Maharashtra

Nagpur

CC/453/2018

SHRI. UMAKANT SUBHASH ADKI - Complainant(s)

Versus

MANAGER/ AUTHORIZED OFFICER/CEO, TATA CLIQ - Opp.Party(s)

ADV. C.S. DESHPANDE

31 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/453/2018
( Date of Filing : 06 Jul 2018 )
 
1. SHRI. UMAKANT SUBHASH ADKI
R/O. 111/07, SHIVGOURI APARTMENT, PANDEY LAYOUT, KHAMLA, NAGPUR-440025
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. MANAGER/ AUTHORIZED OFFICER/CEO, TATA CLIQ
LAL BAHADUR SHASHTRI MARG, 1ST FLOOR, EMPAIR PLAZA, CHANDAN NAGAR, VIKROLI, MUMBAI (W)-400083
MUMBAI
MAHARASHTRA
2. MANAGER, TATA CLIQ, SERVICE STATION
DR. MUNJE CHOWK, BANK OF BARODA, 2ND FLOOR, SITABURDI, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 31 Jan 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर. आजने, मा. सदस्‍य)

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हा मोबाईल टॅबलेट आणि इतर टाटा कंपनीचा ऑनलाईन विक्रेता असुन टाटा क्लीक या नावाने कंपनी चालवितो तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हा टाटा क्‍लीक, मुंबई चा अधिकृत सेंटर म्‍हणून नागपूर येथे कार्यरत आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी मोबाईल वर दिलेली जाहिरात पाहिली व ग्राहकाने वस्‍तु विकत घेतल्‍यास व ती खराब निघाल्‍यास वस्‍तु बदलने किंवा पैसे परत करणे (Easy Replacement and easy Refund) अशा प्रकारची जाहिरात व्‍दारे आश्‍वासीत केले होते. तक्रारकर्त्‍याने जाहिरात वाचुन विरुध्‍द पक्ष क्रमांक  १ यांचेकडे दिनांक ५/४/२०१८ रोजी टॅबलेट पी.सी. आय बॉल ब्रास एक्‍स जे टॅब (Tablet Pci Ball Brace XJ)  ची ऑनलाईन ऑर्डर केली व त्‍यासंदर्भात तक्रारकर्त्‍याला ईमेल सुद्धा आला. तक्रारकर्त्‍याचे मागणीप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी Tablet Pci Ball Brace XJ किंमत रुपये १६,९९९/- तक्रारकर्त्‍याचे घरच्‍या राहत्‍या पत्‍यावर ऑर्डर नंबर १८०४०५-००१९५४११९, ईनव्‍हाईस नंबर १२३९०२ Mum ११८१९४०, Transaction No. 1239020024657 या व्‍दारे पाठविला.सदर टॅबलेट पी.सी. तक्रारकर्त्‍याला कॅश ऑन डिलीवरी व्‍दारे मिळाला. तक्रारकर्त्‍याने टॅबलेट चे पॅकिंग उघडले असता टॅब ला प्रोटेक्‍टीव फिल्‍म नव्‍हती. सदर टॅब मेन्‍युवर क्लिक केल्‍यावर कोणतीही कमांड न देता व कोणतीही माहिती न टाकता सुरु झाला, टॅब सुरु केल्‍यानंतर त्‍याची गती कमी होती. टॅब मध्‍ये सिम कार्ड न टाकता टॅब कॅश, हॅंग, गरम होत होता.
  2. तक्रारकर्त्‍याने वरील टॅब मधील दोषामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ शी फोन वर संपर्क साधला व टॅब बाबत तक्रार नोंदविली व टॅब बदलवुन मागितला. परंतू विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ने तक्रारकर्त्‍याला कळविले की, आपल्‍या तक्रारीवर निर्णय २४ तासात करण्‍यात येईल. दिनांक १०/०४/२०१८ ला विरुध्‍द पक्ष कंपनी कडुन तक्रारकर्त्‍याला फोन आला व त्‍याने तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष क्रमांक २ अधिकृत सर्व्हिस सेंटर नागपूर यांचेकडे टॅबलेट दाखविण्‍यास सांगितले व जर टॅब सुधारण्‍याच्‍या स्थितीत नसेल तर विरुध्‍द पक्ष क्रमांक २ सर्व्हिस सेंटर जॉबशिट देईल. तक्रारकर्त्‍याने कोणताही वेळ न लावता सदर टॅब विरुध्‍द पक्ष क्रमांक २ सर्व्हिस सेंटर सिताबर्डी, नागपूर यांचेकडे नेला व टॅब मधील दोषाबाबत विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ला सांगितले. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी टॅब ची तपासणी केली व त्‍यांनी सदरचा टॅब दुरुस्‍त होऊ शकत नाही असे तक्रारकर्त्‍यास सांगितले करीता विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी सदर टॅबला पॉलिथीत कव्‍हर लावुन टॅबलेट तक्रारकर्त्‍यास परत केला व त्‍याबाबचे प्रमाणपञ तक्रारकर्त्‍यास दिले. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ने सदर टॅब ला जॉ‍बशिट लावुन दिल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने सदरचा जॉब शिट लावुन असलेला टॅब चा फोटो विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना ईमेल वर पाठविला व त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ला फोन करुन टॅबमधील प्रॉब्‍लेम बाबत सांगितले. परंतू विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ने तक्रारकर्त्‍याला दुस-या दिवशी फोन करुन सांगितले की, जॉबशिट चा पेपर हा ऐ-४ साईझ चा पूर्ण पेपरवर नसल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ने सदर टॅब परत/वापस घेणार नाही असे सांगितले. परंतू तक्रारकर्त्‍याने सदर टॅब चे पॅ‍किंग विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी केले असल्‍याचे सांगितले. त्‍यावर संबंधीत विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ने वरीष्‍ट अधिका-याशी बोलवुन कळवितो असे सांगितले. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची दखल घेतली नाही. त्‍यानंतर दिनांक १२/०४/२०१८ ला विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडुन दुपारी २.०० वाजता फोन आला व त्‍याव्‍दारे जो पर्यंत टॅब ला पूर्ण जॉबशिट लावुन टॅब पाठविणार नाही तोपर्यंत टॅब परत घेऊन दुसरा देण्‍यात येणार नाही व तक्रारकर्त्‍याला त्‍याच दिवशी दुपारी ५.०० वाजता टॅब ला पूर्ण जॉबशिट लावुन पाठविण्‍याबाबत सांगण्‍यात आले.तक्रारकर्त्‍याने त्‍याच दिवशी दुपारी ४.४५ वाजता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ला ईमेल केला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सांगितले की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चा माणूस सर्व्हिस सेंटर येथे येऊन सदर पॅक केलेला टॅबलेट घेऊन जाईल व तक्रारकर्त्‍यास नविन टॅबलेट देण्‍यात येईल. परंतू विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍याचा टॅबलेट नेला नाही व तक्रारकर्त्‍यास नविन टॅबलेट दिला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ला दिनांक १५/०४/२०१८ ला कायदेशीर नोटीस पाठविली व त्‍याव्‍दारे टॅब ची किंमत रुपये १६,९९९/- किंवा दुसरा टॅब बदलवुन देण्‍याची मागणी केली परंतू विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ने नोटीस ची दखल घेतली नाही व उत्‍तर सुद्धा दिले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केलेली आहे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्‍यास ञुटीपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारकर्त्‍याला रुपये १६,९९९/- अदा करावे व त्‍यावर १२ टक्‍के व्‍याज दिनांक ९/४/२०१८ पासुन आजपावतो देण्‍याचे आदेशित व्‍हावे किंवा सदर टॅबलेट बदलवुन दुसरा टॅबलेट देण्‍याचे आदेशीत करावे.  
  3. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक ञासाकरीता व तक्रारीचा खर्च देण्‍याचे आदेशीत करावे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली परंतू विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी विहीत मुदतीत त्‍यांचा लेखी जबाब सादर केला नाही म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्‍द बिना लेखी जबाब प्रकरण चालविण्‍याचा आदेश दिनांक ३१/०१/२०१९ रोजी पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवज व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर खालिल मुद्दे विचारात घेतले व त्‍यावरील कारणमिमांसा खालिलप्रमाणे नमुद आहे.

        अ.क्र.                  मुद्दे                                                                       उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                      होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?           होय
  3. काय आदेश ?                                                               अंतिम आदेशाप्रमाणे 
  4.  
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हा मोबाईल टॅबलेट आणि इतर टाटा कंपनीचा ऑनलाईन विक्रेता असुन टाटा क्लीक या नावाने कंपनी चालवितो तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हा टाटा क्‍लीक, मुंबई चा अधिकृत सेंटर म्‍हणून नागपूर येथे कार्यरत आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी मोबाईल वर दिलेल्‍या जाहिरातीनुसार विरुध्‍द पक्षाकडुन Tablet Pci Ball Brace XJ ची ऑनलाईन ऑर्डर केली व विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास त्‍याच्‍या घरच्‍या पत्‍यावर टॅबलेट पी.सी. ची डिलीवरी प्राप्‍त झाली. सदरचा टॅबलेट पी.सी किंमत रुपये १६,९९९/- तक्रारकर्त्‍याला कॅश ऑन्‍ डिलीवरी व्‍दारे प्राप्‍त झाला. सदर टॅबलेट चे पॅकिंग उघडल्‍यानंतर सदर टॅब ला प्रोटेक्‍टीव फिल्‍म नव्‍हती. सदर टॅब मेन्‍युवर क्लिक केल्‍यावर कोणतीही कमांड न देता व कोणतीही माहिती न टाकता सुरु झाला, टॅब सुरु केल्‍यानंतर त्‍याची गती कमी होती.तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचे कडुन दोषपूर्ण टॅबलेट चा पुरवठा करण्‍यात आल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना दुरध्‍वनीवर संपर्क साधला व विरुध्‍द पक्षाने जाहिरातीव्‍दारे दिलेल्‍या आश्‍वासनाप्रमाणे टॅब बदलवुन मागितला. परंतू विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍यास सदरचा टॅब त्‍यांचे नागपूर येथील अधिकृत सर्व्हिस सेंटर, सिताबर्डी नागपूर यांचेकडे टॅबलेट दाखविण्‍याबाबत सांगितले. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी सुचित केल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेकडे टॅबलेट पी.सी. दाखविला. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी टॅबची तपासणी केली व सदरचा टॅब दुरुस्‍त होऊ शकत नाही असे तक्रारकर्त्‍यास सांगितले व त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे सुचनेनूसार सदर टॅब ला विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेकडुन प्राप्‍त जॉबशिट ऐ-४ साईझ मध्‍ये प्राप्‍त करुन ती जॉबशिट पी.सी. टॅबलेटला लावुन विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेकडे हस्‍तांतरीत केली. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचे सुचनेनूसार सदरचा टॅब विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चा व्‍यक्‍ती विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेकडुन प्राप्‍त करुन तो विरुध्‍द पक्ष क्रमांक १ तक्रारकर्त्‍यास जाहिरातीमध्‍ये दिलेल्‍या आश्‍वासनानूसार दुसरा टॅब बदलवुन देणार होता.  परंतू विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास बदलवुन दिला नाही. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍याकडुन टॅबपोटी रुपये १६,९९९/- स्विकारुन त्‍यास दोषपूर्ण टॅबलेट पी.सी. चा पुरवठा केला व जाहिरातीप्रमाणे नविन टॅबलेट पी.सी. बदलवुन दिला नाही ही विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी  तक्रारकर्त्‍याप्रती ञुटीपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार पद्धतीचा वापर केल्‍याचे  मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना निर्देश देण्‍यात येते की,  त्‍यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारकर्त्‍यास नविन टॅबलेट पी.सी. द्यावा किंवा तक्रारकर्त्‍याकडुन टॅबलेट पी.सी. खरेदीपोटी स्विकारलेली रक्‍कम रुपये १६,९९९/- अदा करावे व त्‍यावर दिनांक ५/४/२०१८ पासुन द.सा.द.शे. ९ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा होईपर्यंत अदा करावे.
  3.  विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्‍याला मानसिक व  शारिरीक ञासाकरीता रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- अदा करावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.