Maharashtra

Jalna

CC/40/2012

Radheshyam Ramnath Kabra - Complainant(s)

Versus

Malpani Brothers - Opp.Party(s)

Adv.Y.G.Somani

19 Oct 2012

ORDER

 
CC NO. 40 Of 2012
 
1. Radheshyam Ramnath Kabra
R/O: Tembhurni,Tq-Jafrabad
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Malpani Brothers
Shop No:2 to 6, Ambika market,Jalna
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Rekha Kapdiya PRESIDING MEMBER
 HON'ABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

(घोषित दि. 19.10.2012 व्‍दारा श्रीमती. रेखा कापडिया, प्र.अध्‍यक्ष)
 
      अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍याकडून रिवॉलव्हिंग खुर्ची विकत घेतली. त्‍यात उत्‍पादकीय दोष असल्‍यामुळे त्‍यांनी ती गैरअर्जदार यांच्‍याकडे दुरुस्‍तीसाठी दिली. गैरअर्जदार यांनी ती दुरुस्‍त न करुन दिल्‍यामुळे अर्जदाराने सेवेतील त्रुटी म्‍हणून ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
      अर्जदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीनुसार त्‍यांनी दिनांक 21.02.2011 रोजी गैरअर्जदार यांच्‍याकडून रिवॉलव्हिंग खुर्ची खरेदी केली. सदरील खुर्चीची किंमत 5,200/- रुपये आहे. सदरील खुर्चीत बसल्‍यानंतर एकीकडे झुकत असल्‍यामुळे त्‍यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडे तक्रार केली. गैरअर्जदार यांनी सांगितल्‍या प्रमाणे अर्जदाराने दिनांक 25.03.2011 रोजी ती खुर्ची दुरुस्‍तीसाठी गैरअर्जदार यांच्‍याकडे दिली. गैरअर्जदार यांनी ती दुरुस्‍त करुन त्‍यांना परत केली. काही दिवसानंतर अर्जदारास सदरील खुर्चीमध्‍ये तोच दोष आढल्‍यामुळे गैरअर्जदार यांच्‍या बरोबर संपर्क केला. अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांनी दिनांक 05.04.2011 रोजी ती खुर्ची गैरअर्जदार यांना दुरुस्‍तीसाठी दिली व त्‍याच प्रमाणे गैरअर्जदार यांच्‍या मागणी नुसार खरेदीची पावती देखील त्‍यांच्‍याकडे जमा केली. अर्जदाराने त्‍यानंतर अनेकवेळेस गैरअर्जदार यांच्‍याशी संपर्क साधून खुर्ची दुरुस्‍त करुन देण्‍याबाबत विचारणा केली. परंतू गैरअर्जदार यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्‍यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून गैरअर्जदार यांनी नवीन खुर्ची देण्‍याची व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
      गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्‍या जवाबानुसार त्‍यांचा फर्निचर विक्रीचा व्‍यवसाय आहे. अर्जदाराने त्‍यांच्‍याकडून खुर्ची विकत घेतली नसल्‍याचे त्‍यांचे म्‍हणणे आहे. त्‍याच प्रमाणे त्‍यांनी खुर्ची दुरुस्‍त करुन देतो असेही अर्जदारास सांगितले नाही. अर्जदाराने स्‍वत:च खुर्ची त्‍यांच्‍या इथे आणून ठेवली आहे. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार चुकीची असल्‍यामुळे खारीज करण्‍याची विनंती मंचास केली आहे.
      अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍याकडून खुर्ची विकत घेतली असल्‍याचे म्‍हटले आहे. परंतू त्‍यांनी सदरील खुर्चीची खरेदी पावती मंचात दाखल केलेली नाही. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्‍या जवाबात एकीकडे अर्जदाराने त्‍यांच्‍याकडे खुर्ची आणून ठेवली असल्‍याचे म्‍हटले आहे तर दुसरीकडे त्‍यांनी अर्जदारास खुर्ची विकली नसल्‍याचे म्‍हटले आहे. मंचासमोर झालेल्‍या सुनावणी दरम्‍यान गैरअर्जदार यांनी त्‍यांचे खुर्ची दुरुस्‍तीचे दुकान नसल्‍याचे मान्‍य केले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेल्‍या दिनांक 05.04.2011 रोजीच्‍या पत्रावर अर्जदाराची रिवॉलव्हिंग खुर्ची त्‍यांच्‍याकडे जमा केल्‍याचे तसेच त्‍याची किंमत रुपये 5,200/- नमूद केलेली दिसून येते. यावरुन गैरअर्जदार यांचा जर खुर्ची दुरुस्‍तीचा व्‍यवसाय नसेल तर त्‍यांनी खुर्ची कशासाठी ठेवून घेतली याबाबतचा खुलासा करणे अपेक्षित होते. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍या टेलीफोन क्रमांकावर अनेक वेळेस संपर्क केल्‍याचे टेलीफोन बिलाच्‍या तपशिलावरुन दिसून येते. यावरुन सदरील खुर्ची ही गैरअर्जदार यांच्‍याकडून विकत घेतली असल्‍याचे अर्जदाराचे म्‍हणणे मंच मान्‍य करीत आहे. अर्जदाराने मंचात खरेदीची किंमत, वॉरंटी प्रमाणपत्र इत्‍यादी दाखल केले नसल्‍यामुळे गैरअर्जदार यांनी नवीन खुर्ची द्यावी हे अर्जदाराचे म्‍हणणे मंच मान्‍य करीत नाही. गैरअर्जदार यांनी सदरील खुर्ची अर्जदारास विकली असल्‍याचे स्‍पष्‍ट असल्‍यामुळे त्‍यांनी ती दुरुस्‍त करुन देण्‍याची जवाबदारी गैरअर्जदार यांची आहे.
 
आदेश
 
  1. गैरअर्जदार यांनी अर्जदाराची रिवॉलव्हिंग खुर्ची 15 दिवसात विनामूल्‍य दुरुस्‍त करुन द्यावी.
  2. गैरअर्जदार यांनी मानसिक त्रास व खर्चाबद्दल रुपये 1,500/- 30 दिवसात द्यावे.
 
 
[HON'ABLE MRS. Rekha Kapdiya]
PRESIDING MEMBER
 
[HON'ABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.