जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. तक्रार दाखल दिनांक: 24/11/2009. तक्रार आदेश दिनांक :29/03/2011. ग्राहक तक्रार क्रमांक : 649/2009. श्री. इरण्णा गुरुसिध्दप्पा सिंदगी, वय 58 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. सी-41, सिध्देश्वर मार्केट यार्ड, सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी. (नोटीस विरुध्द पक्ष क्र.2 व्यवस्थापक, श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर यांचेवर बजावणेत यावी.) 2. व्यवस्थापक, श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. 3. श्री. अनिल शंकर पारशेट्टी (चेअरमन), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर, रा. चंदन निवास, भवानी पेठ, 56/5/11, शाहीर वस्ती, सोलापूर. 4. श्री. भिमाशंकर श्रीपती चाकूरकर, (संचालक), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर, रा. कुंभारी, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर. 5. श्री. प्रकाश नागप्पा करपे, (संचालक), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर, रा. सदर. 6. श्री. चन्नप्पा शिवप्पा गदगे, (संचालक), रा. सदर. श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. रा. सदर. 7. सौ. सुरेखा योगिनाथ पारशेट्टी, (संचालिका), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. रा. सदर. विरुध्द पक्ष 8. श्री. गुरप्पा आणप्पा विजापुरे, (संचालक), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. रा. सदर. 9. श्री. मल्लिनाथ चंद्रशेखर भंडे, (संचालक), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. रा. सदर. 10. श्री. सिध्दराम अप्पाराव पारशेट्टी, (संचालक), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. रा. सदर. 11. श्री. शंकर गुरुनाथ गदगे, (संचालक), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. रा. सदर. 12. श्री. शिवयोगी सिध्दराम चांगले, (संचालक), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. रा. सदर. 13. सौ. सुरेखा चंद्रकांत मडिवाळ, (संचालिका), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. रा. सदर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : ओ.एस. उंबरजे विरुध्द पक्ष क्र.3 यांचेतर्फे अभियोक्ता : साक्षी लॉ असोसिएटस् विरुध्द पक्ष क्र.4 यांचेतर्फे अभियोक्ता : ए.एस. महामुनी विरुध्द पक्ष क्र.7, 8, 10 ते 13 यांचेतर्फे अभियोक्ता : आर.बी. कोरे विरुध्द पक्ष क्र.5, 6 व 9 यांचेतर्फे अभियोक्ता : एम.एच. हरहरे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची अशी तक्रार आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 संस्थेमध्ये संक्षेप ठेव खाते उघडलेले असून त्यांचे क्रमांक 159 आहे. सदर खात्यांची मुदत पूर्ण झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी त्यांना दिलेला धनादेश क्र.003788 पुरेशी रक्कम नसल्यामुळे अनादरीत झाला आहे. विरुध्द पक्ष ठेव रक्कम परत करण्यास टाळाटाळ करीत आहेत आणि त्यांनी सेवेमध्ये त्रुटी केलेली असल्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे संक्षेप ठेव खात्यावरील जमा रक्कम रु.8,490/-व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी अनुक्रमे रु.5,000/- व तक्रार खर्चापोटी रु.2,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार धनादेश न वटल्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे रकमेची मागणी केली असता, दि.1/1/2008 रोजी रु.8,500/- रोखीने तक्रारदार यांना अदा केले आहेत आणि रक्कम प्राप्त झाल्याचे व्हावचर लिहून दिले आहे. तक्रारदार यांनी धनादेश परत न करता त्याचा दुरुपयोग करुन खोटी तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी तक्रार रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र.4 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पतसंस्थेच्या संचालक पदाचा दि.3/1/2007 रोजी राजीनामा दिला असून तो मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना जबाबदार धरता येणार नाही, अशी विनंती केली आहे. 4. विरुध्द पक्ष क्र.5, 6 व 9 यांचेतर्फे रेकॉर्डवर म्हणणे दाखल करण्यात आले असून त्यांनी तक्रार अमान्य केली आहे. त्यांना नाममात्र संचालक म्हणून पतसंस्थेत घेण्यात आले असून पतसंस्थेचे व्यवहार विरुध्द पक्ष क्र.3 मनमानी पध्दतीने करीत असल्यामुळे ते व्यवहारात जात नव्हते किंवा व्यवहार पाहत नव्हते. त्यांनी पतसंस्थेचा राजीनामा दिलेला असून ते सर्वसाधारण सभेस किंवा मासिक सभेस हजर राहिले नाहीत. शेवटी त्यांनी तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे. 5. विरुध्द पक्ष क्र.7, 8 व 10 ते 13 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल करुन तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पतसंस्थेची स्थापना दि.16/7/2002 रोजी झालेली असून संस्थेचे मुख्य व्यवहार चेअरमन, व्हाईस चेअरमन व व्यवस्थापक पाहतात. त्यांनी संस्थेच्या व्यवहारात भाग घेतलेला नाही. तीन मासिक बैठकीस गैरहजर राहिल्यास संचालक पदावर राहण्यास अपात्र ठरतात आणि त्यांनी बंधपत्र लिहून दिलेले नाही. त्या संचालक पदावर राहण्यास अपात्र असल्यामुळे त्यांना जबाबदार धरता येणार नाही. शेवटी त्यांच्या विरुध्द तक्रार नामंजूर करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 6. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिल्याचे सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 7. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेमध्ये संक्षेप ठेवीद्वारे रक्कम गुंतवणूक केल्याविषयी विवाद नाही. सदर ठेवीची मुदत संपल्यानंतर रकमेची मागणी केली असता टाळाटाळ करण्यात येत असून विरुध्द पक्ष यांनी दिलेला धनादेश अनादरीत झाल्याची तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे. 8. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांची तक्रार अमान्य केली आहे. विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या म्हणण्यानुसार धनादेश न वटल्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे रकमेची मागणी केली असता, दि.1/1/2008 रोजी रु.8,500/- रोखीने तक्रारदार यांना अदा केले आहेत आणि रक्कम प्राप्त झाल्याचे व्हावचर लिहून दिलेले आहे. सदर व्हावचर रेकॉर्डवर दाखल आहे. तक्रारदार यांचे अभियोक्त्यांनी युक्तिवादाचे वेळी व्हावचर हे झेरॉक्स प्रत आहे आणि चेक अद्याप त्यांच्याकडे असल्याचे आणि रक्कम दिली असती तर विरुध्द पक्ष यांनी धनादेश स्वीकारला असता, असे नमूद केले. 9. विरुध्द पक्ष पतसंस्थेकरिता विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांच्या स्वाक्षरीने दि.12/12/2007 रोजीचा रु.8,490/- चा धनादेश तक्रारदार यांना दिलेला आहे. तो धनादेश वटविण्यासाठी जमा केला असता अनादरीत झालेला आहे. तक्रारदार यांना दि.1/1/2008 रोजी संक्षेप ठेवीची रक्कम रु.8,500/- रोखीने अदा केल्याबाबत तक्रारदार यांची स्वाक्षरी असलेली पावती रेकॉर्डवर दाखल करण्यात आलेली आहे. त्या पावतीवरील तक्रारदार यांची स्वाक्षरी व तक्रारीवरील स्वाक्षरी मिळतीजुळती आहे. तक्रारदार यांच्या वतीने युक्तिवादामध्ये जरी त्यांना रोखीने रक्कम प्राप्त झाली नसल्याचे व पावती बनावट असल्याचे नमूद केले असले तरी त्यांनी त्यापृष्ठयर्थ कोणतेही शपथपत्र दाखल केलेले नाही. त्याशिवाय, तक्रारदार यांनी संक्षेप ठेव पासबूक मंचासमोर दाखल केलेले नाही. तसेच धनादेश दि.12/12/2007 रोजी अनादरीत झाल्यानंतर त्यांनी तक्रार दि.24/11/2009 रोजी दाखल केलेली असून त्या विलंबाची कारणे अनुत्तरीत आहेत. तसेच तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द धनादेश अनादरीत झाल्यामुळे योग्य न्यायालयासमोर केस का केली नाही ? हाही प्रश्न निर्माण होतो. वरील विवेचनावरुन विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना संक्षेप ठेवीची रक्कम दिलेली असल्यामुळे त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही, या मतास आम्ही आलो आहोत. 10. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येते. 2. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/24311)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |