जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 2009/144 प्रकरण दाखल दिनांक – 20/06/2009. प्रकरण निकाल दिनांक – 11/09/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. चंद्रकांत पि. नारायणराव बासटवार, वय, 55 वर्षे, धंदा व्यापार रा. राजेंद्रनगर, नांदेड. अर्जदार विरुध्द व्यवस्थापक, सिंडीकेट बँक, शाखा नांदेड, जी.जी. रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड. अविनाश कदम. गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - अड.अमित डोईफोडे. निकालपत्र (द्वारा,मा.श्री. सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार यांचे सेवेच्या ञूटी बददल अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात, त्यांचे बासटवार ऑप्टीकल या नांवाने दूकान असून त्यांनी गैरअर्जदार यांचे बँकेत चालू खाते नंबर 1215 व 1271 तसेच बचत खाते नंबर 9332 व 7377 व्यवसायासाठी ठेवले होते. गैरअर्जदार यांचे प्रशासकीय व्यवहार न आवडल्यामूळे त्यांनी सर्व खाते बंद करण्यासाठी दि.6.9.2009 रोजी अर्ज दिला. त्यावेळेस गैरअर्जदार बँकेने बचत खाते नंबर 9332 मधून रु.102/- कपात केले व रु.830/- अर्जदारास परत दिले तसेच खाते नंबर 7377 मधून रु.90/- कपात केले व रु.1881/- अर्जदारास परत केले. चालू खाते नंबर 1215 मधून रु.1801/- कपात केले व रु.1235/- अर्जदारास परत केले. तसेच खाते नंबर 1271 मधून रु.1801/- कपात केले व रु.1418/- अर्जदारास परत दिले.अशा प्रकारे सर्व खाते बंद केले. अर्जदाराने गैरअर्जदारास खात्यातील रक्कम कपाती बददल कूठल्या नियमाद्वारे कपात केली अशी विचारणा केली असताना त्यांनी कोणतीही माहीती त्यांना दिली नाही. यानंतर दि.6.2.2009 रोजीला लेखी तक्रार दिली. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर अर्जदारास समाधानकारक उत्तर न देता गैरअर्जदाराने नोटीस मिळाल्यावर दि.8.4.2009 रोजी रु.674/- चा धनादेश दिला व आपली चूक मान्य केली. गैरअर्जदाराने अर्जदारास कधीही खात्यामध्ये किती किमान रक्कम शिल्लक असली पाहिजे या बददल कळवलेले नाही. खाते बंद करतेवेळेस किमान शिल्लकेच्या साठी दंड लाऊन बेकायदेशीर कपात केली आहे असे करुन गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक ञास दिला म्हणून सर्व खाती बंद करताना किमान रक्कमेच्या साठी कपात केलेली एकूण रु.3794/- व्याजासह परत दयावेत तसेच ञूटीच्या सेवे बददल व नूकसान भरपाई रु.10,000/- दयावेत व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.अर्जदार यांचे दूकान ज्या इमारतीमध्ये आहे त्याच इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर सिंडीकेट बँकेची शाखा आहे. आर.बी.आय. चे बँकीग क्षेञावर काही अंशी नियंञण आहे व ब-याच बँकाना स्वांञता देण्यात आलेली आहे. अर्जदार यांचे बचत खाते नंबर 7377 व 9332 व चालू खाते नंबर 1271 व 1215 हे गैरअर्जदार यांचेकडे होते. जोपर्यत अर्जदार यांचे खाती चालू होती तोपर्यत बँकेच्या नियम व कार्यपध्दती प्रमाणे अर्जदारास आवश्यक ती सेवा व सवलती दिलेल्या आहेत.अर्जदार यांचे सूचनेप्रमाणे त्यांचे सर्व खाते बंद केलेली आहेत. अर्जदाराने दि.6.2.2009 रोजी एक पञ दिले त्यांचे उत्तर लगेच दि..7.2.2009 रोजीला दिले. खाते बंद करताना लावलेल्या चार्जेसची रक्कम 50 टक्के रक्कम खाते बंद करतानाचे वेळी अनावधानाने जास्त लागली होती ती रक्कम रु.674/- अर्जदारास पे ऑर्डर दि.8.4.2009 रोजी परत केली. गैरअर्जदार बँक ही डिसेंबर 2008 मध्ये सीबीएस मध्ये परिवर्तीत झाली त्यामूळे पूर्वीचे चार्जेस व नंतरच्या चार्जेसमध्ये तफावत आहे. गैरअर्जदार बँक शहरी भागात काम करणारी बँक आहे. बचत खाते नंबर 7377 व 9332 मधून प्रत्येकी रु.112/- वजा केले आहेत. त्यापैकी 50 टक्के रक्कम पे ऑर्डरनें दिलेली आहे. हे चार्जेस बँकेचे परिपञक क्र.198/08/बीसी/पी अन्ड डी/70 दि.12.08.2008 प्रमाणे वापस केलेले आहेत. त्यावर सर्व्हीस टॅक्स लागलेला आहे. तो 12.36 प्रमाणे वजा केलेला आहे. चालू खाते नंबर 1271 व 1215 या बाबत बँकेचे परिपञक नंबर 198/2008/बीसी/पि अन्ड डी/70 दि.12.08.2008 प्रमाणे फोलीओ चार्जेस वजा केलेले आहेत व खात्यात शिल्लक रक्कम न ठेवल्याबददल सीबीएस मधून रु.56/- व सीबीएस लागू झाल्यानंतर रु.300/- रु.37/- असे एकूण रु.337/- यानंतर परिपञक नंबर 198/08/बीसी/पीओडी/70 दि.12.08.2008 प्रमाणे वजा केलेल्या आहेत. तसेच खाते बंद करण्यासाठी यांचे परिपञकाप्रमाणे सर्व्हीस टॅक्स लावला आहे. खाते बंद चार्जेस पैकी 50 टक्के रु.562/- पे ऑर्डर द्वारे परत केलेले आहेत. त्यामूळे अर्जदाराची तक्रार ही जून्या संकल्पनेवर आधारित आहे. अर्जदाराची तक्रार ही वस्तूस्थितीच्या विरुध्द आहे व अपू-या माहीतीच्या आधारावर दाखल आहे म्हणून तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व दोघानीही केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी किंवा अनूचित प्रकार अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी चालू खाते नंबर 1271 व 1215 यांचा खाते उतारा (पासबूक) दाखल केलेले आहे. दि.1.10.2008 ते 1.12.2008 या तिन महिन्यासाठी किमान शिल्लक रक्कम या बददल दंड म्हणून रु.56/- प्रति महिना असे रु.168/- एवढी रक्कम कपात केली आहे व यानंतर फोलिओ चार्जेस म्हणून रु.30/- व दि.1.1.2009 रोजी रु.337/-, रु.337/- रु.929/- अशा प्रकारची रक्कम दोन्ही खात्यातून वसूल केली ेआहे. याचप्रमाणे बचत खाते नंबर 7377 व 9332 यांचाही खाते उतारा दाखल केलेला आहे. यात रु.112/-, रु.112/- अशी किमान रक्कमेवर आधारित दंड रक्कम वसूल केले आहेत. दि.6.2.2009 रोजी गैरअर्जदारांना एक तक्रार वजा अर्ज लिहीलेला आहे. याप्रमाणे त्यांचे उत्तर दि.7.2.2009 रोजी गैरअर्जदार बँकेचे दिले असून त्यांचे चालू खाते नंबर 1215 हे नियमाप्रमाणे मेंटेन न केल्या बददल व मिनिमम बॅलेन्स बददल दि.31.12.2008 रोजी फोलीओ चार्जेस म्हणून रु.30/- व रु.929/- वसूल केले आहेत. यानंतर दि.6.2.2009 रोजी फोलीओ चार्जेस रु.30/- रु.337/- असे एकूण रु.562/- खाते बंद करताना लावलेले आहेत. चालू खाते नंबर 1251 मध्ये फोलीओ चार्जेस रु.30/- व दि.6.2. ला रु.929/- तसेच रु.337/- असे एकूण रु.562/- खाते बंद करताना लावलेले आहेत. यानंतर बचत खाते नंबर 7377 व 9332 मध्ये सर्व्हीस चार्जेस म्हणून रक्कम रु.112/- व रु.112/- वसूल केलेले आहेत. अशा आशयाचे पञ त्यांनी अर्जदारास दिले होते ते दोन्ही पञ या प्रकरणात दाखल केलेले आहेत. यानंतर अर्जदाराने दि.7.3.2009 रोजी एक कायदेशीर नोटीस गैरअर्जदारांना दिली होती. हया नोटीसची दखल घेऊन दि.8.4.2009 रोजी गैरअर्जदार यांना अर्जदार यांनी एक पञ लिहीले त्यांच दिवशी दि.8.4.2009 रोजीला रु.674/- अर्जदारांना 50 टक्के चार्जेस कमी केले म्हणून वापस केले आहेत. ते पञ व चेक ही सोबत जोडलेला आहे. जो की अर्जदाराने इनकॅश केलेला नाही. गैरअर्जदाराने अनॅक्सर 1 Revised Service Charges with effect from 01-09-2008 हे परिपञक दाखल केलेले आहे. या परिपञकाच्या आधारे आम्ही रक्कम कपात केली आहे. परंतु या परिपञकाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, हे Collection of out Station cheques, Collection of Bills, Bankers Cheques, Remittance, Ledger Folio Charges, Read of MT, TT, या बददलचे आहेत. हे अर्जदारास लागू होत नाहीत. अर्जदाराची तक्रार ही फक्त मिनिमम बॅलेन्स बददल आहे. यासाठी म्हणून बॅलेन्स करंट अकॉऊट याबददल सध्या अस्तित्वात असलेले शहरी बँक यासाठी म्हणून बॅलेन्स सध्या अस्तित्वात रु.3000/- आहे व आता जे रिव्हाईजड आहे ते रु.5000/- करण्यात आलेले आहे. तसेच बचत खात्यासाठी शहरी बँकेसाठी रु.500/- अस्तित्वात होती ती यानंतर रु.1000/- करण्यात आलेले आहे. याप्रमाणे अर्जदार यांचे चालू खाते तपासले असता तेव्हा मिनिमम बॅलेंन्स रु.3000/- च्या वर आहे व जेथून मिनिमम बॅलेन्स बददल दंड आकारण्यात आला ती दिनांक बघितली असता दि.20.04.2007 रोजी अर्जदाराच्या खात्यात रु.3219/- एवढी रक्कम शिल्लक होती म्हणजे किमान रक्कमेपक्षारु.219/- जास्त होते असे असताना दि.1.10.2008 रोजी पासून ते दि.1.12.2008पर्यत महिना रु.56/- दंड लाऊन रक्कम कमी करण्यात आलेली आहे. गैरअर्जदार यांचे परिपञकाप्रमाणे हा दंड गैररित्या लावलेलो आहे व किमान रक्कम ही कमी करत दाखवलेल्या आहेत. यानंतर आपल्या लेखी म्हणण्यात गैरअर्जदारांनी डिसेंबर 2008 पासून बँक ही सीबीएस मध्ये परिवर्तीत झाली असे म्हटले आहे. तेथून रु.337/- प्रत्येक महिन्यास किमान रक्कमेवर दंड लावला आहे. यात रिव्हाईजड परिपञक प्रमाणे किमान रक्कमे बददल करण्यात आलेले आहे. असे अर्जदार यांना कळविले नाही. अर्जदाराने देखील किमान रक्कम वाढविली आहे हे आपल्याला माहीतच नव्हते त्यामूळे अकाऊट मेंन्टेन्स झाला नाही असे म्हटले आहे. नियमात काही बदल झाले असेल तर तो प्रत्येक ग्राहकाला कळवीणे हे गैरअर्जदाराचे कर्तव्य आहे. गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे की, दि.29.08.2008 रोजी अशा प्रकारची नोटीस ज्यात नियमात काही बददल करण्यात आलेले आहेत यांचा अंमल दि.1.9.2008 पासून सूरु केलेला आहे. अशा प्रकारची नोटीस या प्रकरणात दाखल केली आहे. परंतु ती बोर्डवर लावलीच होती या बददलचा पूरावा दिसून येत नाही. जेव्हा हे नोटीस बोर्डवर अशी नोटीस लावली या बददल गैरअर्जदाराने आपले लेखी म्हणण्यात किंवा शपथपञामध्ये असा उल्लेख केलेला नाही. तेव्हा अर्जदाराना या बाबतची माहीती असणे शक्य नाही व परिपञक व हया नोटीसप्रमाणे यांचे अंमलबजावणी दि.1.9.2008 पासून सूरु होणार होती असे पासबूकामध्ये दि.1.12.2008 रोजी पर्यत जूनेच चार्जेस लावण्यात आलेले असून तेथून नवीन चार्जेस लावलेले आहेत असा उल्लेख केलेलो आहे. म्हणजे गैरअर्जदाराने दाखल केलेले परिपञक, नोटीस व आपले लेखी म्हण्णे, शपथपञ यात तफावत आढळून येते. बचत खात्या बददल ही गैरअर्जदराने सर्व्हीस चार्जेस म्हणून प्रत्येक खात्यास रु.112/- लावलेले आहेत व अर्जदाराने तक्रार केल्यानंतर आपले कडून सर्व्हीस चार्जेस जादा लावल्या गेले असे म्हणून त्यातील 50 टक्के रक्कम ही अर्जदारांना वापस केली आहे ? समजा अर्जदार यांनी विश्वास ठेऊन तक्रार केलीच नसती तर गैरअर्जदार हे आपली चूक लक्षात घेऊन त्यांनी एवढी रक्कम निश्चितच वापस केली नसती, म्हणजे तक्रारीनंतरच गैरअर्जदारांनी आपली चूक मान्य केली आहे. या परिपञकातील नंबर 13 वर अकाऊट क्लोजर मध्ये 1 वर्ष एवढे नवीन खाते असेल व बंद केले असेल तर रु.100/- व एक वर्षापेक्षा जूने खाते असेल तर त्यांस रु.50/- कपात असे म्हटले आहे. असे नियम असताना त्यांनी पूर्णच रक्कम रु.112/-, रु.112/- वसूल केली हे निश्चितच सेवेतील ञूटी आहे. व तक्रारीनंतर ही 50 टक्के रक्कम कपात केली आहे. गैरअर्जदार यांची वागणूक ही संपूर्णतः परिपञकाप्रमाणे नाही आणि त्यांचे मर्जीप्रमाणे सवलती दिल्या व नाकारल्या देखील आहेत. लेखी म्हणणे व शपथपञ यात विरोधाभास आहे. अर्जदार यांनी नवीन परिपञकाच्या बददलची सूचना नव्हती व केवळ माहीती नसल्याकारणाने व गैरअर्जदारयांनी दंडाची रक्कम लावत त्यांचे खात्यातील बॅलेन्स कमी केल्यामूळे हा प्रकार घडलेलो आहे. त्यामूळे अर्जदाराच्या मागणीप्रमणे चालू खाते नंबर 1271 यामध्ये 56,56,56,337,337,929,30 असे एकूण रु.1801/- तसेच चालू खाते नंबर 1215 यामध्ये 56,56,56,337,337,929,30 असे एकूण रु.1801/- दोन्ही मिळून रु.3602/- एवढी रक्कम वसूल केलेली आहे यातून फोलीओ चार्जेस रु.30/- व 30/-, कमी केले असता रु.3602/- वजा रु.60/- = रु.3542/- दोन्ही चालू खात्यास लावलेले किमान रक्कमेवरचा दंड असे एकूण रु.3542/- जास्तीचे लावलेले आहेत. ते वापस करणे आवश्यक आहे व बचत खाते बददल वसूल केलेले 50 टक्के रक्कम ही वापस केलेले आहेत. त्यामूळै गैरअर्जदाराने वापस केलेली रक्कम पे ऑर्डर नंबर 527012000090 दि..8.4.2009 द्वारे रु.674/- दिली आहे. ती रक्कम कमी करुन उर्वरित रक्कम रु.3542/- रु .674/- असे एकूण रु.2868/- एवढी रक्कम वापस मिळण्यास अर्जदार पाञ आहेत. दि.8.4.2009 चा पे ऑर्डर नंबर 7270/2000090 रु.674/- हे चे अर्जदारांनी वटविला नाही तो चेक अर्जदाराने आपल्या खात्यात वटवून घ्यावा कारण हया चकची रक्कम आदेशातून कमी केलेली आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना सेवेच्या ञूटी बददलची रक्कम रु.2868/- व त्यावर दि.6.2.2009 पासून 6 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याज परत करावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.5000/- व दावा खर्च म्हणून रु.1000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्य जे.यू.पारवेकर लघूलेखक |