Maharashtra

Chandrapur

CC/20/22

Shri.Pradip Balawant Ramteke - Complainant(s)

Versus

Manager Anjikar Automobiles,Adhikrut Vikreta,T.V.S.Motor Cycle Ltd. - Opp.Party(s)

V.S.Damke

19 Sep 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/20/22
( Date of Filing : 11 Mar 2020 )
 
1. Shri.Pradip Balawant Ramteke
Anuj Hotel Jawal,Balawant Ice Factry, Ekori Ward, Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Manager Anjikar Automobiles,Adhikrut Vikreta,T.V.S.Motor Cycle Ltd.
Datta Nagar,Nagpur Road, Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 19 Sep 2022
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

           (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)                  

                    (पारीत दिनांक १९/०९/२०२२ )

 

                       

                       

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे  कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ता यांनी स्‍वतःच्‍या वापराकरिता मोटर सायकलची आवश्‍यकता असल्‍याने त्‍यांनी विरुध्‍द पक्ष हे टि.व्‍ही.एस. मोटरसायकल लिमी. चे अधिकृत विक्रेता असल्‍यामुळे दिनांक ७/३/२०१७ रोजी इनव्‍हॉईस क्रमांक ५३०६७ प्रमाणे टि.व्‍ही.एस. जुपीटर वॉल्‍कॅन रेड एल.पी.,  इंजिन क्रमांक BG4NF1758302, फ्रेम क्रमांक MD626BG47FIN58841 विकत घेतली. विरुध्‍द पक्ष यांनी सदर गाडीचा ताबा तक्रारकर्त्‍याला देऊन आर.टी.ओ. मधून पासींग करिता बोलविल्‍यावर येण्‍यास सांगितले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षावर विश्‍वास ठेवून गाडीचा ताबा घेतला परंतु विरुध्‍द पक्ष यांनी बोलवणे पाठविले नसल्‍यामुळे १५ दिवसांनी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे जाऊन पासींग आणि नोंदणी बद्दल विचारण केली परंतु विरुध्‍द पक्ष यांनी बोलवल्‍यावर या म्‍हणूल तक्रारकर्त्‍याला सांगितले. त्‍यानंतरही आजपर्यंत तक्रारकर्त्‍याने पासींग व नोंदणीची चौकशी वेळोवेळी केली परंतु विरुध्‍द पक्ष यांनी नेहमी नवीन कारण देऊन तक्रारकर्त्‍याला टाळले. विरुध्‍द पक्ष यांची सदर कृती अनुचित व्‍यापार पध्‍दती असून सेवेत न्‍युनता आहे. सबब तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वकील मार्फत दिनांक ३/१/२०२० रोजी विरुध्‍द पक्ष यांना नोटीस पाठवून सदरहू गाडीचे पासींग व नोंदणी करण्‍यास  सूचना दिली परंतु विरुध्‍द पक्ष यांनी दिनांक ४/१/२०२० रोजी सदर नोटीस प्राप्‍त होऊनही नोटीसला उत्‍तर दिले नाही. विरुध्‍द पक्ष यांच्‍या या कृतीमुळे तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारीरिक ञास सहन करावा लागत आहे. सबब तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल केली आहे.
  3. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की तक्रारकर्ताप्रती विरुध्‍द पक्ष यांची कृती अनुचित व्‍यापार पध्‍दती आहे अशी घोषणा करावी तसेच सदरहू गाडीचे तक्रारकर्त्‍याला तात्‍काळ आ.टी.ओ. कार्यालय मधून रजिस्‍ट्रेशन व पासींग करुन द्यावे असा आदेश द्यावा तसेच विरुध्‍द पक्षामुळे झालेल्‍या मानसिक व शारीरिक ञासाबद्दल रुपये ५०,०००/- तक्रारकर्त्‍यास देण्‍यात यावे.
  4. तक्रारकर्त्‍याची तक्रार स्‍वीकृत करुन विरुध्‍द पक्षाला नोटीस पाठविण्‍यात आले.  
  5. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारीत उपस्थित राहून तक्रारीतील म्‍हणणे खोडून काढीत पुढे विशेष कथनात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याची तक्रार मुदतबाह्य असून खर्चासह खारीज करण्‍यात यावी तसेच आर.टी.ओ. यांनी गाडी पासींग करुन दिली नाही अशी मागणी त्‍यांनी केली परंतु आर.टी.ओ. यांना प्रकरणात पक्ष न केल्‍यामुळेही सदर तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे. दिनांक ७/३/२०१७ रोजी विरुध्‍द पक्षाकडून सदरहू गाडी तक्रारकर्त्‍याने विकत घेतली परंतु विरुध्‍द पक्ष यांनी सदर गाडी पासींग करुन दिली नाही ही बाब खोटी आहे. वास्‍तविक तक्रारकर्त्‍याने दिनांक २/२/२०१७ रोजी रुपये १०,०००/- विरुध्‍द पक्षाला देऊन बुक केली व दिनांक ३/२/२०१७ रोजी पुन्‍हा बुकींग रक्‍कम रुपये १०,५००/- असे एकूण रुपये २०,५००/- दिले. त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी दिनांक ६/२/२०१७ रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या गाडीचे पेपर्स तयार केले व सदर गाडीचा टॅक्‍स सुध्‍दा दिनांक २३/०२/२०१७ रोजी आर.टी.ओ. कार्यालय मध्‍ये भरला. दरम्‍यान तक्रारकर्त्‍याने दिनांक ७/३/२०१७ रोजी गाडी खरेदी करुन मुहूर्त असल्‍यामुळे पुजा करावयाची असल्‍यामुळे गाडी घेऊन गेले त्‍यावेळी विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला आम्‍ही  सांगु येईल तेव्‍हा पासींगसाठी गाडी प्रत्‍यक्ष आणावी लागेल असे सांगितले होते त्‍यानंतर वारंवार फोन करुनही तक्रारकर्त्‍याने आर.टी.ओ. कडे पासींगसाठी गाडी आणली नाही त्‍यामुळे पासींग झाले नाही त्‍यानंतर सरकारने दिनांक ३१/०३/२०१७ रोजी बी.एस.३ गाड्या बंद केल्‍यानंतर ऑक्‍टोबर २०१७ मध्‍ये गाडी पासींगसाठी Disclaimer Form टाकला व गाडी रजिस्‍ट्रेशन करुन देण्‍यास आर.टी.ओ. ला विनंती केली तेव्‍हा आर.टी.ओ. ने गाडी पासींगसाठी उशीर का केला त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याला शपथपञ द्यायला सांगितले. तक्रारकर्त्‍याने शपथपञ देऊन त्‍यात कबूल केले की त्‍याची प्रकृती ठीक नसल्‍यामुळे गाडी पासींग केली नाही. त्‍यानंतर आर.टी.ओ. यांनी गाडीची तपासणी केली व गाडी उशीरा पासींगसाठी आणल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास रुपये ३,०००/- फाईन भरण्‍यास सांगितले. सदर रक्‍कम तक्रारकर्त्‍याने न भरल्‍यामुळे गाडीचे रजिस्‍ट्रेशन झाले नाही. यामध्‍ये विरुध्‍द पक्ष यांचा कोणताही दोष नाही. विरुध्‍द पक्ष यांनी गाडी विकल्‍यावर प्रत्‍येक गाडी ते आर.टी.ओ. कडे आवश्‍यक कागदपञ तयार करुन पासींगसाठी बोलवितात पण खरेदीदाराने जर गाडी आणलीच नाही तर त्‍यात विरुध्‍द पक्ष यांचा दोष नाही. तक्रारकर्त्‍याने उशीरोन सदर गाडी आर.टी.ओ.कडे आणल्‍यामुळे आर.टी.ओ. यांनी त्‍यांना दंड लावला व तो दंड तक्रारकर्त्‍याने न भरल्‍यामुळे सदर गाडीचे पासींग आजपर्यंत झाले नाही. सबब सदर तक्रार विरुध्‍द पक्ष विरुध्‍द खारीज करण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याची तक्रार, दस्‍त, विरुध्‍द पक्षाचे लेखी उत्‍तर, दस्‍त व शपथपञाबद्दल दाखल केलेली पुर्सिस तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरुन तक्रार निकाली काढण्‍याकरिता खालील कारणमीमांसा व त्‍यावरील निष्‍कर्ष कायम करण्‍यात आले.

कारणमीमांसा

 

  1. तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्षाकडून दिनांक ७/३/२०१७ रोजी तक्रारीत दाखल इनव्‍हॉईस क्रमांक ५३०६७ प्रमाणे टि.व्‍ही.एस. जुपीटर वॉल्‍कॅन रेड एल.पी.,  इंजिन क्रमांक BG4NF1758302, फ्रेम क्रमांक MD626BG47FIN58841 विकत घेतली, याबद्दल वाद नाही. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत विरुध्‍द पक्ष यांनी सदर उपरोक्‍त गाडीचे आर.टी.ओ. कार्यालय मधून पासींग करुन दिले नाही. त्‍यामुळे सदर तक्रार विरुध्‍द पक्ष विरुध्‍द दाखल केली त्‍यावर विरुध्‍द पक्ष यांनी सदर गाडी तक्रारकर्ता यांनी दिनांक ७/३/२०१७ रोजी खरेदी केली. विरुध्‍द पक्ष यांनी दिनांक ६/२/२०१७ रोजी पासींगचे पेपर्स तयार करुन रोड टॅक्‍स भरला. दिनांक ७/३/२०१७ रोजी तक्रारकर्ता मुहूर्त म्‍हणून गाडी घेऊन गेले. त्‍यावेळी विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला स्‍वतः गाडी पासींगसाठी यावे लागेल असे सांगितले परंतु वेळोवेळी सांगूनही विरुध्‍द पक्षाच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने गाडी वेळेत पासींगसाठी आणली नाही. त्‍यानंतर ऑक्‍टोबर २०१७ मध्‍ये गाडी पासींगसाठी आणली तेव्‍हा विरुध्‍द पक्ष यांनी गाडीचा Disclaimer Form टाकला व गाडीचे रजिस्‍ट्रेशन करण्‍यास आर.टी.ओ. पा‍ठविले.  तेव्‍हा आर.टी.ओ. यांनी गाडी इतक्‍या उशीरा पासींगसाठी का आणली त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याला शपथपञ मागितले. तक्रारकर्त्‍याने त्‍याबद्दल शपथपञ दाखल केल्‍यावर आर.टी.ओ. यांनी गाडीचे निरीक्षण करुन रुपये ३,०००/- दंड गाडी उशीरा पासींगसाठी आणल्‍याबद्दल लावला परंतु सदर दंड रक्‍कम तक्रारकर्त्‍याने न भरल्‍यामुळे गाडी पासींगची प्रक्रिया झाली नाही. प्रकरणातील तक्रारकर्त्‍याचे कथन तसेच विरुध्‍द पक्ष यांचे उत्‍तर व दस्‍तऐवजाचे अवलोकन केले. विरुध्‍द पक्ष यांनी सदर गाडीचा ताबा तक्रारकर्ता यांना दिला असून तक्रारकर्ता यांनी सुध्‍दा सदर गाडी दिनांक ७/३/२०१७ पासून दिनांक ७/१०/२०१७ पर्यंत बिना पासींग चालविली हे दिसून येत आहे. तक्रारकर्ता यांनी प्रकरणात विरुध्‍द पक्ष यांना वेळोवेळी जाऊन गाडी पासींग बद्दल विचारणा केली असे कथन केले परंतु त्‍याबद्दल कोणताही पुरावा आयोगात दाखल केला नाही. याउलट विरुध्‍द पक्ष यांनी प्रकरणात दस्‍तऐवज दाखल केले. सदर दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता विरुध्‍द पक्ष यांनी सदर गाडीच्‍या पासींग करिता फॉर्म भरला दस्‍त क्रमांक १ वर Disclaimer Form दिनांक ७/१०/२०१७ रोजी भरलेला दिसून येत आहे त्‍यात Fees Particular यात रुपये ३,०००/- ची रक्‍कम तक्रारकर्त्‍याला भरावयाची होती तसेच दस्‍त क्रमांक ४ वर तक्रारकर्त्‍याने दिनांक १०/११/२०१७ रोजीचे शपथपञ दाखल केले त्‍यात त्‍याची प्रकृती ठीक नसल्‍यामुळे त्‍यांनी सदर गाडीचे रजिस्‍ट्रेशन केले नाही असे शपथपञात कथन केलेले आहे.  प्रकरणात विरुध्‍द पक्ष यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन असे स्‍पष्‍ट होत आहे की, विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला रजिस्‍ट्रेशनची कारवाई आर.टी.ओ. कडे आल्‍यावर करुन दिली परंतु तक्रारकर्ता यांनी रजिस्‍ट्रेशन फी न भरल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या गाडीचे पासींग होऊ शकले नाही. प्रकरणात विरुध्‍द पक्ष यांनी त्‍याचे उत्‍तर व दस्‍त दाखल केल्‍यानंतर तक्रारकर्ता हे सतत गैरहजर राहीले तसेच त्‍यांनी त्‍यानंतर त्‍यावर त्‍यांचे शपथपञ अथवा लेखी युक्तिवाद दाखल करुन स्‍वतःचे विरुध्‍द पक्षाच्‍या उत्‍तरावर काय म्‍हणणे आहे ते आयोगासमोर आणले नाही. आयोगाच्‍या मते विरुध्‍द पक्ष यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावर भिस्‍त (विश्‍वास) ठेवून आयोग कसा निष्‍कर्ष काढत आहे की, तक्रारकर्त्‍याने त्‍याची प्रकृती ठीक नसल्‍याकारणाने उशीराने त्‍याच्‍या गाडीचे पासींगसाठी आणली व त्‍याबद्दल आर.टी.ओ. यांनी नवीन रजिस्‍ट्रेशनची फी रुपये ३,०००/- लावल्‍यावर तक्रारकर्त्‍याने ती रक्‍कम (दंड) न भरल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची गाडी पासींग झाली नाही यात विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला सेवेत कोणतीही ञुटी केली नाही. तसेच जर तक्रारकर्त्‍याने पक्ष म्‍हणून आर.टी.ओ. यांना सदर प्रकरणात पक्ष केले असते तर प्रकरणावर आर.टी.ओ. यांनी सदर गाडी का पासींग करुन दिली नाही याबद्दलही खुलासा झाला असता. याही कारणावरुन आयोगाच्‍या मते सदर तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे, असा निष्‍कर्षास आयोग येत असून खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.  

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र. २२/२०२० खारीज करण्‍यात येते.
  2. उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.
  3. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.