Maharashtra

Dhule

CC/12/129

Shri Chaitram Bhura Badgujar - Complainant(s)

Versus

Manager, Dadasaheb waman Vishnu Shinker Nagri Sah. Patpedhi Ltd. Dhule - Opp.Party(s)

Shri Kirankumar Lohar

15 May 2013

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/12/129
 
1. Shri Chaitram Bhura Badgujar
Atpost Kusumba, Tal Dhule
Dhule
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, Dadasaheb waman Vishnu Shinker Nagri Sah. Patpedhi Ltd. Dhule
Opp.Chitle Hospital Shinkar Bhavan Nehru Chowk Dhule
Dhule
Maharashtra
2. Shri Ananda Dhondu Suryawanshi, Chairman Dadasaheb waman Vishnu Shinker Nagri Sah. Patpedhi Ltd. Dhule
R/o Old Dhule, Subhash Nager, Devidas Colony Dhule
Dhule
Maharashtra
3. Shri Suresh Mahant, Administrator Dadasaheb waman Vishnu Shinker Nagri Sah. Patpedhi Ltd. Dhule
Upnibhandak Office, Old Collectre Office area Dhule
Dhule
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,धुळे.

 

मा.अध्‍यक्षा-श्रीमती.वी.वी.दाणी.      मा.सदस्‍या-श्रीमती.एस.एस.जैन.

                                  ----------------------------------------                          ग्राहक तक्रार क्रमांक  १२९/२०१२

                                  तक्रार दाखल दिनांक    २६/०७/२०१२

                                  तक्रार निकाली दिनांक १५/०५/२०१३

(१)श्री.चैञाम भुरा बडगुजर.                   ----- तक्रारदार

वय.६८ वर्ष, धंदा-सेवानिवृत्‍त

(२)सौ.सुशिला चैञाम बडगुजर.

वय.६२ वर्ष, धंदा-घरकाम.

वरील दोन्‍ही राहणार-मु.पो.कुसुंबा,

ता.जि.धुळे.

            विरुध्‍द

(१)दादासाहेब वामन विष्‍णु शिनकर नागरी       ----- सामनेवाले

सहकारी पतपेढी मर्यादित,धुळे.  

म.मॅनेजर,दादासाहेब वामन विष्‍णु शिनकर

नागरी सहकारी पतपेढी मर्यादित,धुळे.

चितळे हॉस्पिटल समोर,शिनकर भवन,नेहरु चौक,

देवपुर,धुळे.ता.जि.धुळे.           

(२)श्री.आनंदा धोंडू सुर्यवंशी-म.चेअरमन साो.

दादासाहेब वामन विष्‍णु शिनकर नागरी

सहकारी पतपेढी मर्यादित,धुळे.

राहणार-जुने धुळे,सुभाष नगर,देविदास कॉलनी,

ता.जि.धुळे.

(३)श्री.सुरेश महंत-म.प्रशासक साो.

दादासाहेब वामन विष्‍णु शिनकर नागरी

सहकारी पतपेढी मर्यादित,धुळे.

म.उपनिबंधक कार्यालय,जुने जिल्‍हाधिकारी कार्यालय

आवार,ता.जि.धुळे.

न्‍यायासन

(मा.अध्‍यक्षाः श्रीमती.वी.वी.दाणी.)

(मा.सदस्‍याः श्रीमती.एस.एस.जैन.)

उपस्थिती

(तक्रारदारा तर्फे वकील श्री.के.आर.लोहार.)

(सामनेवाले नं. १ ते ३ तर्फे वकील श्री.व्‍ही.एस.भट.)

--------------------------------------------------------------------------

निकालपत्र

(द्वारा-मा.अध्‍यक्षा : श्रीमती.वी.वी.दाणी.)

--------------------------------------------------------------------------

 

(१)       सामनेवाले पतसंस्‍थेने तक्रारदारांच्‍या मुदत ठेवीची रक्‍कम न दिल्‍याने सेवेत त्रृटी केली आहे, म्‍हणुन तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार या न्‍यायमंचात दाखल केली आहे.

(२)      तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की,  सामनेवाले क्र.१ ही नोंदणीकृत पतसंस्‍था असून, सामनेवाले क्र.२ व ३ हे सामनेवाले क्र.१ चे अनुक्रमे चेअरमन व प्रशासक आहेत.  तक्रारदार हे सामनेवाले पतसंस्‍थेचे ग्राहक असून त्‍यांचेकडे तक्रारदारांनी ७२ महिन्‍यांसाठी दाम दुप्‍पट योजनेत आणि बचत खात्‍यावर काही रकमा ठेवल्‍या आहेत.  त्‍याचा सविस्‍तर तपशिल खालील तक्‍त्‍यात नमूद केल्‍या प्रमाणे आहे.

 

अ.नं.

मुदत ठेव पावती

 नंबर

ठेव दिनांक

देय दिनांक

व्‍याजदर

ठेव रक्‍कम

देय रक्‍कम

(१)

(२)

(३)

(४)

(५)

(६)

(७)

००१८३५

२८-११-०५

२८-११-११

डबल

३०,०००/-

६०,०००/-

००१८३६

२८-११-०५

२८-११-११

डबल

४०,०००/-

८०,०००/-

००१८३७

२८-११-०५

२८-११-११

डबल

३०,०००/-

६०,०००/-

००१८३८

२८-११-०५

२८-११-११

डबल

४०,०००/-

८०,०००/-

००१८३९

२८-११-०५

२८-११-११

डबल

४०,०००/-

८०,०००/-

००१८४०

२८-११-०५

२८-११-११

डबल

४०,०००/-

८०,०००/-

००१८४१

२८-११-०५

२८-११-११

डबल

४०,०००/-

८०,०००/-

००१८४२

२८-११-०५

२८-११-११

डबल

४०,०००/-

८०,०००/-

००२१०४

१७-०१-०६

१७-०१-१२

डबल

३०,०००/-

६०,०००/-

१०

००२१०५

१७-०१-०६

१७-०१-१२

डबल

३०,०००/-

६०,०००/-

११

००२१०६

१७-०१-०६

१७-०१-१२

डबल

२०,०००/-

४०,०००/-

१२

००२१०७

१७-०१-०६

१७-०१-१२

डबल

३०,०००/-

६०,०००/-

१३

००२१०८

१७-०१-०६

१७-०१-१२

डबल

२०,०००/-

४०,०००/-

१४

००२१०९

१७-०१-०६

१७-०१-१२

डबल

४०,०००/-

८०,०००/-

१५

००२११०

१७-०१-०६

१७-०१-१२

डबल

४०,०००/-

८०,०००/-

१६

बचत खातेक्र.४९७५ वरील दि.२०-०४-१२ अखेरची शिल्‍लक रक्‍कम

९४,०२६/-

१७

बचत खातेक्र.४५७३ वरील दि.२०-०४-१२ अखेरची शिल्‍लक रक्‍कम

,१७,८००/-

एकूण देय रक्‍कम रु.

१२,३१,८२६/-

 

(३)       तक्रारदारांनी उपरोक्‍त दाम दुप्‍पट योजनेत ठेवलेल्‍या ठेव रकमेची मुदतीअंती तसेच बचत खात्‍यावरील रकमेची सामनेवाले यांचेकडे मागणी केली असता, सामनेवाले यांनी रक्‍कम देण्‍यास स्‍पष्‍ट नकार दिला.  तक्रारदार हे वयोवृध्‍द असून त्‍यांना औषधोपचारासाठी सदर रकमेची अत्‍यंत आवश्‍यकता आहे.  परंतु सामनेवाले यांनी रक्‍कम न देऊन सेवेत निष्‍काळजीपणा व बेजबाबदारपणा केला आहे.  सामनेवाले अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब करीत आहेत.  त्‍यामुळे रक्‍कम वेळेत न मिळाल्‍याने तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रास होत आहे.

     

(४)      तक्रारदार  यांनी  सामनेवाले पतसंस्‍थेकडून मुदत ठेवीपोटी व बचत खात्‍यावरील जमा असलेली एकूण रक्‍कम रु. १२,३१,८२६/-  मिळावेत, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.५०,०००/- तसेच तक्रार अर्जाचा खर्च रु.५,०००/- आणि सदर रकमा तक्रारदारास अदा होईपावेतो द.सा.द.शे.१८ टक्‍के दराने व्‍याज मिळावे  अशी विनंती केली आहे.

 

(५)      तक्रारदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयर्थ शपथपत्र आणि मुदत ठेव पावतीच्‍या व बचत खात्‍याच्‍या साक्षांकीत प्रती दाखल केल्‍या आहेत.

 

          सामनेवाले यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयर्थ शपथपत्र आणि प्रशासकीय सभा दि.०७-०१-२०१३ च्‍या सभेतील ठरावाची सत्‍यप्रत या नावाची छायांकीत प्रत दाखल केली आहे.

 

(६)       सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी त्‍यांची कैफीयत दाखल केली असून, त्‍यात त्‍यांनी तक्रारदारांचा अर्ज मान्‍य व कबूल नसल्‍याचे नमूद केले आहे.  तसेच तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक नाहीत, सामनेवालेंच्‍या सेवेत कसूर नाही, असे कथन करुन संचालक रक्‍कम देण्‍यास वैयक्‍तीक रित्‍या जबाबदार नसल्‍याचे नमूद केले आहे व तक्रार अर्ज रद्द करण्‍याची शेवटी विनंती केली आहे.

 

(७)       तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्र आणि सामनेवाले यांचा खुलासा व दाखल कागदपञ पाहता तसेच उभयपक्षाच्‍या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्‍यानंतर आमच्‍यासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.

 

 

मुद्दे :

 निष्‍कर्ष :

(अ) सामनेवाले पतसंस्‍थेने तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रृटी केली आहे काय ?

: होय.

(ब) तक्रारदार अनुतोष मिळण्‍यास पात्र आहे काय ?

: होय.

(क) आदेश काय ?

: अंतिम आदेशा प्रमाणे

 

विवेचन

 

(८)      मुद्दा क्र. ‘‘’’ तक्रारदार यांनी सामनेवाले पतसंस्‍थेमध्‍ये मुदत ठेव पावती स्‍वरुपात दाम दुप्‍पट योजनेत व बचत खात्‍यात उपरोक्‍त कलम २ मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे रकमा ठेवल्‍याचे तसेच मुदतीअंती सदर रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यास ते सामनेवालेंचे ग्राहक असल्‍याने पात्र असल्‍याचे मुदत ठेव पावत्‍यांच्‍या छायांकीत प्रतीवरुन स्‍पष्‍ट होते.  त्‍याप्रमाणे सामनेवाले यांनी सदर पावत्‍यांच्‍या देय तारेखेस रकमा परत करण्‍यास जबाबदार आहेत.   परंतु मुदतीअंती सदर ठेव रकमेची व बचत खात्‍यावरील रकमेची तक्रारदारांनी वारंवार मागणी करुनही रकमा सामनेवाले यांनी परत केलेल्‍या दिसत नाहीत.  हे सामनेवाले यांचे कृत्‍य अत्‍यंत अन्‍यायकारक व बेकायदेशीर आहे असे आमचे मत आहे.  त्‍यामुळे सामनेवाले पतसंस्‍थेने तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रृटी केल्‍याचे सिध्‍द होते.    म्‍हणून मुद्दा क्र. ‘‘’’  चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

 

(९)      मुद्दा क्र. ‘‘’’ आमच्‍या मते तक्रारदार हे सामनेवाले पतसंस्‍थेकडून त्‍यांच्‍या सर्व मुदत ठेव पावत्‍यांची रक्‍कम व बचत खात्‍यावरील रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहेत.  तसेच विरुध्‍दपक्षाच्‍या अशा बेकायदेशीर वागणूकीमुळे तक्रारदारांना वेळेवर स्‍वतःची रक्‍कम न मिळाल्‍यामुळे निश्चितच मानसिक त्रास व पैशांची अडचण भासणे स्‍वाभावीक आहे, त्‍यासाठी तसेच तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम मिळण्‍यासही तक्रारदार पात्र आहेत.   तक्रारदार यांनी सदर रक्‍कम सामनेवाले क्र.१ पतसंस्‍था आणि तिचे चेअरमन सामनेवाले क्र.२ तसेच प्रशासक सामनेवाले क्र.३ यांच्‍याकडून मिळावी अशी विनंती केली आहे.  परंतु  मा.मुंबई उच्‍च न्‍यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ वर्षा ईसाई विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी  या न्‍यायीक दृष्‍टांतामध्‍ये संचालकांना वैयक्तिक रित्‍या रक्‍कम देण्‍यास जबाबदार ठरविता येणार नाही असे खालील प्रमाणे तत्‍व विषद केले आहे.

     As has been recorded above, I am of the view that a society registered under  the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can  be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertainable against the society, the Directors or members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Cooperative Societies Act. To hold the Directors of the banks/ members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies.

 

 

(१०)      वरील न्‍यायीक दृष्‍टांतातील तत्‍व पाहता संचालकांची महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम 1960 च्‍या कलम 88 नुसार चौकशी होऊन जबाबदारी निश्चित होत नाही तोपर्यंत संचालकांना वैयक्तिक रित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही असे म्‍हटले आहे.  त्‍यामुळे हेच तत्‍व सामनेवालेपतसंस्‍थेच्‍या चेअरमन सामनेवाले क्र.२ तसेच सामनेवाले क्र.३ हे शासकीय कर्मचारी असून ते शासनाचे वतीने, त्‍यांना नेमून दिलेले कामकाज करीत आहेत.   त्‍यामुळे सामनेवाले क्र. २ व ३  यांना तक्रारदारांची मुदत ठेवीची रक्‍कम देण्‍यास वैयक्‍तीक रित्‍या जबाबदार धरता येणार नाही.  परंतु हे पतसंस्‍थेचे अधिकारी म्‍हणून पतसंस्‍थे मार्फत जबाबदार असतील.  त्‍यामुळे त्‍यावेळी अस्‍तीत्‍वात असलेले पतसंस्‍थेमधील संचालक मंडळ, मॅनेजन, चेअरमन, प्रशासक व इतर अधिकारी हे संस्‍थेच्‍या वतीने रक्‍कम देण्‍यास जबाबदार असतील असेही या न्‍यायमंचाचे मत आहे.  याचा विचार होता तक्रारदार हे सदर रक्‍कम सामनेवाले क्र.१ पतसंस्‍थेकडून मिळण्‍यास पात्र आहेत असे आमचे मत आहे.    म्‍हणून मुद्दा क्र. ‘‘’’ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.े

 

(११)      मुद्दा क्र. ‘‘’’ उपरोक्‍त सर्व विवेचनावरुन हे न्‍यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.

                        आदेश

 

     (अ)  तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

(ब)  सामनेवाले क्र.१ दादासाहेब वामन विष्‍णु शिनकर नागरी सहकारी पतपेढी मर्यादित,धुळे यांनी,या आदेशाच्‍या तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत.

(१) तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००१८३५ पोटी, मुदतीअंतीची देय रक्‍कम ६०,०००/- (अक्षरी रु.साठ हजार मात्र) दि.२८-११-२०११ पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्‍के व्‍याजासह द्यावेत. 

(२)तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००१८३६ पोटी, मुदतीअंतीची देय रक्‍कम ८०,०००/- (अक्षरी रु.एंशी हजार मात्र)दि.२८-११-२०११ पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्‍के व्‍याजासह द्यावेत. 

(३)तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००१८३७ पोटी, मुदतीअंतीची देय रक्‍कम ६०,०००/-(अक्षरी रु.साठ हजार मात्र) दि.२८-११-२०११ पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्‍के व्‍याजासह द्यावेत. 

(४)तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००१८३८ पोटी, मुदतीअंतीची देय रक्‍कम ८०,०००/-(अक्षरी रु.एंशी हजार मात्र) दि.२८-११-२०११ पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्‍के व्‍याजासह द्यावेत. 

(५)तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००१८३९ पोटी, मुदतीअंतीची देय रक्‍कम ८०,०००/-(अक्षरी रु.एंशी हजार मात्र) दि.२८-११-२०११ पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्‍के व्‍याजासह द्यावेत. 

(६)तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००१८४० पोटी, मुदतीअंतीची देय रक्‍कम ८०,०००/-(अक्षरी रु.एंशी हजार मात्र) दि.२८-११-२०११ पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्‍के व्‍याजासह द्यावेत. 

(७)तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००१८४१ पोटी, मुदतीअंतीची देय रक्‍कम ८०,०००/-(अक्षरी रु.एंशी हजार मात्र) दि.२८-११-२०११ पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्‍के व्‍याजासह द्यावेत. 

(८)तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००१८४२ पोटी, मुदतीअंतीची देय रक्‍कम ८०,०००/-(अक्षरी रु.एंशी हजार मात्र) दि.२८-११-२०११ पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्‍के व्‍याजासह द्यावेत. 

(९)तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००२१०४ पोटी, मुदतीअंतीची देय रक्‍कम ६०,०००/-(अक्षरी रु.साठ हजार मात्र) दि.१७-०१-२०१२ पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्‍के व्‍याजासह द्यावेत. 

(१०)तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००२१०५ पोटी, मुदतीअंतीची देय रक्‍कम ६०,०००/-(अक्षरी रु.साठ हजार मात्र) दि.१७-०१-२०१२ पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्‍के व्‍याजासह द्यावेत. 

(११)तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००२१०६ पोटी, मुदतीअंतीची देय रक्‍कम ४०,०००/-(अक्षरीरु.चाळीस हजार मात्र)दि.१७-०१-२०१२ पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्‍के व्‍याजासह द्यावेत. 

(१२)तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००२१०७ पोटी, मुदतीअंतीची देय रक्‍कम ६०,०००/-(अक्षरी रु.साठ हजार मात्र) दि.१७-०१-२०१२ पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्‍के व्‍याजासह द्यावेत. 

(१३)तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००२१०८ पोटी, मुदतीअंतीची देय रक्‍कम ४०,०००/-(अक्षरीरु.चाळीस हजार मात्र)दि.१७-०१-२०१२ पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्‍के व्‍याजासह द्यावेत. 

(१४)तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००२१०९ पोटी, मुदतीअंतीची देय रक्‍कम ८०,०००/-(अक्षरी रु.एंशी हजार मात्र) दि.१७-०१-२०१२ पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्‍के व्‍याजासह द्यावेत. 

(१५)तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.००२११० पोटी, मुदतीअंतीची देय रक्‍कम ८०,०००/-(अक्षरी रु.एंशी हजार मात्र) दि.१७-०१-२०१२ पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्‍के व्‍याजासह द्यावेत. 

(१६)तक्रारदारांना बचत खाते क्र.४९७५ मधील शिल्‍लक एकूण रक्‍कम  ९४,०२६/-  (अक्षरी रु.चौ-यान्‍नव हजार सव्‍हीस मात्र)        दि.२०-०४-२०१२ पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.४ टक्‍के व्‍याजासह द्यावेत. 

(१७)तक्रारदारांना बचत खाते क्र.७५७३ मधील शिल्‍लक एकूण रक्‍कम  ,१७,८००/-  (अक्षरी रु. एक लाख सतरा हजार आठशे मात्र) दि.२०-०४-२०१२ पासून ते संपूर्ण रक्‍कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.४ टक्‍के व्‍याजासह द्यावेत. 

 

 (क) सामनेवाले क्र.१ दादासाहेब वामन विष्‍णु शिनकर नागरी सहकारी  पतपेढी मर्यादित,धुळे. यांनी, तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम  1,000/- (अक्षरी रु.एक हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी  500/- (अक्षरी रु.पाचशे मात्र) द्यावेत.

 

(ड) उपरोक्‍त आदेश कलम (ब) मध्‍ये उल्‍लेखीलेल्‍या रकमेमधून, सामनेवाले यांनी तक्रारदारांना काही रक्‍कम किंवा व्‍याज रक्‍कम दिली असल्‍यास, तक्रारदारांना काही कर्ज दिले असल्‍यास अथवा तक्रारदारांकडून काही रक्‍कम नियमानुसार येणे असल्‍यास, अशी रक्‍कम नियमानुसार वजावट करुन उर्वरीत रक्‍कम व्‍याजासह तक्रारदारांना अदा करावी.

 

 

धुळे.

दिनांकः १५/०५/२०१३

 

 

 

 

              (श्रीमती.एस.एस.जैन.)    (श्रीमती.वी.वी.दाणी.)

                    सदस्‍या               अध्‍यक्षा

                  जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,धुळे.

 

 

 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.