::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, श्रीमती किर्ती गाडगीळ (वैद्य), मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 31.03.2016)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
1. अर्जदार हा चंद्रपूर येथील रहिवासी असून अर्जदाराने गैरअर्जदाराकडून विमा पॉलिसी काढलेल्या आहे व अर्जदाराने गैरअर्जदाराकडून विमा पॉलिसी क्र.972466396 ही दिनांक 28.10.1998 पासून घेतली होती त्याची परिपक्वता दिनांक 28.10.2013 ही ठरलेली होती. परंतु, पॉलिसीची मुदत संपल्यावरही पॉलिसीची रक्कम अर्जदाराला सतत पाठपुरावा करुनही मिळाली नाही. अर्जदाराने दिनांक 13.5.2014 रोजी गैरअर्जदारांना पञ देवून सदर पॉलिसीमधील रक्कम कशी काय विड्राल झाली या संदर्भात माहिती मागीतली. परंतु गैरअर्जदाराने त्याचे उत्तर अर्जदाराला दिले नाही. अर्जदाराला उपरोक्त पॉलिसीतील विमा रक्कम रुपये 42,329/- आजपर्यंत मिळालेली नाही. अर्जदार पुढे नमूद करतो की, गैरअर्जदाराने दिनांक 19.6.2014 रोजी ज्या व्यक्तीला सदर पॉलिसीतील रक्कम मिळाली त्यांचेकडून वरिल रक्कम जमा करण्यास गैरअर्जदाराने पञ दिले. परंतु, त्यानंतर रक्कम गैरअर्जदाराला मिळाली की नाही याबद्दल अर्जदाराला काहीच माहिती नाही. अर्जदाराने दिनांक 18.6.2014 रोजी गैरअर्जदाराला वकीलाच्या मार्फत नोटीस पाठविली त्यावर गैरअर्जदार दिनांक 30.7.2014 रोजी खोट्या आशयाचे उत्तर अर्जदाराला दिले. वरील प्रकारे गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति सेवेत न्यूनता दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, अर्जदाराचे विमा पॉलिसी क्र.972466396 ची रक्कम रुपये 42,329/- ही दिनांक 28.10.2013 पासून 12 टक्के व्याजासह गैरअर्जदाराने देण्याचे आदेश व्हावे. तसेच अर्जदाराला शारिरीक, मानसिक ञासापोटी भरपाई व तक्रारीचा खर्च देण्यात यावा.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराने नि.क्र. 9 वर हजर होऊन त्यांचे लेखीउत्तर दाखल करुन त्यात नमूद केले की, अर्जदाराने पॉलिसी घेतांना त्यात नॉमिनी म्हणून त्याची पत्नी सुनीता हीचे नाव दिले होते. पॉलिसी शेडूलमध्ये ‘’विमाधन किसको मिलेगा’’ या सदरात ‘’प्रस्तावक या उसके समुपदेशीसी या विमा अधिनियम के धारा 39 के अंतर्गत उसके नामीत व्यक्तीयों अथवा प्रमाणीत प्रबंधको - या अन्य वैधानिक प्रतिनीधी -‘’ अशी तरतूद आहे. तसेच पॉलिसीच्या रकमेची मागणी अर्जदाराची पत्नी श्रीमती सुनीता हीने म्हणजे नॉमीनी ने केल्यामुळे पॉलिसी रक्कमचा डिस्चार्ज फॉर्म तिला देण्यात आला होता तो तीने दिनांक 25.10.2013 रोजी गैरअर्जदाराकडे सादर केला तसेच अर्जदाराच्या पत्नीने रुपये 200/- च्या स्टॅम्प पेपरवर लिखीत हमीपञ दिले आहे की, जर कोणी प्रस्तुत पॉलिसीत रकमे संबंधी मागणी केल्यास ती विमा कंपनीस त्याची भरपाई करुन देईल. परंतु, अर्जदाराने जेंव्हा पॉलिसीच्या रकमेबद्दल मागणी करताच गैरअर्जदारांनी दिनांक 19.6.2014 रोजी सुनीता हिला पञ पाठवून रकमेची मागणी केली व तसे अर्जदारालाही कळवीले. अर्जदाराला रक्कम ताबडतोब मिळावी म्हणून गैरअर्जदारांनी प्रयत्न केले व दिनांक 25.7.2014 ला अर्जदाराच्या पत्नीने रुपये 40,000/- व रुपये 2329/- या दोन पावत्यानुसार रक्कम गैरअर्जदाराकडे भरली. गैरअर्जदारानी दिनांक 30.7.2014 रोजी पञ लिहून अर्जदाराला त्यासोबत डिस्चार्ज फार्म पाठविला व तो भरुन अर्जदारानी द्यावा अशी विनंती केली. गैरअर्जदाराने वेळोवेळी स्मरणपञ पाठवूनही अर्जदाराने त्याकडे दुर्लक्ष केले. सदर कृतीत गैरअर्जदाराची काहीही चुक नाही. अर्जदाराची पत्नी ही नॉमिनी असल्यामुळे अर्जदार व तीचा पत्ता सारखाच असल्यामुळे गैरअर्जदाराने पॉलिसीतील रक्कम दिली होती. त्यात गैरअर्जदाराने सेवेत कोणतीही ञुटी केलेली नाही.
4. अर्जदार व गैरअर्जदाराचे तक्रार व जवाब, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति सेवेत न्युनता केली आहे काय ? : होय
3) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? :अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून विमा पॉलिसी क्र.972466396 ही दिनांक 28.10.1998 पासून घेतली होती त्याची परिपक्वता दिनांक 28.10.2013 ही ठरलेली होती. ही बाब, गैरअर्जदाराना मान्य असून अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून विमा पॉलिसी क्र.972466396 ही दिनांक 28.10.1998 पासून घेतली होती त्याची परिपक्वता दिनांक 28.10.2013 ही ठरलेली होती हे अर्जदाराने दाखल केलेल्या निशाणी क्र.5 दस्त क्र.1 वरुन स्पष्ट होत आहे. परंतु, जेंव्हा अर्जदाराने गैरअर्जदाराकडे उपरोक्त पॉलिसीतील रकमेची मागणी केली तेंव्हा गैरअर्जदाराने पॉलिसीतील रक्कम अर्जदाराच्या पत्नीने मागणी केल्यामुळे तीला देण्यात आले ही बाब गैरअर्जदाराने त्यांचे उत्तरात तसेच शपथपञात कबूल केलेले आहे. तसेच गैरअर्जदाराने नमूद केलेले आहे की, सदर रक्कम जरी अर्जदाराच्या पत्नीला देण्यात आलेले आहे तरी ती रक्कम अर्जदाराच्या मागणीप्रमाणे नियमांची पुर्तता केल्यावर अर्जदाराला देण्यात देईल. मंचाच्या मते गैरअर्जदाराने प्रकरणातील पॉलिसीची रक्कम अर्जदार हयात असतांना दुस-या व्यक्तीला देवून अर्जदाराप्रती सेवेत न्युनता दिलेली आहे हे स्पष्ट होत असल्याने मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 ते 2 च्या विवेचनावरुन अर्जदार खालील अंतिम आदेशाप्रमाणे मागणीस पाञ आहे.
अंतीम आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदाराने अर्जदारास विमा रक्कम रुपये 42,329/- दिनांक 7.2.2015 पासून द.सा.द.शे. 7 टक्के व्याजासह आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवासचे आत द्यावी.
3) उभय पक्षांनी आप-आपला खर्च स्वतः सहन करावा.
4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
5) सदर निकालपञाची प्रत संकेतस्थळावर टाकण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 31/03/2016