जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 5/2016 तक्रार नोंदणी दि. :-29/1/2016
तक्रार निकाली दि. :- 30/08/2016
निकाल कालावधी :- 7 म. 1 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- श्री.राकेश दशरथ मित्रावार,
वय 3719 वर्षे, व्यवसाय-चालक,
रा.वार्ड नं.7, आलापल्ली, जि.गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) मॅनेजर, भारती अॅक्सा जनरल इन्सुरन्स कंपनी,
मुख्य कार्यालय, पहिला मजला, फ्रेंच आयकॉन
सर्वे नं.28, डोडेनकुंडी आउटर रिंग रोड,
बैंगलोर कर्नाटक-560037
(2) मॅनेजर,भारती अॅक्सा जनरल इन्सुरन्स कंपनी,
एस.डी.एफ.पार्क सर्कस, कोलकत्ता,
(पश्चिम बंगाल)-700016
(3) मॅनेजर,भारती अॅक्सा जनरल इन्सुरन्स कंपनी,
222, बी ब्लॉक विष्णू वैभव कॉम्प्लेक्स,
पालम रोड, सिव्हील लाईन, नागपूर.
आयआरडीए रजिस्ट्रेशन नं.139.
(4) मॅनेजर, ए.के.गांधी ब्रोकींग,
सिव्हील लाईन, बापट नगर, ता.जि.चंद्रपूर.
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री.रत्नघोष ठाकरे
गैरअर्जदार क्र.1 ते 3 तर्फे वकील :- अधि.श्री विनय लिंगे
गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील :- अधि.निलिमा जुमनाके व अन्य
गणपूर्ती :- (1) श्री विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्यक्ष
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
(3) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या
- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, रोझा फु.खोब्रागडे, सदस्या)
(पारीत दिनांक : 30.8.2016)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्त्याने, दिनांक 2.8.2013 रोजी ए.के.मोटर्स, नागपूर यांचेकडून टाटा इंडिगो ही कार खरेदी केली असून, सदर गाडीचा क्रमांक MH-33-A-3251 असा आहे व गैरअर्जदार कंपनीकडून सदर गाडीचा विमा उतरविला असून, सदर गाडी फायनान्सवर घेतलेली आहे व अद्याप गाडीची किस्त बाकी आहे. दिनांक 8.4.2014 रोजी आलापल्ली मिकल या रस्त्यावर गाडीचा अपघात झाला व गाडी पुर्णपणे क्षतिग्रत झाली. अर्जदाराने सदर अपघाताची माहिती गैरअर्जदार क्र.2 यांना दिली. त्यावेळी गैरअर्जदार क्र.2 यांनी, अपघातग्रस्त गाडी ए.के.गांधी शोरुम, चंद्रपूर येथे जमा करण्यास सांगितल्यावरुन अर्जदाराने दिनांक 21.4.2014 रोजी गाडी जमा केली. परंतु, गैरअर्जदार यांनी आजतागायत अर्जदारास किंवा परस्पर शोरुम मालकास गाडी दुरुस्तीकरीता कोणतीही रक्कम दिली नाही. सदर गाडीचा विमा दिनांक 13.8.2013 ते दिनांक 12.8.2014 या कालावधीचा होता. गैरअर्जदार यांनी अर्जदारास कारच्या विम्याची रक्कम न दिल्यामुळे, अर्जदारास शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने गाडीची संपुर्ण किंमत करासहींत रुपये 6,90,000/- अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह गैरअर्जदारांकडून देण्यात यावे तसेच, मानसिक ञासापोटी रुपये 2,30,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 50,000/- व अर्जदाराने पंप दुरुस्तीसाठी अदा केलेली रक्कम रुपय 20,000/- गैरअर्जदारांकडून मिळण्याचे आदेश व्हावे, अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 14 अस्सल व झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणीकरुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी नि.क्र.17 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.4 ने नि.क्र.21 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी नि.क्र.17 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदार हा व्यवसायाने चालक असून, दिनांक 2.8.2013 रोजी टाटा इंडिगो गाडी घेतलेली असून गाडीचा क्रमांक MH-33-A-3251 आहे याबाबत वाद नाही. परंतु, सदर गाडीचा अपघात आलापल्ली मिकल येथे घडला व अर्जदाराची गाडी पुर्णतः क्षतिग्रस्त झाली व वापरण्यायोग्य नाही हे अमान्य आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास किंवा शोरुम मालकास गाडी दुरुस्तीकरीता कोणतीही रक्कम दिलेली नाही हे मान्य आहे. कारण अर्जदार हा विमाकृत वाहनाचा वापर प्रवासी व भाडे आकारुन करीत होता. त्यामुळे, अर्जदाराने विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग केलेला आहे. त्यामुळे, अर्जदार नुकसानभरपाई मिळण्यास पात्र नाही. गैरअर्जदाराचे गडचिरोली जिल्हयात कोणतेही कार्यालय नसल्यामुळे, विद्यमान मंचास सदर तक्रार चालविण्याचे अधिकार नाहीत. अर्जदाराने अपघातग्रस्त गाडी ए.के.गांधी, चंद्रपूर दिलेली होती. अर्जदाराने दिनांक 18.10.2014 रोजी, गाडीच्या दुरुस्तीकरीता येणा-या खर्चापैकी 75 टक्के रक्कम गैरअर्जदार देईल व 25 टक्के रक्कम अर्जदार देण्यास तयार असल्याबाबत प्रस्ताव दिला. सदर वाहनाच्या दुरुस्तीकरीता सर्व्हेअर यांनी रुपये 2,24,200/- खर्च निश्चित केलेला होता. त्याप्रमाणे, अर्जदाराने 25 टक्के रक्कम चंद्रपूर येथील शोरुमला जमा केल्याची पावती गैरअर्जदाराकडे सादर केली नाही. त्यामुळे, गैरअर्जदाराने दिनांक 20.11.2015 रोजी अर्जदाराला नोटीस पाठवून क्लेम बंद केल्याबाबत कळविले. अर्जदाराने सदर वाहन हे खाजगी वापराकरीता घेतल्यामुळे, गैरअर्जदार विमा कंपनीने खाजगी वाहनाचा विमा काढला होता. परंतु, सदर वाहनाचा वापर अर्जदाराने व्यावसायिक वापराकरीता करुन विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग केला आहे, त्यामुळे अर्जदार नुकसानभरपाई मिळण्यास पात्र नाही. सबब, अर्जदाराची तक्रारखारीज करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
4. गैरअर्जदार क्र.4 ने नि.क्र.21 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, प्रस्तुत तक्रारीशी गैरअर्जदार क्र.4 यांचा कोणताही संबंध नाही किंवा गैरअर्जदार क्र.4 यांनी पुरविलेल्या सेवेबाबतही कोणतीही तक्रार नाही. अर्जदाराची कार विमाकृत आहे परंतु, गैरअर्जदार क्र.4 हे विमा कंपनीचे ब्रोकर नाहीत. गैरअर्जदार क्र.4 हे टाटा मोटर्स चे अधिकृत डिलर असून, मुख्य व्यवसाय कंपनीने निर्माण केलेल्या वाहनाची विक्री व दुरुस्त करणे आहे. गैरअर्जदार इन्शुरन्स कंपनीने गाडी दुरुस्तीकरीता कोणतीही रक्कम दिलेली नाही त्यामुळे गाडी दुरुस्त करण्यात आली नाही, हे खरे आहे. गैरअर्जदार क्र.4 हे गाडी पार्कींगचे रुपये 250/- प्रतिदिन याप्रमाणे आकारणी करतात, त्यानुसार अर्जदाराकडून रुपये 91,250/- घेणे आहे. गैरअर्जदार क्र.4 यांनी सेवेत कोणतीही त्रृटी दिलेली नसल्यामुळे, अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार क्र.4 विरुध्द खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली आहे
5. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांनी दाखल केलेले लेखी बयान, तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ते 3 ने दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ व लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदार क्र.1 ते 3 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय
व्यवहार केला आहे काय ?
3) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 ते 3 कडून विमा पॉलिसीचा लाभ : होय
मिळण्यास पाञ आहे काय ?
4) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.4 चा ग्राहक आहे काय ः नाही
5) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
6. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.1 ते 3 कंपनीची प्रिमियम भरुन मोटार विमा पॉलीसी काढली होती व ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असल्यामुळे, अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे, हे सिध्द होते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
7. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 ते 3 कडून मोटार विमा पॉलीसी काढली होती व अर्जदाराच्या गाडीचा अपघात विमा पॉलीसीच्या मुदतीच्या आंत झाला असल्यामुळे व अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 ला सदर अपघाताबाबत कळविले असून गैरअर्जदार क्र.1 ते 3 तर्फे सदर अपघातग्रस्त गाडीचे सर्व्हे करण्यात आल्याचे, गैरअर्जदार क्र.1 ने ने नि.क्र.19 नुसार दाखल दस्तऐवज क्र.1 वरुन दिसून येते. सदर सर्व्हे रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमुद आहे की, अर्जदाराची अपघातग्रस्त गाडी ही भाडे तत्वावर (Commercial Purpose) वापरण्यात येत नव्हती. तसेच, गैरअर्जदाराचे हे म्हणणे की, अर्जदाराच्या गाडीचा दुरुस्ती खर्च सर्व्हेअरने रुपये 2,24,200/- निश्चित केला होता, हे पुराव्याअभावी अमान्य आहे. गैरअर्जदाराचे नि.क्र.19 नुसार दस्तऐवज क्र.3 वर सुध्दा अर्जदाराने हे कुठेही लिहिले नाही की, अर्जदारास रुपये 2,24,200/- विमा कंपनी देणार व तो ती रक्कम घेण्यास तयार आहे. गैरअर्जदाराचे नि.क्र.19 चे दस्तऐवज क्र.4 वरुन सुध्दा सिध्द होत नाही की, गैरअर्जदाराने किती रक्कम अर्जदारास देण्याची तयारी दाखवली आहे. उलट, दस्तऐवजची मागणी सदर पत्रात करीत आहे ते दस्तऐवज कोणते हे ही खुलासा केलेला नाही. फक्त दस्तऐवज दिले नाही म्हणून विमा दावा बंद करीत आहे, असे म्हणणे अनुचित व न्युनतापुर्ण आहे. वरील विवेचनावरुन मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
8. अर्जदाराने अपघातग्रस्त गाडीचा विमा दावा सादर केल्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदारास कुठलेही कारण न सांगता विमा दावा नाकारला. तसेच, सदर वाहन भाडे तत्वावर (Commercial Purpose) आहे हे सिध्द करु शकले नाही व गैरअर्जदाराने सॉल्वेज डिप्रिसिएशन (Depreciation of Vehicle) काढून किती रक्कम अर्जदारास द्यावयाची आहे किंवा किती देणार व दिली आहे हे सिध्द करणारे कोणतेही दस्तऐवज पुरावे सादर केले नसल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदाराकडून विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्यास पात्र आहे, असे या मंचाचे मत आहे.
मुद्दा क्रमांक 4 बाबत :-
गैरअर्जदार क्र.4 हा गैरअर्जदार क्र.1 ते 3 चा एजंट नसून सदर तक्रारीतील अपघातग्रस्त वाहनाशी त्यांचा कोणताही संबंध नाही व तो अर्जदारास विमा दावा देण्यास पात्र नाही म्हणून मुद्दा क्र.4 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
- अंतिम आदेश –
(1)
(2)
पॉलीसीचे I.D.V. नुसार म्हणजे रुपये 5,39,596/- कायदयानुसार
Depreciation रक्कम वजा करुन अर्जदारास, आदेशाची प्रत
मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(3)
रक्कम वजा करु नये.
(4)
त्रासापोटी रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2000/- आदेशाची प्रत
मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(5)
(6)
गडचिरोली.
दिनांक – 30.8.2016.
( रोझा फु.खोब्रागडे ) (सादिक मो.झवेरी)
सदस्य अध्यक्ष (प्र.)