Maharashtra

Sangli

CC/11/267

Harunrashid Haji Chand Bagwan - Complainant(s)

Versus

Manager, Chhola Mandal Investment & Finance Co.Ltd., Kolhapur - Opp.Party(s)

M.S.Vajir

24 Nov 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/11/267
 
1. Harunrashid Haji Chand Bagwan
Chand Manzil, Guruwar Peth, Miraj, Tal.Miraj
Sangli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, Chhola Mandal Investment & Finance Co.Ltd., Kolhapur
C/15, 1st Floor, Royal Plaza, Dhabholkar Corner, Kolhapur
Kolhapur
Maharashtra
2. Manager, Chhola Mandal Investment & Finance Co.Ltd., Sangli
Nr.Congress Bhavan Committee, Sangli, Talwalkar Chambers, Sangli
Sangli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 
PRESENT:M.S.Vajir, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

                                                            नि. १९
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
                                                    
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र.२६७/११
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख    १९/९/२०११
तक्रार दाखल तारीख   २०/९/२०११
निकाल तारीख       २४/११/२०११
----------------------------------------------------------------
 
श्री हारुणरशिद हाजी चॉंद बागवान
व.व.४७, धंदा व्‍यापार
रा.चॉंद मंझिल, गुरुवार पेठ, मिरज
ता.मिरज जि.सांगली                                                ..... तक्रारदारú
          
 विरुध्‍दù
 
१ मॅनेजर
   छोला मंडल इन्‍व्‍हेस्‍टमेंट आणि फायनान्‍स कं.लि.
   कोल्‍हापूर, कार्यालय सी/१५, १ ला मजला,
   रॉयल प्‍लाझा, दाभोळकर कॉर्नर, कोल्‍हापूर
 
२. मॅनेजर
   छोला मंडल इन्‍व्‍हेस्‍टमेंट आणि फायनान्‍स कं.लि.
   सांगली, कार्यालय कॉंग्रेस भवन कमिटीशेजारी,
   सांगली तळवळकर चेंबर्स, सांगली                    .....जाबदारúö
                               
                                      तक्रारदारतर्फेò     : +ìb÷.श्री.एम.एस.वजीर
   जाबदार              :  एकतर्फा  
                      
नि का ल प त्र
 
द्वारा- अध्‍यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
 
.     तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपल्‍या वाहनाबाबत जाबदार यांनी दिलेल्‍या सदोष सेवेबाबत दाखल केला आहे.
२.    सदर तक्रार अर्जाचा थोडक्‍यात तपशील पुढीलप्रमाणे
 
तक्रारदार यांचे चारचाकी वाहन असून सदर वाहन खरेदी करण्‍यासाठी तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ यांचेकडून फायनान्‍स घेतला होता. सदरचे वाहन तक्रारदार यांनी पंडीत ऑटोमोटीव्‍ह सांगली यांचेकडून खरेदी केले आहे. सदर वाहनाची किंमत ही रु.३,२८,०००/- इतकी ठरली होती व जाबदार यांनी सदर वाहन खरेदीसाठी रु.२,६७,०००/- इतक्‍या रकमेचा कर्जपुरवठा केला आहे. सदर कर्जाचे हप्‍ते हे दरमहा रु.८,३३५/- प्रमाणे भरावयाचे होते. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे रक्‍कम रु.३३,३४०/- हे चेकने जमा केले व रक्‍कम रु.५५,०१०/- इतकी रक्‍कम जाबदार यांचेकडे पावतीने जमा केली. तक्रारदार यांनी जाबदार यांना एकूण रु.८८,१५०/- इतकी रक्‍कम अदा केली आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांच्‍याकडून कोरे चेकही घेतले आहेत. जून २०११ ते ऑगस्‍ट २०११ पर्यंतचे हप्‍ते तक्रारदार यांना आर्थिक अडचणीमुळे भरता आले नाहीत. दि.१३/९/२०११ रोजी जाबदार यांचेकडील अधिकृत इसम जावेद पटेल व अजिंक्‍य ओतारी यांनी तक्रारदार यांचेकडील गाडीचे ड्रायव्‍हर कोणतीही नोटीस न देता व पूर्वसूचना न देता गाडी ओढून नेली आहे. त्‍याबाबत तक्रारदार यांनी विश्रामबाग पोलिस स्‍टेशनकडे दि.१६/९/२०११ रोजी लेखी तक्रार दिली. परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही तसेच जाबदार यांनी दि.१६/९/२०११ रोजी तक्रारदार यांची गाडी विकणार असलेबाबत नोटीस पाठविली. जाबदार यांनी दिलेल्‍या या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज गाडी ताब्‍यात मिळावी या प्रमुख मागणीसाठी तसेच इतर तदानुषंगिक मागण्‍यांसाठी दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.४ चे यादीने १० कागद दाखल केले आहेत. 
 
३.    जाबदार यांना नोटीस लागूनही ते याकामी हजर झाले नाहीत, त्‍यामुळे त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्‍यात आला. 
 
४.    तक्रारदार यांनी नि.५ वर गाडी परत मिळावी तसेच नि.८ वर गाडीची विक्री करु नये याबाबत मनाई अर्ज दाखल केले आहेत. तक्रारदार यांचा नि.८ वरील अर्ज मंजूर करुन जाबदार यांनी गाडीची विक्री करु नये असा तूर्तातूर्त आदेश करण्‍यात आला आहे. तक्रारदार यांनी नि.१६ वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे तसेच नि.१७ चे यादीने २ निवाडे दाखल केलेले आहेत. तसेच नि.१७ वर तोंडी युक्तिवाद करणेचा नाही अशी पुरसि‍स दाखल केली आहे. 
 
५.    तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्‍हणणे, दाखल करण्‍यात आलेली कागदपत्रे व लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे मालकीचे टाटा कंपनीचे चारचाकी वाहन असून त्‍याचा क्रमांक एमएच १०/एक्‍यू २२९८ असा असलेबाबत नि.४/२ वरील नोंदणी पुस्‍तकावरुन दिसून येते. तक्रारदार यांचे वाहन जाबदार यांनी बेकायदेशीररित्‍या ताब्‍यात घेतले आहे. सदरचे वाहन दि.१३/९/२०११ रोजी ताब्‍यात घेतले आहे व त्‍याबाबत तात्‍काळ तक्रारदार यांनी विश्रामबाग पोलिस स्‍टेशनला कळविले असल्‍याबाबत नि.४/१ वरील कागदपत्रांवरुन स्‍पष्‍ट होते. तक्रारदार यांना जाबदार यांनी दिलेली प्रिसेल नोटीस याकामी नि.४/३ वर दाखल आहे. सदर नोटीस दि.१३/९/११ रोजीची असून सदर नोटीसवरुन तक्रारदार यांचे वाहनाचा जाबदार यांनी ताबा घेतले असल्‍याचे स्‍पष्‍ट होते व सदर ताबा घेतलेनंतर तक्रारदार यांनी रक्‍कम जमा नाही केली तर वाहनाची विक्री करणार असल्‍याचेही जाबदार यांनी सदर नोटीसमध्‍ये नमूद केले आहे. तक्रारदार यांचे वाहन जाबदार यांनी बेकायदेशीररित्‍या ताब्‍यात घेतले आहे. तक्रारदार हे थकीत कर्जदार आहेत हे तक्रारदार यांच्‍याच तक्रारअर्जातील कथनावरुन स्‍पष्‍ट होते. परंतु तक्रारदार हे जरी थकीत कर्जदार असले तरी जाबदार यांनी सदर वाहनाचा दांडगाव्‍याने ताबा घेणे समर्थनीय होत नाही. सन्‍मा.राष्‍ट्रीय आयोग यांनी III (2007) CPJ 161 NC Page 219 Citycorp Maruti Finance Vs. Vijayalakshmi या निवाडयाचे कामी पुढील निष्‍कर्ष काढला आहे. In a democratic country having well established independent judiciary and having various laws, it is impermissible for the money lender/financer/banker to take possession of the vehicle for which loan is financed by use of force. Legal or judicial process may be slow but it is no excuse for employing muscleman to repossess the vehicle for which loan is given. Such type of instance justice cannot be permitted in a civilized society where there is effective rule of law. Otherwise, it would result in anarchy that too when the borrower retorts and uses the force. वरील निवाडयातील निष्‍कर्षाचे अवलोकन करता कोणत्‍याही कायदेशीर तरतुदीचा अवलंब न करता व कोणत्‍याही न्‍यायालयीन आदेशाशिवाय जाबदार यांनी तक्रारदार यांचे वाहन ताब्‍यात घेतले आहे. जाबदार यांना मंचाची नोटीस मिळूनही ते प्रस्‍तुत प्रकरणी हजर राहिले नाहीत त्‍यामुळे जाबदार यांनी बेकायदेशीररित्‍या वाहनाचा ताबा घेवून तक्रारदार यांना दूषित सेवा दिली आहे या निष्‍कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
 
६.    तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारअर्जात वाहन ताब्‍यात मिळावे तसेच जाबदार यांनी गाडी विकलेस नुकसानीपोटी रक्‍कम रु.२,१६,३५०/- व गाडीची किंमत रु.२,००,०००/- अशी रक्‍कम मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांचे वाहन जाबदार यांनी बेकायदेशीररित्‍या ताब्‍यात घेवून तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे या निष्‍कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांची सदरची मागणी मान्‍य करण्‍यात येत आहे. तक्रारदार यांनी ज्‍या अन्‍य मागण्‍या केल्‍या आहेत, त्‍या मागण्‍यांचा विचार करता तक्रारदार यांचे वाहन जाबदार यांनी विकले आहे हे दर्शविणारा कोणताही पुरावा मंचासमोर आलेला नाही. त्‍यामुळे सदरची मागणी मान्‍य करणे संयुक्तिक होणार नाही असे या मंचाचे मत आहे. त्‍यामुळे सदरची मागणी अमान्‍य करण्‍यात येत आहे.
 
७.    तक्रारदार यांनी तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु.५,०००/- मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांना जाबदार यांनी सदोष सेवा दिल्‍यामुळे तक्रारदार यांना या न्‍याय मंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणे योग्‍य ठरेल असे या मंचाचे मत आहे.
 
 
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
 
                        आदेश
 
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
 
२. जाबदार यांनी तक्रारदार यांचे वाहन क्र. एमएच १०/एक्‍यू २२९८ चा ताबा तात्‍काळ तक्रारदार
   यांना सुस्थितीत परत करावा.
 
३. तक्रारदार यांना जाबदार यांनी तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.३,०००/- अदा करावेत.
 
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार यांनी दिनांक २४/१२/२०११ पर्यंत करणेची आहे.
 
५. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचे विरुध्‍द
   ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
 
सांगली                                             
दिनांकò: २४/११/२०११                          
 
                 (गीता सु.घाटगे)                   (अनिल य.गोडसे÷)
                   सदस्‍या                                  अध्‍यक्ष           
              जिल्‍हा मंच, सांगली                  जिल्‍हा मंच, सांगली.  
 
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्‍टाने दि.//२०११
       जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्‍टाने दि.//२०११
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.