जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. तक्रार दाखल दिनांक: 31/12/2009. तक्रार आदेश दिनांक : 02/01/2011. ग्राहक तक्रार क्रमांक : 709/2009. श्री. मल्लीनाथ रेवणसिध्द ख्याडे, वय 37 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. 11/12, भवानी पेठ, बसवेश्वर नगर, सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी. (नोटीस विरुध्द पक्ष क्र.2 व्यवस्थापक, श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर यांचेवर बजावणे) 2. व्यवस्थापक, श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. 3. श्री. अनिल शंकर पारशेट्टी (चेअरमन), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर, रा. चंदन निवास, भवानी पेठ, 56/5/11, शाहीर वस्ती, सोलापूर. 4. श्री. भिमाशंकर श्रीपती चाकूरकर, (संचालक), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर, रा. कुंभारी, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर. 5. श्री. प्रकाश नागप्पा करपे, (संचालक), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर, रा. सदर. 6. श्री. चन्नप्पा शिवप्पा गदगे, (संचालक), रा. सदर. श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. रा. सदर. 7. सौ. सुरेखा योगिनाथ पारशेट्टी, (संचालिका), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. रा. सदर. 8. श्री. गुरप्पा आणप्पा विजापुरे, (संचालक), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. रा. सदर. विरुध्द पक्ष 9. श्री. मल्लिनाथ चंद्रशेखर भंडे, (संचालक), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. रा. सदर. 10. श्री. सिध्दराम अप्पाराव पारशेट्टी, (संचालक), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. रा. सदर. 11. श्री. शंकर गुरुनाथ गदगे, (संचालक), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. रा. सदर. 12. श्री. शिवयोगी सिध्दराम चांगले, (संचालक), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. रा. सदर. 13. सौ. सुरेखा चंद्रकांत मडिवाळ, (संचालिका), श्री मल्लिकार्जून ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कुंभारी, ता. दक्षीण सोलापूर, जि. सोलापूर. रा. सदर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : ओ.एस. उंबरजे विरुध्द पक्ष क्र.3 यांचेतर्फे अभियोक्ता : साक्षी लॉ असोसिएटस् विरुध्द पक्ष क्र.7, 10 ते 13 यांचेतर्फे अभियोक्ता : आर.बी. कोरे विरुध्द पक्ष क्र.5, 6 व 9 यांचेतर्फे अभियोक्ता : एम.एच. हरहरे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची अशी तक्रार आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 संस्थेमध्ये संक्षेप ठेव खाते उघडलेले असून त्यांचे क्रमांक 102 आहे. सदर खात्यांची मुदत दि.31/12/2007 रोजी संपलेली असून त्यांचे खात्यावर रु.26,200/- जमा आहेत. विरुध्द पक्ष यांनी ती रक्कम त्यांना द.सा.द.शे. 5 टक्के व्याज दराने देणे आवश्यक असताना ठेव रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी केलेली असून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे संक्षेप ठेव खात्यावरील जमा रक्कम रु.26,200/-व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी अनुक्रमे रु.5,000/- व तक्रार खर्चापोटी रु.2,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पतसंस्थेच्या सभासदांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्यामुळे ठेवीदारांना व पिग्मीधारकास रक्कम देता आलेली नाही. त्यांनी 53 सभासदाविरुध्द वसुली कार्यवाही चालू केली आहे. विरुध्द पक्ष क्र.4 यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही. तसेच इतर संचालक त्यांच्यावर जबाबदारी लादत आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 73 (1-अब) नुसार व नियम 58 अन्वये सर्व संचालकांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी असल्यामुळे तसे आदेश पारीत व्हावेत, अशी त्यांनी विनंती केली आहे. शेवटी तक्रार रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र.5, 6 व 9 यांचेतर्फे रेकॉर्डवर म्हणणे दाखल करण्यात आले असून त्यांनी तक्रार अमान्य केली आहे. त्यांना नाममात्र संचालक म्हणून पतसंस्थेत घेण्यात आले असून पतसंस्थेचे व्यवहार विरुध्द पक्ष क्र.3 मनमानी पध्दतीने करीत असल्यामुळे ते व्यवहारात जात नव्हते किंवा व्यवहार पाहत नव्हते. त्यांनी पतसंस्थेचा राजीनामा दिलेला असून ते सर्वसाधारण सभेस किंवा मासिक सभेस हजर राहिले नाहीत. शेवटी त्यांनी तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे. 4. विरुध्द पक्ष क्र.7 व 10 ते 13 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल करुन तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पतसंस्थेची स्थापना दि.16/7/2002 रोजी झालेली असून संस्थेचे मुख्य व्यवहार चेअरमन, व्हाईस चेअरमन व व्यवस्थापक पाहतात. विरुध्द पक्ष क्र.7 व 10 ते 13 हे कमी शिक्षीत असल्यामुळे व वैयक्तिक कामामुळे त्यांनी संस्थेच्या व्यवहारात भाग घेतलेला नाही. दि.31/5/2006 पासून त्यांना संचालक मंडळामध्ये घेण्यात आले असून त्यांच्या नियुक्तीपासून आजपर्यंत एकाही प्रोसिडींग बुकावर व मिटींग बुकावर स्वाक्षरी घेतलेली नाही आणि ते पतसंस्थेच्या मासिक व सर्वसाधारण सभेस उपस्थित नव्हते व नाहीत. तीन मासिक बैठकीस गैरहजर राहिल्यास संचालक पदावर राहण्यास अपात्र असल्यामुळे त्यांचे नांव कमी झालेले असावे आणि त्यांना जबाबदार धरता येणार नाही. शेवटी त्यांच्या विरुध्द तक्रार नामंजूर करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 5. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार पिग्मी रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 6. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेमध्ये संक्षेप ठेव खाते क्र. 102 मध्ये रु.26,200/- जमा केल्याचे पासबुकावरुन निदर्शनास येते. सदर ठेवीची मुदत संपल्यानंतर रकमेची मागणी केली असता टाळाटाळ करण्यात येत असल्याची तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे. 7. पतंसंस्थेच्या संचालकाची यादी रेकॉर्डवर दाखल असून त्याप्रमाणे संचालकांना प्रस्तुत तक्रारीमध्ये विरुध्द पक्ष म्हणून समाविष्ठ करण्यात आलेले आहे. विरुध्द पक्ष क्र.1, 2, 4 व 8 यांनी प्रस्तुत तक्रारीला उत्तर दिलेले नसल्यामुळे आणि मंचासमोर उपस्थित राहून वस्तुस्थिती स्पष्ट करत नसल्यामुळे त्यांना तक्रारदार यांची तक्रार मान्य असल्याचे अनुमानास आम्ही येत आहोत. 8. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे संक्षेप ठेव खात्यामध्ये रक्कम गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतलेली आहे. संक्षेप ठेव खात्याची मुदत संपल्यानंतर तक्रारदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी करुनही त्यांना रक्कम परत करण्यात आलेली नाही. ठेव रक्कम मुदत संपल्यानंतर त्यावरील नमूद व्याजासह परत करणे, ही विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. असे असताना, तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. 9. विरुध्द पक्ष क्र.2 हे व्यवस्थापक असल्यामुळे तक्रारदार यांची ठेव रक्कम परत करण्यासाठी त्यांची जबाबदारी निश्चित झाल्याशिवाय त्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरणे उचित ठरत नाही. 10. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 व 3 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना संक्षेप ठेव खाते क्र. 102 मध्ये जमा असलेली रक्कम रु.26,200/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.1 व 3 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना रु.26,200/- रकमेवर ठेव कालावधीकरिता द.सा.द.शे. 5 टक्के व ठेवीची मुदत संपल्यानंतर तेथून पुढे द.सा.द.शे. 12 टक्के दराने वरील नमूद रकमेवर व्याज द्यावे. 3. विरुध्द पक्ष क्र.1 व 3 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/1211)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |