जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर
मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, दक्षिण बाजू, बावडा रोड, कोल्हापूर-416 003.
................................................................................................................................
तक्रार क्र.232/2012
दाखल दि.29/06/2012
आदेश दि.13/03/2013
(1) श्रीमती शारदा दामोदर खडतरे,
रा.वाठार तर्फ वडगांव, ता.हातकणंगले,
जि.कोल्हापूर.
(2) श्री.लोकेश दामोदर खडतरे,
रा.वरीलप्रमाणे,
(3) श्री.ओंकेश दामोदर खडतरे,
रा.वरीलप्रमाणे ........तक्रारदार क्र.1 ते 3
विरुध्द
मा.शाखाधिकारी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया,
पुणे-बेंगलोर हायवे क्र.4, वाठार तर्फ वडगांव,
ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर. ........सामनेवाला
तक्रारदार तर्फे वकील:- श्री.एन.आर.पाटील, हजर
सामनेवाले तर्फे वकील:-श्री.एम.एम.कुलकर्णी, हजर
गणपूर्ती:- 1. मा. श्री.संजय पी. बोरवाल, अध्यक्ष
2. मा. श्री.दिनेश एस. गवळी, सदस्य
3. मा. श्रीमती सावनी एस. तायशेटे, सदस्या
व्दाराः- मा.श्री.संजय पी.बोरवाल, अध्यक्ष
आदेश
1 सदरची ग्राहक तक्रार क्र.232/2012 ही तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून तक्रार अर्ज परिच्छेद क्र.2 मधील नमुद ठेवीची रक्कम मिळणेकरीता दाखल केली आहे.
2 सदरचे प्रकरण प्रलंबित असताना, तक्रारदार हे मे.कोर्टात मागील तारखांना म्हणजे दि.17.01.2013 व दि.02.03.2013 रोजी सतत गैरहजर होते. यावरुन तक्रारदार यांना प्रकरण चालविणेस काही स्वारस्य आहे असे दिसुन येत नाही तसेच सामनेवाले यांनी दि.13.03.2013 रोजी सदर तक्रारदार यांना तक्रार अर्जात नमुद रक्कमां दिल्याचे पुरसीस दाखल केली आहे, त्यावर त्यांचे वकीलांची स्वाक्षरी आहे. तसेच त्यासोबत, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचे पत्र दि.12.03.2013 त्यामध्ये तक्रारदार यांना रक्कम अदा केल्याचे नमुद केले आहे. यावरुन, तक्रारदार यांना वि.प.-बँकेने रक्कम अदा केली असलेने अर्जातील विषय संपुष्टात आले आहे असे दिसुन येते. सबब, सदरचा अर्ज तक्रारदार यांना चालविणेचा नाही असे दिसुन येते. सबब, आदेश खालीलप्रमाणे
3 तक्रारदार मागील तारखांना सतत गैरहजर, तक्रारदार यांना प्रकरण चालविणेस काही स्वारस्य असल्याचे दिसुन येत नाही, सबब सदरची तक्रार निकाली काढणेत येते.
4 सदर आदेशाच्या सही शिक्काच्या प्रतिलिपी उभय पक्षकारांना नि:शुल्क देण्यात यावी.
(श्रीमती सावनी एस. तायशेटे) (श्री.दिनेश एस. गवळी) (श्री. संजय पी. बोरवाल)
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर.
vrb