जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –152/2011 तक्रार दाखल तारीख –08/08/2011
बापुराव पि.बळीराम सांळूके
वय 38 वर्षे धंदा व्यापार .तक्रारदार
रा.बलभिम नगर, पेठ बीड ता. जि.बीड
विरुध्द
व्यवस्थापक
द्वारकादास मंत्री बँक,
मुख्य शाखा, बीड ता.जि. बीड सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.ए.एम.चंदनशिव
सामनेवाला तर्फे :- कोणीही हजर नाही.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे
तक्रारदारांनी सदरची तक्रार दि.10.10.2011 रोजी दाखल केली. सदर तक्रारीत .मुदतीचे संदर्भात प्राथमीक मूदया बाबत यूक्तीवादासाठी दि.08.11.2011 नेमण्यात आली.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री. चंदनशिव यांचा यूक्तीवाद आज रोजी ऐकला.
तक्रार थोडक्यात की, तक्रारदारांनी सामनेवाला बँकेकडून दूचाकी विकत घेण्यासाठी दि.08.06.2001 रोजी कर्ज घेतले होते. त्यावेळी रक्कम रु.20,000/- भरले आहेत. तक्रारदारांना रु.19,825/- चे कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. बँकेचे संचालक मंडळ, अध्यक्ष यांचे संगनमत करुन तक्रारदाराचे नांवाने बनावट दस्ताऐवज तयार करुन रक्कम रु.47,558/- मंजूर केल्याचे कागदोपत्री दाखवून तक्रारदाराची फसवणूक केली व रक्कम रु.20,000/- चा अपहार केला. तसेच बनावट दस्ताऐवज तयार करुन तक्रारदाराचे नांवाने रक्कम रु.7500/- दि.14.06.2009 रोजी एफडी केल्याचे दर्शवले. त्यावर तक्रारदाराची सही नाही. मोटार सायकल सहा महिने तक्रारदाराकडे होती. सेल पावती, एजन्सीने सामनेवालाकडे दिल्यामुळे सेल पावती नाही. आरटीओ कार्यालयात पासिंग होत नसल्याने कागदपत्राची मागणी सामनेवालाकडे केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गाडी तक्रारदारांना वापरता आलेली नाही. असे असताना सामनेवाला यांनी तक्रारदारांनी रक्कम रु.6,000/- दि.22.01.2000 रोजी भरले, हप्ते थकल्याचे दाखवून सामनेवाला यांनी गाडी ओढून नेली. दि.27.02.2004 रोजी गाडी मिळाली म्हणून बँकेमध्ये रक्कम रु.2859/- आरडी अकाऊटला जमा केले. विमा बोगस असल्याचे दाखवून, नोटीस पाठविल्याचे बोगस दाखवून उपनिबंधक बीड याचेकडे चूकीच्या पध्दतीची कार्यवाही तक्रारदारा विरुध्द केली. त्यामुळे तक्रारदाराचे अतोनात आर्थिक नूकसान झाले. यासर्व प्रकरणात तक्रारदारास आर्थिक, मानसिक त्रास झाला. त्यामुळे मानसिक त्रासाची रक्कम रु.7,53,000/- 12 टक्के व्याजासह व तसेच कर्ज प्रकरणातील दिनांक दूरुस्त करण्याचा आदेश व्हावा अशी मागणी तक्रारदारांनी केलेली आहे.
वरील सर्व विधानात सामनेवाला यांना तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब कूठेही नमूद नाही. घटनाक्रम तक्रारदाराने नमूद केलेला आहे व सदरचा घटनाक्रम 2001 गाडीचे कर्ज मंजूर, 2002 साली हप्त्याची रक्कम भरली. 2004 गाडी जप्त केली. यात दिनांक व तसेच सर्व महत्वाची मागणी कलमा या बाबतचा तक्रारदारांना निश्चितपणे कोणती मागणी करावयाची यांचाही बोध होत नाही. वरील सर्व दिनांकावरुन तक्रारदाराची त्रकार मूदतीत नाही. त्यामुळे रदद करणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार प्राथमीक मूददयावर रदद करण्यात येते.
2. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3)
प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड