जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/102,103,104,105,106,107,108 प्रकरण दाखल तारीख - 03/04/2010 प्रकरण निकाल तारीख – 08/07/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य 1. पंडीत पि.विठल जाधव, तक्रार क्र.2010/102 रा. मंगल सांगवी ता.कंधार, अर्जदार. जि.नांदेड. 2. गोविंद पि.व्यंकटी कदम, तक्रार क्र.2010/103 रा.मंगल सांगवी ता.कंधार, जि.नांदेड. 3. बाबाराव पि.दिगांबर कदम, तक्रार क्र. 2010/104 रा.मंगल सांगवी ता.कंधार, जि.नांदेड. 4. गणपती पि.दत्तराम शिंदे, तक्रार क्र.2010/105 रा.मंगल सांगवी ता.कंधार, जि.नांदेड. 5. अनंदा पि.मारोती कदम, तक्रार क्र.2010/106 रा.मंगल सांगवी ता.कंधार, जि.नांदेड. 6. बालाजी पि.रावसाहेब कदम, तक्रार क्र.2010/107 रा.मंगल सांगवी ता.कंधार, जि.नांदेड. 7. नामदेव पि.ग्यानोबा कदम, तक्रार क्र.2010/108 रा.मंगल सांगवी ता.कंधार, जि.नांदेड. विरुध्द. 1. जिल्हा व्यवस्थापक, (महाबिज) म.रा.बि.म.मर्यादित, गैरअर्जदार अकोला जि.अकोला. 2. कार्यकारी संचालक (महाबिज) म.रा.बि.म.मर्या,अकोला, मुख्य कार्यालय, अकोला ता.जि.अकोला. अर्जदारा तर्फे वकील - अड.पि.बी.कदम. गैरअर्जदारा क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.शिरीष नागापुरकर. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्य) सर्व प्रकरणांत, गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला यांनी खरीप 2009-2010 बिजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत बी.एन. 1 बी.टी. कपाशीच्या सदोष बियाण्यामुळे झालेले रु.80,000/- आर्थीक नुकसान भरपाई मागण्यासाठी तसेच मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/-, सेवेच्या त्रुटी पोटी, मिळण्यासाठी आदेश व्हावेत म्हणुन तक्रार दाखल केलेली असुन सर्व अर्जदार हे शेतकरी असून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालण्यासाठी त्यांनी म्हटलेल्या शेत जमीन व्यवस्थीत नांगरुन शेन खत टाकून जमीन तयार केली व यानंतर यात गैरअर्जदार यांनी निर्माण केले बी.एन.1, बी.टी. कपाशीचे उत्पन्न घेण्यासाठी त्यांनी दि.11/06/2009 रोजी घेतलेल्या बियाणांची दि.26/06/2009 रोजी 3x3 फुटावर कपाशीची लागवड केली. यानंतर उत्पादक कंपनीने सांगितल्याप्रमाणे कापसाला रासायनिक खताचा डोस देण्यात आला. किटकनाशकाची फवारणी करण्यात आली, यासाठी अर्जदार यांना बराच खर्च आला. सर्व प्रकारची काळजी घेऊन सुध्दा गैरअर्जदार कंपनीने निकृष्ट दर्जाचे बियाणांची पुरवठा केल्यामुळे कापसाची उगवण समाधानकारक झाली नाही. कंपनीने ज्या प्रमाणात बोंडे उत्पादीत होण्याची हमी दिली त्या प्रमाणात बोंडे,फुले,पाती व फळे लागले नाही, बहुतांश बोंडे चांगल्या प्रकारे उमलले नाही. पिक जर चांगले आले असते तर अर्जदारास एकरी 20 ते 25 क्विंटल एवढे उत्पादन झाले असते. अर्जदारास दर वर्षी एका हेक्टरमध्ये 30 ते 35 क्विंटल उत्पादन होते दि. 05/11/2009 रोजी पंचायत समीती कंधार व कृषी अधिकारी जिल्हा परीषद नांदेड व जिल्हा व्यवस्थापक गैरअर्जदार कंपनी अकोला यांच्याकडे तक्रार केली. यानुसार दि.01/12/2009 रोजी कृषीविकास अधिकारी कृषी विद्यापीठ, प्रतिनीधी महाबिज, बिज प्रमाणीकरण यंत्रणा यांनी अर्जदाराच्या शेतात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीमध्ये कापसाला पाते, फुले व बोंडे कमी आढळुन आली त्यामुळे अर्जदारांच्या उत्पन्नात घट झाली. गैरअर्जदाराच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार यांनी वरील प्रमाणे मागणी केलेली आहे. सर्व प्रकरणांत गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी एकत्रितरित्या वकीला मार्फत आपले लेखी म्हणणे दाखल केले. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराची तक्रार ही संपुर्ण अमान्य आहे. अर्जदारांनी शेत जमीनीबद्यल कुठलेही दस्तऐवज दाखल केलेले नाही. अर्जदारांनी लागवडीसाठी जे शेत जमीन तयार केली ती माहीती अवास्तव असुन गैरवाजवी आहे, असा कुठलाही पुरावा त्यांनी दाखल केलेली नाहीत. गैरअर्जदारांच्या प्रतिनीधी मार्फत अर्जदारांनी आपल्या शेताची तपासणी केली हे म्हणणे पुर्णतः खोटे आहे. बी.एन.1.बी.टी. कपाशीचे उत्पन्न करण्यास अर्जदाराची जमीन पोषक असुन त्यास कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही हे म्हणणे खोटे आहे. गैरअर्जदाराने अर्जदारांना एकरी 10 ते 15 क्विंटल उत्पन्न मिळते असे सांगितले हे म्हणणे खोटे आहे. अर्जदारांनी बी.एन.1.बी.टी. बियाणे बिजोत्पादन कार्यक्रमा अंतर्गत घेतलेले असल्यामुळे त्यांच्याकडे उत्पादीत झालेले कापुस त्यांनी बिजप्रक्रीया क्रेंद्र महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित धनेगांव येथे आणल्यावर ते स्विकारुन रुई परत करुन डिलेंटेड सरकी बियाणे चाचण्यातुन पास झाल्यावर रु.4,000/- प्रती क्विंटल भाव देण्यात येईल असे सांगीतले हे म्हणणे खरे आहे. अर्जातील परिच्छेद क्र. 4 मध्ये एका एकर करीता दोन किलो बियाण्याची किंमत व नोंदणी फिस असे चलनाद्वारे भरुन घेऊन बी.एन.1.बी.टी.बियाणे देण्यात आले, हे मान्य आहे की, पेरणीच्या वेळी पुरेसे पाऊस पडले होते व दि.26/06/2009 रोजी 3 x 3 फुटावर कापसाची लागवड केली होती, हेही म्हणणे खोटे आहे की, उत्पादीत कंपनीच्या सल्यानुसार कापसाला रासायनिक खताचे डोस देण्यात आले. निकृष्ट बियाणाच्या त्रुटीबद्यलची तक्रार खोटी आहे. महाराष्ट्राचे बियाणे महामंडळ ही शासनाने अंगीकृत केलेली कंपनी असुन शेतकरी बिज उत्पादन कार्यक्रम राबवून उत्पादीत बियाणांवर प्रक्रीया करुन त्याचे वितरण करणे हा त्याचा व्यवसाय आहे. जिल्हा तक्रार निवारण समितीच्या तपासणी अहवालात नुकसान झाल्याचे सिध्द केलेले नाही. अर्जदार यांनी बियाणे लागवड 3 x 3 फुटावर केली ते काळया जमीनीसाठी 2 x 1.5फुटावर लावगवड करणे आवश्यक आहे. त्यामुळे तांत्रिक पुर्तता अर्जदाराने केलेली नाही. किटक नाशके रासायनिक खते दिल्याबद्यल कागदोपत्री कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. शेन खत दिल्याबद्यलचा पुरावा नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन त्यांचा नफा मिळण्याच्या उद्येशाने तक्रार केलेली आहे. अशाच पध्दतीच्या तक्रारीमध्ये महामंडळाने राज्य आयोग मुंबई येथे अपील क्र.2474/98 व 46 अपीलामध्ये विद्यमान आयोगाने In all these matters the position is that seeds supplied to the complainants were on the basis of Foundation seeds as per arrangements reached between the parties. In that the farmers were supplied seeds by the Seed Producers with understanding to buy the products. यानुसार या निवाडयाचा आधार घेऊन अर्जदाराची तक्रार बिज उत्पादन कार्यक्रमापासुन नफा कमविण्याच्या संदर्भात असल्याने व त्यानुसार कॉन्ट्रॅक्ट या संज्ञाखाली उपभोक्ता होऊ शकत नाही या सबबीवर तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज खारीज करावा अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदाराची तक्रार ही कमर्शिअल या मुद्याखाली मोडते काय? होय. 2. या अनुषंगाने गैरअर्जदारांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय? नाही. 3. काय आदेश? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 व 2 सर्व अर्जदार यांनी महाराष्ट्र बियाणे महामंडळ यांचेकडे बँक चलनाद्वारे त्यांच्या त्यांच्या गांवातील शेतामध्ये कापसाचे सिड प्लॉट घेण्यासाठी चलनाद्वारे रक्कम भरलेली आहे व चलन याप्रकरणांत दाखल केलेले आहे. कापसाचे बियाणे लागवडीनंतर ते योग्य प्रकारे आले नाही, म्हणुन जिल्हा व्यवस्थापक,बिजोउत्पादन महामंडळ यांचेकडे दि.05/11/2009 रोजी तसेच कृषी विकास अधिकारी जिल्हा परीषद यांचेकडे तक्रार केल्याचे अर्ज या प्रकरणांत दाखल आहे. जिल्हा तक्रार निवारण समीतीच्या तपासणी अहवाल यात दाखल केलेला असून जमीन ही कोरडवाहू असे लिहीलेले आहे, प्रत्यक्ष त्याला पंचनामा म्हणता येत नुसन तपासणी अहवाल आहे. तपासणीत केलेले निरीक्षण बी.एन.1.बी.टी. कापसाचे पाने किडी तुडतुडे पांढरे माशा इत्यादीच्या प्रादुर्भावामुळे कोलमडलेले दिसत असुन झाडावर बोंडाची संख्या 20 ते 25 आढळूण आली व बोंडे चांगल्या प्रकारची उमललेली नाही. संकरीत वाणाची प्रत्यक्ष उत्पन्न कमी आहे तसेच 3.5 x 3.5 फुटावर लागवड केल्यामुळे रोपाची संख्या कमी दिसुन आली व निष्कृशामध्ये या भागातील हवामान कोरडवाहु जमीनीसाठी अनूकूल नसल्याचे दिसून आले त्यामुळे उत्पन्नामध्ये 40 ते 50 टक्के घट झालेले आहे, यावर सर्व सदस्य व अध्यक्ष यांची सही आहे. एकंदरीत अहवालावरुन शेतक-याची जमीन ही कोरडवाहु असुन त्यांनी तक्रारअर्जात उल्लेख केल्याप्रमाणे शेत जमीन तयार केली. शेन खत टाकले त्याला रासायनिक खते दिले इत्यादी प्रकारचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. या शिवाय तक्रार निवारण समीतीने जे अहवाल दिला त्यानुसार कापसाच्या झाडाची पाने ही किडी तुडतुडे पांढरे माशा यांच्या प्रादुर्भावामुळे कोलमडलेले दिसुन आले याचा अर्थ किटक नाशके फवारणी केली नाही. अर्जदाराने म्हटल्या प्रमाणे त्यांनी केलेले दिसत नाही व ती केली असती तर किड लागले नसते शिवाय त्यांनी तक्रारअर्जात म्हटलेले आंतर 2 x 1.5 ऐवजी 3.5 x 3.5 असे आहे यामुळे रोपांची संख्या कमी झाली व उत्पान्नही कमी झाले व हे आंतर जवळ जवळ लागवड केली पाहीजे होते शिवाय जमीन ही कोरडवाहू आहे याला पाणी कमी पडले असेल व यामुळे समीतीच्या अहवालाप्रमाणे 55 टक्के घट आढळून आले आहे. गैरअर्जदार यांनी पुरवीलेले बियाणे याप्रमाणे रोपे 20 ते 25 टक्के आढळुन आले याचा अर्थ बियाणेमध्ये दोष दिसुन येत नाही. अर्जदाराने आपल्या तक्रारअर्जात बी.एन.1 बी.टी. कापसाचे सिडस प्लॉटबद्यल गैरअर्जदाराशी करारनामा झालेला असून गैरअर्जदार यांच्या मार्गदर्शनाखाली जे सिड प्लॉटचे उत्पन्न घेण्यात आले ते विकत घेण्याची हमी गैरअर्जदारांनी दिली असून त्याचा भावा रु.4,000/- प्रती क्विंटल देण्यात येईल असे ठरले होते, हाच मुद्या गैरअर्जदारांनी त्यांच्या लेखी म्हणण्यात उचलून धरुन कमर्शिअल मुद्याबद्यल आक्षेप घेतला व आम्ही दिलेले बियाणे त्यांचे उत्पन्न काढुन ते आम्हीच विकत घेणार याचा अर्थ ते कमर्शिअल ट्रांन्जक्शन होते व या मुद्यावर अर्जदाराला आपले प्रकरण या मंचात चालविता येणार नाही. अर्जदाराने आपल्या तक्रारअर्जात सुरुवातीसच स्वतःच्या उपजिवीकेसाठी कापसाचे उत्पन्न घेतले आहे, असे जरी म्हटले तरी या परिस्थितीत उत्पन्न काढल्यानंतर ते कोणास तरी कुठे तरी विकणार ज्याचे नांव व ठिकाण अर्जदारास माहीती नाही पण येथे ज्या कंपनीचे बियाणे दिले आहे. तीच कंपनी हमी भावावर शेतक-याचा माल विकत घेण्यास तयार आहे म्हणुन कमर्शिअल ट्रांन्जक्शन ग्राहक संरक्षण कायदा सेक्शन 2 (I) (डी)(II) म्हणजे नफा कमविण्याच्या हेतूने घेण्यात आलेले पिक हे उपजिवीकेसाठी असे समजण्यात येणार नाही सबब या मुद्यावरच अर्जदाराचा अर्ज खरीज होण्यास पात्र आहे. मा.महाराष्ट्र राज्य आयोग, यांचा आदेश दि.05/10/2009 प्रमाणे तक्रारदार विरुध्द गैरअर्जदार कंपनी, मुळ आदेश खारिज केले आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदारांचा तक्रारअर्ज खारीज करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकालाच्या प्रती देण्यात याव्यात. 4. सर्व एकत्रित निकालाची मुळ प्रत प्रकरण क्र.102/2010 मध्ये ठेवण्यात येते. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |