यांची पॉलिसी पूर्ववत ठेवावी. 

 

  1.  

दिनांक ०५/१२/२०१४

(सौ.के.एस. जगपती)  (श्री.एस.एस. जोशी)

सदस्‍या          प्र.अध्‍यक्ष

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.

 
 
[HON'BLE MR. S.S. Joshi]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MRS. K.S. Jagpati]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.