नि. १२
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २२८१/२००९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ०४/१२/२००९
तक्रार दाखल तारीख : १४/१२/२००९
निकाल तारीख : १७/११/२०११
----------------------------------------------------------------
श्री संजय लक्ष्मण कुडचे
व.व. ३८, धंदा – व्यापार,
रा.दक्षिण शिवाजीनगर, मालू हायस्कूलजवळ,
सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
व्यवस्थापक
जि.३, मनी फायनान्शिअल सर्व्हिसेस लि.
शिव पॅव्हेलियन, राम मंदीर कॉर्नर, सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.आर.बी.ढगे
जाबदार : एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज जाबदार यांनी दिलेल्या सदोष सेवेबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून यामाहा क्रक्स हे वाहन खरेदी करणेसाठी सन २००६ मध्ये रक्कम रु.२३,८२९/- चे कर्ज घेतले होते. सदर कर्जाची प्रतिमहिना रु.९९३/- प्रमाणे एकूण ३४ हप्त्याने व्याजासह परतफेड करण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी घेतलेली संपूर्ण कर्जाची रक्कम व त्यावरील व्याज याची ठरल्याप्रमाणे परतफेड करुन जाबदार यांचेकडून ना हरकत पत्राची मागणी केली असता जाबदार यांनी पत्र देण्यामध्ये टाळाटाळ केली. त्यामुळे सदर कंपनीचा बोजा तक्रारदार यांच्या वाहनाच्या रेकॉर्डसदरी राहिला आहे. त्याबाबत तक्रारदार यांनी दि.२१/१०/२००९ रोजी जाबदार यांना रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली. सदर नोटीसला जाबदार यांचेकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. जाबदार यांनी दिलेल्या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ६ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार रजि.पोस्टाने नोटीस पाठवूनही ते याकामी हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला.
४. तक्रारदार यांनी नि.९ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तसेच नि.११ चे यादीने ४ कागद दाखल केलेले आहेत.
५. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे व लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारअर्जासोबत जाबदार व तक्रारदार यांचेमध्ये झालेले करारपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये वाहनाबाबत काय करार झाला होता हे समजून येत नाही. तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये वाहनाच्या नोंदणीबाबत ना हरकत दाखला मिळावा अशी मागणी केली आहे. परंतु प्रस्तुत तक्रारअर्जाचे कामी जाबदार यांचा सदर वाहनावर बोजा आहे हे दर्शविण्यासाठी कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी संपूर्ण ३४ हप्त्यांच्या रकमेची परतफेड केली असे नमूद केले आहे व ही रक्कम जाबदार यांना मिळाली हे दर्शविण्यासाठी नि.११ च्या यादीने बॅंकेचे पासबुक दाखल केले आहे. सदर पासबुकाचे अवलोकन केले असता सदर पासबुक हे दिनेश ज्ञानदेव कुडचे यांचे नावचे आहे. सदर खात्यावरुन ३४ चेक वटले आहेत असे तक्रारदार यांनी दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर खातेउतारा हा तक्रारदार यांचे नावचा नसून दिनेश कुडचे यांचे नावचा आहे. सदर दिनेश कुडचे व तक्रारदार यांचा काय संबंध व त्यांचा प्रस्तुत कर्जप्रकरणाशी काय संबंध येतो ? याचा उल्लेख तक्रारअर्जामध्ये करण्यात आलेला नाही. तसेच सदरची बाब दर्शविण्यासाठी तक्रारदार यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणलेला नाही. सदर दिनेश कुडचे यांच्या पासबुकावरुन तक्रारदार यांचे कर्ज फिटले हे मानणे संयुक्तिक ठरणार नाही असे या मंचाचे मत आहे. जाबदार यांना रजि.पोस्टाने नोटीस पाठविली हे दाखविण्यासाठी तक्रारदार यांनी नि.५/५ वर नोटीसची स्थळप्रत दाखल केली आहे व सदरची नोटीस जाबदार यांना मिळाली हे दाखविण्यासाठी नि.५/६ वर पोस्टाची पोहोच पावती दाखल केली आहे. सदर नोटीस व पोहोचपावतीचे अवलोकन केले असता नोटीसमध्ये जाबदार यांचा सांगलीमधील पत्ता नमूद आहे व पोहोचपावतीवर मात्र दिल्लीमधील पत्ता नमूद आहे. त्यामुळे सदर नोटीसीचीच पोहोच पावती आहे का याबाबत साशंकता निर्माण होते. प्रस्तुत प्रकरणी जाबदार यांनी कोणतेही म्हणणे दाखल केले नाही व ते याकामी उपस्थित राहिले नाहीत तरीही प्रस्तुतच्या तक्रार अर्जातील मागणी योग्य त्या कागदोपत्री पुराव्यांसह शाबीत करण्याची जबाबदारी तक्रारदार यांची आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेला कागदोपत्री पुरावा हा अपूर्ण आहे त्यामुळे तक्रारदार हा मागणीप्रमाणे कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: १७/११/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११