Maharashtra

Ahmednagar

CC/16/293

Sanjay Rajendra Jatti - Complainant(s)

Versus

Manager, Bajaj Allianz General Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Pisal

15 Oct 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/16/293
( Date of Filing : 19 Oct 2016 )
 
1. Sanjay Rajendra Jatti
A/P- Wadgaon Tanpura, Tal- Karjat,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, Bajaj Allianz General Insurance Co.Ltd.
Chandani Chowk, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 15 Oct 2019
Final Order / Judgement

निकालपत्र

(द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)

__________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.    तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदारने हिरोहोंडा कंपनीची हंक मोटारसायकल नंबर एमएच-१६-एएस-५४२९ ही भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्‍थेकडुन कर्जाऊ रक्‍कम घेऊन खरेदी केली आहे. अशाप्रकारे तक्रारदार हे सदरच्‍या मोटारसायकलचे मालक आहेत. तक्रारदाराने सामनेवाले विमा कंपनीकडुन गाडीचा विमा उतरविलेला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्‍याकडुन विमा प्रिमीयमची रक्‍कम रूपये १,०७३/- स्विकारून तक्रारदार यांना पॉलिसी क्रमांक ओजी-१४-२००२-१८०२-००००५६४९ या क्रमांकाची पॉलिसी दिलेली आहे. सदर पॉलिसीची मुदत ही दिनांक ३०-०७-२०१९ ते २९-०७-२०१४ पर्यंती होती व आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्‍या मोटारसायकलच्‍या विम्‍याचा प्रिमीयमची रक्‍कम स्विकारून तक्रारदारास विमा पॉलिसी तसेच पैसे स्विकारल्‍याची पावती दिलेली आहे. अशाप्रकारे तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत. तक्रारदार हे दिनांक ०१-१२-२०१३ रोजी त्‍यांच्‍या सदरील मोटारसायकलवरुन बारामती येथुन गावी येत असतांना बारामती भिगवन रोडवर पारवाडी फाट्याजवळ रात्री ९.०० च्‍या दरम्‍यान शेटफळगडे गावाचे शिवारातुन बारामतीकडुन येत असतांना समोरून येणारे मोटार सायकल नंबर एमएच-१६-एएन-३१९२ वरील चालकाने त्‍याची ताब्‍यातील मोटारसायकल ही अविचाराने, भरधाव वेगाने व रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून चालवुन तक्रारदार हे चालवित असलेल्‍या मोटार सायकलला समोरून जोराची धडक दिली. त्‍यात अपघात होऊन तक्रारदार हे गाडीसह खाली पडले. सदरील अपघातामध्‍ये  तक्रारदार यांच्‍या मालकीचे गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तक्रारदार यांना अपघात झाल्‍यानंतर जखमांमुळे बरेच दिवस उपचार घ्‍यावे लागले. त्‍यामुळे फिर्याद देण्‍यास ऊशिर झाला तसेच गाडीचा क्‍लेमबाबत देखील चौकशी करून क्‍लेम सादर करता आला नाही. सदरील घडलेल्‍या घटनेबाबत तक्रारदार यांनी भिगवन पोलीस स्‍टेशनला दिलेल्‍या फिर्यादीवरून पोलीसांनी गुन्‍हा रजिस्‍टर नंबर १८९/२०१४ चा दाखल करून गुन्‍ह्याचा तपास केला. त्‍यानंतर तक्रारदाराने जुलै २०१४ मध्‍ये तक्रारदार यांच्‍या गाडीच्‍या झालेल्‍या नुकसानीबाबत सामनेवाले कंपनीस फोनवर माहिती दिली व सदरील मोटारसायकल गाडी साईदीप ऑटोमोबॉईल्‍स सर्जेपुरा, अहमदनगर यांच्‍याकडे आणली. त्‍यांनी गाडीची दुरूस्‍तीबाबत पाहणी करून खर्चाबाबात माहिती दिली. त्‍यानुसार तक्रारदाराने सामनेवाले कंपनीच्‍या अधिकारी यांना सांगितले की, गाडी दुरूस्‍त करून घेऊन गाडीचे बिलासहीत तसेच कागदपत्रांसहीत क्‍लेम सादर करा, असे सांगण्‍यावरून तक्रारदाराने सदरची मोटारसायकल दुरूस्‍त करून घेतली. त्‍यास रक्‍कम रूपये ३५,०००/- खर्च आला.  तक्रारदाराने सामनेवाले कंपनीकडे सर्व कागदपत्र, पोलीस पेपर्स, खर्चाची सर्व बिले यासहीत सामनेवाले यांच्‍याकडे क्‍लेम सादर केला. त्‍यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यास दिनांक ०६-०५-२०१५ रोजी पत्र देऊन त्‍यात तक्रारदाराच्‍या गाडीचा नंबर नमुद न करता दुसरेच गाडीचा नंबर नमुद करून तक्रारदार यांना कागदपत्रांची मागणी केली. सदरचे पत्र मिळाल्‍यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले कंपनीत येऊन सदरील पत्रातील गाडी तक्रारदार यांचे मालकीची नसुन तक्रारदार यांची गाडी दुसरी आहे, असे सांगुन सामनेवाले यांच्‍या  मागणीखातर पुन्‍हा  कागदपत्र देऊनही सामनेवाले यांनी तक्रारदार यांची क्‍लेमची रक्‍कम अदा केलेली नाही व क्‍लेम प्रलंबित ठेवुन तक्रारदाराचे नुकसान केले आहे, म्‍हणुन तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने सामनेवालेडुन गाडीच्‍या क्‍लेमची रक्‍कम रूपये ३५,०००/- वेळेत क्‍लेम मंजुर करून रक्‍कम अदा न केल्‍याने झालेले नुकसान रूपये २५,०००/- अशी एकुण रक्‍कम रूपये ६०,०००/- तक्रारदार यांना सामनेवालेडुन मिळावे, सदर रक्‍कम वसुल होईपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्‍के प्रमाणे व्‍याज सामनेवालेकडुन मिळावे, तसेच शारीरिक व मानसिक त्रासाबाबत रक्‍कम रूपय २५,०००/- मिळावे अशी विनंती केली आहे.

३.   तक्रारदाराने त्‍याच्‍या तक्रारीसोबत निशाणी क्रमांक ६ वर दस्‍तऐवज यादीसोबत एकुण ११ कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्‍यामध्‍ये तक्रारदार यांनी भिगवन पोलीस दुरक्षेत्र येथे दिलेली फिर्याद, घटनास्‍थळ पंचनामा, इन्‍शुरन्‍स  कंपनीची पॉलिसीची कव्‍हरनोट, तक्रारदार यांचे ड्रायव्‍हींग लायसेन्‍स, गावडे अॅक्‍सीडेंट हॉस्‍पीटल यांच्‍या मेडिको लिगल सर्टीफीकेटची छायांकीत प्रत,       उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, अहमदनगर यांनी तक्रारदार यांच्‍या अर्जावरून त्‍यांच्‍या मोटारसायकलविषयी दिलेल्‍या माहितीची छायांकीत प्रत, साईदिप ऑटोमोबाईल्‍स प्रा.लि. अहमदनगर यांनी दिलेले तक्रारदार यांच्‍या मोटारसायकल दुरूस्‍तीबाबतचे बिलाची छायांकीत प्रत, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिनांक ०६-०५-२०१६ रोजी पाठविलेल्‍या पत्राची मूळ प्रत, तक्रारदार यांनी सामनेवाले यांना रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेल्‍या नोटीसची प्रत, रजिस्‍टर पोस्‍टाची पोहोच पावती दाखल केली आहे. तक्रारदाराने निशाणी १७ वर MACP No.121/2014 – Shri. Sanjay Rajendra Jatti Vs. Shri. Mahesj J. Katre या निकालाची छायांकीत प्रत जोडली आहे. नि.१८ वर सामनेवाले तर्फे लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.    

४.   सदरची तक्रार दाखल करण्‍यात येऊन सामनेवाले यांना नोटीस काढण्‍यात आली. त्‍यानुसार सामनेवाले यांनी हजर होऊन निशाणी १४ वर कैफीयत दाखल केली. त्‍यामध्‍ये सामनेवालेने तक्रारदाराचे म्‍हणणे खोडुन तक्रारदाराची तक्रारीतील केलेली मागणी बरोबर नाही, ती सामनेवाले यांना मान्‍य नाही. खरी वस्‍तुस्थिती पुढीलप्रमाणे नमुद केली आहे.

     तक्रारदाराने त्‍याचे मोटारसायकल दुचाकीचा विमा सामनेवालेकडे उतरविला आहे. सामनेवालेने विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे करार केलेला आहे. या पॉलिसीच्‍या करारनाम्‍यात असे म्‍हटले आहे की, अपघात घडल्‍यानंतर त्‍याबाबत तोंडी अथवा लेखी त्‍वरीत कळविणे आवश्‍यक आहे व सदरील अपघाताबबतची माहिती कंपनीला त्‍वरीत मिळणे आवश्‍यक आहे. दिनांक ०१-१२-२०१३ रोजी सदरची घटना घडली असली तरी जुलै २०१४ मध्‍ये तक्रारदाराने दुरध्‍वनीवर सदरील माहिती दिली. म्‍हणजे सदरील माहिती ही उशीरा दिलेली आहे. सामनेवाले इन्‍शुरन्‍स कंपनीस तक्रारदाराने सदरील अपघाताबाबत त्‍वरीत कळविणे आवश्‍यक होते.  सदरील तक्रारीत अपघाताविषयी माहिती व विमा दावा अर्ज विलंबाने दाखल केला आहे. सामनेवाले विमा कंपनीला सदरील अपघाताविषयी माहिती व विमा दावा मिळाल्‍यानंतर अपघातासंदर्भात सर्व्‍हेअरची  नेमणुक केली व सर्व्‍हेअरने  अपघातग्रस्‍त मोटारसाकलची पाहणी केली, निरीक्षण केले व त्‍याचा निरीक्षण अहवाल सामनेवाले विमा कंपनीला सादर केला. त्‍यानुसर डिप्रेसीएशन शुल्‍क आकारणी नंतर सर्व्‍हेअरने अहवालामध्‍ये वाहनाच्‍या  स्‍पेअर पार्टची किंमत रूपये २२,५९६.९०/- आणि कामगार शुल्‍काची किंमत रूपये ३,१२३.६०/- अशी एकुण रक्‍कम रूपये २५,७२०.५०/- इतकी किमतीचे नुकसान झाल्‍याचे अहवालात नमुद केले आहे.  पॉलिसीच्‍या एक्‍सेस क्‍लॉजनुसार रूपये १००/- ची रक्‍कम वजावट करून तसेच रूपये ५,०००/- ची सॅवेज व्‍हॅल्‍यु कमी करून रक्‍कम रूपये २०,६२१/- चे नुकसान झाले आहे, अशा प्रकारे नुकसानीचे मुल्‍यांकन करण्‍यात आलेले आहे. दरम्‍यानच्‍या काळात सामनेवाले विमा कंपनीने दिनांक २०-०४-२०१५ रोजीच्‍या पत्राद्वारे तक्रारदारास संबंधीत अपघातग्रस्‍त  मोटारसायकलचा विमा दावा कागदपत्र,  दाखल करण्‍यास सांगितले. दिनांक    ०६-०५-२०१५ रोजी स्‍मरण पत्र देऊन दावा व मोटारसायकची दुरूस्‍तीची बिले सादर करण्‍याचे व वाहन तपासणीसाठी काढुन पाठविण्‍याचे आवाहन केले. परंतु पत्र मिळाल्‍यानंतरही तक्रारदार यांनी सदरील बिले, कागदपत्र व फोटो पाठविले नाही. त्‍याची पुर्तता न करता तक्रारदाराने वकिलांमार्फत नोटीसची बजावणी केली. विमा पॉलिसीच्‍य अटी व शर्तीनुसार तक्रारदाराने त्‍याच्‍या अपघातग्रस्‍त  मोटारसाकलचा अपघातासंबंधी माहिती त्‍वरीत देणे व संबंधीत माहिती व कागदपत्र सामनेवाले इन्‍शुरन्‍स  कंपनीला पाठविणे बंधनकाराक असते. सदरील तक्रारदाराने विमा पॉलिसीच्‍या  अटी व शर्तीनुसार कुठलीही मागणीप्रमाणे माहिती पाठविली नाही. या प्रकरणातील कारण व तक्रारदाराचे आचरण लक्षात घेता तक्रारदाराने केलेला दावा संश्‍यास्‍पद आहे. तक्रारदाराने विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तींचा भंग केलेला आहे.  त्‍यामुळे सदरची तक्रार फेटाळण्‍यास पात्र आहे, असे सामनेवाले यांनी म्‍हटले असुन तक्रारदाराने खोटा दावा केल्‍याबद्दल रक्‍कम रूपये ३,०००/- ची नुकसान भरपाई सामनेवाले यांना द्यावी, असे म्‍हटले आहे.

     सामनेवाले यांनी निशाणी क्र.१५ वर कैफीयतीसोबत शपथपत्र दाखल केले आहे.  तसेच निशाणी १६ वर मोटारसायकलच्‍या विम्‍याची सर्टीफाईड पॉलिसी कॉपी दिनांक ३०-०७-२०१३, तक्रारदाराने दाखल केलेल्‍या विमा दाव्‍याची छायांकीत प्रत दाखल केल आहे, दिनांक २१-१०-२०१४ रोजीचा सर्व्‍हेअरचा रिपोर्ट इत्‍यादी कागदपत्र दाखल केलेले आहेत. नि.१८ वर सामनेवाले तर्फे लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. सामनेवाने नि.२१ वर सर्व्‍हेअर श्री.सचिन मगदुम यांचा सर्व्‍हे रिपोर्ट दाखल केला आहे. तसेच पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी १९ वर सामनेवालेने पुढील न्‍यायनिवाडा दाखल केला आहे.  – I (2003) CPJ Page 442 Maha, State Commission – Premlal N. Ratan Vs. New India Assurance Co. Ltd.

५.    तक्रारदाराची तक्रार त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र, सामनेवालेंचे दाखल कागदपत्र, युक्तिवाद यांचे अवलोकन केले असता मंचाच्‍या विचारात खालील मुद्दे उपस्थित होतात.

अ.नं.   

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रती सेवेत त्रुटी दिलेली आहे काय ?

 

 नाही

(२)

आदेश काय

अंतिम आदेशा प्रमाणे

 

कारणमिमांसा

६.  मुद्दा क्रमांक १ ला उत्‍तर :  तक्रारदाराने तक्रारीत नमुद केल्‍याप्रमाणे अपघात झाला असल्‍याचे दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन दिसुन येते. सामनेवालेने दिनांक ०६-०५-२०१५ रोजीच्‍या पत्राप्रमाणे तक्रारदाराच्‍या  मोटरसायकल दुरूस्‍तीची बिले व वाहनाचे पुर्नतपासणीची फोटो पाठविण्‍याची मागणी केली त्‍यातील क्‍लेम व पॉलिसी क्रमांकावरून दिसुन येते. तक्रारदार व सामनेवाले यांनी सदर तक्रार अर्जामध्‍ये दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन करता क्‍लेम क्रमांक व पॉलिसी क्रमांक नमुद आहे. तसेच सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये  क्‍लेम क्रमांक वेगळा नमुद केलेला आहे. या तांत्रीक चुका आहेत. परंतु तक्रारदारानेही सामनेवाले यास मागणीप्रमाणे योग्‍य दस्‍तऐवज विमा कंपनीला पुरविले पाहिजे, ते पुरविले नाही, असे दिसुन येते. म्‍हणुन सामनवालेने तक्रारदाराप्रती सेवेत त्रुटी दिली नाही, या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्‍हणुन मुद्दा क्र.१ चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे.      

७.  मुद्दा क्रमांक २ ला उत्‍तर :  ग्राहकाला त्‍याचा योग्‍य विमा दावा मिळाला पाहिजे, असे मंचाचे मत आहे. म्‍हणुन सामनेवालेने तक्रारदारास दस्‍तऐवज पुरवीणेबाबत निर्देश देणेत व सामनेवालेने त्‍याचा पुनर्वीविचार करावा. तसेच तक्रारदाराने सामनेवालेकडे अपघातग्रस्‍त वाहनाच्‍या दुरूस्‍तीची बिले व वाहनाच्‍या  दुरूस्‍तीबाबत लागणारी दस्‍त आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसांच्‍या आत द्यावे व सामनेवालेने नमुद कागदपत्र मिळाल्‍यापासुन ३० दिवसांच्‍या आत तक्रारदाराच्‍या नमुद मोटारसायकला विमा दावाबाबत योग्‍य तो निर्णय घ्‍यावा, असे आदेश करणे योग्‍य होईल. मुद्दा क्रमांक १ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.   

अंतिम आदेश

१.  तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

 

२. तक्रारदाराने सामनेवालेकडे अपघातग्रस्‍त वाहनाच्‍या  दुरूस्‍तीची बिले व वाहनाच्‍या दुरूस्‍तीबाबत लागणारी दस्‍त आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसांच्‍या आत द्यावे व सामनेवालेने नमुद कागदपत्र मिळाल्‍यापासुन ३० दिवसांच्‍या आत तक्रारदाराच्‍या नमुद मोटारसायकला विमा दावाबाबत योग्‍य तो निर्णय घ्‍यावा,

 

३. उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

 

४. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 

५. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.