जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/113. प्रकरण दाखल तारीख - 08/01/2010 प्रकरण निकाल तारीख – 25/03/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य कू.सूवर्णा सुरेशराव जगताप वय, 22 वर्षे, धंदा घरकाम रा. लोहार गल्ली, जूना मोंढा, गणेश टाकीज जवळ, नांदेड. अर्जदार विरुध्द. 1. सरव्यवस्थापक, दि. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय, स्टेशन रोड, नांदेड. गैरअर्जदार. 2. व्यवस्थापक. दि. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मुख्य शाखा स्टेशन रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. पी.व्ही.बूलबूले. गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.एस.डी.भोसले निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष) गैरअर्जदार नांदेड जिल्हा सहकारी बँक यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार ही नांदेड येथील रहीवासी असून तिने गैरअर्जदार क्र.2 यांचे शाखेत मूदत ठेव पावती क्र.121711 द्वारे रु.10,000/- दि.23.8.2000 ते 23.11.2005 या 63 महिन्याच्या कालावधीसाठी टाकले होते व मूदत संपल्यानंतर म्हणजे 63 महिन्यानंतर गैरअर्जदार रु.20,078/- अर्जदारास देणार होते. मूदत संपल्यानंतर अर्जदार यांनी मूळ पावती जमा केली गैरअर्जदार यांना रक्कमेची मागणी केली परंतु त्यांनी सांगितले की रिझर्व बँकेने कलम 35 अ नुसार गैरअर्जदार बँकेवर निर्बध लावलेले आहेत. त्यामूळे गैरअर्जदार हे रक्कम देऊ शकत नाहीत. अर्जदाराच्या मूदत ठेवीची मूदत दि.23.11.2005 रोजी संपली असून त्यानंतर अर्जदारास त्या रक्कमेवर दि.23.11.2005 ते 7.6.2008 पर्यत 13.50 टक्के दराने रु.7000/- व्याज मिळणे आवश्यक आहे व उर्वरित रक्कम त्यांचे बचत खाते क्र.15740 मध्ये जमा करावी असे म्हटले आहे. अर्जदाराने गैरअर्जदारांना रक्कमे संदर्भात दि.09.12.2009 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली, गैरअर्जदारांनी नोटीसीस न जूमानता रक्कम ही दिली नाही त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदारास मूदत ठेव पावती क्र.121711 ची परिपक्व रक्कम रु.20,078/-वर दि.23.11.2005 ते 7.6.2008 पर्यत मूदत ठेव पावतीच्या कराराप्रमाणे 13.50 टक्के व्याजाची आकारणी करुन रु.7000/- अर्जदाराच्या बचत खाते क्र.15740 मध्ये जमा करावी, तसेच व्याजासह मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.3000/- कायदेशीर नोटीसचा खर्च रु.200/- व दाव्याचा खर्च रु.500/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे मांडले आहे. त्यांना हे मान्य केले आहे की, अर्जदाराचे रु.20,078/- जमा आहेत, परंतु त्यांना ती रक्कम हार्डशिप गाऊंडवर देण्यात आलेली आहे व उर्वरित रु.78/- त्यांच्या खात्यात शिल्लक आहेत. परंतु दि.23.11.2005 ते 7.6.2008 पर्यत परिपक्व रक्कम रु.20,078/- यावर 13.50 टक्के दराने व्याज रु.7,000/- आकारण्यात यावे हे म्हण्णे बरोबर नाही. करार हा वर्ष 2005 ला संपलेला आहे त्यामूळे 13.50 टक्के व्याज देण्याचा प्रश्न येत नाही. गैरअर्जदार ठरलेल्या ठरावाप्रमाणे अर्जदारास बचत खात्याच्या व्याजाप्रमाणे व्याज देण्यास तयार आहे. गैरअर्जदाराने घेतलेल्या व्याजासंबंधीत ठरावाची प्रत सोबत जोडली आहे. गैरअर्जदार बँकेवर आर.बी.आय. ने दि.20.10.2005 रोजी 35 अ कलम लाऊन आर्थिक निर्बध घातले आहेत. रक्कम न देऊन बँकेने कोणतीही ञूटी केलेली नाही. म्हणून सदरची तक्रार खर्चासह फेटाळावी अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदारानी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः– अर्जदार यांनी ठेव पावती नुसार यांमध्ये रक्कम गुंतविली होती, तसेच मूदतीनंतर वरील एकूण रक्कम रु.20,078/- गैरअर्जदार यांचेकडून आर.बी.आय. च्या मंजुरी नुसार देण्यात आलेले आहेत हे कागदपञ पाहिले असता सिध्द होते. पण अर्जदार यांना रु.20,078/- वर व्याज देण्याचे कोणताही ठराव झालेला नव्हता. परंतु गैरअर्जदार क्र.1 बँकेवर आर.बी.आय.गैरअर्जदार क्र.2 ने कलम (35 ए) हे कलम लावून बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बध लादले असल्यामूळे गैरअर्जदार क्र.1 हे आर.बी.आय. च्या परवानगीशिवाय रक्कम देऊ शकत नाही. त्यामूळे गैरअर्जदार क्र.1 यांच्या सेवेतील ञूटी होत नाही. परंतु या अर्जदाराच्या तक्रारीमध्ये मूदत ठेवीबददल वाद नाही. तर मूदत ठेवीवरील व्याजाबददल तक्रार आहे. परंतु गैरअर्जदार बँकेने अर्जदाराला मूदत ठेवीस नियमाप्रमाणे व्याज दिलेले आहे तसेच अर्जदाराला ठेवीप्रमाणे पूर्ण रक्कम व्याजासह देण्यात आलेली आहे. कोणतीही रक्कम गैरअर्जदार यांचेकडून अर्जदार यांना येणे बाकी नाही. अर्जदाराने ज्या कालावधीसाठीचे व्याज मागितलेले आहे ते ठरावाप्रमाणे नाही. म्हणून त्यांना व्याज देण्यात आलेले नाही असे करुन गैरअर्जदार यांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येतो. 2. मानसिक ञासाबददल आदेश नाही. 3. दावा खर्च पक्षकारांनी आपआपला सोसावा. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |