जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 81/2008. प्रकरण दाखल तारीख - 21/02/2008 प्रकरण निकाल तारीख - 01/08/2008 समक्ष - मा.श्री.विजयसिंह राणे. - अध्यक्ष. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते - सदस्य. माधव पि. एकनाथराव दासरवार अर्जदार. वय वर्षे 30, धंदा व्यापार, रा. सिडको, नांदेड. विरुध्द. 1. मॅनेजर बाफना मोटर्स प्रायव्हेट लि.नांदेड गैरअर्जदार 2. वीभागीय, टाटा मोटार्स ऐरिया सर्व्हीस ऑफिस, तिसरा मजला, नारंग सिव्हील लाईन, नागपूर-440 001. अर्जदारा तर्फे वकील - श्री.राहूल कूलकर्णी गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - श्री.पी.एस. भक्कड गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष ) यातील तक्रारकर्ते यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, ते व्यावसायाने व्यापारी आहेत, ते रु.1,10,000/- निव्वळ नफा वर्षाकाठी कमवितात. त्यांनी व्यापाराच्या उन्नतीसाठी व वाढत्या कामाच्या मागणीपोटी गैरअर्जदाराकडून वादातील ट्रक विकत घेतला. त्यावर त्यांनी एक ते दोन लाख खर्च केला. पूढे दोनदा त्यांना टायर बदलावे लागले आणि समोरील उजव्या चाकाचे डिस्क हे 3 एम एम आऊट असल्याचा अहवाल दिला. म्हणून त्यांनी ही तक्रार दाखल करुन ती द्वारे रु.1,00,000/- नूकसानीची मागणी केली आहे. यात गैरअज्रदार क्र.1 ने हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले आणि असा आक्षेप घेतला आहे की, सदरील प्रकरण व्यावसायीक स्वरुपाचे आहे तसेच सदर वाहन व्यावसायीक कामासाठी विकत घेतलेला आहे. त्यामुळे ही तक्रार या मंचात चालत नाही व इतरही कारणे त्यांनी नाकारलेली आहे त्यामुळे सदर तक्रार खारीज करावी असे ते म्हणतात. गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीस देण्यात आली पण नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही, त्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचे आदेश दि.9.7.2008 रोजी पारीत केले. सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र.1 यांचा संबंध फार कमी आहे. कारण त्यांनी केवळ वाहन विकलेले आहे. त्याचे निर्माते गैरअर्जदार क्र.2 हे आहेत. यातील तक्रारदारांना वारंवार संधी देण्यात आली की, त्यांनी वॉरटीच्या कालावधीमध्ये दोष निर्माण झालेला आहे असा आरोप केलेला आहे पण त्या संबंधी तज्ञाचा पूरावा सादर केलेला नाही. अर्जदारांनी अनेक वेळा संधी देऊनही त्यांनी तज्ञाचा पूरावा व शपथपञ दाखल केलेले नाही. आजही अर्जदार स्वतः हजर झाले नाहीत. या बाबी लक्षात घेता तक्रारकर्ते या प्रकरणात वॉरंटीच्या कालावधीमध्ये दोष निर्माण झाला ही बाब योग्य व निश्चित व तज्ञाचे पूराव्याने सिध्द करु शकले नाही. म्हणून ही तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. वरील सर्व बाबीचा विचार करता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते. 2. तक्रारीचा खर्च ज्यांचा त्यांनी आपआपला सोसावा. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते श्री.विजयसिंह राणे सदस्या सदस्य अध्यक्ष जे. यु. पारवेकर लघूलेखक. |