Maharashtra

Jalna

CC/59/2012

Vankat Narayan Gunjar - Complainant(s)

Versus

Managar, H.D.F.C. Bank, Jalna - Opp.Party(s)

23 Jan 2013

ORDER

 
CC NO. 59 Of 2012
 
1. Vankat Narayan Gunjar
Mastgad, Jalna
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Managar, H.D.F.C. Bank, Jalna
Shivaji putla Road,
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Rekha Kapdiya PRESIDING MEMBER
 HON'ABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

(घोषित दि. 23.01.2013 व्‍दारा श्रीमती रेखा कापडिया, प्र.अध्‍यक्ष)
      अर्जदाराचे गैरअर्जदार बँकेत बचत खाते होते. अर्जदाराने खाते बंद करण्‍याची विनंती केल्‍यानंतर गैरअर्जदार यांनी कपात केलेली रक्‍कम अर्जदारास मान्‍य नसल्‍यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
      अर्जदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीनुसार ते ज्‍येष्‍ठ नागरिक असून त्‍यांनी गैरअर्जदार बँकेत बचत खाते उघडले होते. सदरील खाते बंद केल्‍यानंतर खात्‍यात असलेले 600/- रुपये गैरअर्जदार यांनी परत न करता ते जमा करुन घेतले. अर्जदाराने या बाबत विचारणा केली असता गैरअर्जदार यांनी जवाब दिला नाही. गैरअर्जदार यांच्‍या या कृती विरुध्‍द अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून गैरअर्जदार यांनी 600/- रुपये परत करण्‍याची व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
      अर्जदाराने तक्रारी सोबत बचत खात्‍याचा उतारा, गैरअर्जदार यांना केलेली तक्रार, वकीला मार्फत देण्‍यात आलेली नोटीस इत्‍यादी कागदपत्रे जोडली आहेत.
      गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्‍या जवाबानुसार अर्जदाराचे त्‍यांच्‍या बँकेत बचत खाते असून अर्जदार त्‍यांचे ग्राहक असल्‍याचे त्‍यांना मान्‍य आहे. परंतू आता खाते बंद केल्‍यामुळे त्‍यांना ग्राहक म्‍हणता येणार नाही असे म्‍हटले आहे. अर्जदाराने बँकेत खाते उघडताना खात्‍यातून शुल्‍क कपात करण्‍याच्‍या अर्जावर सही केलेली आहे. अर्जदार खात्‍यात नियमित व्‍यहार करीत नव्‍हते. त्‍यांच्‍या खात्‍यातून केलेली कपात योग्‍य असल्‍याचे जवाबात म्‍हटले आहे.
      अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की, अर्जदाराचे गैरअर्जदार बँकेत बचत खाते होते व अर्जदाराने ते स्‍वत: बंद केले. गैरअर्जदार यांनी खात्‍यातून 600/- रुपये कपात केली असल्‍याची अर्जदाराची तक्रार आहे. अर्जदाराने त्‍यांचा खाते उतारा मंचात दाखल केला आहे. या खाते उता-याचे निरीक्षण केल्‍यावर गैरअर्जदार यांनी डेबिट कार्ड पोटी वरील रक्‍कम कपात केली असल्‍याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी दिनांक 23.12.2008 रोजी अर्जदारास पत्र दिलेले असून त्‍यात चेक बुक, ए.टी.एम/डेबिट कार्ड, नेट बँकींग इत्‍यादी त्‍यांना पाठविण्‍यात येईल असे म्‍हटले आहे. अर्जदाराने या सुविधेची मागणी केलेली दिसून येत नाही. तसेच गैरअर्जदार यांनी या सुविधेसाठी शुल्‍क आकारल्‍या बाबत काहीही नमूद केलेले नाही. त्‍यामुळे अर्जदारास कोणतीही पूर्व सूचना न देता व त्‍यांनी डेबिट कार्ड सुविधेची मागणी केली नसतानाही त्‍यांच्‍या खात्‍यातून रक्‍कम कपात करण्‍याची गैरअर्जदार यांची कृती चुकीची असल्‍याची मंचाचे मत आहे. अर्जदाराची तक्रार मान्‍य करण्‍यात येत असून ते सदरील रक्‍कम व नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत.
 
आदेश
 
  1. गैरअर्जदार यांनी अर्जदारास 600/- रुपये (सहाशे रुपये फक्‍त) 9 टक्‍के व्‍याजासह 30 दिवसात परत करावेत. 
  2. गैरअर्जदार यांनी सेवेतील त्रुटी व खर्चा बद्दल रुपये 500/- (पाचशे रुपये फक्‍त) 30 दिवसात द्यावे.
  3.  

 
 
[HON'ABLE MRS. Rekha Kapdiya]
PRESIDING MEMBER
 
[HON'ABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.