Maharashtra

Bhandara

CC/14/87

Dr. Mohan Keshavrao Hedaoo - Complainant(s)

Versus

Manager, Eros Hyundai - Opp.Party(s)

Adv. C.S. Nikhade

19 Nov 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/14/87
( Date of Filing : 08 Dec 2014 )
 
1. Dr. Mohan Keshavrao Hedaoo
R/o. Sangadi, Post. Sangadi, Tah. Sakoli, Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, Eros Hyundai
Car Showroom and Office and Sales - Gayatri Sadan, Ghat Road, Nagpur
Nagpur
MAHARASHTRA
2. Manager, Eros Hyundai
Car showroom and Office and Car Servicing Centre - Nagpur Road, Bhandara
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:Adv. C.S. Nikhade, Advocate
For the Opp. Party: Adv.J.A.Vora, Advocate
Dated : 19 Nov 2018
Final Order / Judgement

:: निकालपत्र ::

                                                                  (पारीत व्‍दारा श्रीमती स्मिता निळकंठ चांदेकर, मा.सदस्‍या.)

                                                                             (पारीत दिनांक–19 नोव्‍हेंबर, 2018)  

01.  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षां विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली दाखल केलेली आहे.

02.   तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालील प्रमाणे-

      तक्रारकर्ता उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून त्‍याने दिनांक-12/06/2013 रोजी इरोस हुन्‍दई कंपनीची इऑन मॅग्‍नाप्‍लस कार, इरोज कंपनीचे भंडारा येथील शोरुम मधून खरेदी केली. सदर कारचा क्रं-MH-36-H-3856 असा असून, इंजिन क्रं-176803, चेसीस क्रं-2023375 असा आहे. कार खरेदीचे वेळेस विरुध्‍दपक्ष कंपनीने दोन वर्षाची वॉरन्‍टी किंवा 40,000 किलोमीटर पर्यंतची गॅरन्‍टी/वॉरन्‍टी दिली होती व सदर कालावधीत कारमध्‍ये दोष निर्माण झाल्‍यास विनामुल्‍य दुरुस्‍त करुन देण्‍याची हमी दिली होती.

     तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, त्‍याने खरेदी केलेली कार फक्‍त 4000 किलोमीटर पर्यंत चालली. दिनांक-06/06/2014 रोजी त्‍याने विरुध्‍दपक्ष कंपनीच्‍या भंडारा येथील शोरुम गॅरेज मध्‍ये कार सर्व्‍हीसिंगला टाकली व त्‍याच दिवशी कार सर्व्‍हीसिंग करुन परत जातानां कार गॅरेज मधून फक्‍त 3 ते 4 किलोमीटर अंतरावर बंद पडली असता त्‍याने विरुध्‍दपक्ष कंपनीचे भंडारा गॅरेज मध्‍ये दुरध्‍वनी करुन माहिती दिली असता तेथील कर्मचा-याने कार परत गॅरेज मध्‍ये नेली. त्‍याने चौकशी केली असता आठ दिवसात कार दुरुस्‍त करुन मिळेल असे सांगण्‍यात आले, त्‍यानंतर चौकशी केली असता सदर कार ही नागपूर येथील शोरुम गॅरेजमध्‍ये दुरुस्‍तीसाठी पाठविल्‍याचे सांगितले व तब्‍बल सव्‍वा महिन्‍या नंतर विरुध्‍दपक्षाने कळविले की, कार दुरुस्‍त झालेली आहे.

     तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, तो दिनांक-12/07/2014 रोजी विरुध्‍दपक्षाचे गॅरेज मध्‍ये कार आणण्‍यास गेला असता त्‍याला कारच्‍या इंजिन मध्‍ये बिघाड झाल्‍याचे सांगून साहित्‍य, मजूरी व ईतर खर्च असे दर्शवून रुपये-34,745/- चे बिल देण्‍यात आले, त्‍यावर त्‍याने कार दोन वर्षाच्‍या वॉरन्‍टी/गॅरन्‍टी मध्‍ये असल्‍याचे सांगितले परंतु पैसे दिल्‍या शिवाय कार देता येणार नसल्‍याचे सांगण्‍यात आले. तो व्‍यवसायाने डॉक्‍टर असल्‍याने व कारची सतत आवश्‍यकता पडत असल्‍याने नाईलाजाने त्‍याने कारचे दुरुस्‍तीपोटी रुपये-34,745/- रक्‍कम विरुध्‍दपक्षाला दिली व कार आपले ताब्‍यात घेतली. वस्‍तुतः कार ही वॉरन्‍टी/गॅरन्‍टी पिरीएड मध्‍ये होती व त्‍यामध्‍ये उत्‍पादकीय दोष असल्‍याने कोणतेही रक्‍कम न घेता कार दुरुस्‍त करुन देण्‍याची जबाबदारी विरुदपक्षांची होती. तक्रारकर्त्‍याचे असेही महणणे आहे की, कार दुरुस्‍तीचे वेळी कारमध्‍ये 24 लिटर पेट्रोल होते परंतु घरी नेल्‍या नंतर 3-4 लिटर पेट्रोल आढळून आले व कार मधील पेन ड्राईव्‍ह सुध्‍दा दिसून आला नाही. शेवटी त्‍याने दिनांक-28/07/2014 रोजी वकीलांचे मार्फतीने विरुध्‍दपक्षांना नोटीस पाठवून कार दुरुस्‍तीपोटी वसुल केलेली रक्‍कम परत करण्‍याची मागणी केली परंतु नोटीस मिळूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाच्‍या दोषपूर्ण सेवेमुळे त्‍यास शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्‍याने त्‍याने विरुध्‍दपक्षां विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार       ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षां विरुध्‍द खालील मागण्‍या केल्‍यात-
     विरुध्‍दपक्षांनी अवैधपणे त्‍याचे कडून कार दुरुस्‍तीपोटी वसुल केलेली रक्‍कम रुपये-34,745/- द.सा.द.शे.-18% दराने परत करावी. त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/- तसेच आर्थिक नुकसानी बाबत रुपये-20,000/- आणि दंडा बाबत रुपये-5000/- व तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- देण्‍यात यावा. याशिवाय योग्‍य ती दाद तक्रारकर्त्‍याचे बाजूने मिळावी.

03.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांचे सेवा आणि विक्री संबधी शो-रुम भंडारा येथे असल्‍याची बाब मान्‍य केली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाचे भंडारा येथील शोरुम मधून हुंडई मोटर इंडीया लिमिटेड निर्मित इऑन मॅग्‍ना बीएसआयव्‍ही मॉडेची कार दिनांक-12/06/2013 रोजी  नोंदणी  केल्‍याची व त्‍यानंतर कारची डिलेव्‍हरी दिनांक-19/06/2013 रोजी दिल्‍याचे नमुद केले. सदर कारची गॉरन्‍टी ही निर्माता कंपनीने दिल्‍याची बाब नाकबुल केली, असून निर्माता कंपनीने कारचे डिलेव्‍हरी पासून 24 महिन्‍याची  किंवा 40000 किलोमीटर पर्यंत वॉरन्‍टी दिली होती, सदर वॉरन्‍टी हुंडई वॉरन्‍टी पॉलिसी मधील क्‍लॉज 2 व 3 मधील अटी व शर्ती प्रमाणे दिलेली होती असे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 ने नमूद केले आहे.  तक्रारकर्त्‍याने दिनांक-06/06/2014 रोजी दुस-या मोफत सर्व्‍हीस साठी कार आणली होती ही बाब मान्‍य करुन पुढे असे नमुद केले की,  विरुध्‍दपक्ष क्रं-2 कडून तक्रारकर्त्‍याला कार देताना ती 03988 किलोमीटर चाललेली होती व तक्रारकर्त्‍याने कारची पाहणी करुन समाधान झाल्‍या बाबत कॉर्डवर सही केली होती. कार ताब्‍यात घेतल्‍या नंतर काही वेळाने तक्रारकर्त्‍याने गॅरेज पासून 4-5 किलोमीटर अंतरावर कार बंद असल्‍याचे  विरुध्‍दपक्ष क्रं-2 ला कळविले असता त्‍यांनी तंत्रज्ञाला मोक्‍यावर पाठविले व कार परत आणली, त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याने सांगितले की, टॉप गेअरमध्‍ये चांगल्‍या गतीने कार चालत असताना अचानक फर्स्‍ट गेअर मध्‍ये ती टाकण्‍यात आली. दिनांक-06/06/2014 रोजी भंडारा येथील वर्क शॉपमध्‍ये कार आणून पाहणी केली असता अचानक असामान्‍यपणे गेअर बदलविल्‍याने इंजिनचे आत मधील भागात क्रॅक होऊन नुकसान पोहचले होते आणि क्रॅकमुळे इंजिन मधून मोठयाने आवाज येत होता. त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याला त्‍यांनी समजावून सांगितले होते की, टॉप गेअर वरुन प्रथम गेअरवर कारची गती जास्‍त असताना गेअर बदलविला तर इंजिनवर परिणाम होतो. कार बंद पडल्‍या नंतर तिला दुरुस्‍तीसाठी भंडारा येथून नागपूर येथे नेणे आवश्‍यक होते कारण कारचे सुटे भाग उपलब्‍ध असणे आवश्‍यक होते, तक्रारकर्त्‍याने त्‍याला सहमती दिली होती. सदर कार क्रेनने भंडारा वरुन नागपूर येथे आणली, त्‍यासाठीचा खर्च रुपये-3500/- विरुध्‍दपक्ष क्रं-2) याने स्‍वतः केला. नागपूर येथे गॅरेज मध्‍ये पाहणी केली असता कारचा  निष्‍काळजीपणे दुरुपयोग केल्‍याने इंजिनला क्रॅक जाऊन इंजिनच्‍या अन्‍य भागाचे सुध्‍दा नुकसान झाल्‍याचे दिसून आले. तक्रारकर्त्‍याने कार दुरुस्‍तीची ऑर्डर दिल्‍याने कामास सुरुवात केली, त्‍यावेळी कोणतीही अग्रीम रक्‍कम तक्रारकर्त्‍या कडून घेतली नाही. दुरुस्‍ती नंतर तक्रारकर्त्‍या कडून दुरुस्‍तीपोटी रुपये-34,745/- घेण्‍यात आले व तक्रारकर्त्‍याने कारचा ताबा घेतला. दिनांक-12/07/2014 रोजी इंजिन मध्‍ये बिघाड झाला होता हे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे नामंजूर करण्‍यात येते. दुरुस्‍तीचे बिलाचे वेळी तक्रारकर्त्‍याने आक्षेप घेतल्‍याची बाब नामंजूर केली. कारला झालेले नुकसान हे गॅरन्‍टी वॉरन्‍टी मध्‍ये अंर्तभूत असल्‍याची बाब नामंजूर केली. कार मध्‍ये उत्‍पादकीय दोष असल्‍याची बाब नामंजूर केली. कार मध्‍ये जे काही दोष निर्माण झालेत त्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने कारचा चुकीचा वापर केल्‍यामुळे निर्माण झालेत, त्‍यासाठी विरुध्‍दपक्षांना जबाबदार धरता येणार नाही. तसेच तक्रारकर्त्‍याचा पेन ड्राईव्‍ह परत केला  नाही हे म्‍हणणे आधारहिन असल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्त्‍याने पाठविलेली नोटीस खोटी  व चुकीची असल्‍याने त्‍यांनी तिला उत्‍तर दिले नसल्‍याचे नमुद केले. सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार ही खोटी, चुकीची असल्‍याने खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) तर्फे करण्‍यात आली.

04.    मंचाद्वारे पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊनही मंचासमक्ष हजर न झाल्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक 3 व 4 यां‍चेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करण्‍यांत आला. विरुध्‍दपक्ष क्रं-5 तर्फे मंचा समक्ष दिनांक-05/11/2015 रोजी पान क्रं-76 वर पुरसिस दाखल करुन नमुद केले की, विरुध्‍दपक्ष क्रं-1 व क्रं-2 यांनी जे उत्‍तर ग्राहक मंचा समक्ष दाखल केले, तेच त्‍यांचे उत्‍तर समजण्‍यात यावे.

05.  विरुध्‍दपक्ष क्रं-6 हुन्‍दई मोटर इंडीया लिमिटेड तर्फे लेखी उत्‍तर पान क्रं-78 ते 83 वर दाखल करण्‍यात आले. त्‍यांनी लेखी उत्‍तरा मध्‍ये तक्रारकर्त्‍याची तक्रार खोटी व तथ्‍यहिन असल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1) ते 4) सर्व्‍हीस डिलर यांचे विरुध्‍द कार दुरुस्‍तीसाठी आकारण्‍यात आलेल्‍या रुपये-34,745/- चे रकमे बद्दल तक्रार केली असून हुन्‍दई मोटर इंडीया लिमिटेडने कोणतीही रक्‍कम तक्रारकर्त्‍या कडून वसुल केलेली नाही व तसे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे सुध्‍दा नाही त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं-6 हुन्‍दई मोटर इंडीया लिमिटेड विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. ते कारचे निर्माता आहेत. डिलर व त्‍यांचे मध्‍ये  एजंटचे संबध नसल्‍याने त्‍यांचा या तक्रारीशी काहीही संबध नाही, या संबधात त्‍यांनी मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने रिव्‍हीजन पिटीशन क्रं-674/2004 आणि 677/2004 मध्‍ये मारोती उद्दोग लिमिटेड-विरुध्‍द नागेंद्रप्रसार सिन्‍हा आणि ईतर यांचे प्रकरणात दिनांक-04/05/2009 रोजी पारीत केलेल्‍या निकालावर तसेच मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन-विरुध्‍द-कंझुमर प्रोटेक्‍शन काऊन्‍सील केरला आणि ईतर या प्रकरणात दिनांक-07/12/1993 रोजी पारीत केलेल्‍या आदेशावर आपली भिस्‍त ठेवली. त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारकर्त्‍याने त्‍यांचे निर्मित कार मध्‍ये उत्‍पादकीय दोष (Manufacturing defect) होता हे दर्शविण्‍यासाठी कोणताही तंत्रज्ञाचा पुरावा दाखल केलेला नाही.  विरुध्‍दपक्ष क्रं 6 ने त्‍यांचे कोणतेही कार्यालय वि.ग्राहक मंचाचे स्‍थानिक क्षेत्रात नाही, त्‍यामुळे जिल्‍हा ग्राहक मंचाला तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र येत असल्‍याची बाब नाकबुल केली. प्रथम खरेदीदाराला कारची डिलेव्‍हरी दिल्‍या पासून दोन वर्षाची वॉरन्‍टी त्‍यांचे तर्फे देण्‍यात येते. वॉरन्‍टी ही अटी व शर्ती नुसार देण्‍यात येते.  निष्‍काळजीपणाने  कार हाताळल्‍याने कारला झालेले नुकसान हे वॉरन्‍टी मध्‍ये मोडत नाही. ओनरस मॅन्‍युअल मध्‍ये कार  कशी हाताळावी याच्‍या सुचना दिलेल्‍या आहेत. कारला झालेला अपघात हा वॉरन्‍टी मध्‍ये येत नाही.   कार मधील इंजिन दोषपूर्ण असल्‍याची बाब नामंजूर केली. सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार ही चुकीची,आधारहिन असल्‍याने खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं-6 हुन्‍दई मोटर इंडीया लिमिटेड तर्फे करण्‍यात आली.

06.   तक्रारकर्त्‍याने पान क्रं-13 वरील दस्‍तऐवज यादी नुसार एकूण-12 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात ज्‍यामध्‍ये त्‍याने विरुध्‍दपक्षांना रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत, रजि.पोस्‍टाच्‍या पावत्‍याच्‍या प्रती,पोच, कारची रेकॉर्ड शिट, वॉरन्‍टी पिरिएड संबधी दस्‍तऐवज, कार दुरुस्‍तीचे बिलाची पावती, कारचे विम्‍याचा दस्‍तऐवज,कारचे आर.सी.बुक, कार खरेदीचे बिल अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने पान क्रं-86 ते 91 वर स्‍वतःचा प्रतिज्ञालेख दाखल केला. तसेच पान क्रं 93 ते 98 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

07.   विरुध्‍दपक्ष क्रं-6 हुन्‍दई मोटर इंडीया लिमिटेड यांनी वॉरन्‍टीचा दस्‍तऐवज दाखल केला.

08.   तक्रारकर्त्‍याला मौखीक युक्‍तीवादासाठी बरीच संधी देऊनही तक्रारकर्ता व त्‍यांचे वकील मंचा समक्ष मौ.यु.चे वेळी अनुपस्थित होते. विरुध्‍दपक्ष क्रं-1 व क्रं-2 आणि क्रं-5 तर्फे वकील श्री जयेश वोरा यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकला.

09.   तक्रारकर्त्‍याची तक्रार, दाखल दस्‍तऐवज, विरुध्‍दपक्ष क्रं-1, 2 आणि  क्रं 5 यांचे लेखी उत्‍तर आणि विरुदपक्षाचे वकील श्री जयेश वोरा यांचा मौखीक युक्‍तीवाद यावरुन मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे देण्‍यात येतो-

                                                                              ::निष्‍कर्ष::

10.    तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे त्‍याने दुस-या मोफत सर्व्‍हीस साठी कार जी फक्‍त 4000 किलोमीटर पर्यंत चालली होती, दिनांक-06/06/2014 रोजी विरुध्‍दपक्ष कंपनीच्‍या भंडारा येथील शोरुम गॅरेज मध्‍ये टाकली व त्‍याच दिवशी कार सर्व्‍हीसिंग करुन परत मिळाल्‍याने ती कार गॅरेज मधून घेऊन गेल्‍यावर फक्‍त 3 ते 4 किलोमीटर अंतरावर बंद पडली असता त्‍याने विरुध्‍दपक्ष कंपनीचे भंडारा गॅरेज मध्‍ये दुरध्‍वनी करुन माहिती दिली असता तेथील कर्मचा-याने कार परत गॅरेज मध्‍ये नेली. पुढे सदर कार ही नागपूर येथील शोरुम गॅरेजमध्‍ये दुरुस्‍तीसाठी पाठविल्‍याचे व तब्‍बल सव्‍वा महिन्‍या नंतर विरुध्‍दपक्षाने कार दुरुस्‍त झाल्‍याचे त्‍याला कळविले.  तो दिनांक-12/07/2014 रोजी विरुध्‍दपक्षाचे गॅरेज मध्‍ये कार आणण्‍यास गेला असता त्‍याला कारच्‍या इंजिन मध्‍ये बिघाड झाल्‍याचे सांगून साहित्‍य, मजूरी व ईतर खर्च असे दर्शवून रुपये-34,745/- चे बिल देण्‍यात आले, त्‍यावर त्‍याने कार दोन वर्षाच्‍या वॉरन्‍टी/गॅरन्‍टी मध्‍ये असल्‍याचे सांगितले परंतु प्रतिसाद न दिल्‍याने नाईलाजाने त्‍याने कारचे दुरुस्‍तीपोटी रुपये-34,745/- रक्‍कम विरुध्‍दपक्षाला दिली व कार आपले ताब्‍यात घेतली. वस्‍तुतः कार ही वॉरन्‍टी/गॅरन्‍टी पिरीएड मध्‍ये होती व त्‍यामध्‍ये उत्‍पादकीय दोष असल्‍याने कोणतेही रक्‍कम न घेता कार दुरुस्‍त करुन देण्‍याची जबाबदारी विरुदपक्षांची होती असे त्‍याचे म्‍हणणे आहे.

11.    या उलट, विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-2) जे हुन्‍दई मोटर इंडीया या लिमिटेडचे डिलर आहेत, त्‍यांनी उत्‍तरात असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष क्रं-2 कडून तक्रारकर्त्‍याला कार देताना त्‍याने कारची पाहणी करुन समाधान झाल्‍या बाबत कॉर्डवर सही केली होती. कार ताब्‍यात घेतल्‍या नंतर काही वेळाने तक्रारकर्त्‍याने गॅरेज पासून 4-5 किलोमीटर अंतरावर कार बंद असल्‍याचे  विरुध्‍दपक्ष क्रं-2 ला कळविले असता त्‍यांनी तंत्रज्ञाला मोक्‍यावर पाठविले व कार परत घेतली, दिनांक-06/06/2014 रोजी भंडारा येथील वर्क शॉपमध्‍ये कारची पाहणी केली असता अचानक असामान्‍यपणे गेअर बदलविल्‍याने इंजिनचे आत मधील भागात क्रॅक होऊन नुकसान पोहचले होते आणि क्रॅकमुळे इंजिन मधून मोठयाने आवाज येत होता. त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याला त्‍यांनी सदर बाब समजावून सांगितली होती.  कारचे सुटे भाग भंडारा येथे नसल्‍याने तिला दुरुस्‍तीसाठी भंडारा येथून नागपूर येथे नेणे आवश्‍यक होते, तक्रारकर्त्‍याने त्‍याला सहमती दिली होती. सदर कार क्रेनने भंडारा वरुन नागपूर येथे आणली, नागपूर येथील गॅरेज मध्‍ये पाहणी केली असता कारचा  निष्‍काळजीपणे दुरुपयोग केल्‍याने इंजिनला क्रॅक जाऊन इंजिनच्‍या अन्‍य भागाचे सुध्‍दा नुकसान झाल्‍याचे दिसून आले. तक्रारकर्त्‍याने कार दुरुस्‍तीची ऑर्डर दिल्‍याने कामास सुरुवात केली, त्‍यावेळी कोणतीही अग्रीम रक्‍कम तयाचे कडून घेतली नाही. दुरुस्‍ती नंतर तक्रारकर्त्‍या कडून दुरुस्‍तीपोटी रुपये-34,745/- घेण्‍यात आले व तक्रारकर्त्‍याने कारचा ताबा घेतला. कार मध्‍ये उत्‍पादकीय दोष असल्‍याची बाब नामंजूर केली. कार मध्‍ये जे काही दोष निर्माण झालेत त्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने चुकीच्‍या पध्‍दतीने कारचा वापर केल्‍यामुळे निर्माण झालेत, त्‍यासाठी विरुध्‍दपक्षांना जबाबदार धरता येणार नसल्‍याचे नमुद केले.

12.   विरुध्‍दपक्ष क्रं-6 हुन्‍दई मोटर इंडीया लिमिटेड चे म्‍हणण्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1) ते 4) सर्व्‍हीस डिलर यांचे विरुध्‍द कार दुरुस्‍तीसाठी आकारण्‍यात आलेल्‍या रुपये-34,745/- चे रकमे बद्दल तक्रार केली असून हुन्‍दई मोटर इंडीया लिमिटेडने कोणतीही रक्‍कम तक्रारकर्त्‍याकडून वसुल केलेली नाही व तसे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे सुध्‍दा नाही त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. ते कारचे निर्माता आहेत. त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारकर्त्‍याने त्‍यांचे निर्मित कार मध्‍ये उत्‍पादकीय दोष (Manufacturing defect) होता हे दर्शविण्‍यासाठी कोणताही तंत्रज्ञाचा पुरावा दाखल केलेला नाही.  प्रथम खरेदीदाराला कारची डिलेव्‍हरी दिल्‍या पासून दोन वर्षाची वॉरन्‍टी त्‍यांचे तर्फे देण्‍यात येते. वॉरन्‍टी ही अटी व शर्ती नुसार देण्‍यात येते.  निष्‍काळजीपणाने  कार हाताळल्‍याने कारला झालेले नुकसान हे वॉरन्‍टी मध्‍ये मोडत नाही. कार मालकाच्‍या (Owner’s) मॅन्‍युअल मध्‍ये कार कशी हाताळावी याच्‍या सुचना दिलेल्‍या आहेत. कार मधील इंजिन दोषपूर्ण असल्‍याची बाब नामंजूर केली.

13.   तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍या प्रमाणे वॉरन्‍टी पिरिएड मध्‍ये सदर कारचे इंजिन मध्‍ये उत्‍पादकीय दोष (Manufacturing defect) होता परंतु या संबधाने त्‍याने कोणत्‍याही तंत्रज्ञाचा पुरावा दाखल केलेला नाही. याउलट विरुध्‍दपक्ष क्रमांक 1, 2 व 5 च्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने कारची गती जास्‍त असताना अचानक असामान्‍यपणे गेअर बदलविल्‍याने इंजिनचे आत मधील भागात क्रॅक होऊन नुकसान पोहचले होते व इंजिन मधील आत मधील काही भागाचे सुध्‍दा नुकसान झाले होते. विरुध्‍दपक्षाचे म्‍हणण्‍या प्रमाणे “Owner’s Manual”  मध्‍ये नमुद केल्‍या नुसार वाहनमालकाने वाहनाचा उपयोग करणे आवश्‍यक आहे. कार मालकाने निष्‍काळजीपणाने केलेल्‍या उपयोगासाठी त्‍यांची जबाबदारी येत नाही, यासाठी विरुध्‍दपक्षानीं वॉरन्‍टीचे अटी व शर्तीचे  दस्‍तऐवजावर आपली भिस्‍त ठेवली, त्‍यामध्‍ये Warranty पॉलीसी मधील What is not Covered  Clause च्‍या  Misuse  या अटीवर जोर देऊन नमुद केले की, तक्रारकर्त्‍याने कार निष्‍काळजीपणाने चालविल्‍याने इंजिन मध्‍ये दोष निर्माण झाला. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 तर्फे उत्‍तरात पुढे असेही नमुद करण्‍यात आले की-

      ”That the complainant who was present on the spot narrated that while the motorcar was at a good speed on the top gear due to inadvertence the first gear was suddenly engaged. Thereafter the motor car of the complainant was brought to the workshop at Bhandara  on 06/06/2014. That upon primary inspection of the motorcar and going by the version of the complainant, it was suspected that due to sudden impact of the abnormal gear shift, the crank etc. housed inside the engine might have sustained severe damages and the noise was detected from the motorcar upon the cranking of the engine.

14.   सद्दस्थितीत कार तक्रारकर्त्‍याचे ताब्‍यात आहे व तो कारचा वापर करीत आहे. कार दुरुस्‍ती नंतरही त्‍यात दोष निर्माण झालेत असे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे नाही. तक्रारकर्त्‍याने कार मधील इंजिन मध्‍ये  कार दुरुस्‍त होण्‍या पलीकडे उत्‍पादकीय दोष (Manufacturing defects beyond repair) या संबधी कोणताही तज्ञांचा पुरावा दाखल केला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे कार मध्‍ये उत्‍पादकीय दोष होता ही बाब तक्रारकर्ता योग्‍य त्‍या पुराव्‍याने सिध्‍द करु  शकला नाही. उत्‍पादकीय दोष म्‍हणजे एखाद्दा वस्‍तुमध्‍ये वारंवार तोच दोष उदभवणे आणि वारंवार दुरुस्‍त्‍या करुनही तो दोष दुर न होणे म्‍हणजेच तो दोष दुरुस्‍ती पलीकडे होणे. परंतु तक्रारकर्त्‍याचे प्रकरणात तसे घडलेले नसून तक्रारकर्त्‍याची कार दुरुस्‍त करण्‍यात आली व आज ती कार तक्रारकर्ता वापरत आहे, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या कारमध्‍ये उत्‍पादकीय दोष होता असे म्‍हणता येणार नाही.

15.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 तर्फे वॉरन्‍टी पॉलिसीचा दस्‍तऐवज अभिलेखावर दाखल करण्‍यात आला आहे-

    विरुध्‍दपक्षा तर्फे तक्रारकर्त्‍याने वाहन चालविताना दुरुपयोग केल्‍याचा आरोप केलेला आहे, त्‍या संबधाने वॉरन्‍टी पॉलिसीचे दस्‍तऐवजात पुढील प्रमाणे नमुद आहे-

What is not covered

This warranty shall not apply to :-           

Damage or failure resulting from:

       Negligence of proper maintenance as required in this Owner’s Manual and Service Booklet.

  • Misuse, abuse, accident, theft, flooding or fire

16.   मंचा तर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, तक्रारकर्त्‍याने कार चालविताना टॉप गेअरवरुन पहिल्‍या गेअरमध्‍ये अचानकपणे टाकल्‍याचे सांगितले व विरुध्‍दपक्षाचे वर्कशॉपमध्‍ये कारची पाहणी केली असता असामन्‍यपणे गेअर बदलविल्‍यामुळे इंजिनच्‍या आतील भागात क्रॅक पडून इंजिन नादुरुस्‍त झाले आणि त्‍यातून आवाज येत होता असे जे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांचे म्‍हणणे आहे, त्‍याला कोणत्‍याही पुराव्‍याचा आधार नाही. याशिवाय विरुध्‍द पक्षाने त्‍याचे लेखी उत्‍तरात वर नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने असाधारणपणे गिअर बदलवल्‍याने जोरदार धक्‍यामुळे इंजिनच्‍या आतील भाग क्षतिग्रस्‍त झाले असावेत असे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांचे म्‍हणणे सिध्‍द करणे ही विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2 ची जबाबदारी आहे, परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 ने तशा आशयाचा कोणताही भक्‍कम पुरावा (Substantial  Evidence) मंचासमोर आलेला नाही, त्‍यामुळे विरुध्‍दपक्षाचे तक्रारकर्त्‍याने कारचा अयोग्‍य प्रमाणे वापर (Misuse) केल्‍यामुळेच कारमध्‍ये बिगाड आला असे म्‍हणता येणार नाही.  कथनात मंचाला कोणतेही तथ्‍य दिसून येत नाही. विरुध्‍दपक्षा तर्फे तक्रारकर्त्‍या कडून वॉरन्‍टी कालावधी असताना दिनांक-12/07/2014 चे बिलाप्रमाणे कार दुरुस्‍तीसाठी जी रक्‍कम रुपये 34,745/-  वसुल करण्‍यात आली ती विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला दिलेली दोषपूर्ण सेवा ठरते असे मंचाचे मते आहे.

17.  सदरचे बिलाच्‍या प्रतीचे अवलोकन केले असता ते एकूण रुपये-36,357/- एवढया रुपयाचे असून त्‍यामधून 10% lqVlसुट मजूरी म्‍हणून रुपये-570/- आणि सुटया भागांवर 5% lqVlसुट म्‍हणून रुपये-1041/-असे मिळून एकूण रुपये-1611/- ची सुट देऊन उर्वरीत रक्‍कम रुपये-34,745/- तक्रारकर्त्‍याकडून वसुल केल्‍या गेली, जे उपरोक्‍त विवेचना वरुन चुकीचे दिसून येते, त्‍यामुळे तक्रारकर्ता वॉरन्‍टी कालावधी मध्‍ये त्‍याचे कडून मोटरकार दुरुस्‍ती संबधाने वसुल केलेली रक्‍कम रुपये 34,745/- द.सा.द.शे 8% व्‍याजासह  विरुध्‍दपक्षांकडून परत मिळण्‍यास पात्र आहे. तक्रारकर्त्‍याला त्‍याचे कारची वॉरन्‍ट ही विरुध्‍द पक्ष क्रमांक 6 निर्माता कंपनीकडून देण्‍यात आली होती तसेच विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍याला मोटार कार दुरुस्‍तीची सेवा पुरविली असून त्‍याचेकडून वॉरन्‍टीच्‍या कालावधीत दुरुस्‍तीकरीता अयोग्‍य रितीने बहलाची रक्‍कम वसून केलेली आहे त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 ते 6 हे सर्व अयोग्‍य रितीने वसून केलेली बीलाची रक्‍कम देण्‍यास जबाबदार आहेत असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  त्‍याच बरोबर या सर्व प्रकारामध्‍ये तक्रसाकर्त्‍याला शारीरीक व मानसिक त्रास झाला आणि मंचात तक्रार दाखल करावी लागली त्‍यामुळे तक्रारकर्ता शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-5,000/- तसेच तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-3000/- विरुध्‍दपक्षांकडून मिळण्‍यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.   तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे कार दुरुस्‍तीचे वेळी कारमध्‍ये 24 लिटर पेट्रोल होते परंतु घरी नेल्‍या नंतर 3-4 लिटर पेट्रोल आढळून आले व कार मधील पेन ड्राईव्‍ह सुध्‍दा दिसून आला नाही या आरोपां बाबत मंचा समक्ष कोणताही योग्‍य पुरावा न आल्‍याने त्‍या संबधी तक्रारकर्त्‍याने आर्थिक नुकसान झाल्‍या बाबत केलेली  मागणी मंचाला सक्षम पुराव्‍या अभावी मान्‍य करता येणार नाही.

 18. तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे कार दुरुस्‍तीचे वेळी कारमध्‍ये 24 लिटर पेट्रोल होते परंतु घरी नेल्‍या नंतर 3-4 लिटर पेट्रोल आढळून आले व कार मधील पेन ड्राईव्‍ह सुध्‍दा दिसून आला नाही या आरोपां बाबत मंचा समक्ष कोणताही योग्‍य पुरावा न आल्‍याने त्‍या संबधी तक्रारकर्त्‍याने आर्थिक नुकसान झाल्‍या बाबत केलेली  मागणी मंचाला सक्षम पुराव्‍या अभावी मान्‍य करता येणार नाही. .

19.  उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

                              ::आदेश::

(01)  तक्रारकर्त्‍याची  तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02) विरुध्‍दपक्ष क्रं-(1) ते (6) यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या वॉरन्‍टी कालावधीत तक्रारकर्त्‍याकडून त्‍याचे कारचे दुरुस्‍तीसाठी वसुल केलेली एकूण रक्‍कम रुपये-34,745/- (अक्षरी रुपये चौतीस हजार सातशे पंचेचाळीस फक्‍त) तक्रार दाखल दिनांक 08/02/2014 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-8% दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला परत करावी.

(03) विरुध्‍दपक्ष 1 ते 6 यांनी तक्रारकर्त्‍याला  झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-3000/-(अक्षरी रुपये तीन हजार फक्‍त) तक्रारकर्त्‍याला द्यावेत.

(04)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-(1) ते (6) यांनी  वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.

(05) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध  करुन देण्‍यात याव्‍यात.

(06)  तक्रारकर्त्‍याला   “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR]
MEMBER
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.