ग्राहक तक्रार क्र. : 186/2014
दाखल तारीख : 25/09/2014
निकाल तारीख : 31/07/2015
कालावधी: 0 वर्षे 10 महिने 06 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. ललीताबाई भ्र. सिताराम डिघुळे,
वय - 45 वर्षे, धंदा – घरकाम,
रा.कलदेव निंबाळा, ता.उमरगा, जि. उस्मानाबाद.
2. सिताराम पिता सदन डिघुळे,
वय – 50 वर्षे,
धंदा – मजूरी, रा. सदर. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. व्यवस्थापक,
फिनामिनल इंडस्ट्रीज लि. हाऊस नं.101 ए,
दिव्या स्मृती लिंक रोड, मालाड, वेस्ट, मुंबई -43064.
2) व्यवस्थापक,
फिनामिनल इंडस्ट्रीज लि.कंपनी,
माणिकवार कॉम्पलेकस, पोलिस स्टेशनच्यासमोर,
उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.जी.के.गायकवाड/अॅड.आपचे.
विरुध्द पक्षकारा क्र.1 व 2 तर्फे विधीज्ञ : श्री.बी.बी.कुलकर्णी.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा:
अ) 1. तक क्र. 1 व 2 हे कलदेवनिंबाळा ता. उमरगा येथील रहिवाशी असून त्यांनी विप कडून Family Economi पॉलिसी घेतली असुन तो विप क्र.1 व 2 यांचा सभासद असुन त्याचा सभासद क्र.जी.ए.बी.4122702010 असा असुन सदरची पॉलिसी दि.23 जानेवारी 2010 ते दि.22 जानेवारी 2019 या कालावधीसाठी असुन अर्जदारानेही पॉलिसी घेत असतांना एकुण सभासद फिस रु.5,000/- विप क्र.2 यांच्या मार्फत विप क्र.1 यांच्याकडे भरलेली आहे व त्याचे सभासद प्रमाणपत्र विप क्र.1 यांनी अर्जदारांनी दिलेले आहे. सदर पॉलिसीनुसार एखाद्या फॅमीली मेंबरचा अपघाती मृत्यु झाल्यास वारसांना रु.1,00,000/- देण्याची जोखीम सदरच्या कंपनीने स्विकारलेली आहे.
2. अर्जदाराचा मुलगा नामे शिवशंकर उर्फ शंकर सिताराम डिघुळे हा भगवान यादव पाटील व अनंत यादव पाटील रा.कलदेव निंबाळा ता. उमरगा यांच्या मालकीची शेत जमिन गट क्र.74 विहिरीतील गाळ काढण्यासाठी मजूरीने दि.02/03/2014 रोजी काम करत असतांना क्रेन विहिरीत पडल्याने गंभीर स्वरुपात जखमी झाला व दि.04/03/2014 रोजी मयत झाला आहे. याची माहिती दि.15/03/2014 रोजी अर्जदार क्र.2 यांनी पोलिस स्टेशनला दिली व त्या अनुषंगाने भगवान पाटील व अनंत पाटील यांवर पोलिस स्टेशन मुरुम येथे गुन्हा रजि. क्र.30/2014 कलम 204 अ भा.दं.वि. प्रमाणे रजिस्टर करण्यात आला व दि.14/03/2014 रोजी घटनास्थळ पंचनामा करण्यात आला होता व दि.04/03/2014 रोजी इन्वेष्ट पंचनामा करुन दि.04/03/2014 रोजी पी.एम. करण्यात आले. पी.एम. रिपोर्टवरुन डोक्यास जब्बर मार लागल्यामुळे तो मयत झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. दि.26/03/2014 रोजी विप क्र.1 यांना सदर घटनेची माहीती देण्यात आली तसेच पोलिस पेपरची पुर्तता केली. विप क्र.12 यांना रकमेच्या संदर्भात ब-याच वेळा चोकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणुन अर्जदाराने विप क्र.1 व 2 यांना आपल्या विधीज्ञाना मार्फत दि.02/06/2014 रोजी कायदेशीर नोटीस पाठवली. यावर विप क्र. 1 ने मेंबरशिपच्या अटीप्रमाणे सदर घटनेची माहिती व कागदपत्रे एक महिन्याच्या आत विप क्र.1 यांच्याकडे पाठवयास पाहिजे होती ती न पाठविल्यामुळे अर्जदारास नमुद मेंबरशिप मधील रक्कम देता येत नाही असे कळविले. म्हणून विप यांनी सेवेत त्रुटी केल्यामुळे रु.25,000/- नुकसान भरपाई देण्याचा आदेश व्हावा तसेच अर्जदारास सदर प्रकरणाचे खर्चापोटी रु.5,000/- व विमा रक्कम रु.1,00,000/- द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
ब) सदर प्रकरणी विप यांना नोटीस पाठविण्यात आली असता त्यांनी आपले म्हणणे दि.02/02/2014 रोजी दाखल केले.
तक्रारदाराने सदरची तक्रार विप विरुध्द नियमबाहय दाखल केलेली आहे. तक यांनी यांनी फॅमिल इकॉनॉमी पॉलिसी घेतलेली आहे हे खोटे आहे. तक विप क्र.1 व 2 यांचे सभासद असल्याचे मान्य. अटी व शर्तीनुसार घटना घडल्यापासून 1 महिन्यात कागदपत्राची पुर्तता करणे आवश्यक आहे ती तक ने केली नाही. अर्जदार क्र. 2 हा मयत मुलगा नामे शिवशंकर ऊर्फ शंकर त्याचा कायदेशीर वारस होऊ शकत नाही. म्हणून सदरची तक्रार खोटी व चुकीची आहे म्हणून सदरची तक्रार खर्चासह रद्द करावी व रु.1,00,000/- नुकसान भरपाई पोटी व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व रु.5,000/- अर्जाचा खर्च देण्यात यावा अशी विनंती केली आहे.
क) तक्रारदार यांची तक्रार व सोबत दाखल कागदपत्रे तसेच विप यांचे म्हणणे व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले. उभयतांचा लेखी युक्तिवाद वाचला तोंडी युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणात आमच्या विचारार्थ खालीलप्रमाणे मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये निष्कर्ष
1) विरुध्द पक्षकाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
2) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
ड) कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 :
1) तक्रारदाराची प्रमूख तक्रार अशी की मयत शंकर याचे अपघाता संबंधीचे सर्व कागदपत्रे उपलब्ध करुन दिल्यावर देखील विप यांनी Family Economi पॉलिसी नुसार रु.1,00,000/- विप देय असतांना ते न दिल्याने विप ने सेवेत त्रुटी केली म्हणून सदरची रक्कम मिळावी अशी तक्रार दाखल केली आहे. सदर बाबत विप यांनी आपले म्हणण्यात तक यांनी Family Economy पॉलिसी घेतली नसून पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार घटना घडल्यापासून एक महिन्यात सदरची कागदपत्रे तक यांनी विप कडे जमा करणे आवश्यक असतांना ती न केल्याने तक सदर रक्कम मिळण्यास अपात्र ठरतात असे म्हंटले आहे. त्या अनुषंगाने कागदपत्रांची पडताळणी केली असता तक यांनी अभिलेखावर दाखल केलेल्या पॉलिसीच्या प्रमाणपत्राची पाहणी केली असता PHENO MENAL असे वर नाव नमूद असलेले मेंबर शिप क्र.GMB4122702010 असून Type : FAMILY ECONOMY, Plan : 20, digule sitaram sadan2 digule lalitabai sitaram, 3. Digule shivshankar sitaram, 4. Digule suvarna sitaram, 5. Digule Satyam Sitaram असे नाव नमूद असून Membership Fees रु.50,000/- व towards Membership:1,00,000/- असे नमूद केले आहे. या वरुन तक यांनी म्हंटल्याप्रमणे family economi पॉलिसी असल्याचे दिसून येते. तसेच विप यांच्या म्हणण्याच्या प्रित्यर्थ कोणतेही कागदपत्रे दाखल केली नाही किंवा तक यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावर आक्षेप जो काही घेतला आहे त्यांचे संदर्भात इतर कागदपत्रे दाखल केली नाहीत. पॉलिसी 2010 मध्ये घेतलेली असून मृत्यू 2014 ला झाला आहे त्यामुळे पहिले दोन हप्ते भरल्यानंतरच हा अपघात झाला आहे या संदर्भात तसेच विप यांनी पॉलिसीबाबतची माहिती तक यांच्या प्रमाणपत्रावरुन खरी असल्याचे दिसते करीता विप यांचे म्हणणे की तक यांनी मुदतीत सर्व कागदपत्रासह क्लेम दाखल केला नाही यास पुष्टी मिळत नाही. म्हणून विप यांनी तक यांना सेवा देतांना त्रुटी केली या मतास हे मंच आले आहे म्हणून आम्ही पुढीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक यांची तक्रार मंजूर करण्यात येते.
1) विप यांनी तक यांना रु.1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त) रक्कम अदा करावी.
2) वरील रकमेवर विप यांनी तक यांना तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे.9 दराने व्याज द्यावे.
3) तक यांना विप यांना तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/-(रुपये तीन हजार फक्त) द्यावे.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (मा.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.