नि. २१
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २०२६/२००९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ३/८/२००९
तक्रार दाखल तारीख : १३/८/२००९
निकाल तारीख : १८/१०/२०११
---------------------------------------------------------------
श्रीमती सावित्री नारायण पवार
वय वर्षे ५४, व्यवसाय – नोकरी
पत्ता – ग्रामीण रुग्णालय पलूस
ता.पलूस जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
व्यवस्थापक,
चौगुले इंडस्ट्रीज प्रा.लि.
पत्ता – ११८/२/कुबेरा चेंबर्स,
महावीरनगर, सांगली .....जाबदारúö
तक्रारदारò : स्वत:
जाबदार तर्फे : +ìb÷. श्री जे.एस.कुलकर्णी
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपल्या वाहनाच्या खरेदीचेवेळी जादा घेतलेली रक्कम परत मिळण्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून दि.९/१०/०८ रोजी मारुती ८०० हे वाहन खरेदी केले. सदर वाहन खरेदी करण्यासाठी तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे रक्कम रु.२,४५,०००/- जमा केले. तक्रारदार यांना सदर वाहनाचा ताबा दि.२३/१०/२००८ रोजी मिळाला. गाडी खरेदी करताना जाबदार यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर एकूण रु.१४,४६५/- च्या सवलती दिल्या होत्या. गाडीची मूळ किंमत ऍक्सेसरीजसह व त्यातून देण्यात आलेली सवलत वजा जाता तक्रारदार यांना जाबदार यांचेकडून रक्कम रु.१९,०५९/- येणे बाकी आहे. त्यापैकी जाबदार यांनी दि.३/११/२००८ रोजी रु.२,३६५/- चा चेक दिला आहे. जाबदार यांचेकडून अद्याप रु.१६,६९४/- येणे बाकी आहे. सदर रक्कम परत मिळावी या मागणीसाठी तसेच इतर तदनुषंगिक मागण्यांसाठी तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.४ चे यादीने ५ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांनी याकामी हजर होवून नि.१२ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपले म्हणणेमध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांना रु.१२,५२५/- चा डिस्काऊंट देण्यात आला होता. गाडीची एकूण किंमत रु.२,५५,१६०/- होते. त्यातून डिस्काऊंटचे रु.१२,५२५/- वजा करता रु.२,४२,६३५/- होतात. तक्रारदार यांना रु.२,४२,६३५/- चे बिल देण्यात आले आहे. सदरील डिस्काऊंटपैकी रक्कम रु.११,६२६/- गाडीच्या मूळ किंमतीतून वजा करुन रु.२,००,८२१/- गाडीची किंमत धरण्यात आली आहे. तक्रारदार यांना रु.१२,५२५/- च्या दिलेल्या डिस्काऊंटचा तपशील जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केला आहे. उर्वरीत रक्कम रु.२,३६५/- तक्रारदार यांना अदा करण्यात आली आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ठयर्थ नि.१३ ला प्रतिज्ञापत्र व नि.१४ च्या यादीने १ कागद दाखल केला आहे.
४. तक्रारदार यांनी नि.१५ ला आपले प्रतिउत्तर दाखल केले आहे व नि.१५/१ वर शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी आपल्या शपथपत्रामध्ये जाबदार यांचे म्हणण्यातील मजकुर नाकारला आहे. तक्रारदार यांनी तोंडी युक्तिवाद केला नाही. जाबदार यांचे विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांना रु.१२,५२५/- चा डिस्काऊंट दिला होता असे नमूद केले आहे. सदर डिस्काऊंटचा तपशील जाबदार यांनी म्हणण्याच्या परिच्छेद ६ मध्ये दिला आहे. त्यामध्ये सी.डी.प्लेयर, ५० टक्के इन्शुरन्स, ग्रुप डिस्काऊंट, फ्रि मॅटींग व मड फ्लॅप अशा बाबी नमूद आहेत. तक्रारदार यांना दिलेल्या गाडीचे किंमतीचे बिल नि.४ चे यादीने दाखल आहे. सदर गाडीची व्हॅटसह किंमत रु.२,००,८२१/- नमूद आहे. त्यामुळे गाडीची मूळ किंमत व इतर तदनुषंगिक आलेला खर्च जो जाबदार यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये नमूद केला आहे, तो तपशीलवार खाली देण्यात येतो.
१. गाडीची किंमत रु.२,००,८२१/-
२. रजिस्ट्रेशन फी व आर.टी.ओ.टॅक्स रु. १५,०७१/-
३. ऍक्सेसरीज रु.१४,४४८/-
४. इन्शुरन्स रु. ७,१९९/-
५. एक्सटेंडेड वॉरंटी रु. २,९९५/-
६. सर्व्हिस चार्ज व आर.टी.ओ.
रजिस्ट्रेशन करतेवेळी आलेला खर्च रु. ३,०००/-
...........................
एकूण रु.२,४३,५३४/-
सदर एकूण किंमतीमधून तक्रारदार यांना रु.१२,५२५/- चा डिस्काऊंट देणेत आला आहे. त्यामुळे रु. २,४३,५३४/- वजा रु.१२,५२५/- = रु.२,३१,००९/- इतकी रक्कम तक्रारदार यांचेकडून घेणे गरजेचे होते. प्रत्यक्षात मात्र तक्रारदार यांचेकडून रु.२,४५,०००/- घेण्यात आले आहेत. म्हणजे तक्रारदार यांचेकडून रु.१३,९९१/- जास्त आकारले आहेत. त्यापैकी रक्कम रु.२,३६५/- तक्रारदार यांना परत करण्यात आले आहेत. म्हणजे अद्याप तक्रारदार यांना रु.११,६२६/- जाबदार यांनी परत केलेले नाहीत.
५. जाबदार यांनी खर्चाचा तपशील देताना गाडीची किंमत डिस्काऊंटसह रु.२,१२,४४७/- दर्शविली आहे व सदर डिस्काऊंटमध्ये रु.११,६२६/- वजा करुन रु.२,००,८२१/- धरण्यात आली असे नमूद केले आहे. वास्तविक जाबदार यांनी पुढे रु.१२,५२५/- च्या डिस्काऊंटचा सविस्तर तपशील देताना सदरचा डिस्काऊंट हा देण्यात आलेल्या ऍक्सेसरीजमध्ये दिला असल्याचे नमूद केले आहे. देण्यात आलेला एकूण डिस्काऊंट रु.१२,५२५/- हा गाडीच्या मूळ किंमतीमध्येही दाखवला आहे व ऍक्सेसरीजमध्येही दाखवला आहे. तक्रारदार यांना गाडीच्या मूळ किंमतीची जी पावती दिली आहे, ती रु.२,००,८२१/- ची आहे. सदरची पावतीवर किंमत ही व्हॅटसह नमूद करण्यात आली आहे. सदर पावतीवर कोणताही डिस्काऊंट नमूद करण्यात आलेला नाही. त्यामुळे गाडीची मूळ किंमत रु.२,१२,४४७/- आहे असे जे जाबदार यांनी नमूद केले आहे, त्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा जाबदार यांनी दाखल केलेला नाही. त्यामुळे गाडीची दर्शविलेली किंमत रु.२,१२,४४७/- मधून गाडीची मुळ किंमत रु.२,००,८२१/- वजा जाता रु.११,६२६/- उरतात व नेमकी हीच रक्कम तक्रारदार यांना जाबदार यांनी परत केलेली नाही. ही बाब प्रामुख्याने स्पष्ट होते. त्यामुळे सदरची रक्कम रक्कम गाडी घेतल्या तारखेपासून म्हणजे दि.९/१०/२००८ पासून व्याजासह परत करण्याबाबत आदेश करणे संयुक्तिक होईल असे या मंचाचे मत आहे.
६. तक्रारदार यांनी शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारअर्जाच्या खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांचेकडून जास्त रक्कम स्वीकारुन व त्याबाबत योग्य तो तपशील न देता व रक्कम मागणीप्रमाणे परत न करुन जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे व त्यामुळे तक्रारदार यांना निश्चितच शारिरिक, मानसिक त्रासास सामोरे जावे लागले व प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल करावा लागला. त्यामुळे तक्रारदार यांची सदरची मागणी अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
२. तक्रारदार यांना जाबदार यांनी रक्कम रु.११,६२६/- (अक्षरी रुपये अकरा हजार सहाशे
सव्वीस) व सदर रकमेवर दि.९/१०/२००८ पासून द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज
अदा करावे असा जाबदार यांना आदेश करण्यात येत आहे.
३. तक्रारदार यांना जाबदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व
तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये ३,०००/- (अक्षरी रुपये तीन हजार माञ) अदा
करावेत.
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार यांनी दिनांक ३/१२/२०११ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दिनांकò: १८/१०/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११