जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १३०/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २६/०७/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २२/०३/२०१३
श्री. नरेंद्र रामदास बोरसे
वय- ४६ वर्षे, धंदा – व्यवसाय,
राहणार – प्लॉट नं.३०२ ए, प्लॉट नं.६,
व्यंकटेश प्लाझा, पारोळा रोड, धुळे ता.जि. धुळे. .............. तक्रारदार
विरुध्द
१. चिंतामणी नागरी सहकारी पतपेढी मर्या., धुळे
म. मॅनेजर
चिंतामणी नागरी सहकारी पतपेढी मर्या., धुळे
८० फुटी रोड, रेल्वे स्टेशन जवळ, धुळे-४२४००१.
२. श्री. राधेश्याम बाबुलाल अग्रवाल-चेअरमन
चिंतामणी नागरी सहकारी पतपेढी मर्या., धुळे
‘कर्तव्य’ ८० फुटी रोड, रेल्वे स्टेशन जवळ,
ता.जि. धुळे-४२४००१. ........... विरूध्द पक्ष
कोरम
(मा. अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा. सदस्या – सौ.एस.एस. जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.के.आर. लोहार )
(विरुध्दपक्ष तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
सौ.एस.एस. जैन, सदस्याः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अंतर्गत गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष चिंतामणी नागरी सहकारी पतपेढी मर्या., धुळे (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अंतर्गत रक्कम गुंतविली होती त्याचा तपशील खालील प्रमाणे.
पावती नंबर |
ठेव दिनांक |
देय दिनांक |
व्याज |
ठेव रक्कम |
देय रक्कम |
२०६५३ |
०६/०९/२००७ |
०६/१०/२००८ |
१०% |
१०,००० |
२०,००० + व्याज |
२१८९० |
०९/०८/२००७ |
०९/०२/२०१४ |
दा.दुप्पट |
१०,००० |
१०,००० + व्याज |
२१८९३ |
१३/०८/२००७ |
१३/०२/२०१४ |
दा.दुप्पट |
१०,००० |
१०,००० + व्याज |
बचत खाते क्रक्र१७/८ वरिल दि.०२/११/२०१० अखेरची शिल्लक रककम रूपये १५,७१५/- |
एकूण रक्कम रूपये ५५,७१५/- व त्यापुढील व्याज |
३. तक्रारदार यांनी गुंतवलेल्या रकमेची मागणी विरुध्द पक्ष पतसंस्थेत केली असता पतसंस्थेने रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडून मुदत ठेव पावती व बचत खाते मधील व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
४. विरुध्द पक्ष क्र.१ व २ हे मे. मंचाची नोटीस लागुनही हजर न झाल्याने, विरूध्द पक्ष क्र.१ व २ यांच्याविरूध्द एकतर्फा आदेश करण्यात आला आहे.
५. तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रे व युक्तीवाद यांचा विचार होता तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय? होय.
२. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी
केली आहे काय? होय.
३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
४. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
६. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी मुदत ठेव पावती व बचत खात्याच्या छायांकित प्रती नि. १० ते १३ वर दाखल केलेल्या आहेत. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या मुदत ठेव पावती व बचत खात्यांवरील रक्कमा नाकारलेल्या नाहीत. मुदत ठेव पावत्या व बचत खातेमधील रक्कम यांचा विचार होता तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अंतर्गत रक्कमा गुंतवल्या होत्या ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव पावती व बचत खाते अन्वये गुंतवलेली रक्कम परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही विरुध्द पक्ष यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावती व बचत खातेमधील व्याजासह होणारी रक्कम चिंतामणी नागरी सहकारी पतपेढी मर्या., धुळे यांचेकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. तसेच तक्रारदार यांनी विरूध्द पक्ष यांच्याकडून आर्थिक, मानसिक, शारिरिक त्रासापोटी प्रत्येकी रक्कम रूपये ३०,०००/- दयावेत अशी मागणी केली आहे.
९. तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावत्या मधील व्याजासह होणारी रक्कम चिंतामणी नागरी सहकारी पतपेढी मर्या., धुळे व विरूध्द पक्ष क्र.१ ते २ यांच्याकडून मिळावी अशी विनंती केली आहे. या संदर्भात मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढील प्रमाणे मत व्यक्त केले आहे.
As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceededagainst and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain ableagainst the society, the Directors of members of the managing committee cannot be heldresponsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To holdthe Directors of the banks/members of the managing committee of the societiesresponsible, without observing the procedure prescribed under the Act, would also beagainst the principles of co-operation, which is the very foundation of establishment ofthe co-operative societies.
वरील न्यायिक दृष्टांतामध्ये संचालकांना रक्कम देण्यासाठी वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.२ यांना वैयक्तिकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे विरूध्द पक्ष क्र.१ चिंतामणी नागरी सहकारी पतपेढी मर्या., धुळे यांच्याकडुन रक्कम मिळण्यास पात्र आहे. तसेच रक्कम परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना चिंतामणी नागरी सहकारी पतपेढी मर्या., धुळे यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे चिंतामणी नागरी सहकारी पतपेढी मर्या., धुळे यांच्या कडून अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- व मानसिक त्रासापोटी रु.१०००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहेत असे आम्हांस वाटते.
१०. मुद्दा क्र.४ - सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. चिंतामणी नागरी सहकारी पतपेढी मर्या., धुळे यांनी तक्रारदार यांना खालील तपशीलात नमुद असलेल्या मुदत ठेव पावत्या व बचत खाते मधील मुदतअंती देय रक्कम ठरलेल्या व्याजदरानुसार दयावी व त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याज या आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसाचे आत अदा करावेत. मुदत ठेव पावतींचा तपशील खालील प्रमाणे.
पावती नंबर |
ठेव दिनांक |
देय दिनांक |
व्याज |
ठेव रक्कम |
देय रक्कम |
२०६५३ |
०६/०९/२००७ |
०६/१०/२००८ |
१०% |
१०,००० |
२०,००० + व्याज |
२१८९० |
०९/०८/२००७ |
०९/०२/२०१४ |
दा.दुप्पट |
१०,००० |
१०,००० + व्याज |
२१८९३ |
१३/०८/२००७ |
१३/०२/२०१४ |
दा.दुप्पट |
१०,००० |
१०,००० + व्याज |
बचत खाते क्रक्र१७/८ वरिल दि.०२/११/२०१० अखेरची शिल्लक रककम रूपये १५,७१५/- |
एकूण रक्कम रूपये ५५,७१५/- व त्यापुढील व्याज |
३. चिंतामणी नागरी सहकारी पतपेढी मर्या., धुळे यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.१०००/- तसेच अर्जाचा खर्च रू.५००/- या आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.
४. वर नमुद आदेश क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.