Maharashtra

Nagpur

CC/11/489

Jaswand Tejram Gorghate - Complainant(s)

Versus

Manager, Bank of India - Opp.Party(s)

Self

19 Apr 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/489
 
1. Jaswand Tejram Gorghate
Vivekanand Nagar, 1st Floor, Plot No. 161-A,
Nagpur 440 015
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, Bank of India
Ajani Branch, Plot No. 1, Hindusthan Colony, Wardha Raod,
Nagpur 440 015
Maharashtra
2. Zonal Manager, Bank of India
Bank of India Building, 3rd floor, Kingsway,
Nagpur 440 001
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Self, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)
                           -// आ दे श //-
                  (पारित दिनांक : 19/04/2012)
 
 
1.          प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत मंचात दि.24.08.2011 रोजी विरुध्‍द पक्षा विरुध्‍द दाखल करुन मागणी केली आहे की, तक्रारकर्त्‍याचे बचत खात्‍यातुन गैरकायदेशिररित्‍या विरुध्‍द पक्षाने कपात केलेली रक्‍कम रु.60,430/- 21 टक्‍के व्‍याजाने परत करावी तसेच तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक मानसिक त्रास, तक्रारीच्‍याकरीता रु.50,000/- मागणी केली आहे.
 
                  प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.          तक्रारकर्ताचा विरुध्‍द पक्ष क्र.1 च्‍या शाखेत बचत खाते क्र. 3546 असुन तो 25 वर्षांपासुन खातेधारक आहे व विरुध्‍द पक्षाने पुरविलेल्‍या धनादेश पुस्‍तिकेचा आवश्‍यकतेनुसार तिस-या पक्षाला धनादेश देऊन बँकेचा व्‍यवहार करीत असे. दि.16.01.2005 रोजी वरील बचत खात्‍याचा विना तारखेचा अकाऊंट पेयी धनादेश 216926 रु.60,430/- तिसरे पक्ष (आर. महेश) यांना दिला, परंतु त्‍यांनी तक्रारकर्त्‍यासोबत हेतुपूरस्‍सर फसवणूक व धोकेबाजी केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि.23.05.2005 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1 यांना उपरोक्‍त धनादेशाचे भुगतान ताबडतोब थांबवून तो बॅंकेच्‍या ताब्‍यात घेण्‍यांस अगाऊ नोटीस दिली. ती नोटीस बँकेच्‍या ऑफीस रेकॉर्डमधे नोंदवुन दि.23.05..2005 ला सकाळी 9.30 वाजता तक्रारकर्त्‍यास दिली व धनादेश वटविण्‍यावर प्रतिबंध केला.
3.          उपरोक्‍त वस्‍तुस्थिती असतांना विरुध्‍द पक्ष क्र.1 चे मॅनेजरने दि.09.05.2011 रोजी तक्रारकर्त्‍याचे बॅंकेचे खाते विवरणानुसार उपरोक्‍त धनादेशाचे निष्‍काळजीपणाने व दुर्लक्ष होऊन धनादेश वटविण्‍यांत आला,त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास रु.60,430/- चे नुकसान सहन करावे लागले. जेव्‍हा की, सदर धनादेशाचे भुगतान थांबविण्‍याबाबत तक्रारकर्त्‍याने विरुध्द पक्ष क्र.1 ला दि.16.01.2005 रोजी सुचना दिली होती. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 सोबत पत्रव्‍यवहार केला व त्‍यांचे वरीष्‍ठ कार्यालयास सुचविले परंतु त्‍यांनी त्‍यास दाद दिली नाही व सदर रक्‍कम तक्रारकर्त्‍याचे खात्‍यात जमा केली नाही, ही विरुध्‍द पक्षांचे ग्राहक सेवेतील गंभीर स्‍वरुपाची त्रुटी आहे.
 
4.          तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दि.23.03.2005 च्‍या विरुध्‍द पक्ष बँकेने धनादेशाची भुगतान थांबविल्‍याची पोच, तक्रारकर्त्‍याचे खाते विवरण, तसेच विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 सोबत केलेला पत्रव्‍यवहार इत्‍यादीं अ.क्र.पृ.क्र. 7 ते 10 वर आहेत.
5.          विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे थोडक्‍यात खालिल प्रमाणे...
            विरुध्‍द पक्षाने म्‍हटले की, तक्रारकर्त्‍याचे बचत खाते विरुध्‍द पक्ष क्र.1 कडे आहे व उपरोक्‍त धनादेश क्र.216926 संदर्भात माहिती नसुन झालेल्‍या फसवणूक व धोकाबाकीबाबत माहिती नसल्‍याचे म्‍हटले आहे. तक्रारकर्त्‍याने दिलेले दि.23.03.2005 चे पत्र मान्‍य केले, विरुध्‍द पक्षाने म्‍हटले की, तक्रारकर्त्‍याने 2005 साली धनादेश न वटविण्‍याबाबत नोटीस दिली होती व तो धनादेश दि.09.05.2011 रोजी वटविण्‍यांस विरुध्‍द पक्षाकडे सादर झाला. जर त्‍या धनादेशावर तक्रारकर्त्‍याने तारीख नमुद केली असती तर धनादेश कालबाह्य होऊन वटविल्‍या गेला नसता. तक्रारकर्त्‍याने स्‍वतः निष्‍काळजीपणाने विना तारखेचा धनादेश दिलेला होता. 6 वर्षांचा कालावधी उलटला असल्‍याने स्‍वाभाविकपणे बँकेजवळ असे स्‍टँडींग इन्‍सट्रक्‍शन असणे शक्‍य नव्‍हते त्‍यामुळे त्‍याचे सेवेत त्रुटी नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे इतर कथन अमान्‍य केले व तक्रारकर्ता त्‍यांचा ग्राहक नाही व तक्रार कालबाह्य असुन ती खारिज होण्‍यांस पात्र आहे, असे नमुद केले आहे.
 
6.          विरुध्‍द पक्षाने म्‍हटले की, उपरोक्‍त धनादेश धारक आर.महेश / ऍड. आर. महेश्‍वरम याला तक्रारीत पक्ष बनवीणे आवश्‍यक आहे, परंतु त्‍यास पक्ष न केल्‍यामुळे सदरची तक्रार खारिज होण्‍यांस पात्र आहे. व इतर तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे नाकारले. विरुध्‍द पक्षाने म्‍हटले की, त्‍यांचेकडे उपरोक्‍त धनादेश स्‍टेट बँक ऑफ त्रावणकोर, यांनी कलेक्‍शनसाठी ऍड. आर महेशवरन यांचेतर्फे सादर केला असल्‍यामुळे तो नाकारण्‍याची कुठलेही अधिकार नव्‍हते. म्‍हणून दि.09.05.2011 रोजी धनादेश वटविण्‍यांत आला त्‍यानंतर दि.18.05.2011, 23.05.2011 व 10.06.2011 ला सदर खात्‍यात व्‍यवहार करण्‍यांत आले, परंतु तक्रारकर्त्‍याने तक्रार केली नाही म्‍हणून डॉक्‍टराईन ऑफ इस्‍टॉपल प्रमाणे तक्रार अपात्र ठरते व निगोशिएबल इन्‍स्‍ट्रुमेंट ऍक्‍टचे तरतुदी नुसार विरुध्‍द पक्षास दोशी ठरविता येत नाही, त्‍यामुळे त्‍यांचे सेवेत त्रुटी नाही.
7.          मंचाने दोन्‍ही पक्षांचे वकीलांचा युक्तिवाद ऐकला व तक्रारीसोबत असलेल्‍या सर्व कागदपत्रांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता आम्‍ही खालिल प्रमाणे निष्‍कर्षाप्रत पोहचलो.
 
                        -// नि ष्‍क र्ष //-
 
 
8.          तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍द पक्ष क्र.1 चे शाखेत बचत खाते असल्‍यामुळे तक्रारकर्ता त्‍यांचा ग्राहक ठरतो, तक्रारकर्त्‍याने दि.23.03.2005 रोजी उपरोक्‍त धनादेशाचे भुगतान थांबविण्‍याबाबत सुचना विरुध्‍द पक्ष क्र.1 यांना दिलेल्‍या होत्‍या व त्‍याची पोच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे अनुक्रमे पृ.क्र.7 वरील पत्रावर दिलेली आहे, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या सुचना विरुध्‍द पक्षाने मान्‍य केली होती हे स्‍पष्‍ट होते. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने उपरोक्‍त धनादेश हा दि.09.05.2011 रोजी वटविण्‍यांत आला हे त्‍यांचे कृत्‍य गैरकायदेशिर असुन ग्राहक सेवेतील त्रुटी व निष्‍काळजीपणा आहे, असे तक्रारकर्त्‍याने म्‍हटले आहे. दि.09.05.2011 ला उपरोक्‍त धनादेशाचे गैरकायदेशिररित्‍या भुगतान झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि.24.08.2011 रोजी मंचात तक्रार दाखल केली त्‍यामुळे वादाचे कारण हे दि.09.05.2011 रोजी घडल्‍यामुळे सदरची तक्रार मुदतीत दाखल केल्‍यामुळे कालबाह्य ठरत नाही व विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे मंचाने नाकारले.
9.          विरुध्‍द पक्षाने आर. महेश/ ऍड. आर. महेशवरण, यांना पक्ष बनविले नाही या सबबेखाली तक्रार खारिज करण्‍यांची मागणी केली, हे विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे तथ्‍य‍हीन असल्‍यामुळे ते मंचाने नाकारले, कारण तक्रारकर्त्‍याच्‍या स्‍पष्‍ट सुचनेनंतर सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने गैरकायदेशिररित्‍या उपरोक्‍त धनादेशाचे भुगतान केले, त्‍यामुळे आता त्‍याबाबत पक्ष करुनसुध्‍दा काहीही फलित होणार नाही, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच विरुध्‍द पक्षाने डॉक्‍टराईन ऑफ इस्‍टॉपल व निगोशिएबल इन्‍स्‍ट्रुमेंट ऍक्‍टप्रमाणे तक्रार अपात्र ठरते, हे त्‍यांचे म्‍हणणे पूर्णतः तथ्‍यहीन असल्‍यामुळे मंचाने नाकारले.
 
10.         तक्रारकर्त्‍याने अनुक्रमे पृ.क्र.44 वर Code of Banks Commitment for Individual Customers या भारतीय रिझर्व बँकेच्‍या मार्गदर्शक तत्‍वाचे कलम 8.4 प्रमाणे Stop payment facility- - we will accept stop payment instructions from you respect of cheques issued by you. Immediately on receipt of your instructions we will give acknowledgement and take action provided these cheques have not already been cleared by us. We leave charges if any, and the same will be included in the tariff schedule as amended from time to time. In case a cheque has been paid after stop payment instructions are acknowledged, we will reimburse and compensate you as per compensation policy of the Bank.
 
                        तसेच राज्‍य आयोग राजस्‍थान, 2009 सीटीजे-192 Aroawali Shetriya Gramin Bank –v/s- Bhagchand Jain”, In case payment of cheque has been made by Bank despite received the stop payment instructions of the drawer, Bank is liable to pay the amount of the cheque to him.
 
11.        वरील विवेचनावरुन हे स्‍पष्‍ट झाले की, विरुध्‍द पक्षाचे सेवेत गंभीर स्‍वरुपाची त्रुटी आहे व ते उपरोक्‍त धनादेशाची रक्‍क्‍म रु. 60,430/- दि. 09.05.2011 पासुन 9 टक्‍के व्‍याजाने तक्रारकर्त्‍यास देण्‍यांस बाध्‍य आहेत. तसेच तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरिक व मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्‍या खर्चापोटी एकत्रीतरित्‍या रु.5,000/- देणे संयुक्तिक होईल असे मंचाचे मत आहे. करीता खालिल प्रमाणे आदेश देण्‍यांत येतो.
 
           
 
             -// अं ति म आ दे श //-
 
 
1.    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    विरुध्‍द पक्षाला आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास धनादेशाची रक्‍कम रु.60,430/- दि.09.05.2011 पासुन  द.सा.द.शे. 9% व्‍याजासह       तक्रारकर्त्‍याचे उपरोक्‍त बचत खात्‍यात जमा करावी.
3.    विरुध्‍द पक्षाला आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला शारीरिक, मानसिक व तक्रारीच्‍या खर्चापोटी एकत्रीतरित्‍या `.5,000/-     द्यावे.
4.    वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्‍द पक्षाने आदेशाची प्रत मिळाल्‍याचे      दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. अन्‍यथा आदेश क्र.2 वर 12%    व्‍याज देय राहील.
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.