नोंदणी दिनांक :- १०.०२.२०१५ निर्णय दिनांक :- १०.०८.२०१७ निर्णय कालावधी :- २ वर्ष ६ म. ० दि. ::: नि का ल प ञ::: मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष १. सामनेवाले यांनी, तक्रारदारांस, ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार, सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. २. तक्रारदार यांनी दिनांक २२.१०.२०१३ रोजी तक्रारदारांचा जुना टॅक्टर क्रमांक एम. एच. ३४ एल ३७५ सामनेवाले क्रमांक 1 यांना विक्री रक्कम रुपये २,२५,०००/- निश्चित करुन नवीन टॅक्टर स्वराज ७४४ एफ ई दिनांक २३.१०.२०१३ रोजी सामनेवाले क्र. १ यांचेकडून खरेदी केला. तक्रारदारांनी सामनेवाले क्र. १ यांना दिनांक १८.१०.२०१३ व २२.१०.२०१३ रोजी रक्कम रुपये २०००/- व ३०००/- प्रत्येकी अदा केले. नवीन टॅक्टर खरेदी करतेवेळी सामनेवाले क्रमांक १ यांनी तक्रारदारांनी किती रक्कम अदा करावी याबाबत काहीही कळविले नाही. तक्रारदारांनी सामनेवाले क्र. २ यांचेकडून वाहन कर्ज घेणेसाठी अर्ज दिला होता. परंतु सदर अर्ज अपुर्ण असल्याने व कर्ज रक्कम नमुद न केल्याने तक्रारदारास कर्ज रक्कमेची माहिती झाली नाही. सामनेवाले क्र. १ यांनी तक्रारदारास नवीन वाहनाची आरटीओ नोंदणी करण्यासाठी दिनांक १३.०१.२०१४ रोजी टॅक्टर जमा करुन घेतले. परंतु त्यानंतर परत दिले नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. १ यांना टॅक्टरची मागणी करुन देखील सामनेवाले क्र १ यांनी कोणतेही प्रतिउत्तर दिले नाही. सामनेवाले क्र. २ यांनी तक्रारदारांचे नावे रक्कम रुपये ७,४०,०००/- वाहन कर्ज दाखवून थकीत रक्कम १,६८,८०१/- अदा करावी असा तगादा लावला. सामनेवाले क्र. २ यांनी दिनांक २४.१२.२०१४ रोजी तक्रारदारास नोटीस पाठविली. तक्रारदारांनी दिनांक २४.०१.२०१५ रोजी सदर नोटीसला प्रतिउत्तर पाठवून तक्रारदारास दररोज झालेल्या नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये १५००/- प्रतिदिवस प्रमाणे एकूण रक्कम रुपये ५,४७,५००/- तक्रार दाखल करेपर्यंत मागणी केली आहे. सामनेवाले क्र. २ यांनी तक्रारदाराला कर्ज रक्कम रुपयं ७,४०,०००/- मंजुर केल्याबाबत तक्रारदारांना कोणतीही माहिती नसून सदर बाब न्यायोचीत नाही. सामनेवाले क्र. १ यांनी तक्रारदारांचे जुने टॅक्टर स्वताःकडे ठेवून घेवून नवीन टॅक्टरची आरटीओ पासींग न करुन दिल्याने तसेचे सामनेवाले क्र. २ यांनी तक्रारदारांच्या सम्मतीशीवाय रक्कम रुपये ७,४०,०००/- कर्ज तक्रारदारास मंजुर केल्याने सदर बाबीत आक्षेप घेवून सामनेवाले क. १ यांनी नवीन टॅक्टर पासींग न करुन दिल्याने त्यांचे ताब्यातील तक्रारदारांचे जुने टॅक्टर तक्रारदारांना परत द्यावे किंवा रक्कम रुपये २,२५,०००/- दिनांक २३.१०.२०१३ पासून १२ टक्के व्याजासह परत द्यावी तसेच सामनेवाले क्र. १ यांनी नवीन व जुने टॅक्टर स्वतःच्या ताब्यात ठेवल्याने दिनांक २३.१०.२०१३ पासून प्रतिदिवस १५००/- रुपये याप्रमाणे आर्थिक नुकसान म्हणून रक्कम रुपय ५,४७,५००/- तक्रारदारास अदा करावे. तसेच सामनेवाले क्र. २ यांनी कर्ज करारनामा क्र. २९५०१९३ दिनांक १९.१२.२०१३ रद्द करुन रक्कम रुपये ७,४०,०००/- तक्रारदाराकडून वसूल करण्यात येवू नये, अशी विनंती प्रस्तुत तक्रारीत केली आहे. ३. सामनेवाले क्र. १ यांनी तक्रारीतील मुद्द्याचे खंडन करुन प्रस्तुत तक्रारदार यांनी जुना टॅक्टर अदलाबदल करुन जुन्या टॅक्टरची किंमत रुपये १,३५,०००/- मान्य केली होती. तक्रारदारांनी सामनेवाले क्र. १ यांचेकडून नवीन स्वराज टॅक्टरची किंमत ६,७१,०००/- निश्चित करुन त्यापैकी रक्कम रुपये २०००/- दिनांक १८/१०/२०१३ रोजी व रक्कम रुपये ३०००/- दिनांक २२.१०.२०१३ रोजी रोख दिले. सामनेवाले क्र. १ यांनी तक्रारदारास दिनांक १३.०१.२०१४ रोजी आरटीओ पासींगसाठी टॅक्टर तक्रारदारास फोनवर सुचना देवून मागविल्यानंतर ताबडतोब आरटीओ पासींग करुन घेवून जाण्यास सांगितले होते. परंतु तक्रारदारांनी सामनेवाले क्र. २ यांनी तक्रारदारास वाहन कर्ज मंजुर केल्यानंतर उर्वरीत फरकाची रक्कम रुपये १,३६,८९०/- गैरअर्जदार क्र. १ यांना भरण्यास विनंती केल्याने व रोटाव्हेटर एकूण किंमत रु. ८९,९००/- तक्रारदारांनी सामनेवाले क्र.१ यांचेकडून उधारीवर विकत घेतल्याने जुने टॅक्टरची किंमत १,३५,०००/- व नवीन टॅक्टरची वर नमुद प्रमाणे एकूण किंमत ९,०९,७९०/- यामधुन वजा केली असता रक्कम रुपये ५,९०,०००/- सामनेवाले क्र. २ यांनी तक्रारदारांच्या खात्यात जमा केले. सामनेवाले क्र. १ यांना तक्रारदारांकडून वाहन कर्ज रक्कमेसह एकूण रक्कम रुपये ८,३०,०००/- प्राप्त झाले आहेत व उर्वरीत रक्कम रुपये १,७९,७९०/- तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. १ यांना तात्काळ अदा करण्याचे आदेश करुन तक्रार खर्चासह अमान्य करावी अशी विनंती सामनेवाले क्र. १ यांनी केली आहे. ४. सामनेवाले क्र. २ यांनी तक्रारीतील मुद्दयांचे खंडन करुन तक्रारदारांच्या वाहन कर्ज अर्जाप्रमाणे दिनांक १९.१२.२०१३ रोजी नियमानुसार तक्रारदारांना कर्ज रक्कम ७,४०,०००/- मंजुर करण्यात आले. सदर कर्ज रक्कमेची परतफेड प्रत्येकी रक्कम रुपये ७४,०००/- माहे जुन व डिसेंबर मध्ये प्रतिवर्षी एकूण दहा हप्त्यामध्ये व्याजासह करण्याची बाब तक्रारदारांनी कबुल केली आहे. सामनेवाले क्र. १ यांनी दिनांक ३०.०३.२०१४ रोजी तक्रारदारांच्या वाहनास एमएच ३४ एपी ११५२ हा नोंदणी क्रमांक दिला असून तक्रारदारांनी सामनेवाले क्र. २ यांचेकडे कर्ज परतफेड कराराप्रमाणे न केल्याने तक्रारदार यांनी अट क्र. ६ चा भंग केला आहे. त्यामुळे सामनेवाले क. २ यांनी तक्रारदारास दिनांक २४.१२.२०१४ रोजी रक्कम रुपये १,६३,५४६/- तात्काळ जमा करण्यास नोटीस पाठविली होती. सदर नोटीसला तक्रारदारांनी दिनांक २४.०१.२०१५ रोजी उत्तर देउुन थकीत रक्कम भरणा केलेली नाही. सामनेवाले क्र. १ यांनी सामनेवाले क्र. २ यांचेकडून कर्ज रक्कम स्वीकारुन तक्रारदारांच्या नवीन वाहनाची नोंदणी करुन वाहनाचा ताबा घेण्याविषयी तक्रारदाराला कळविले असून केवळ सामनेवाले क्र. २ यांचे थकीत कर्ज रक्कम अदा करण्यास तसेच सामनेवाले क्र. १ यांची उर्वरीत थकबाकी रक्कम अदा करण्यास तक्रारदार तयार नसल्याने हेतुतः प्रस्तुत तक्रार दाखल करुन थकबाकी रक्कम सामनेवाले क्र. १ व २ यांनी मागणी करु नये अशा न्यायोचीत नसना-या विनंती सह तक्रारदारांनी कालापव्यय होणेकामी तक्रार दाखल केली असल्याने तक्रारखर्चासह अमान्य करण्यात यावी अशी विनंती सामनेवाले क्र. २ यांनी केली आहे. ५. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद पुरशिस व सामनेवाले क्रमांक १ व २ यांचे जवाब, कागदपत्रे, पुरावा शपथपत्राबाबत पुरशीस, लेखी युक्तिवाद व लेखी युक्तीवादाबाबत पुरशिस यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात. मुद्दे निष्कर्ष १. सामनेवाले यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिद्ध करतात काय? नाही २. सामनेवाले तक्रारदारास नुकसान भरपाई देण्यास पात्र आहेत कायॽ नाही ३. आदेश ? तक्रार अमान्य कारण मिमांसा मुद्दा क्र. १ व २ : ६. सामनेवाले क्र. १ यांनी तक्रारदारास तक्रारदारांचे जुने वाहन रक्कम रुपये १,३५,०००/- मध्ये घेवून नवीन टॅक्टरच्या खरेदीमध्ये सदर रक्कम सामावून घेतली. नवीन टॅक्टरची एकूण किंमत ६,७१,०००/- असून तक्रारदारांनी रक्कम रुपये ८९,९००/- चा रोटाव्हेटर देखील विकत घेतला आहे. सदर वाहनाची आरसी व पासींग व १ वर्षाचा इन्शुरंस यासाठी रक्कम रुपये १२,०००/- सामनेवाले क्र. १ यांनी खर्च केले आहेत. सामनेवाले क्र. २ यांचेकडून मिळणा-या वित्त सहाय्यामध्ये रक्कम रुपये १,३६,८९०/- तक्रारदारास सामनेवाले क्र. १ यांचेकडे जमा करणे आवश्यक होते. सदर रक्कम सामनेवाले क्र. १ यांनी दिनांक १०.१२.२०१३ रोजी सदर रक्कम तक्रारदारांच्या वतीने जमा केली आहे. एकंदरीत ९,०९,७९०/- तक्रारदारांनी सामनेवाले क्र. १ यांना अदा करणे आवश्यक आहे. त्यापैकी तक्रारदारांनी सामनेवाले क्र. १ यांना केवळ जुने टॅक्टरची रक्कम रुपये १,३५,०००/- व रोख रक्कम ५,०००/- अदा केली आहे. सामनेवाले क्र. २ यांनी सामनेवाले क्र. १ यांना रक्कम रुपये ५,९०,०००/- तक्रारदारांचे कर्जखाते मधुन अदा केलेली आहे. सामनेवाले क्र. १ यांनी नवीन टॅक्टरची आरटीओ पासींग करुन तक्रारदारांना घेवून जाण्यास कळवूनही तक्रारदारांनी अद्याप सदर वाहन स्वतःच्या ताब्यात घेतले नाही. सामनेवाले क्र. २ यांनी तक्रारदारांना थकीत रक्कम भरण्यासाठी नोटीस पाठवून देखील तक्रारदारांनी सदर रक्कम अद्याप अदा केलेली नाही. सामनेवाले क्र. २ यांनी करारातील अटी व शर्ती प्रमाणे तक्रारदार हे थकबाकीदार असल्याने थकीत रक्कमेची वसुली करणेकामी तक्रारदारांचे नवीन टॅक्टरची जप्ती करुन कायदेशीरपणे थकीत रक्कमेची वसुली करतील यामुळे तसेच गैरअर्जदार क्र. १ यांनी तक्रारदारांच्या वतीने अदा केलेली रक्कम तक्रारदारांना आज रोजी सामनेवाले क्र. १ यांना कोणत्याही न्यायोचीत प्रयोजनाशिवाय अदा न केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. सामनेवाले क्र. १ व २ यांना प्रस्तुत तक्रारीमध्ये सेवापुरवठादार संबोधन्यासाठी तक्रारदारांनी कराराप्रमाणे न्यायोचीत बाबींची पुर्तता केल्याची बाब सिध्द केलेली नाही. सामनेवाले क्र. १ यांनी तक्रारदारांच्या वतीने अदा केलेली रक्कम तक्रारदार नाकारु शकत नसून सामनेवाले क्र. २ यांचेसोबत दिनांक १९/१२/२०१३ रोजी केलेला वाहन कर्ज करारनामा अवैध असल्याची बाबही तक्रारदार सिध्द करु शकले नाही. तक्रारदाराने सामनेवाले क्र. १ व २ यांचेसोबत केलेला करारनामा तक्रारदारांनी कोणत्याही न्यायोचीत कारणाशिवाय अपूर्ण अवस्थेत ठेवला असून अटी व शर्तीचा भंग केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. सबब सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारास सेवासुविधा पुरविण्यात कसुर केला नसून तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही असे मंचाचे मत आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार वर नमूद निष्कर्षावरून, सामनेवाले यांनी तक्रारदारास कराराबाबत सेवा सुविधा पुरविण्यात कसूर न केल्याची बाब सिध्द झाल्याने मुद्दा क्रं. १ व २ चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. ३ : ७. मुद्दा क्रं. १ व २ मधील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश १. ग्राहक तक्रार क्र. १७/२०१५ अमान्य करण्यात येते. २. खर्चाबाबत आदेश नाहीत. ३. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. श्रीमत श्रीमती. कल्पना जांगडे श्री. उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती गाडगीळ (सदस्या) (अध्यक्ष) (सदस्या) |