तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले : त्यांचे वकीलाचे प्रतिनीधी श्री मनोज बामणे हजर.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*--
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. तक्रारदारांनी मे.श्री.ओम साईनाथ कार यांचेकडे रु.1,22,000/- पाच मुदत ठेवीमध्ये दिनांक 27.3.2008 रोजी ठेवले. व कंपनीने या रक्कमेवर तक्रारदारांना दर महा रु.4,690/- व्याज प्रत्येक महिन्याचे 10 तारखेस अदा करण्याचे कबुल केले. कंपनीच्या या आश्वासनास सा.वाले बँक यांनी जामीन दिला व तसे पत्र तक्रारदारांना दिले.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे मे.श्री.ओम साईनाथ कार यांनी दिलेला दिनांक 10 डिसेंबर, 2009 रोजीचा रु.4,593/- चा धनादेश तक्रारदारांनी त्यांच्या बँकेमध्ये जमा परंतु तो वटला नाही. तक्रारदार दुसरे दिवशी म्हणजे दिनांक 11.12.2009 मे.श्री.ओम साईनाथ कार यांचे कार्यालयात गेले व त्यांनी चौकशी केली व त्यांनी तक्रारदारांना असे सांगीतले की, भविष्यामध्ये ई.सी.एस. व्दारे तक्रारदारांचया बॅक खात्यामध्ये मासीक व्याजाची रक्कम जमा करण्यात येईल. या आश्वासनावर विसंबून तक्रारदारांनी डिसेंबर, 2009, ते मार्च 2010 या चार महिन्याचे धनादेश बँकेकडे परत केले. दरम्यान बँकेची आर्थिक गुन्हा विभागामार्फत चौकशी सुरु झाली.
3. तक्रारदारांनी त्यानंतर कंपनीके चौकशी केली व तक्रारदारांना असे सांगण्यात आले की, जामीनदार बँक म्हणजे सा.वाली बँक ही तक्रारदारांना मासीक व्याजाचे हप्ते अदा करतील. त्यावरुन तक्रारदार 2 फेब्रृवारी 2010 रोजी सा.वाले बँकेकडे गेले व त्यांनी मुळचे जामीनपत्र दाखविले. तथापी सा.वाले बँकेने तक्रारदारांना फक्त फेब्रृवारी, 2010 व मार्च, 2010 चा हप्ता अदा केला. परंतु डिसेंबर, 2009 व जानेवारी, 2010 चे दोन हप्ते प्रत्येकी रु.4,593/- एकंदरीत रु.9,186/- अदा करण्याचे नाकारले. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व सा.वाले यांनी तक्रारदारांना जामीनकीच्या कराराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली व सा.वाले यांचेकडून व्याजाच्या दोन हप्त्याची रक्कम रु.9,186/- अधिक नुकसान भरपाई रु.5000/- वसुल करुन मिळावेत अशी दाद मागीतली.
4. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली व तक्रारदारांनी मे.श्री.ओम साईनाथ कार कंपनीशी केलेला व्यवहार कबुल केला व जामीनकिचा करार देखील कबुल केला. तथापी सा.वाले यांच्या कथनाप्रमाणे जामीनपत्र दिनांक 29.3.2009 यामध्ये अशी स्पष्ट तरतुद आहे की, जामीनकिचा करार दिनांक 20.2.2008 रोजी सुरु होईल व दर महिन्याच्या 10 तारखेस रु.4,593/- येवढया रक्कमेने कमी होईल. सा.वाले यांनी त्या प्रकारे 11 महिन्याची तालीका आपल्या कैफीयतीमध्ये हजर केली व असे कथन केले की, सा.वाले यांनी डिसेंबर, 2009 चा हप्त्याकरीता त्या महिन्याचे 10 तारखेपूर्वी व जानेवारी 2010 च्या हप्त्याकरीता जानेवारी, 2010 पूर्वी मागणी करणे आवश्यक हेाते. परंतु तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे दिनांक 3.2.2010 मध्ये तिन्ही मासीक हप्त्याबद्दल एकत्रित मागणी केल्याने व डिसेंबर, 2009 व जानेवारी,2010 या दोन मासीक हप्त्यांची मागणी मुदत बाहय झाल्याने व येवढी रक्कम करारातून कमी झाल्याने तक्रारदारांना फक्त वैध हप्ता म्हणजे फेब्रृवारी, 2010 रु.4,593/- अदा करण्यात आले. दरम्यान सा.वाले यांनी करारातील तरतुदीप्रमाणे आपण व्यवहार केला असे कथन केलें व तक्रारदारांना जामीनकीचे कराराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास नकार दिला.
5. तक्रारदारांनी सा.वाले यांचे कैफीयतीस प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले. तसेच पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तक्रारदारांनी तक्रारीसोबत जामीनकीच्या व्यवहाराची प्रत दाखल केली.
6. प्रस्तुत मंचाचे तक्रार, कैफीयत, शपथपत्र, व कागदपत्रे यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना जामीनकीच्या करराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली व तक्रारदारांना डिसेंबर, 09 व जानेवारी,2010 या महिन्याच्या व्याजाचे दोन मासीक हप्ते कराराचे विरुध्द अदा केले नाही हे तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2. | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
7. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये तक्रारदार व मे.श्री.ओम साईनाथ कार यांचे दरम्यान झालेला व्यवहार, तसेच त्या व्यवहारास सा.वाले जामीन राहीले व जामीनकीचे पत्र दिले हया सर्व बाबी मान्य केलेल्या आहेत. सा.वाले यांचे थोडक्यात कथन की, जामीनकीचा करार व जामीन पत्र या प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना रक्कम रु.55,116/- अशी हमी दिली होती. व कराराप्रमाणे ती हमी दिनांक 15.3.2010 पर्यत अस्तीत्वात रहायची होती. जामीनकीच्या करारामध्ये व पत्रामध्ये अशी तरतुद आहे की, प्रत्येक महिन्याचे 10 तारखेला जामीनकीच्या रक्कमेतुन रु.4,593/- कमी होतील. थोडक्यामध्ये मे.श्री.ओम साईनाथ कार यांनी व्याजाची रक्कम तक्रारदारांना अदा केली नाही तर तक्रारदारांनी सा.वाले बँकेकडे त्या महिन्याचे 10 तारखेपूर्वी मागणी करणे आवश्यक आहे.
8. तक्रारदारांनी तक्रारीत असे कथन केले आहे की, मे.श्री.ओम साईनाथ कार यांनी तक्रारदारांना दिलेला 10 डिसेंबर, 2009 चे रु.4,593/- चा धनादेश वटला गेला व त्याचा अनादर झाला. त्यानंतर मे.श्री.ओम साईनाथ कार यांनी तक्रारदारांना असे सांगीतले की, तक्रारदारांचे मुदतीत पैसे जमा होतील. परंतु त्या आश्वासनाची पुर्तता कंपनी करु शकली नाही. त्यानंतर कंपनीने तक्रारदारांना सा.वाले म्हणजे जामीनदार यांचेकडून जामीन करारपत्राप्रमाणे पैसे वसुल करण्याची सूचना केली. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीतच असे कथन केलेले आहे की, कंपनीने दिनांक 3.2.2010 रोजी सा.वाले बँकेकडे तिन्ही मासीक हप्त्याची मागणी केली. त्या मागणीमध्ये डिसेंबर, 2009, ते मार्च, 2010 असे चार हप्ते अतर्भुत हेाते. येथे एक बाब नमुद करणे आवश्यक आहे की, कराराप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेनंतर जामीनकीची रक्कम रु.4,593/- येवढया रक्कमेने कमी होणार होती. परीणामतः विशिष्ट महिन्याचे 10 तारखेनंतर तक्रारदार सा.वाले यांचेकडे त्या विशिष्ट महिन्याच्या व्याजाचा हप्ता मागू शकत नव्हते. या प्रकारचा मुदतीचा करारनामा अंतर्भुत असल्याने सा.वाले यांनी तक्रारदारांना वैध हप्ता म्हणजे फेब्रृवारी 2010 चा रु.4,593/-व मार्च,2010 प्रत्येकी अदा केला. या प्रकारचे सा.वाले यांचे वर्तन जामीनकीच्या करारावार आधारीत असल्याने व जामीनकीच्या कराराचे विपरीत नसल्याने सा.वाले यांनी तक्रारदारांना जामीनकीच्या कराराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढणे शक्य नाही.
9. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील आदेश करण्यात येतो
आदेश
1. तक्रार क्रमांक 200/2010 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.