जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २०१/२०१२
तक्रार दाखल दिनांक – ०३/११/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २८/११/२०१३
१) श्री. नामदेव विठ्ठल माळी, उ.व.६०,
धंदा – शेती
२) सौ. कोकीळाबाई नामदेव माळी, उ.व.५५,
धंदा – शेती व घरकाम
३) श्री. महेंद्र नामदेव माळी, उ.व. ३५,
धंदा – शेती व व्यवसाय
४) श्री. रविंद्र नामदेव माळी, उ.व.३९,
धंदा – शेती व व्यवसाय
सर्व राहणार – बेटावद, तालुका – शिंदखेडा,
जिल्हा – धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
१. दि.दादासाहेब रावल को-ऑप. बॅंक ऑफ
दोंडाईचा लि., दोंडाईचा, नोटीसीची बजावणी –
मॅनेजर, दि.दादासाहेब रावल को-ऑप. बॅंक ऑफ
दोंडाईचा लि., दोंडाईचा, दादानगर, दोंडाईचा,
तो. शिंदखेडा, जि.धुळे.
२. श्री.जे.जी. कंडारे, उपनिबंधक, सहकारी संस्था धुळे,
तो.जि. धुळे, अध्यक्ष (अवसायक) - दि.दादासाहेब रावल
को-ऑप. बॅंक ऑफ दोंडाईचा लि., दोंडाईचा.
३. श्री.पी.बी. बागूल, तालुका लेखा परिक्षक, सहकारी संस्था
शिंदखेडा, तो.शिंदखेडा, जि.धुळे.
सदस्य(अवसायक) - दि.दादासाहेब रावल को-ऑप. बॅंक
ऑफ दोंडाईचा लि., दोंडाईचा
४. श्री.पी.एम. सांगडे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था
शिंदखेडा, तो.शिंदखेडा, जि.धुळे.
सदस्य(अवसायक) - दि.दादासाहेब रावल को-ऑप. बॅंक
ऑफ दोंडाईचा लि., दोंडाईचा. ............ जाबदेणार
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.दिपक डी. जोशी)
(जाबदेणार नं.१ तर्फे – अॅड.अलंकार आर. साळे)
(जाबदेणार नं.२ ते ४ तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
तक्रारदार यांनी जाबदेणार बॅंकेत मुदत ठेव पावती अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी जाबदेणार दि.दादासाहेब रावल को-ऑप. बॅंक ऑफ दोंडाईचा लि., दोंडाईचा, (यापुढे संक्षीप्तेसाठी बॅंक असे संबोधण्यात येईल) या बॅंकेत मुदत ठेव पावतीत रक्कम गुंतविली होती त्याचा तपशील खालील प्रमाणे.
अ.न. |
तक्रारदार नं. |
पावती नंबर |
रक्कम |
व्याजदर |
तारीख |
देय तारीख |
देय रक्कम |
१. |
१ |
०३८७०९ |
३८,५०७/- |
८.७५% |
०१/०९/१० |
०१/१०/११ |
४२,१५६/- |
२. |
१ |
०२९९९९ |
३५,०००/- |
११.००% |
१५/१२/०८ |
१५/०१/११ |
४३,४७९/- |
३. |
१ |
०७२०८८ |
३०,०००/ |
११.००% |
२४/०१/०९ |
१९/०२/११ |
३७,२६८/- |
४. |
१ |
०३८२५४ |
२५,०००/ |
९.२५% |
१०/०१/१० |
१०/०२/११ |
२७,५०४/- |
५. |
१ |
०३८७०८ |
२७,५०५/ |
८.७५% |
०२/०९/१० |
०२/१०/११ |
३०,१११/- |
६. |
१ व २ |
०३८९६४ |
२७,७४८/ |
८.७५% |
१०/०८/१० |
१०/०९/११ |
३०,१५०/- |
७. |
२ |
०३८७०४ |
३८,५०७/ |
८.७५% |
०१/०९/१० |
०१/१०/११ |
४२,१५६/- |
८. |
२ व १ |
०२९९९८ |
३५,०००/ |
११.००% |
१५/१२/०८ |
१५/०१/११ |
४३,४७९/- |
९. |
२ |
०३८२५३ |
२५,०००/ |
९.२५% |
१०/०१/१० |
१०/०२/११ |
२७,५०४/- |
१०. |
२ |
०३८७०५ |
२७,५०५/ |
८.७५% |
०२/०९/१० |
०२/१०/११ |
३०,१११/- |
११. |
२ व १ |
०३८६९६ |
२७,७४८/ |
८.७५% |
१०/०८/१० |
१०/०९/११ |
३०,१५०/- |
१२. |
२ व १ |
०३८६९५ |
२७,७४८/ |
८.७५% |
१०/०८/१० |
१०/०९/११ |
३०,१५०/- |
१३. |
३ |
०३८७०७ |
४५,५३५/ |
८.७५% |
०१/०९/१० |
०१/१०/११ |
४९,८५०/- |
१४. |
३ |
०३८६०८ |
३८,९८१/ |
८.७५% |
१३/०५/१० |
१३/०६/११ |
४२,६७५/- |
१५. |
३ |
०३८२१८ |
३५,०००/ |
९.२५% |
१९/१२/०९ |
१९/०१/११ |
३८,५०६/- |
१६. |
३ |
०३८२५५ |
३०,०००/ |
९.२५% |
१३/०१/१० |
१३/०२/११ |
३३,००६/- |
१७. |
३ |
०३८६९९ |
२७,५०५/ |
८.७५% |
२४/०८/१० |
२४/०९/११ |
३०,१११/- |
१८. |
३ |
०२९९९७ |
४०,०००/ |
११.००% |
१५/१२/०८ |
१५/०१/११ |
५०,४१५/- |
१९. |
३ |
०७२०८७ |
३५,०००/ |
११.००% |
१९/०१/०९ |
१९/०२/११ |
४३,४७९/- |
२०. |
३ |
०३८२५६ |
२५,०००/ |
९.२५% |
१०/०१/१० |
१०/०२/११ |
२७,५०४/- |
२१. |
३ |
०३८७०६ |
२७,५०५/ |
८.७५% |
०२/०९/१० |
०२/१०/११ |
३०,१११/- |
२२. |
४ |
०३८७११ |
४५,५३५/ |
८.७५% |
०१/०९/१० |
०१/१०/११ |
४९,८५०/- |
२३. |
४ |
०३८६०९ |
३८,९८१/ |
८.७५% |
१३/०५/१० |
१३/०६/११ |
४२,६७५/- |
२४. |
४ |
०३८२१७ |
३५,०००/ |
९.२५% |
१९/१२/०९ |
१९/०१/११ |
३८,५०६/- |
२५. |
४ |
०३८७१० |
२७,५०५/ |
८.७५% |
०२/०९/१० |
०२/१०/११ |
३०,१११/- |
२६. |
४ |
०३८२५७ |
२५,०००/ |
९.२५% |
१०/०१/१० |
१०/०२/११ |
२७,५०४/- |
२७. |
४ |
०७२०८९ |
३५,०००/ |
११.००% |
२४/०१/०९ |
१९/०२/११ |
४३,४७९/- |
२८. |
४ |
०२९९९६ |
४०,०००/ |
११% |
१५/१२/०८ |
१५/०१/११ |
५०,४१५/- |
२९. |
४ |
०३८७०० |
२७,५०५/ |
८.७५% |
२४/०८/१० |
२४/०९/११ |
३०,१११/- |
३०. |
४ |
०३८२५८ |
३०,०००/ |
९.२५% |
१३/०१/१० |
१३/०२/११ |
३३,००६/- |
२. तक्रारदार यांनी गुंतवलेल्या रकमेची मागणी जबादेणार बॅंकेत केली असता बॅंकेने रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब जाबदेणार यांचेकडून मुदत ठेव पावतीतील व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
३. जाबदेणार क्र.१ हे मे. मंचात हजर झालेनंतर मुदतीत खुलासा दाखल न केलेने त्यांच्या विरुध्द ‘नो से’ चा आदेश करण्यात आलेला आहेत.
४. जाबदेणार क्र.२ ते ४ यांना मंचाच्या नोटीसीची बजावणी होवूनही मुदतीत हजर न झालेने त्यांच्या विरूध्द‘एकतर्फा’ आदेश करण्यात आलेले आहेत.
५. तक्रारदार यांची तक्रार यांचा विचार होता तक्रारीच्या न्यायनर्णियासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुददे निष्कर्ष
१. तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक आहेत काय ? होय
२. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कमतरता केली आहे काय ? होय
३. तक्रारदार हे जाबदेणार यांच्याकडून देय रक्कम
व त्यावरील व्याज मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
४. तक्रारदार हे जाबदेणार यांच्याकडून मानसिक
त्रास व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम वसुल होऊन
मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
५. अंतिम आदेश ? खालीलप्रमाणे विवेचन
६. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी मुदत ठेव पावत्यांच्या छायांकित प्रती नि.९ ते ३८ वर दाखल केलेल्या आहेत. जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्या मुदत ठेव पावत्यांमधील रक्कमा नाकारलेल्या नाही. मुदत ठेव पावत्यांमधील असलेली रक्कम याचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी बॅंकेत मुदत ठेव पावती अन्वये रक्कम गुंतविली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे गुंतवलेली रक्कम परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही जाबदेणार यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेल्या मुदत ठेव पावत्यांमधील व्याजासह होणारी रक्कम जाबदेणार दि.दादासाहेब रावल को-ऑप. बॅंक ऑफ
दोंडाईचा लि., दोंडाईचायांच्याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. तक्रारदार हे जाबदेणार यांचेकडून मुदत ठेव पावत्यांमधील मुदतीअंती एकूण देय रक्कम रू.११,०५,५३२/- सदर आदेश तारखे पासून रक्कम फीटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दरा प्रमाणे व्याजासह, अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.३ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा क्र.४- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावत्यांमधील व्याजासह होणारी रक्कम जाबदेणार यांच्याकडुन परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना जाबदेणार बॅंक दि.दादासाहेब रावल को-ऑप. बॅंक ऑफ दोंडाईचा लि., दोंडाईचा यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे जाबदेणार यांच्या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुदद क्रं.४ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा क्र.५- वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. जाबदेणार दि.दादासाहेब रावल को-ऑप. बॅंक ऑफ दोंडाईचा लि., दोंडाईचा सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांना खालील प्रमाणे रक्कमा दयाव्यात.
(१) मुदत ठेव पावतींमध्ये असलेली मुदतीअंती एकूण देय रक्कम रू.११,०५,५३२/- (अक्षरी रूपये अकरा लाख पाच हजार पाचशे बत्तीस मात्र) व या रकमेवर आदेश दिनांकापासुन द.सा.द.शे. ६ टक्के दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत व्याज दयावे.
(२) मानसिक त्रासापोटी रक्कम रू.१,०००/- (अक्षरी रू. एक हजार मात्र) व
अर्जाचे खर्चापोटी रक्कम रू.५००/- (अक्षरी रू. पाचशे मात्र) दयावेत.
३. वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (अध्यक्ष/संचालक/व्यवस्थापक/अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी बॅंकेचा कारभार पाहात असतील त्यांनी करावी. तसेचक्र.२मधीलरकमेपैकीकाहीरक्कम अगर व्याज दिले असल्यास, त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
धुळे.
दि.२८/११/२०१३
(सौ.व्ही.व्ही. दाणी) (श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन)
अध्यक्षा सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.