(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदार यांनी प्रतिवादी यांच्याकडून जाहीर लिलावाच्या अटीप्रमाणे घर विकत घेतले. प्रतिवादी बँकेने आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली नसल्यामुळे संबंधित घर अजूनही अर्जदाराच्या नावावर हस्तांतरित करण्यात आलेले नाही. दि.24.07.2006 रोजी मंचाने या प्रकरणी आदेश पारित केला. सदरील आदेशाविरुध्द प्रतिवादी यांनी मा.राज्य आयोगामध्ये तक्रार दाखल केली. मा.राज्य आयोगाने तिस-या सदस्याची सही नसल्यामुळे सदरील प्रकरण सुनावणीसाठी पुन्हा मंचामध्ये पाठविले. मंचाने प्रतिवादी यांना नोटीस पाठवूनही प्रतिवादी गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे आढळून येते की, तक्रारदार यांनी प्रतिवादीकडून जाहीर लिलावाच्या अटीप्रमाणे घर नं.6, एम-2, 36/3 हे 2,13,000/- रुपयास विकत घेतले, व विक्री प्रमाणपत्रे कायद्याप्रमाणे दिले. सदरील घर तक्रारदार यांच्या नावावर होण्यासाठी सिडकोकडे अर्ज दिला, परंतू सिडकोने, सदरील घर हस्तांतरीत होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मागितली, जी बँकेकडे आहेत. मंचाच्या मते बँकेने, सदरील घर तक्रारदाराच्या नावावर होण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. संपूर्ण पैसे घेऊन कार्यवाही न करणे ही सेवेतील त्रुटी ठरते. आदेश 1) प्रतिवादी यांनी, सिडको कार्यालयाने दर्शविलेल्या कागदपत्रांची पूर्तता 30 दिवसात करावी. 2) प्रतिवादी यांनी तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रु.25,000/- 30 दिवसात द्यावे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्रीमती अंजली देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |