- आदेश- नि. 1 वर
( दि.06/06/2018)
द्वारा : मा. श्री. व्ही. ए. जाधव, अध्यक्ष.
1) यातील तक्रारदार ग्रामपंचायत केळये यांनी दि. 23-02-2012,14-08-2012 व 14-09-2012 रोजीचे मिटींगमध्ये ठराव करुन सामनेवाला 1 व 2 कंपनीकडून"सौरपथदिप" बसविणेबाबत कोटेशन मागविले होते. सामनंवाला 1 या कंपनीचे नाव MEDA च्या अधिकृत यादीमध्ये समाविष्ट आहे. महाराष्ट्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण यांनी दि. 17-07-2012 मध्ये केलेल्या दर करारामध्ये सदरचे सौरदिप पथदिवे हे नमूद एजन्सीकडून खरेदी करणेचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण यांचेबरोबर दि. 17-07-2012 रोजी सामनेवाला 1 याने दर करार केला असलेने कोटेशनप्रमाणे तक्रारदार ग्रामपंचायतीने (1) ग्रामनिधी अंतर्गत 16 सौरपथदिप- किंमत 16x119750 =3,16,000/-, (2) पर्यावरण संतुलित समृध्द ग्रामयोजना अंतर्गत 13 सौरपथदिप किंमत 13 x 20500 = 2,66,500/- अशी एकूण रक्कम रु. 5,82,500/- इतकी रक्कम तक्रारदार ग्रामपंचायतीने तक्रारदार यांना अदा केली असून उर्वरीत रक्कम रु. 15,800/- मात्र सेक्युरिटीपोटी तक्रारदार ग्रामपंचायतीकडे जमा आहे. सामनेवाला 1 यांनी बसवलेल्या काही सौरपथदिपाबाबत वर्क कंप्लीशन रिपोर्ट देण्यात आलेला आहे. करारपत्रानुसार बसवण्यात आलेल्या दिव्यांसाठी पाच वर्षापर्यंत फ्री मेंटेनन्स करण्याचे सामनेवाला कंपनीवर बंधनकारक होते. सामनेवाला 1 यांची तक्रारदार ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्रात 2012 साली सौरपथदीप बसवण्याचे काम व मेंटेनन्स करण्याची जबाबदारी होती.
तक्रारदार ग्रामपंचायत तक्रार अर्जात पुढे नमूद करतात, सामनेवाला 1 यांनी 30 सौरपथदिपांपैकी 29 सौरपथदिपे बसविले. 30 सौरपथदिपांपैकी फक्त 7 ते 8 सौरपथदिपांची पाहणी केली असता ते सर्व सौरपथदिप नादुरुस्त/बंद अवस्थेत असल्याचे आढळले. त्याबद्दल तक्रारदार ग्रामपंचायतीने सामनेवाला 1 यांना दि. 19-03-2016 व 15-03-2016 रोजी सौरपथदिपांची दुरुस्तीकरणेबाबत कळविले होते. परंतु सौरपथदिपांची दुरुस्ती करणेबाबत कोणतीही उपाययोजना केली नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेमध्ये कसूर केली आहे. तक्रारदार केळये ग्रामपंचायतीचे हद्दीत बंद असलेले सौर दिवे चालू करणेचे आदेश करणेत यावेत. तसेच तक्रारदार केळये ग्रामपंचायतीने सामनेवाला 1 व 2 यांना अदा केलेली रक्कम रु.5,66,700/- इतकी रक्कम दि.22-03-2013 रोजी पासून द.सा.द.शे.10 टक्के व्याजाने नुकसान भरपाई अदा करावी. ग्रामपंचायतीला झालेल्या त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.2,00,000/- देणेचे आदेश करणेत यावेत अशी विनंती तक्रारदार केळये ग्रामपंचायतीने मंचाकडील तक्रार अर्जात विनंती केली आहे.
2) प्रस्तुत तक्रार अर्जात तक्रारदार ग्रामपंचायत केळये यांनी नि. 15 वर दि. 13-04-2018 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेमध्ये मे. कोर्टाबाहेर तडजोड झालेली असून त्याप्रमाणे सदर तक्रार मागे घेणेबाबत तक्रारदार ग्रामपंचायतीने ठराव देखील पारीत केलेला आहे. त्यामुळे सदरची तक्रार यापुढे चालविण्याची नसलेने निकाली करणेत यावी अशी तक्रारदार ग्रामपंचायत, केळये यांनी पुरसीशीत नमूद केले आहे.
3) तक्रारदार ग्रामपंचायत, केळये यांनी दि. 13-04-2018 रोजी नि. 15 वर तडजोड पुरसीस दाखल करुन पुरसीसीमध्ये नमूद केलेप्रमाणे उभय पक्षकारांमध्ये सामनेवाला यांचेमध्ये मे. कोर्टाबाहेर तडजोड झालेली असून त्याप्रमाणे सदर तक्रार मागे घेणेबाबत तक्रारदार ग्रामपंचायतीने ठराव पारीत केलेला आहे. सबब, तक्रारदाराचे तडजोड पुरसीसीस अनुसरुन मंच खालील आदेश पारीत करीत आहे. सबब, आदेश खालीलप्रमाणे.
- आदेश -
1) तक्रार अर्ज निकाली करणेत येतो.
2) तक्रारदारांची नि.15 वरील दि. 13-04-2018 रोजीची तडजोड पुरसीस ही या आदेशाचा एक भाग समजणेत यावा.
4) उभय पक्षकांराना सदरच्या आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.