(घोषित दि. 21.06.2011 व्दारा सौ.माधूरी विश्वरुपे, सदस्या) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार गैरअर्जदार बँकेचे खातेदार/ग्राहक असून, खाते क्रमांक 4870100038535 येथे रक्कम रुपये 27,664.75/- जमा आहे. दिनांक 19.06.2010 रोजी एस.बी.एच. रेल्वे स्टेशन शाखा औरंगाबाद येथील ए.टी.एम. मधून रक्कम रुपये 17,000/- काढण्याचा प्रयत्न केला. परंतू सदरची रक्कम मिळाली नाही या कारणास्तव तक्रारदाराने दिनांक 19.06.2010 रोजी आय.सी.आय.सी.आय बँक शाखा औरंगाबाद यांचे ए.टी.एम मधून रक्कम रुपये 17,000/- हस्तगत केली. परंतू गैरअर्जदार बँकेने रक्कम रुपये 10,000/- तक्रारदाराच्या खात्यावरुन डेबीट केले आहेत. त्यामुळे तक्रारदाराने एस.बी.एच यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गैरअर्जदार बँकेशी संपर्क साधण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने गैरअर्जदार यांचेकडे तक्रार केली. तसेच दिनांक 29.09.2010 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. परंतू गैरअर्जदार यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही अशी तक्रारदाराची तक्रार आहे. सदर प्रकरणात गैरअर्जदार बँक हजर झालेली असुन, दिनांक 22.03.2011 रोजी लेखी म्हणणे न्यायमंचात दाखल केले आहे. गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानुसार गैरअर्जदार यांना त्यांचे खातेदार असल्याची बाब मान्य असुन, सदर खात्यास ए.टी.एम ची सुविधा असल्याचे नमुद केले आहे. तसेच दिनांक 19.06.2010 रोजीचे रेकॉर्ड प्रमाणे तक्रारदाराने दिनांक 19.06.2010 रोजी सकाळी 11.39 वाजता रक्कम रुपये 10,000/- स्टेट बँक ऑफ हैद्राबाद औरंगाबाद शाखा रेल्वे स्टेशन यांचेकडून काढण्यात (Withdrawl) आल्याचे दिसून येते. तक्रारदाराचे खात्यावर (Withdrawl) पूर्वी रुपये 27,664.75/- एवढी रक्कम जमा होती. तक्रारदाराने सकाळी 11.39 वाजता रक्कम रुपये 10,000/- (Withdrawl) काढण्यात आल्यानंतर फक्त रुपये 17,664.75/- एवढी रक्कम सदर खात्यावर जमा होती हे खाते उता-यावरुन दिसून येते. तक्रारदाराची या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी तात्काळ स्टेट बँक ऑफ हैद्राबाद बेलापूर शाखेला कळविले. तक्रारदाराचे व्यवहार स्टेट बँक ऑफ हैद्राबाद बँके मार्फत झालेले असल्यामुळे ए.टी.एम ची रक्कम मिळण्याबाबत स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा रेल्वे स्टेशन औरंगाबाद यांना कळविले. दिनांक 27.07.2010 रोजी गैरअर्जदार बँकेने स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, औरंगाबाद रेल्वे स्टेशन शाखा यांचेकडे सदर रक्कम परत मिळण्याबाबतचा प्रस्ताव दिला (Charge back). अशा प्रकारचा चार्ज बॅकचा क्लेम विशीष्ट कालावधीत दाखल करणे आवश्यक असते. स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, बेलापूर यांनी सदरचा चार्जबॅक क्लेम दिनांक 04.12.2011 रोजीच्या पत्रान्वये नाकारलेला असुन, तक्रारदाराने दिनांक 19.06.2010 रोजी सकाळी 11.39 वाजता स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, औरंगाबाद रेल्वे स्टेशन शाखा यांचेकडे केलेले व्यवहार यशस्वी झाला असल्याचे कळविले आहे. त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ हैद्राबाद औरंगाबाद रेल्वे स्टेशन शाखा यांनी जे.पी लॉगची प्रत पाठविली असुन तक्रारदारास सदरची रक्कम प्राप्त झाल्याचे याप्रतीवरुन स्पष्टपणे दिसून येते. तसेच तक्रारदाराने सदरचे स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा, औरंगाबाद यांचेकडे केलेले असल्यामुळे त्यांना सदर प्रकरणात पार्टी करणे आवश्यक होते. सदर प्रकरणात गैरअर्जदार बँकेची जबाबदारी नसून तक्रारदारास कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यास बंधनकारक नाही असे नमूद केले आहे. तक्रारातील कागदपत्रे पाहता तक्रारदार गैरअर्जदार बँकेचे खातेदार असुन, सदर खात्याला ए.टी.एम व क्रेडीट कार्ड ची सुविधा देण्यात आलेली आहे. डेप्यूटी जनरल मॅनेजर, ए.टी.एम (Operations), ए.टी.एम स्वीच सेंटर, बेलापूर नवी मुंबई यांनी दिनांक 03.02.2011 रोजी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार ट्रान्झेक्शन नंबर 616 दिनांक 19.06.2010 रोजीचे ए.टी.एम एस – 120030202 म्हणजेच तक्रारदाराच्या खात्यावरील व्यवहार यशस्वी झालेले असुन रोख रक्कमेची तपासणी केली असता कोणत्याही प्रकारची जादा रक्कम रेकॉर्डला दिनांक 18.06.2010 रोजी पासून दिनांक 20.06.2010 पर्यंत आढळून आलेली नाही. त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ औरंगाबाद शाखा रेल्वे स्टेशन यांच्या ए.टी.एम व्यवहार प्रतीवरुन दिनांक 19.06.2010 रोजी तक्रारदाराच्या खात्यावरुन ए.टी.एम स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, औरंगाबाद रेल्वे स्टेशन शाखा यांचेकडून रक्कम रुपये 10,000/- (Withdrawl) केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. वरील परीस्थितीचे अवलोकन केले असता तक्रारदाराचे खात्यावरुन दिनांक 19.06.2010 रोजी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, औरंगाबाद रेल्वे स्टेशन शाखा येथून ए.टी.एम द्वारे रक्कम रुपये 10,000/- (Withdrawl) बाबतचे व्यवहार यशस्वी झाले असल्याची बाब स्पष्ट होते. तक्रारदाराने सदरचे व्यवहार स्टेट बँक ऑफ हैद्राबाद औरंगाबाद रेल्वे स्टेशन शाखे मार्फत केलेले असल्यामुळे त्यांना सदर प्रकरणात समाविष्ट करणे आवश्यक होते. तसेच तक्रारदाराच्या तक्रारीची दखल घेवून गैरअर्जदार बँकेने या संदर्भात वेळोवेळी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, औरंगाबाद तसेच बेलापूर यांचेकडे संपर्क करुन माहीती प्राप्त केल्याचे तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन स्पष्ट होते. या कारणास्तव गैरअर्जदार बँकेच्या सेवेत त्रुटी असल्याची बाब स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे. सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश - तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
सौ.माधूरी विश्वरुपे डी.एस.देशमुख सदस्या अध्यक्ष
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |