Maharashtra

Gadchiroli

CC/22/2014

Shri. Rajnish Shrawan Kolhe, Pro.Pra. R.K. Traders, Gadchiroli - Complainant(s)

Versus

Manager, Escorts Construction Equipment Ltd. Nagpur & 2 Others - Opp.Party(s)

Adv. K. A. Jiwani

28 Nov 2014

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Gadchiroli, M.I.D.C. Road, T - Point, Navegaon, Tah. Dist. Gadchiroli, Pin No. 442605.
Maharashtra
 
Complaint Case No. CC/22/2014
 
1. Shri. Rajnish Shrawan Kolhe, Pro.Pra. R.K. Traders, Gadchiroli
Age- 30 Yr., Occu.- Business, At. Armori Road, Gadchiroli, Tah. Dist. Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, Escorts Construction Equipment Ltd. Nagpur & 2 Others
First Floor, Bajaj Wing, Mangalwadi Complex, Sadar Nagpur, Tah. Dist. Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Manager, Escorts Construction Equipment Ltd. Hariyana.
Plot No. 219, Sector 58, Balagad, Faridabad, Hariyana
Faridabad
Hariyana
3. Manager, Kosfield Sells & Servises Nagpur
Block No. 313, A- Third Floor, Bajaj Wing, Mangalwadi Complex, Sadar, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vijay C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MR. Sadik M. Zaveri MEMBER
 HON'BLE MS. Roza F. Khobragade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(निशाणी क्र.1 वर )

(मंचाचे निर्णयान्‍वये, श्री विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्‍यक्ष)

(पारीत दिनांक : 28 नोव्‍हेंबर 2014)

                                      

1.                 अर्जदाराने सदर तक्रार दाखल केली असून,  तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

2.          अर्जदार आर.के.ट्रेडर्स या नावाने रेतीघाट लिलावाव्‍दारे खेरीदी करतो व त्‍याचेकडे स्‍वतःचे 3 ट्रक, पोकलॅन्‍ड मशीन, एक ट्रक्‍टर व इतर किरायाने घेतलेल्‍या वाहनाव्‍दारे रेतीची वाहतुक करतो.  अर्जदाराने दि.26.6.2014 ला गैरअर्जदाराकडून एस्‍कार्ट 14 टन हॉयड्रोलीक मोबाईल क्रेन मॉडेल नं.हायड्रा-14 रुपये 14,70,000/- ला इंडूसलड बँक फायनांस कंपनीव्‍दारे खरेदी केले.  दि.28.6.2014 ला उपरोक्‍त मशीन अर्जदारास गडचिरोली येथे आणून देण्‍यात आली.  अर्जदाराने उपरोक्‍त मशीनचा वापर सुरु केला असता पहिल्‍यास दिवशी लक्षात आले की, सदर मशीन ही जास्‍त डिझल उपयोगात आणते, मशीनची कार्यक्षमता ही निकृष्‍ठ दर्जाची आहे, तसेच ठरावीक वेळेनंतर आपोआप बंद होते, ऑईल लिकेज प्रॉबलेम व कार्यक्षमतेनुसार मशीन काम करीत नाही.  अर्जदाराने उपरोक्‍त दोष गैरअर्जदाराचे वारंवार लक्षात आणून दिले. गैरअर्जदाराने दि.30.6.2014 ला भेट देवून अर्जदाराची मशीनची तपासणी केली.  अर्जदाराने गैरअर्जदारास मशीन परत घेवून जाण्‍यास सांगितले व मशीन खरेदी रक्‍कम परत करण्‍यास सांगितले. गैरअर्जदाराने आजतागायत मशीन परत नेलेली नाही व मशीन खरेदी रक्‍कम अर्जदारास परत केलेली नाही.  त्‍यामुळे, गैरअर्जदाराने मशीन खरेदी करण्‍याकरीता आलेला खर्च रुपये 14,70,000/-,  नुकसान भरपाई खर्च रुपये 3,60,000/- मानसिक ञासापोटीचा खर्च रुपये 1,00,000/- असे एकूण रुपये 18,30,000/- अर्जदारास देण्‍याचा आदेश पारीत करण्‍याची विनंती केली.  

 

3.          अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 3  दस्‍ताऐवज दाखल केले.  सदर प्रकरण प्राथमिक सुनावणीकरीता ठेवण्‍यात आले. अर्जदाराचे वकील यांनी दि.25.11.2014 ला तक्रारीत प्राथमिक युक्‍तीवाद केला व अर्जदाराचे वकीलांनी सदर तक्रारीत या मंचाचे कार्यक्षेञ चालविण्‍याचा अधिकार आहे किंवा नाही याबाबत अर्जदाराचे वकीलांने अतिरिक्‍त सुनावणी करीता दि.27.11.2014 ला प्रकरण ठेवण्‍यात यावे अशी विनंती केली. सदर प्रकरणात अर्जदारास दि.27.11.2014 ला अतिरिक्‍त प्राथमिक युक्‍तीवादाकरीता संधी देवूनही मंचासमक्ष अनुपस्थित राहीले. मंचाने 4 वाजे पर्यंत वारंवार अर्जदाराचे वकीलाचा पुकारा केला असता, मंचासमक्ष गैरहजर राहिले. सबब, सदर तक्रार आज दि.28.11.2014 ला प्राथमिक आदेशाकरीता ठेवण्‍यात आले. सदर तक्रार व दाखल दस्‍ताऐवज यांची पडताळणी करुन व दि.25.11.2014 ला अर्जदार तर्फे वकीलाची प्राथमिक युक्‍तीवादावर मंचाचे मताप्रमाणे खालील कारणे व निष्‍कर्षावरुन नि.क्र.1 वर आदेश पारीत करण्‍यात येत आहे.  

                                                      

- कारणे व निष्‍कर्ष

       

 

5.          अर्जदाराने नि.क्र.7 वर गैरअर्जदाराकडून घेतलेले मोबाईल क्रेनचे देयक दाखल केले.  सदर देयकाची पडताळणी करतांना असे दिसले की, गैरअर्जदाराने सदर देयक तालुका पनवेल, जिल्‍हा – रायगड महाराष्‍ट्र येथून जारी केला होता.  सदर तक्रारीत अर्जदाराने गैरअर्जदारांचा पत्‍ता नागपूर व फरिदाबाद, हरियाणा असे दर्शविले आहे.  सदर क्रेन खरेदीकरीता अर्जदाराने गैरअर्जदाराकडे कोणत्‍या ठिकाणी खरेदी रक्‍कम दिली याबाबत तक्रारीत काहीही उल्‍लेख नाही.  तसेच, गैरअर्जदाराचा गडचिरोली जिल्‍ह्यामध्‍ये कोणती शाखा आहे याबाबत तक्रारीत कोणताही उल्‍लेख नाही.  अर्जदाराने सदर तक्रार दाखल करण्‍याचे कारण गडचिरोली मध्‍ये घडले याबाबत सुध्‍दा तक्रारीत काहीही उल्‍लेख केलेला नाही.  ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 11 (2) प्रमाणे सदर तक्रार या मंचाच्‍या कार्यक्षेञात बसत नसल्‍यामुळे सदर तक्रारीत खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

                 

                                                                    -  अंतिम आदेश  -

 

(1)   अर्जदाराची तक्रार अस्विकृत करण्‍यात येत आहे.

 

(2)   अर्जदाराच्‍या तक्रारीची मुळ प्रत सोडून उरलेली प्रत व दस्‍ताऐवज अर्जदारांना परत करण्‍यात यावी.  

 

                        (3)   अर्जदाराला आदेशाची प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी.

गडचिरोली.

दिनांक :- 28.11.2014

 
 
[HON'BLE MR. Vijay C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Sadik M. Zaveri]
MEMBER
 
[HON'BLE MS. Roza F. Khobragade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.