नि. २४
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २३३७/२००९
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २३/१२/२००९
तक्रार दाखल तारीख : ३०/१२/२००९
निकाल तारीख : २०/१२/२०११
----------------------------------------------------------------
श्री लक्ष्मण गणपती पाटील
व.व.६८, धंदा – शेती
रा.पेठ, ता.वाळवा जि.सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. मॅनेजर, इको व्हेईकल्स प्रायव्हेट लि.
CASA BIRGITTA, 10 ब्रुन्टन रोड,
एम.जी.रोड क्रॉस, बंगलोर – ५६० ०२५
२. व्यवस्थापक,
आर.के.एको शोरुम व डिलर
सांगली, कोल्हापूर रोड .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.एस.व्ही.माळी
जाबदार नं. १ : एकतर्फा
जाबदार क्र.२ तर्फे : +ìb÷. श्री एम.ए.पाटील
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपल्या वाहनाबाबत मिळालेल्या सदोष सेवेबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ यांच्याकडून दि.५/१२/२००० रोजी इलेक्ट्रीक बॅटरीवरची दुचाकी गाडी खरेदी केली. सदर गाडीची बॅटरी एकवेळ चार्ज केल्यानंतर ३० किमी +ìव्हरेज देईल असे सांगण्यात आले. परंतु तक्रारदार यांनी गाडी खरेदी केलेनंतर लगेचच +ìव्हरेज फक्त ७/८ किमी आहे असे पहिल्या आठवडयात तक्रारदार यांना समजून आले. त्यानंतर तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे गाडी दुरुस्तीसाठी दिली. जाबदार यांनी गाडी दुरुस्त करुन दिली परंतु +ìव्हरेजमध्ये कोणताही फरक पडला नाही. तक्रारदार यांनी जून २००९ ते ऑगस्ट २००९ या कालावधीमध्ये गाडी दुरुस्तीसाठी दिली. त्याबाबतची नोंद जाबदार यांनी सर्व्हिस बुकवर घेतली नाही. जाबदार यांनी तक्रारदार यांना आजअखेर गाडीची कागदपत्रे दिली नाहीत व नंबर देखील दिला नाही. तक्रारदार यांनी जाबदार यांच्याकडून गाडीची खरेदीची किंमत परत मिळावी यासाठी पत्र पाठवून मागणी केली. परंतु जाबदार यांनी कोणतीही दखल घेतली नाही. जाबदार यांनी दिलेल्या या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी गाडीची किंमत व्याजासह परत मिळावी व शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ३ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.१ यांना नोटीस लागूनही ते याकामी हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला.
४. जाबदार क्र.२ यांनी नि.१६ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांच्या गाडीच्या तक्रारीबाबत वॉरंटी कालावधीमध्ये दखल घेण्यास केव्हाही नकार दिला नाही. तक्रारदार हा आजअखेर आर.सी.बुक नेणेस जाबदार यांचेकडे आला नाही. आजही जाबदार हे तक्रारदार यांचे आर.सी.बुक योग्य ती पोहोच नोंदवहीत घेवून देण्यास तयार होते व आहेत. तक्रारदार यांना जाबदार क्र.२ यांनी जाबदार क्र.१ यांनी उत्पादित केलेली गाडी दि.५/१२/२००८ रोजी विक्री केलेली आहे. सदरची गाडी वापरणेबाबत योग्य ते यूजर मॅन्युअल तक्रारदार यांना दिलेले आहे. सदर यूजर मॅन्युअलमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व सूचनांचे पालन न केलेस बॅटरीची क्षमता कमी होवू शकते. सदर बॅटरीस सहा महिने इतकी वॉरंटी होती. त्या काळात बॅटरीसंबंधी जर काही तक्रार असेल तर ती जाबदार क्र.२ यांच्या नजरेस आणून देणे आवश्यक होते. तक्रारदार यांनी अशी कोणतीही तक्रार जाबदार यांच्याकडे मुदतीत केलेली नाही. तक्रारदार यांनी बॅटरी कोणत्या कारणाने खराब आहे याबाबत कोणतेही तज्ञ मत हजर केलेले नाही. जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार क्र.२ यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१७ ला प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
५. तक्रारदार व जाबदार यांनी प्रस्तुत प्रकरणी लेखी युक्तिवाद दाखल केला नाही तसेच सुनावणीचेवेळी दोन्ही विधिज्ञ गैरहजर राहिले. त्यामुळे प्रस्तुत प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले.
६. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे व दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी प्रस्तुत प्रकरणात गाडीची किंमत रु.३२,०००/- परत मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारअर्जामध्ये गाडीची बॅटरी चार्ज केल्यानंतर गाडी योग्य ते +ìव्हरेज देत नसल्याची प्रमुख तक्रार केली आहे. तक्रारदार यांनी गाडी दि.५/१२/२००० रोजी खरेदी केली असल्याचे तक्रारअर्जात नमूद केले आहे. सदर गाडी खरेदी केलेबाबत कोणतीही पावती तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेली नाही. परंतु जाबदार क्र.२ यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांनी दि.५/१२/२००८ रोजी गाडी खरेदी केलेचे नमूद केले आहे. यावरुन तक्रारदार यांनी दि.५/१२/२००८ रोजी गाडी खरेदी केली असल्याचे स्पष्ट होते. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तक्रारदार यांनी गाडीचे +ìव्हरेजबाबत जाबदार यांचेकडे दि.२५/९/२००९ रोजी प्रथमच तक्रार केल्याचे दिसून येते. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये वॉरंटी कालावधीमध्ये तक्रारदार यांच्या तक्रारीबाबत दखल घेतली असे नमूद केले आहे. सदर गाडीच्या बॅटरीसाठी सहा महिने इतकी वॉरंटी आहे. तक्रारदार यांनी वॉरंटी कालावधीनंतर तक्रार दाखल केली आहे असे नमूद केले आहे. सदर वाहनासाठी वॉरंटी कालावधी नेमका किती हे दर्शविणारा कोणताही पुरावा तक्रारदार यांनी हजर केला नाही अथवा जाबदार यांचे म्हणणे खोडून काढलेले नाही. गाडीची संपूर्ण किंमत परत मागताना सदर वाहनामध्ये नेमका काय उत्पादन दोष आहे हे दर्शविण्यासाठी तक्रारदार यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणलेला नाही. तक्रारदारतर्फे कोणत्याही तज्ञ व्यक्तीचा अहवाल प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही व सदर वाहनाची तज्ञ व्यक्तीमार्फत तपासणी करण्यात यावी अशी कोणतीही मागणी तक्रारदार यांनी प्रस्तुत प्रकरणी केलेली नाही, त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज पुराव्यानिशी शाबीत केला नाही. त्यामुळे तक्रारदार हे मागणीप्रमाणे कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाहीत असे या मंचाचे मत झाले आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: २०/१२/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.