Maharashtra

Sangli

CC/11/271

Smt.Jaquavva Muttyappa Natekar - Complainant(s)

Versus

Manager, Bharatiya Jeevan Bima Nigam Ltd., - Opp.Party(s)

P.S.Parit

25 Jun 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/11/271
 
1. Smt.Jaquavva Muttyappa Natekar
Pacchapur, Tal.Jat, Dist.Sangli
Sangli
Maharashtra
2. Shri.Shrikant Muttyappa Natekar
Pacchapur, Tal.Jat
Sangli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, Bharatiya Jeevan Bima Nigam Ltd.,
Satara Regional Office, Jeevan Tara, Ganpatdasdevi Path, Satara 415 001. Jeevn Jyoti, Aamrai Road, Sangli Br., Sangli
Sangli
Maharashtra
2. Manager, The Sangli Salary Earners Co.Op.Soc.Ltd.,Sangli
1104/B, Harbhat Road, Sangli
Sangli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  A.V. Deshpande PRESIDENT
  K.D. Kubal MEMBER
  Smt.V.N.Shinde MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                         नि.29


 

मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

मा.अध्‍यक्ष श्री ए.व्‍ही.देशपांडे


 

मा.सदस्‍य - श्री के.डी.कुबल


 

मा.सदस्‍या - श्रीमती वर्षा शिंदे


 

ग्राहक तक्रार अर्ज क्र. 271/2011


 

तक्रार नोंद तारीख   : 27/09/2011


 

तक्रार दाखल तारीख  :  04/10/2011


 

निकाल तारीख         :   25/06/2013


 

----------------------------------------------


 

 


 

1. श्रीमती जकव्‍वा मुत्‍याप्‍पा नाटेकर


 

   वय वर्षे 42, धंदा – घरकाम


 

2. श्री श्रीकांत मुत्‍याप्‍पा नाटेकर,


 

   वय वर्षे – 23, धंदा – शिक्षण


 

   दोघे रा.पाच्‍छापुर, ता.जत जि.सांगली                              ....... तक्रारदार


 

 


 

विरुध्‍द


 

 


 

1. भारतीय जीवन विमा निगम लि.


 

    तर्फे मॅनेजर, सातारा मंडल कार्यालय,


 

    जीवनतारा, गणपतदास देवी पथ,


 

    सातारा 415 001 (सदरचे समन्‍स


 

    जीवन-ज्‍योती, आमराई रोड, सांगली शाखा)


 

 


 

2. दी सांगली सॅलनी अर्नस को-ऑप.सोसायटी लि.


 

    सांगली तर्फे मॅनेजर


 

    1104/ब, हरभट रोड, सांगली                            ........ सामनेवाला


 

                                   


 

तक्रारदार तर्फे : अॅड श्री पी.एस.परीट


 

                              जाबदारक्र.1 तर्फे :  अॅड श्री व्‍ही.एस.हिरुगडे


 

                                    जाबदारक्र.2 तर्फे :  अॅड श्री पी.ए.सावंत



 

 


 

- नि का ल प त्र -


 

 


 

द्वारा: मा. सदस्‍या : श्रीमती वर्षा शिंदे  


 

 


 

1.    प्रस्‍तुतची तक्रार विमा क्‍लेम नाकारलेने दाखल करण्‍यात आली आहे. प्रस्‍तुत तक्रार अर्ज स्‍वीकृत करुन सामनेवाला क्र.1 व 2 यांना नोटीस आदेश झाला. सामनेवालांना नोटीस लागू झालेनंतर सामनेवाला क्र.1 व 2 हे वकीलांमार्फत मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले. तक्रारदाराचे वकिलांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदार व सामनेवाला क्र.1 तर्फे लेखी युक्तिवाद दाखल करण्‍यात आला.



 

2.  तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी -



 

तक्रारदार क्र.1 व 2 हे पाच्‍छापूर ता.जत जि. सांगली येथील रहिवासी असून कै. मुत्‍याप्‍पा मल्‍लाप्‍पा नाटेकर यांचे ते अनुक्रमे पत्‍नी व मुलगा आहेत. सामनेवाला क्र.1 ही विमा कंपनी आहे.  सामनेवाला क्र.2 ही सहकारी संस्‍था असून मयत मुत्‍याप्‍पा नाटेकर हे सदर संस्‍थेचे सभासद होते. त्‍यांचा सभासद खाते क्र. 37/2 असा होता. मयत नाटेकर हे कर्जदार असलेने त्‍यांचा विमा उतरविलेला होता. सबब तक्रारदार नमूद विमा धारकाचे मृत्‍यूपश्‍चात विमा रकमेच्‍या लाभार्थी आहेत.


 

      मयत मुत्‍याप्‍पा नाटेकर यांनी दि.12/6/06 रोजी सामनेवाला क्र.2 संस्‍थेकडून रक्‍कम रु.1,50,000/- (रुपये एक लाख पन्‍नास हजार फक्‍त) इतके अर्थसहाय्य/कर्ज घेतले होते. सदर सामनेवाला क्र.2 संस्‍थेने त्‍याचे कर्जदार सभासदाच्‍या कर्जाच्‍या रकमेस परतफेडीची हमी रहावी म्‍हणून जाबदार नं.1 यांचेकडे कर्जाच्‍या रकमेच्‍या हमीसाठी अशा कर्जदारांचा समूह (Group) विमा उतरविलेला होता. सदर विमा कालावधी दि.15/6/2008 ते 14/6/2009 अखेर असून पॉलिसी क्र.685831 असा आहे. 


 

सामनेवाला क्र.2 ने दि.9/4/2010 रोजी दिले पत्राप्रमाणे दि.30/11/2008 रोजी पुन्‍हा रक्‍कम रु.670/- मयत नाटेकर यांचे कर्जखाती नावे टाकून सदर रक्‍कम जाबदार क्र.1 कडे पॉलिसी नूतनीकरणासाठी जमा केलेली आहे. दि.8/10/09 रोजी कर्जदार मत्‍याप्‍पा नाटेकर यांचे छातीत दुखू लागलेने अचानक निधन झाले. तक्रारदार लाभार्थी असलेने त्‍यांनी सामनेवाला क्र.1 व 2 कडे बराच पत्रव्‍यवहार करुन विमा रक्‍कम मंजूर करणेबाबत विनंती केली. मात्र सामनेवालांनी त्‍यास दाद दिली नाही. शेवटी दि.8/7/11 रोजी वकीलांचे मार्फत नोटीस पाठवून विमा रकमेची मागणी केली असता त्‍यास खोटीनाटी उत्‍तरे पाठविली आहेत.


 

वस्‍तुतः सामनेवाला क्र.1 यांनी ग्रुप विम्‍याची रक्‍कम स्‍वीकारुन विमा उतरविला आहे. दि.17/9/2009 रोजीचे सामनेवाला नं.1 यांनी सामनेवाला नं.2 यांना दिलेल्‍या पत्रानुसार सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला नं.2 चे सभासदांची तारीख दि.15/8/2009 पासून विमा योजनेत समाविष्‍ट करणेची संमती दर्शविली आहे. दि.8/12/2009 रोजी कर्जदार नाटेकर मयत झालेनंतर सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 कडे विमा हप्‍त्‍याचे चेक परत पाठविण्‍याचे बेकायदेशीर कृत्‍य केलेले आहे. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार क्र.2 चे वडील नाटेकर यांना दि.24/2/10 रोजीचे पत्र दि.5/4/10 रोजी पाठवून विमा पॉलिसी रद्द झालेचे कळविले आहे. विमा हप्‍ता रक्‍कम स्‍वीकारली तेव्‍हाच विमा करार अस्तित्‍वात आला. तो रद्द करावयाचा असल्‍यास लवकरात लवकर (within reasonable time) विमा हप्‍ता रक्‍कम परत करणे गरजेचे होते. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी संगनमताने कागदी खेळ करुन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन विमा रक्‍कम देणेची जबाबदारी टाळल्‍यानेच प्रस्‍तुत तक्रारअर्ज दाखल करणे भाग पडले. सबब, तक्रारदारांनी विमा रक्‍कम रु.1,50,000/-, शारिरिक मानसिक त्रासापोटी रु.30,000/-, तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.5,000/- अशी एकूण रु.1,85,500/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्‍तरित्‍या मिळावी अशी तक्रारदाराने मागणी केली आहे.



 

3.  आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍ठयर्थ तक्रारदाराने नि.2 ला आपले शपथपत्र दाखल केले असून नि.4 च्‍या कागदयादीसोबत 15 कागदपत्रे जोडली आहेत. यामध्‍ये कर्जखाते पासबुक खातेउतारा, पॉलिसी क्‍लेम नाकारलेचे पत्र, सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडे वेळोवेळी केलेला पत्रव्‍यवहार, विमा रक्‍कम मागणी आणि क्‍लेम नाकारलेचे पत्र, पॉलिसी समाविष्‍ट असलेली यादी, वकीलांमार्फत पाठविलेल्‍या नोटीसची प्रत व पोहोच, कर्जदार मुत्‍याप्‍पा नाटेकर यांचा मृत्‍यूचा दाखला अशी एकूण 15 कागदपत्रे दाखल केली आहेत.



 

4.    सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने नि.8 वर आपले लेखी म्‍हणणे दाखल करुन तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, वस्‍तुतः तक्रारदार नं.1 चे पती व तक्रारदार नं.2 चे वडील मयत मुत्‍याप्‍पा मल्‍लाप्‍पा नाटेकर हे सामनेवाला नं.2 संस्‍थेचे सभासद होते. EGI Employees Group Insurance No.685831 विमा योजनेअंतर्गत सदर मयत नाटेकरचा विमा उतरविलेला होता. आय.डी.नं.789 होता. त्‍याचे नाव मध्‍यंतरी समाविष्‍ट करण्‍यात आले होते. सदर योजना दि.15/9/2008 ते 14/6/2009 या कालावधीची होती. योजनेची सुरुवात दि.15/9/2008 रोजीची आहे.


 

      सदर विमा योजनेअंतर्गत रु.1,50,000/- इतक्‍या रकमेचे विमा संरक्षण देण्‍यात आले होते. सदर विमा हप्‍ता रक्‍कम रु.590.63 पैसे, सर्व्हिस टॅक्‍स 12.36 टक्‍के दराने रु.73/- असे मिळून रु.663.63 म्‍हणजे रु.664/- इतका होता.



 

5.    दि.15/6/2009 रोजी विम्‍याच्‍या वार्षिक नूतनीकरणाचेवेळी मयत मुत्‍याप्‍पा नाटेकर यांचे नाव सामनेवाला क्र.2 यांनी दिलेल्‍या 399 सभासदांच्‍या यादीत नव्‍हते. तद्नंतर सामनेवाला क्र.1 यांना दि.20/8/2009 रोजीचे पत्रासोबत पाठविलेल्‍या 315 सभासदांच्‍या यादीमध्‍ये मयत नाटेकरचा समावेश होता. सामनेवाला नं.2 यांनी सदर विमा हप्‍ता रक्‍कम रु.6,138/- कमी भरलेचे सामनेवाला क्र.1 यांनी दि.17/9/09 ला कळविले. सामनेवाला क्र.2 यांनी दि.12/10/09 चे पत्रासोबत रु.6,138/- ऐवजी रु.914/- पाठवून दिले. सदर रक्‍कम पाठविताना काही सभासदांचा दुबार समावेश झालेने सदर रक्‍कम कपात करुन उर्वरीत रक्‍कम पाठवून दिली. सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने सामनेवाला क्र.2 यांना दि.17/9/2009 व दि.4/11/2009 रोजी पत्र पाठवून रु.6,138/- रकमेची मागणी करुनही दि.8/12/09 पर्यंत सदर रक्‍कम मिळालेली नाही. त्‍यामुळे सामनेवाला विमा कंपनीने एकूण रक्‍कम रु.2,48,455/- दि.4/12/09 रोजी 315 सभासदांच्‍या यादीसहीत (ज्‍यामध्‍ये मयत मुत्‍याप्‍पा नाटेकर याचा समावेश होता) रक्‍कम पाठवून दिली आहे. त्‍यामुळे नाटेकर सदर विमा योजनेचा सभासद नसल्‍याने क्‍लेम द्यायचा प्रश्‍नच उद्भवत नाही. 


 

 


 

6.    सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, सामनेवाला विमा कंपनी व सामनेवाला क्र.2 (MPH)Master Policy Holder यांचेमध्‍ये करार झालेला होता. त्‍यामुळे सामनेवाला क्र.2 ना सदर विमा योजनेत सभासद वाढवणे अथवा कमी करणेचा अधिकार आहे. Master Policy Holder  च्‍या सूचनांचे पालन करणेस सामनेवाला विमा कंपनी बांधील आहे. तक्रारदारास विमा क्‍लेमबाबत प्रश्‍न उपस्थित करावयाचा असल्‍यास त्‍याने सामनेवाला क्र.2 मार्फतच करावा. सदर वस्‍तुस्थिती असून तक्रारदाराची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे.



 

7.    सामनेवाला क्र.1 यांनी आपले म्‍हणणेचे पुष्‍ठर्या नि.9 ला शपथपत्र व नि.20 ला मास्‍टर पॉलिसी नं.GI/685831 (1 ते 12 पाने ) दाखल केली आहे.



 

8.    सामनेवाला क्र.2 यांनी नि.14 ला दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार मान्‍य केले कथनाखेरीज परिच्‍छेद निहाय नाकारली आहे. सामनेवाला पुढे असे कथन करतात की, सामनेवाला क्र.2 ही पगारदार नोकरांची सहकारी संस्‍था असून ती सहकार कायद्याखाली नोंदली आहे. तक्रारअर्ज कलम 2 मधील कथन विमाधारकाबाबत बरोबर आहे मात्र वारसांचे संदर्भातील कथन मान्‍य नाही. संस्‍थेच्‍या हितासाठी विमा उतरविणेची कारवाई सामनेवाला क्र.2 ने सुरु केली होती. मात्र मयत नाटेकरसह अन्‍य सभासदांचा सदर ग्रुप विमा सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने दि.8/12/09 चे पत्राने नाकारला आहे. तदनंतर विमा हप्‍ता रक्‍कम रु.670 त्‍यांचे खात्‍यात जमा केली आहे. सामनेवाला क्र.2 ने नाटेकरच्‍या खातेतून काढलेली रक्‍कम वेळेत सामनेवाला क्र.1 कडे जमा केली आहे. मात्र अचानकपणे विमा संरक्षण नाकारल्‍याने मयत नाटेकर यांना विम्‍याचा लाभ मिळू शकला नाही. यास सामनेवाला क्र.2 जबाबदार नाहीत. तक्रारदाराने दि.8/7/2011 रोजी पाठविलेल्‍या नोटीसीस उत्‍तर देवून वस्‍तुस्थिती कळविलेली आहे. दि.8/12/09 चे पत्राने सामनेवालाने OGI 685831 च्‍या पॉलिसीचा चेक परत पाठविला. त्‍यामुळे विमा नूतनीकरण सामनेवाला क्र.1 यांनी नाकारल्‍याने विमा क्‍लेम देणेस सामनेवाला क्र.2 जबाबदार नाहीत. मयत नाटेकर व त्‍यांचे वारसदार व जामीनदार कर्जाची येणे रक्‍कम वसूलीसाठी सहकार न्‍यायालय, सांगली येथे लवाद दावा क्र. 191/2011 दाखल अहे. सबब यात सामनेवाला नं.2 ची काही चूक नसून त्‍यांनी सेवात्रुटी न केल्‍याने तक्रारदाराची तक्रार रद्द करणेत यावी अशी विनंती केली आहे.



 

9.    सामनेवाला क्र.2 यांनी आपले म्‍हणणेचे पुष्‍ठयर्थ नि.15 ला शपथपत्र व नि.16 प्रमाणे दि.14/1/12 चा संचालक मंडळ सभा ठराव, उत्‍तरी नोटीस, तक्रारदारांस पाठविलेले पत्र, लवाद दावा क्र.191/11 ची प्रत अशी चार कागदपत्रे दाखल केली आहेत.



 

10.   सदर प्रकरणात खालील मुद्दे आमच्‍या निष्‍कर्षासाठी उपस्थित होतात.



 

          मुद्दे                                                      उत्‍तरे


 

 


 

1.  तक्रारदार हा ग्राहक आहे काय ?                                          होय.


 

 


 

2. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देणेमध्‍ये त्रुटी


 

    केली आहे काय ?                                        होय. सामनेवाला


 

                                                         क्र.1 यांनी


 

3.  तक्रारदार विमा रक्‍कम तसेच अन्‍य मागणी केलेल्‍या रकमा


 

    मिळणेस पात्र आहेत काय ?                                       होय.


 

 


 

4.  अंतिम आदेश                                                  खालीलप्रमाणे.


 

 


 

 


 

:- कारणे -:


 

मुद्दा क्र.1  


 

 


 

11.   तक्रारदार नं.1 चे पती व तक्रारदार नं.2 चे वडील मयत मुत्‍याप्‍पा मल्‍लाप्‍पा नाटेकर हे सामनेवाला नं.2 संस्‍थेचे सभासद होते. EGI Employees Group Insurance No.685831 विमा योजनेअंतर्गत सदर मयत नाटेकरचा विमा उतरविलेला होता. आय.डी.नं.789 होता. त्‍याचे नाव मध्‍यंतरी समाविष्‍ट करण्‍यात आले होते. सदर योजना दि.15/9/2008 ते 14/6/2009 या कालावधीची होती. योजनेची सुरुवात दि.15/9/2008 रोजीची आहे. तक्रारदार क्र.1 व 2 हे मयताचे वारसदार असल्‍याने ते लाभार्थी आहेत. सबब तक्रारदार हे ग्राहक आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 


 

 


 

मुद्दा क्र.2


 

 


 

12.  मुद्दा क्र.1 मधील विवेचनावरुन हे दिसून येते की, मयत मुत्‍याप्‍पा नाटेकर यांचा सदर विमा योजनेखाली विमा उतरविलेला आहे. सदर विमा हा कर्जदाराच्‍या कर्जाचे परतफेडीच्‍या हमीसाठी उतरविलेला समूह विमा होता व सदर विमा हा सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडे उतरविलेला होता. नि.20 सोबत सदर विमा पॉलिसी क्र. EGI Employees Group Insurance No.685831 असा आहे. त्‍याची सत्‍यप्रत प्रस्‍तुत प्रकरणी दाखल आहे.  नि.4/12 वर तक्रारदाराने, माहिती अधिकार 2005 अंतर्गत मागविलेली माहिती न मिळालेने दाखल केलेल्‍या अपिलामध्‍ये प्रथम अपिलीय अधिकारी एस.एम.जगजंपी, वरिष्‍ठ मंडल प्रबंधक यांनी दि.2/6/2011 चे पत्राने तक्रारदारास Group Insurance No.685831 मधील सभासदांची एकूण 6 पानी यादी दिलेली आहे. ती नि.4/12 सोबत जोडली आहे. त्‍यामध्‍ये प्रकरणातील पान नं.33 वरील यादीमधील पान नं.5 वर मुत्‍याप्‍पा एम. नाटेकर यांच्‍या नावाचा समावेश आहे. तसेच सदर नावापुढे जत या गावाचाही उल्‍लेख आहे. यावरुन सदर यादीमध्‍ये मयत विमाधारक मुत्‍याप्‍पा नाटेकर यांचा समावेश असल्‍याची बाब निर्विवाद आहे व सदरची बाब सामनेवाला क्र.1 यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये मान्‍य केली आहे. 


 

 


 

13.   सामनेवाला क्र.1 याने दि.15/6/2009 रोजीच्‍या नूतनीकरणावेळी मयत मुत्‍याप्‍पा नाटेकर यांचा 399 सभासदांच्‍या यादीमध्‍ये समावेश नव्‍हता, मात्र सामनेवाला क्र.2 याने दि.20/8/2009 रोजी स्‍वतंत्र 315 सभासदांच्‍या, ज्‍यामध्‍ये मयत नाटेकर यांचा समावेश होता, यादीसहीत एक स्‍वतंत्र पत्र पाठवून दिले. त्‍यास अनुसरुन सामनेवाला क्र.1 याने जी विमा हप्‍ता रक्‍कम पाठविली त्‍यामध्‍ये रु.6,138/- देणे होते, ती रक्‍कम दि.17/9/2009 रोजी सामनेवाला क्र.1 याने सामनेवाला क्र.2 कडे मागणी केली असता सामनेवाला क्र.2 यांने 12/9/2010 चे पत्रासोबत रु.6,138/- ऐवजी रक्‍कम रु.914/- पाठविल्‍याचे कथन केले आहे. तसेच सदर रक्‍कम ही दुबार सभासदांचा समावेश झाल्‍यामुळे कपात करुन पाठविल्‍याबाबतचे सामनेवाला क्र.2 यांचे पत्र नि.4/7 ला आहे. वस्‍तुतः सामनेवाला क्र.1 याने सभासद संख्‍येचा आक्षेप उठविलेला आहे व ठरल्‍याप्रमाणे सभासदाचा विमा उतरविला नसल्‍याने सदर पॉलिसी रद्द करण्‍याचा अधिकार सामनेवाला क्र.1 यांना असल्‍याचे प्रतिपादन केले आहे तसेच करार असल्‍याचेही प्रतिपादन केले आहे. सदर वस्‍तुस्थिती जरी गृहीत धरली तरी नि.4/3 वरती दि.11/6/2009 चे सामनेवाला क्र.1 याने सामनेवाला क्र.2 यांना पाठविलेल्‍या पत्राचे अवलोकन केले असता हजारच्‍या आत सभासद असल्‍याने कमी हप्‍त्‍यात पॉलिसीचे नूतनीकरण करणे शक्‍य नसल्‍याचे दिसून येते. नि.4/4 वर दि.20/8/2009 रोजी सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांना पत्र पाठवून शाखा मिरज 121, इस्‍लामपूर 96, नवीन 21, शिराळा 79 आणि जत 26 अशी एकूण 343 सभासदांचा विमा हप्‍ता कळविणेबाबत विनंती केलेली आहे. सदर पत्रास अनुसरुन सामनेवाला क्र.1 याने नि.4/6 वर दाखल दि.17/9/2009 चे पत्राने सामनेवाला क्र.2 यांना वर नमूद दि.20/8/09 च्‍या पत्राचा संदर्भ देवून दि.15/8/2009 पासून 345 सभासदांना योजनेत समावेश करण्‍याची जी यादी पाठविली होती, त्‍यांचा समावेश केला असल्‍याचे कळविले आहे व त्‍यापोटी हप्‍त्‍याची रक्‍कम रु.6,138/ - येणे बाकी आहे, ती त्‍वरीत पाठवावी असे कळविल्‍याचे दिसून येते. त्‍याप्रमाणे नि.4/7 वर दाखल दि.12/10/09 चे पत्रानुसार सामनेवाला 2 यांनी दुबार सभासदांचा समावेश असलेली यादी व रकमेचा हिशेब देवून हिशेबांअंती देय असणारी रक्‍कम रु.914/- चेक नं.66543 ने पाठविली असल्‍याचे नमूद केलेले आहे.


 

      ही वस्‍तुस्थिती वर दाखल पुराव्‍यावरुन निर्विवाद आहे. सदर यादीमध्‍ये मुत्‍याप्‍पा नाटेकर यांच समावेश असल्‍याची वस्‍तुस्थितीही निर्विवाद आहे. दि.8/10/09 रोजी छातीत अचानक दुखु लागल्‍यामुळे सामनेवाला क्र.2 यांचा विमाधारक कर्जदार मुत्‍याप्‍पा मल्‍लाप्‍पा नाटेकर याचा अचानक मृत्‍यू झाला. नि.4/15 वर मृत्‍यूचा दाखला दाखल आहे. त्‍यामुळे तक्रारदार हे मयत विमाधारकाचे पश्‍चात त्‍याचे कायदेशीर वारस असल्‍याने त्‍यांनी रु.1,50,000/- इतक्‍या विमा रकमेची मागणी सामनेवाला यांचेकडे केली. त्‍यास सामनेवाला यांनी विमा पॉलिसी रद्द केली असल्‍याने विमा संरक्षणच नव्‍हते, त्‍यामुळे विमा रक्‍कम देता येत नाही असे तक्रारदारास कळविलेचे नि.4/11 वरील सामनेवाला क्र.2 यांचे तसेच नि.8 वरील सामनेवाला क्र.1 यांचे म्‍हणण्‍यानुसार दिसून येते. 


 

      सदर वस्‍तुस्थितीचा विचार करता प्रस्‍तुत विमा हा समूह विमा होता व तो कर्जदार सभासदांच्‍या हितार्थ कर्जफेड रकमेच्‍या हमीसाठी उतरविला होता. या वस्‍तुस्थितीचा विचार करता तसेच दाखल पॉलिसी नि. 20 वरील अटी व शर्तींचा विचार करता General Condition मध्‍ये


 

 


 

Clause 7 – It shall be a condition of employment for all future employees of the Grantees that they must become Members and the Grantees shall take effective steps to ensure that relevant information is furnished to the Corporation and that appropriate Assurance are effected hereunder. In the event of breach of this condition, the Corporation shall be entitled to give written notice to the Grantees of termination of this Policy.


 

 


 

Schedules of costs and benefits in respect of the Members who become entitled to the benefits under this policy shall be issued to the Grantees from time to time which Schedules shall be deemed to form part of the policy.


 

 


 

Clause 14 – If Grantees do not renew this Policy on any Annual Renewal Date by paying the premiums then falling due or within 30 days following the said date (or within such extended time as the Corporation may allow) the Grantees shall (unless the Corporation otherwise agree) be deemed to have discontinued payment of premiums hereunder and shall not be entitled to resume payment except with the consent of the Corporation. The Corporation shall be entitled to notify the Members of such discontinuance. 


 

 


 

In case the premiums stipulated hereunder shall not be duly paid or in case any conditions herein mentioned or any endorsements made hereto shall be contravened or in case it shall hereafter appear that an untrue, or incorrect averment is contained in the proposal, declaration, lists or statements already furnished or to be furnished to the Corporation by the Members or the Grantees in accordance with the provisions hereof or otherwise in respect of the Assurance effected or to be effected hereunder or that any of the matters set forth or referred to in such proposal, declaration, lists or statements have not been truly and fairly stated or that any material information has been suppressed or withheld, then and in every such case, but subject to the provisions of Section 45 of the Insurance Act, 1938, wherever applicable, the benefits under this Policy, in so far the same relate to the Member or Members in respect of whom such contravention of conditions or suppression or withholding of material information takes place or such untrue or incorrect averment has been made either by the Member himself or by the Grantees, shall be void and the relative Assurances shall cease and be determined and all claims to any benefits in respect of the Assurance shall be null and void and all the Moneys paid in respect of such Assurances shall belong to the Corporation excepting always in so far as relief is provided in terms of the provisions hereof and without prejudice to the rights of the Corporation of condone any such contravention of condition or untrue or incorrect averment or suppression or withholding of material information in so far as Law permits such condonement or to reinstate the Assurance or parts thereof the original values subject to fulfillment of such conditions as the Corporation may prescribe for such reinstatement or to grant any other relief to the Grantees or to the Member or Members concerned at the sole discretion of the Corporation.


 

 


 

Clause 15 – The Corporation reserves the right to terminate the scheme without assigning any reason whatsoever by giving to the Grantees 30 days notice in writing expiring on the Annual Renewal Date following the notice.


 

 


 

वरील तरतुदींचा विचार करता सामनेवाला क्र.1 यांनी पॉलिसी रद्द करणेबाबतची रितसर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. सामनेवाला क्र.1 ने सामनेवाला क्र.2 ला 30 दिवसांची नोटीस पाठविलेली नाही हे निर्विवाद सत्‍य आहे. तसेच सभासद संख्‍या कमी असतानाही वर नमूद केलेल्‍याविवेचनानुसार सामनेवाला क्र.2 यांनी केलेल्‍या दि.20/8/09 च्‍या पत्राची विनंती मान्‍य करुन, मयत नाटेकर यांचा यादीत समावेश केलेला असून येणे देणे हिशेबाप्रमाणे रु.6,138/- ची मागणी केली आहे, तर सामनेवाला क्र.2 यांनी दुबार सभासदांचा विचार करुन हिशोबाअंती रु.914/- पाठवून दिले आहेत. सदर हिशोबाबतचे स्‍पष्‍टीकरण न घेता केवळ रु.6,138/- मधून अदा केलेली रु.914/- ही रक्‍कम वजा जाता रु.5,224/- इतकी रक्‍कम मिळाली नाही. नि.4/8 वर दि. 8/12/2009 चे पत्राने पॉलिसी रद्द करीत असलेबाबत परस्‍पर कळविलेचे दिसून येते. त्‍याप्रमाणे सामनेवाला क्र.2 यांनी मयत नाटेकर यांच्‍या कर्जखाती विमा हप्‍त्‍यापोटी नावे टाकलेली रक्‍कम जमा केलेली आहे. 


 

 


 

14.   वरील विस्‍तृत विवेचनावरुन नमूद पॉलिसीच्‍या अटी व शर्तींचा विचार करता सामनेवाला यांच्‍या सदर कृत्‍यास estopple या तत्‍वाचा बाध येतो कारण सभासद संख्‍या कमी आहे याचे पूर्णतः पूर्वज्ञान असतानाही सामनेवाला यांनी पॉलिसीचे नूतनीकरण करण्‍याचे मान्‍य करुन सभासदांचा समावेश करुन घेवून पॉलिसीमध्‍ये सदर सभासद समाविष्‍ट करुन त्‍यास मान्‍यता देवून देय रु.6,138/- ची मागणी केली आहे व केवळ हिशेबाच्‍या वादातून प्रस्‍तुत पॉलिसी कोणत्‍याही प्रकारची नोटीस न देता रद्द केलेली आहे. तसेच सदर रक्‍कम हिशेबाचे स्‍पष्‍टीकरण देवून देय रक्‍कम त्‍यांना मागणी करता आली असती पण तसे त्‍यांनी करण्‍याचे टाळले आहे. मध्‍यंतरीच्‍या काळामध्‍ये दि.8/10/09 रोजी कर्जदार मुत्‍याप्‍पा मल्‍याप्‍पा नाटेकर याचा मृत्‍यू झालेला आहे. तदनंतर दि.8/12/09 रोजी सामनेवाला याने नमूद नाटेकर यांचा समावेश असलेली यादी परत पाठवून पॉलिसी रद्द केल्‍याचे कळविले आहे. हे सामनेवालाचे वर्तन कायद्यास धरुन नाही. एकदा मान्‍य केलेल्‍या कृतीच्‍या बाहेर सामनेवाला क्र.1 यांना जाता येणार नाही. सबब सामनेवाला क्र.1 ची कृती estopple या तत्‍वाचा विचार करता नियमबाहय आहे. सदर बाबीचा विचार करता एकदा सामनेवालांनी मयत नाटेकर यांचा विमा यादीत समावेश केला आहे, तो त्‍यांना रद्द करता येत नाही.


 

 


 

15.   वरील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता तसेच माहिती अधिकारात आलेल्‍या माहितीचा विचार करता मयत मुत्‍याप्‍पा मल्‍लाप्‍पा नाटेकर यांचा नमूद समूह विमा योजनेअंतर्गत समावेश होता व सदर विमा कालावधीतच त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतर मिळणारी विमारक्‍कम रु.1,50,000/- देण्‍याची सामनेवाला क्र.1 यांची संपूर्णतः जबाबदारी आहे. यासाठी सामनेवाला क्र.2 यांना जबाबदार धरता येणार नाही.         


 

      अशी वस्‍तुस्थिती असतानाही सामनेवाला क्र.1 यांनी शुल्‍लक कारणास्‍तव आपली जबाबदारी टाळून ग्राहकास द्यावयाच्‍या सेवेमध्‍ये अक्षम्‍य अशी त्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हा मंच येत आहे.



 

मुद्दा क्र.3



 

16.   सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारुन केलेल्‍या सेवात्रुटीमुळे मयत नाटेकरांच्‍या मृत्‍यूपश्‍चात कायदेशीर वारस म्‍हणून  त्‍यांची पत्‍नी व मुलगा अनुक्रमे तक्रारदार क्र.1 व 2 हे व्‍याजासह होणारी विमा रक्‍कम मिळणेस पात्र आहेत. तक्रारदार यांना सामनेवाला यांच्‍या कृतीमुळे विनाकारण शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे. सबब त्‍यापोटी व तक्रारीच्‍या खर्चापोटी सुध्‍दा रक्‍कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.


 

 


 

मुद्दा क्र.4


 

 


 

17.   वरील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला क्र.1 यांनी अक्षम्‍य त्रुटी ठेवल्‍यामुळे खालील रकमा देण्‍यास सामनेवाला क्र.1 हे जबाबदार आहेत. तसेच हे मंच यापुढे असेही सूचित करीत आहे की, प्रस्‍तुत विमा हा कर्जफेडीच्‍या हमीपोटी उतरविला असल्‍यामुळे तक्रारदारांनी, सामनेवाला क्र.2 यांचे कर्जदार मयत नाटेकर यांचे थकीत कर्जफेड करण्‍यासाठी प्राधान्‍याने प्रस्‍तुत विमा रकमेचा विनियोग करावा या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.


 

 


 

आदेश


 

 


 

1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करणेत येत आहेत.


 

 


 

2. तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 यांनी विमा दाव्‍यापोटी रक्‍कम रुपये 1,50,000/-


 

   (अक्षरी रुपये एक लाख पन्‍नास हजार माञ) दि.5/4/2010 पासून द.सा.द.शे.9% दराने


 

   व्‍याजासह अदा करावेत.


 

 


 

3. तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 यांनी शारीरिक आर्थिक, मानसिक ञासापोटी नुकसान


 

   भरपाई रुपये 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार माञ) अदा करावेत.


 

 


 

4. तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 यांनी तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 2,000/- (अक्षरी रुपये दोन  


 

   हजार माञ) अदा करावेत.


 

 


 

5. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.1 यांनी या आदेशाच्‍या तारखेपासून 45 दिवसांत


 

   करणेची आहे.


 

 


 

6. जाबदार नं.1 यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचे विरुध्‍द


 

   ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.


 

 


 

सांगली


 

दि. 25/06/2013           


 

        


 

             


 

      ( वर्षा शिंदे )               ( के.डी.कुबल )                          ( ए.व्‍ही.देशपांडे )


 

        सदस्‍या                       सदस्‍य                                  अध्‍यक्ष
 
 
[ A.V. Deshpande]
PRESIDENT
 
[ K.D. Kubal]
MEMBER
 
[ Smt.V.N.Shinde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.