जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/308 प्रकरण दाखल तारीख - 22/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 25/02/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या सौ.चिञलेखा शिवाजी जारे, वय वर्षे 32, धंदा मजूरी रा.तरोडा (खु) ता.जि.नांदेड. अर्जदार. विरुध् मॅनेजर, फिनामिनल हेल्थ केअर सर्व्हीसेस लि. मुंबई, शाखा महावीर चौक, नांदेड गैरअर्जदार अर्जदारा तर्फे वकील - अड.पी.एम.कंधारे गैरअर्जदारा तर्फे वकील - कोणीही हजर नाही. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) 1. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार व त्यांचे पती यांनी गैरअर्जदार यांचेकडून पॉलिसी घेतली व सदर पॉलिसीची मेंबरशिप नऊ वर्षासाठी होती. सदर पॉलिसीचा नंबर जीएमबी 1907172008 असा असून ती दि.27.08.2008 रोजी घेतली. त्या पॉलिसी एकमूस्त रक्कम रु.20,910/- भरली व पॉलिसीची समाप्तीची दि.26.08.2017 होती व त्यादिवशी रु.40,000/- देण्याचे कबूल केले होते. अर्जदार व त्यांचे पतीचे आजारपणामध्ये वर्षातून 15 वेळा जनरल डॉक्टराकडून मोफत वैद्यकीय सुवीधा व तज्ञ डॉक्टराकडून पाच वेळा मोफत तपासणी केली जाणार होती. तसेच कूठल्याही दवाखान्यात इलाज केला तर रु.15,000/- पर्यतचा क्लेम दिला जाईल असे सांगितले होते व सदर नियमावली तक्रारीसोबत जोडली आहे. अर्जदार यांना आजारी पडल्यानंतर धोंडगे हॉस्पीटल मध्ये दाखवून इलाज केला त्यासाठी रु.20,000/- ते रु.25,000/- खर्च झाला, सदर खर्च हा अर्जदार यांनीच केला आहे. दि.17.2.2010 रोजी अर्जदार यांना शरीक करण्यात आले व दि.23.02.2010 पर्यत शरीक राहावे लागले. या कालावधीतील मेडीकल खर्च झाला तो गैरअर्जदार यांना पावत्यासह दाखल करुन मागण्यात आला परंतु गैरअर्जदार यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. शेवटी गैरअर्जदार यांच्या कार्यालयातील अधिका-यांनी तूमचा क्लेम मंजूर होत नाही म्हणून हाकलून दिले. म्हणून अर्जदारास प्रचंड मानसिक धक्का बसला असून त्यांचे आर्थिक नूकसान झाले आहे, अर्जदार यांनी दि.4.10.2010 रोजी वकिलामार्फत गैरअर्जदार यांना नोटीस पाठविली ती नोटीस दि.5.10.2010 रोजी गैरअर्जदार यांना प्राप्त झाली परंतु गैरअर्जदार यांनी सदर नोटीसचे उत्तर वा क्लेम मंजूर केला नाही. म्हणून त्यांनी सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, इलाजासाठी लागलेला खर्च रु.15,000/- तसेच नूकसान भरपाई रु.10,000/-, असे मिळून रु.25,000/- मिळावेत. गैरअर्जदार यांना मंचाने नोटीस पाठविली, नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. अर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासल्यानंतर व अर्जदाराचा यूक्तीवाद ऐकल्यानंतर जे मूददे उपस्थित होतात ते मूददे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे. मुद्ये. उत्तरे. 1. अर्जदार हे ग्राहक आहे काय ? होय. 2. अर्जदार यांने केलेली मागणी पूर्ण करण्यास गैरअर्जदार जबाबदार आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- गैरअर्जदर यांचेकडे अर्जदाराने पॉलिसी घेतलेली आहे. त्याबददल पुरावा म्हणून पॉलिसी कॉपी अर्जदाराने दाखल केलेली आहे म्हणून अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत त्यास्तव मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 ः- अर्जदाराने काढलेल्या पॉलिसीची मेंबरशिप नऊ वर्षासाठी होती. सदर पॉलिसीचा नंबर जीएमबी 1907172008 असा असून ती दि.27.08.2008 रोजी घेतली. त्या पॉलिसी एकमूस्त रक्कम रु.20,910/- भरली व पॉलिसीची समाप्तीची दि.26.08.2017 होती व त्यादिवशी रु.40,000/- देण्याचे कबूल केले होते. अर्जदार व त्यांचे पतीचे आजारपणामध्हये वर्षातून 15 वेळा जनरल डॉक्टराकडून मोफत वैद्यकीय सुवीधा व तज्ञ डॉक्टराकडून पाच वेळा मोफत तपासणी केली जाणार होती. तसेच कूठल्याही दवाखान्यात इलाज केला तर रु.15,000/- पर्यतचा क्लेम दिला जाईल असे सांगितले होते व ही नियमावली अर्जदाराने तक्रारीसोबत जोडलेली आहे. अर्जदार यांनी आजारी पडल्यानंतर धोंडगे हॉस्पीटल मध्ये दाखवून इलाज केला त्यासाठी रु.20,000/- ते रु.25,000/- खर्च आला, सर्व खर्च हा अर्जदार यांनीच केला आहे. दि.17.2.2010 रोजी अर्जदार यांना शरीक करण्यात आले व दि.23.02.2010 पर्यत भरती राहावे लागले. अर्जदारास वैद्यकीय विलाजासाठी लागलेला खर्च अर्जदाराने स्वतः हा केलेला आहे व सदरील खर्चा बाबतची बिले अर्जदाराने तक्रार अर्जासोबत जोडलेली आहे. अर्जदाराने दि.04.10.2010 रोजी वकिलामार्फत पाठवलेली कायदेशीर नोटीस मिळून व अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीची मंचाची नोटीस मिळूनही गैरअर्जदार हजर झाले नाहीत व संधी असूनही त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले नाही. म्हणून त्यांचे विरुध्द दि.04.02.2011 रोजी एकतर्फा प्रकरण चालवण्याचा आदेश झाला. अर्जदारा सोबत केलेल्या पॉलिसीतील कराराचा व अटींचा भंग गैरअर्जदाराने केलेला आहे, असे करुन गैरअर्जदार यांनी सेवेतील ञूटीच केलेली आहे असे दिसून येते. म्हणून अर्जदारास वैद्यकीय ईलाजासाठी रु.15,000/- व मानसिक ञास व दावा खर्च याबददल रु.5,000/- एक महिन्यात गैरअर्जदार यांना दयावेत असा आदेश हे मंच पारीत करीत आहे असे न केल्यास गैरअर्जदार यांनी रक्कम पूर्ण देईपर्यत 9 टक्के व्याज अर्जदारास दयावे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो.1. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना वैद्यकीय खर्चासाठी रु.15,000/- व मानसिक ञास व दावा खर्च म्हणून रु.5,000/- दयावेत, असे न केल्यास रक्कम फिटेपर्यत 9 टक्के व्याज दयावे लागेल. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा.3. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |