Maharashtra

Dhule

CC/12/116

Smt. Arunabai Chotulal Wagh - Complainant(s)

Versus

Manager, Bhartiya Jivan Bima Nigam - Opp.Party(s)

Shri Bhalchandra Pawar

24 Sep 2014

ORDER

Consumer Disputes Redressal Forum,Dhule
JUDGMENT
 
Complaint Case No. CC/12/116
 
1. Smt. Arunabai Chotulal Wagh
R/o Kusumba Tal. Dhule
Dhule
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, Bhartiya Jivan Bima Nigam
Sakri Rd. Opp. Civil Hospital, Dhule
Dhule
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'BLE MR. S.S. Joshi MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 

निकालपत्र

(द्वारा- मा.अध्‍यक्षा - सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी)

(१)       तक्रारदार यांनी, त्‍यांच्‍या मयत पतीच्‍या विमा पॉलिसीची रक्‍कम तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी व अर्जाच्‍या खर्चाची रक्‍कम सामनेवाले यांचेकडून मिळण्‍यासाठी सदरचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्‍वये या मंचात दाखल केला आहे.

 

(२)        तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की, तक्रारदार यांचे पती कै.छोटुलाल बारकु वाघ यांनी सामनेवाले यांच्‍याकडे दि.२८-०८-२००९ रोजी पॉलिसी क्र.९६२१५९६३६ व दि.१५-०४-२०१० रोजी पॉलिसी क्र.९६४३१३९६३ अशा दोन पॉलिसी घेतल्‍या.  तक्रारदार यांच्‍या पतीचा दि.०४-१२-२०११ रोजी अनैसर्गिक मृत्‍यू झाला.  त्‍यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे क्‍लेम फॉर्म भरुन आवश्‍यक त्‍या कागदपत्रांची पुर्तता करुन क्‍लेमची मागणी केली.  परंतु     दि.१३-०४-२०१२ च्‍या पत्राने सामनेवाले यांनी सदरचा क्‍लेम नाकारला.   तक्रारदार यांच्‍या पतीला कधीही दारुचे व्‍यसन नव्‍हते किंवा कोणताही आजार नव्‍हता.  तसेच सदरची विमा पॉलिसी काढतांना कोणतीही माहिती लपवून ठेवलेली नव्‍हती.  असे असूनसुध्‍दा सामनेवाले यांनी नुकसान भरपाई देण्‍याचे नाकारले आहे.  त्‍याकामी सामनेवाले यांना नोटीस पाठविली.  त्‍यास सामनेवाले यांनी नोटीस उत्‍तर देऊन तक्रारदारांची मागणी नामंजूर केली आहे.  त्‍यामुळे सदरचा अर्ज दाखल केला आहे. 

 

          तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांनी नुकसान भरपाईची रक्‍कम रु.२,८२,५००/- व्‍याजासह द्यावेत आणि मानसिक त्रासापोटी रु.१०,०००/- द्यावेत असा आदेश व्‍हावा.

 

(३)       तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या कथनाच्‍या पुष्‍टयर्थ नि.नं. २ वर शपथपत्र, नि.नं.१३ वर पुराव्‍याचे शपथपत्र तसेच नि.नं.६ वरील दस्‍तऐवज यादीसोबत एकूण ७ कागदपत्रे छायांकीत स्‍वरुपात दाखल केली आहेत.  यात मृत्‍यूचे प्रमाणपत्र, विमा पॉलिसीची प्रत, नोटीस, इत्‍यादी कागदपत्रांचा समावेश आहे.    

 

(४)       सामनेवाले यांनी त्‍यांचा खुलासा नि.नं.१५ वर दाखल केला आहे.  त्‍यात त्‍यांनी सदर अर्ज नाकारला असून असे नमुद केले आहे की, तक्रारदार यांच्‍या पतीचा नैसर्गिक मृत्‍यू झाला व पॉलिसीचे नियमीत हप्‍ते भरले हे मान्‍य नाही.  तक्रारदार यांच्‍या पतीने विमा पॉलिसी घेतांना स्‍वत:चे स्‍वास्‍थ्‍य व प्रकृतीविषयी अचूक माहिती दिली नसल्‍याचे, विमा कंपनीने पॉलिसी धारकाच्‍या मृत्‍यूनंतर केलेल्‍या तपासात उघड झाले आहे.  विमाधारकास मद्यपानाची सवय होती.  विमाधारकाने पॉलिसी घेण्‍यापुर्वी दिलेल्‍या प्रस्‍ताव फॉर्ममध्‍ये विचारलेल्‍या प्रश्‍नांची खोटी उत्‍तरे देऊन पॉलिसी मिळविली आहे.  सदर प्रस्‍तावात प्रश्‍न क्र.११ (अ) ते ११ (ड) ची उत्‍तरे खोटी व चूकीची दिली आहे.  त्‍यामुळे तक्रारदारांचा क्‍लेम नामंजूर करण्‍यात आला.  तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्यू हा अती मद्यसेवनामुळे आणि विषबाधेने झाला आहे हे पोलीस पेपर्सवरुन निष्‍पन्‍न झाले आहे.  त्‍यामुळे नुकसान भरपाई मागण्‍याचा तक्रारदारांना हक्‍क नाही.  तक्रारदार हे खोटा दावा करुन विम्‍याची मागणी करीत आहेत.  सबब सदरचा तक्रार अर्ज खर्चासह रद्द्द करण्‍याची मागणी केली आहे.

 

(५)       सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या कथनाच्‍या पुष्‍टयर्थ नि.नं.१४ वर शपथपत्र, नि.नं.१६ वर पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले असून, नि.नं.१८ वरील वर्णन यादी प्रमाणे एकूण ३ कागदपत्रे छायांकीत स्‍वरुपात दाखल केली आहेत.  त्‍यात विमाधारकाच्‍या विमा पॉलिसीची प्रत, अटी-शर्ती यांचा समावेश आहे.  

 

(६)           तक्रारदारांचा तक्रार अर्ज, शपथपत्र व पुराव्‍यासाठी दाखल कागदपत्रे पाहता तसेच सामनेवाले यांचा खुलासा व शपथपत्र पाहता तसेच दोन्‍ही पक्षांच्‍या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्‍यानंतर आमच्‍यासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.

 

      मुद्दे                                                          निष्‍कर्ष

  1. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ?                : होय
  2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात                 : होय

कमतरता केली आहे काय ?                                                    

  1. तक्रारदार सामनेवाले यांचेकडून अनुतोष मिळण्‍यास         : होय

पात्र आहेत काय ?                                      

  1. आदेश काय ?                           : अंतीम आदेशाप्रमाणे

 

विवेचन

 

(७)  मुद्दा क्र. ‘‘१’’   तक्रारदार यांचे पती कै.छोटुलाल बारकु वाघ यांनी सामनेवाले यांच्‍याकडे दि.२८-०८-२००९ रोजी पॉलिसी क्र. ९६२१५९६३६ आणि   दि.१५-०४-२०१० रोजी पॉलिसी क्र.९६४३१३९६३ अशा दोन पॉलिसी घेतलेल्‍या आहेत.  सदर पॉलिसीची छायांकीत प्रत सामनेवाले यांनी दाखल केलेली आहे.  याचा विचार होता तक्रारदार या मयत विमेधारकाच्‍या कायदेशीर वारसदार पत्‍नी असल्‍याने त्‍या सामनेवाले यांच्‍या ‘‘ग्राहक’’ असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.    म्‍हणून मुद्दा क्र. ‘‘१’’  चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

 

(८)   मुद्दा क्र. ‘‘२’’  :   तक्रारदार यांच्‍या पतीचा दि.०४-१२-२०११ रोजी अनैसर्गिक मृत्‍यू झाला आहे.  त्‍याबाबत संबंधित पोलीस स्‍टेशनला फिर्याद नोंदविली आहे.  याबाबतचे कागदपत्र सामनेवाले यांनी नि.नं.१२ वर दाखल केले आहेत.  यामध्‍ये मयताचा समरी मंजूर होणे बाबतचा अर्ज, मरणोत्‍तर पंचनामा, घटनास्‍थळ पंचनामा व जबाब दाखल केले आहेत.  यामधील समरी अर्जाचा विचार करता त्‍यामध्‍ये विमेधारक यांनी दारुच्‍या नशेत काहीतरी विषारी औषध सेवन केल्‍याने त्‍यांचा मृत्‍यू झाला, अशी समरी होणेबाबत अर्ज केलेला आहे.  तसेच मयताचे नातेवाईक यांचे जबाब नोंदविले आहेत.  यामध्‍ये विमेधारकाने दारुच्‍या नशेत विषारी औषध घेतल्‍याने त्‍याचे निधन झाले असा जबाब नोंदविलेला आहे.  त्‍याचप्रमाणे मयताचे मृत्‍यू प्रमाणपत्रामध्‍ये “the cause of death as reported in post mortem report is Death due to poisoning” असे नमूद केलेले आहे.   या सर्व कागदपत्रांचा विचार करता विमेधारकाचा मृत्यू हा दारुच्‍या नशेत विष प्राशन केल्‍याने, विषबाधेने अनैर्गिक मृत्‍यू झाला आहे हे स्‍पष्‍ट होत आहे.  त्‍यासंदर्भात सामनेवाले यांनी संबंधित पोलिस स्‍टेशनचे चौकशी अंमलदार यांची उलट तपासणी ही प्रश्‍नावलीद्वारे घेतलेली आहे.  त्‍यामध्‍ये विमेधारकाचा विषारी औषध प्राशन केल्‍याने मृत्‍यू झाला आहे असे पोस्‍टमॉर्टेम अहवालात नमूद केले आहे, तसेच नातेवाईकांचे जबाब नोंदविले आहेत, हे मान्‍य केले आहे. 

 

          याकामी तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे विमेधारकाच्‍या क्‍लेमची मागणी केली आहे.  ती सामनेवाले यांनी दि.१३-०४-२०१२ च्‍या पत्राने नाकारली आहे.  सदर पत्र नि.नं.६/३ वर दाखल आहे.  या पत्राचा विचार करता विमेधारकाने दोन पॉलिसी घेतल्‍या आहेत.  विमेधारकाने पॉलिसी घेतांना प्रस्‍तावात, प्रश्‍न क्र.११ अ – एक आठवडयाहून अधिक दिवस उपचार आवश्‍यक  असलेल्‍या एखादया दुखण्‍यासाठी गेल्‍या पाच वर्षात आपण वैद्यकिय सल्‍ला घेतला होता का ? – नाही.  प्रश्‍न क्र.११ ब – निरिक्षण, उपचार, अगर शस्‍त्रक्रियेसाठी आपण एखाद्या रुग्‍णालयात किंवा आरोग्‍यधामात वास्‍तव्‍य केले होते का ? – नाही.  प्रश्‍न क्र.११ क – प्रकृतीच्‍या कारणावरुन गेल्‍या पाच वर्षात आपण कधी कामावरुन गैरहजर राहिला होता का ? – नाही.  प्रश्‍न क्र.११ ड – यकृत, पोट, हृदय, फुफ्फुसे, मेंदू किंवा स्‍थायूसंस्‍था संबंधित रोगांपासून आपण कधी आजारी होता किंवा सध्‍या आहात का ? – नाही.  प्रश्‍न क्र.११ इ – आपण खालीलपैकी कशाचा उपयोग करत आहात वा कधी उपयोग केला  – मदयपान ? – नाही.  अशी उत्‍तरे दिलेली आहेत.

 

          वरील कारणांवरुन विमेधारकाने खोटी उत्‍तरे दिलेली असून अचूक माहिती लपविलेली आहे, असे सामनेवाले यांचे म्‍हणणे असल्‍याने सदरचा विमा क्‍लेम त्‍यांनी नाकारलेला आहे.   वरील प्रस्‍तावात नमूद केलेल्‍या प्रश्‍नांचा संबंध बघता, त्‍यातील कोणत्‍याही कारणाने विमेधारकाचा मृत्‍यू झालेला नाही असे दिसते.   परंतु वरील पोलीस कागदपत्रे व पी.एम. रिपोर्टचा विचार करता, मयत विमेधारकचा मृत्यू हा विष प्राशन केल्‍याने अनैसर्गिक झाला आहे हे स्‍पष्‍ट होत आहे.  विमेधारकाचा मृत्यू हा विषबाधेने झाला असल्‍यामुळे सदरची क्‍लेमची मागणी योग्‍य व रास्‍त आहे असे आमचे मत आहे.

 

          या कामी सामनेवाले यांनी विमेधारकाची पॉलिसी व त्‍यातील अटी शर्ती दाखल केल्‍या आहेत.  त्‍यात आत्‍महत्‍वे विषयी पॉलिसीतील नमूद अट क्र.७ खालील प्रमाणे आहे.

 

“7.Suicide Clause : This Policy shall be void of the Life  Assured commits suicide (whether sane or insane at the time) at any time on or after the date on which the risk under the Policy has commenced but before the expiry of one year from the date of commencement of risk under this Policy and the Corporation will not entertain any claim by virtue of this Policy except to the extend of a third party’s bonafide beneficial interest acquired in the Policy for valuable consideration of which notice has been given in writing to the branch where the Policy is being presently serviced (where the Policy records are kept), at least one calendar month prior to death.”

 

          याचा विचार करता असे दिसते की, सदर पॉलिसी घेतल्‍यापासून एक वर्षाच्‍या कालावधीनंतर जर विमेधारकाने आत्‍महत्‍या केली असली तरी विमा क्‍लेमची रक्‍कम देय आहे.  या अटीचा विचार होता, सदर मयत विमेधारक विष प्राशन करुन स्‍वत:च्‍या मृत्‍यूस कारणीभूत झालेला आहे.  तसेच विमेधारकाने घेतलेल्‍या सदर विमा पॉलिसीचा कालावधी हा एक वर्षापेक्षा अधीक झालेला आहे.  त्‍यामुळे सदर पॉलिसीचा लाभ हा विमा पॉलिसीचे वारसांना देय होत असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  याचा विचार होता सदरच्‍या विमा क्‍लेमची रक्‍कम तांत्रीक कारणांचा आधार घेऊन सामनेवालेंनी नाकारल्‍याचे दिसून येते.  त्‍यामुळे विमा क्‍लेमची रक्‍कम पॉलिसीतील अटी शर्तीप्रमाणे न देणे ही सामनेवालेंच्‍या सेवतील त्रुटी असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे.   म्‍हणून मुद्दा क्र. ‘‘२’’ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

 

  • ९)   मुद्दा क्र. ‘‘३’’ :  तक्रारदारांना विमा पॉलिसी क्र.९६२१५९६३६ रक्‍कम रु.६२,५००/- आणि पॉलिसी क्र.९६४३१३९६३ रक्‍कम रु.२,२०,०००/- असे एकूण रक्‍कम रु.२,८२,५००/- मुदतीत न दिल्‍यामूळे साहजीकच शारीरिक व मानसिक त्रास झाला आहे तसेच तक्रार अर्जाचा खर्च सोसावा लागला आहे.  त्‍यामुळे विमा क्‍लेमची एकूण रक्‍कम रु.२,८२,५००/-, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.२,०००/- आणि तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.१,०००/- मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहेत असे आमचे मत आहे.  म्‍हणून मुद्दा क्र. ‘‘३’’  चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

 

(१०) मुद्दा क्र. “४”  : तक्रारदार व सामनेवाले यांचे अर्ज, प्रतिज्ञापत्र व दाखल केलेली सर्व कागदपत्रे, उभयपक्षांच्‍या विद्वान वकिलांचा युक्तिवाद तसेच वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढील प्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.

आदेश

 

(अ)  तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येत आहे.

 

(ब)   सामनेवाले यांनी सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत.

  • १) तक्रारदार यांना, त्‍यांच्‍या पतीच्‍या दोन्‍ही विमा पॉलिसी क्‍लेमची एकूण   रक्‍कम   २,८२,५००/-, (अक्षरी रक्‍कम रूपये दोन लाख ब्‍याएंशी हजार पाचशे मात्र) द्यावेत.      
  • २)     तक्रारदार यांना, शारीरिक व मानसिक त्रासापोटी एकूण रक्‍कम  २,०००/- (अक्षरी रक्‍कम रूपये दोन हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम  १,०००/- (अक्षरी रक्‍कम रूपये एक हजार मात्र) द्यावेत.  

(क) उपरोक्‍त आदेश कलम (ब) (१)  मध्‍ये नमूद केलेली रक्‍कम सामनेवाले  यांनी तीस दिवसांचे मुदतीत न दिल्‍यास, निकाल दिनांकापासून संपूर्ण रक्‍कम देईपर्यंतचे पुढील कालावधीसाठी द.सा.द.शे. ९ टक्‍के  व्‍याजासह रक्‍कम देण्‍यास सामनेवाले जबाबदार राहतील.

 

 

 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.