नि.20 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 92/2011 नोंदणी तारीख – 27/06/2011 निकाल तारीख - 11/10/2011 निकाल कालावधी- 106 दिवस श्री महेंद्र एम गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या ( श्री महेंद्र एम गोस्वामी, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारीत केला) -------------------------------------------------------------------------------- बाबुराव याशवंत जगदाळे रा. शिरवडे (मसूर) ता. कराड, जि. सातारा ----- अर्जदार (वकील श्री. धनवडे) विरुध्द 1 प्रोप्रायटर, संजय शिवाजी माळी पत्ता प्लॉट नं. 43 सी/ए , गाळा नं. 4, हिरो होंडा अनु एजन्सीसमोर, शनिवार पेठ, मार्केट यार्ड रोड, कराड, ता. कराड. जि.सातारा. 2. मॅनेजिंग डायरेक्टर, नामदेव उमाजी अॅग्रो टेक इंडिया प्रा. लि., 161/167, डॉ. आंबेडकर रोड, भायकळा, मुंबई 400 027 -----विरुध्द पक्षकार क्र. 1 व 2 (वकील श्री.विनायक कुलकर्णी) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. प्रस्तुत कामातील तक्रारदार हे मौजे शिरवडे (मसुर) ता. कराड जि. सातारा येथील रहिवाशी असून त्यांचा शेती हा व्यवसाय आहे. तक्रारदार हे बागायती शेती करीत असून त्यांनी त्यांचे शेतात दोडका हे उत्पन्न काढण्याचे ठरविले. त्याप्रमाणे तक्रारदारांनी विरुध्द पक्षकार क्र.1 यांचेकडून शेतीसाठी लागणारी औषधे बी-बीयाणे नेहमी खरेदी करतात त्याप्रमाणे दोडक्याचे सावता एफ1 हायब्रीड या जातीचे बीयाणे दि. 18/02/2011 रोजी कराड येथून 50 ग्रॅमचे 5 पॅकींग रुपये 1250 ला खरेदी केले. सदर बियाणेची लागवड केल्यानंतर बियाणे चांगल्याप्रकारे उगवून आल्यानंतर त्याला चांगल्याप्रकारे फलधारणा झाली. परंतु दोडका बाजारात नेऊन व्यापा-याला विकाला असता सदरचा दोडका हा पूर्ण कडवट असल्याने सर्व माल परत आला. अशाप्रकारे बियाणातील दोषामुळे तक्रारदारांचे नुकसान झाले. तक्रारदार यांनी विरुध्द पक्षकार यांचेकडे तक्रार केलेनंतर त्यांनी कंपनीला तसे कळवून विरुध्दपक्षकार क्र.1 चे व विरुध्दपक्षकार क्र. 2 कंपनी यांचे अधिकारी यांनी तक्रारदारांचे शेतात येवून प्रत्यक्ष पाहणी केली परंतु त्यांनी आजपर्यंत कोणताही निष्कर्ष व भरपाई दिलेली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी झालेल्या फसवणुकीबद्दल दि.6/5/11 रोजी जिल्हा बियाणे तक्रार निवाण समिती जिल्हापरषिद सातारा यांचेकडे विरुध्द पक्षकार क्र. 1 व 2 यांचेविरुध्द तक्रार करुन नुकसानभरपाई मागितली असता कृषी संशोधन कराड, जिल्हा बिज प्रमाणिकरण अधिकारी, प्रतिनिधी तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती माळी अॅग्रो व कंपनी यांचे प्रतिनिधी या सर्वांनी पाहणी केली. व दि. 30/5/2011 रोजी अहवाल कळविला. त्याप्रमाणे तक्रारदारांनी 100 टक्के नुकसानझाले असलेबाबत निष्कर्ष निघाला असून विरुध्द पक्षकार क्र. 1 व 2 हे सामुहिकरित्या तक्रारदारांच्या नुकसानीला जबाबदार आहेत. तक्रारदारांनी लागवड करतेवेळी शेतीची संपूर्ण मशागत करण्यासाठी आलेला खर्च व येणा-या उत्पन्नातून पैसे न मिळाल्याने तक्रारदारांनी 100 टक्के नुकसानभरपाई एकूण रक्कम रु. 1,35,500/- व शारिरिक मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्जाचे खर्चापोटी एकूण रक्कम रु.. 30,000 /- ची नुकसानभरपाईची मागणी केलेली आहे. 2. विरुध्द पक्षकार क्र. 1 व 2 यांनी मंचासमोर हजर होवून नि. 8 कडे आपले म्हणणे व नि. 9 कडे प्रतिज्ञापत्र दाखल करुन तक्रारदारांची तक्रार नाकारलेली आहे. विरुध्द पक्षकार यांचे कथनानुसार तक्रारदाराने त्यांचेकडून खरेदी केलेले सावता एफ 1 हायब्रीड या जातीचे बियाणे चांगले उगवून त्यांचे चांगल्याप्रकारे फळधारणा झाली यावरुन बियाणांमध्ये कोणताही दोष नव्हता व नाही. त्याप्रमाणे बि-बियाणे कायदा 1966 प्रमाणे विरुध्द प्रक्षकार यांनी दोडक्याचे बियाणे उत्तम दिले होते. त्यामुळे बाजारात दोडका नेलेनंतर सदर दोडका कडवट असल्याने व्यापा-याने परत केली ही बाब खोटी व लबाडीची असून त्यास कोणताही पुरावा नसलेचे म्हटले आहे. सदर विरुध्दपक्षकार यांचे कथनानुसार तक्रारदारांनी जिल्हा बियाणे तक्रार समिती यांचेकडे दिलेली तक्रार चुकीची असून समितीने दिलेला दि. 30/5/2011 चा निष्कर्ष चुकीचा असून त्यास कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. तसेच फळातील कडवटपणा हा बियाण्याच्या दोषामुळे नसून पिक ज्यावेळेला परिपक्व अवस्थेत होते त्यावेळी तापमानातील बदल व आणि पाण्याचा ताण व उशिरा काढणी या बाबींमुळे फळांचा कडवटपणा झाला ही बाब समितीने लक्षात घेतली नाही. तसेच बियाणांच्या दोषामुळे कडवटपणा आला यास कोणत्याही प्रकारे बीज परिक्षण प्रयोगशाळा यांचा अहवाल दाखल नाही. समितीच्या अहवालाव्यतिरिक्त प्रयोगशाळेचा कोणताही अहवाल बियाणाच्या दोषाबाबत तक्रारदाराने दिला नाही किंवा समितीने किंवा सदस्यांनी कोणत्याही प्रकारचे प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. फळांच्या कडवटपणाबद्दल बियाणात दोष आहे हे कोणत्याही प्रयोगशाळेच्या अहवालाव्दारे सिध्द केलेले नाही. तसेच दोडका बियाणाची उगवण चांगली झाली व त्यास उत्तम फळधारणा झाली यावरुन बियाणात दोष नाही आणि त्यामुळे विरुध्दपक्षकार कंपनी हे तक्रारदारांचे कोणत्याही तथाकथित नुकसानीस जबाबदार नाहीत. सबब तक्रारदार यांनी मागणी केलेला खर्च हा स्वतःच्या जबाबदारीवर केला असून त्याबाबत कोणताही सल्ला या विरुध्दपक्षकारांनी केलेला नसून सदर खर्चाबाबतची मागणी करता येणार नाही व दोडक्याचे उत्पन्न तक्रारदाराला मिळालेले असून फळातील कडवटपणा हा पीक परिपक्व अवस्थेत असताना झालेले तापमानातील बदल व पाण्याचा ताण यामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी बियाणे जबाबदार नाही. त्यामुळे नुकसानभरपाई मागणेचे कोणतेही कारण नाही. सबब तक्रारदारांची तक्रार ही रद्द होण्यास पात्र असून खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती विरुध्दपक्षकार क्र.1 व 2 यांनी केलेली आहे. 3. तक्रारदार यांनी या अर्जाचे कथनातील सिध्दतेसाठी नि. 2 ला शपथपत्र दिलेले आहे. तसेच नि. 5 सोबत दाखल केलेली 5/1 ते 5/4 कडे कागदपत्रे, नि. 14 कडे तक्रारदारांचे पुराव्याचे अॅफीडेव्हीट, नि. 15 कडे पुराव्याचे अॅफीडेव्हीट व नि.19 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. 4. प्रस्तुत प्रकरणात उभयपक्षकारांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. तक्रारदार यांचे नि. 19 कडील लेखी युक्तीवाद व जाबदार यांचे नि. 17 कडील लेखी युक्तीवाद व नि. 18 कडील वरीष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे पाहीली. त्यानुसार प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे 1) ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत विरुध्द पक्षाने त्रुटी केली आहे काय ? नाही 2) तक्रारदाराने खरेदी केलेले बियाणे सदोष असल्याचे तक्रारदाराने सिध्द केले आहे काय ? नाही 3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणमिमांसा 5. मुद्दा क्र. 1 - तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडून खरेदी केलेले बियाणे सदोष असून या बियाणातील दोषामुळे दोडका फळात कडवटपणा आला व त्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान झाले ही बाब विरुध्दपक्षाने स्पष्टपणे नाकारली आहे. मात्र तक्रारदाराने त्यांचेकडून बियाणे खरेदी केले ही बाब मान्य केली आहे. तक्रारदाराने या तक्रारकामी जिल्हा बियाणे तक्रार निवारण समिती जिल्हा परषिद, सातारा चा पाहणी अहवाल व निष्कर्ष नि. 5 वरील यादीसोबत जोडला आहे. परंतु या पाहणी अहवाल व निष्कर्षासोबत कोणताही पंचनामा जोडलेला दिसून येत नाही. तसेच पुराव्याकामी जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीच्या पदाधिका-याचे शपथपत्र जोडले नाही. एवढेच नव्हे तर तक्रारदाराने खरेदी केलेले बियाणे सदोष असल्याबाबतचा कोणत्याही प्रयोगशाळेचा अहवाल सादर केला नाही. किंवा वादातील बियाणे परिक्षणासाठी योग्य त्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यासाठी कोणतीही तजवीज केली नाही. किंवा त्यासाठी मंचाकडे अर्जदेखील केला नाही. त्यामुळे तक्रारदाराने खरेदी केलेले बियाणे हे सदोष आहे हे तक्रारदाराने सिध्द केले नसल्यामुळे ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत विरुध्द पक्षाने त्रुटी केली असे म्हणता येत नाही. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी आहे. 6. मुद्दा क्र. 2 - I) तक्रारदाराने खरेदी केलेले बियाणे हे सदोष व निकृष्ट दर्जाचे आहे हे दाखविण्यासाठी तक्रारदाराने नि. 5/1 वर जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल जोडला आहे. या अहवालाव्यतिरिक्त अन्य कुठलाही परिक्षण अहवाल दाखल केला नाही. तसेच ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 13(1)(सी) नुसार बियाणे परिक्षणासाठी सक्षम प्रयोगशाळेत पाठविले नाही. त्यामुळे सक्षम प्रयोगशाळेच्या अहवालाअभावी बियाणे सदोष आहेत असे म्हणता येत नाही. जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीने दिलेत्या अहवालाचे अवलोकन केल्यास त्यांनी कशाच्या आधारावर बियाणे सदोष आहेत याचे कोणतेही वर्णन केलेले नाही. फक्त दोडका खाऊन बघितला असता तो कडू आहे असे आढळले असे नमूद केले आहे. त्यामुळे असे अस्पष्ट निष्कर्ष स्विकारता येत नाहीत. एवढेच नव्हे तर त्या सचिवाने हा अहवाल दिला त्याचे शपथपत्र पुराव्याकामी दाखल केले नाही. त्याचप्रमाणे या तक्रार निवारण समितीने निकृष्ट बियाणे विक्रेत्याच्या ताब्यातून घेवून योग्य त्या प्रयोगशाळेकडे पाठविण्याची तजविज केली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी खरेदी केलेले बियाणे सदोष आहेत हे सिध्द होवू शकले नाही. त्यामुळे तक्रारदारास नुकसानभरपाई देता येत नाही. II) विरुध्द पक्षाच्या वकीलांनी या प्रकरणात मा. राज्य आयोग मुंबई यांनी पारीत केलेल्या न्यायनिवाडयाकडे मंचाचे लक्ष वेधले. मा. राज्य आयोगाने अपिल नं. 945/2006 निर्मिती बायोटेक विरुध्द राजेंद्र संकपाळ वगैरे या प्रकरणात निर्वाळा देताना शासनमान्य प्रयोगशाळेकडून परिक्षण अहवाल मागविणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले आहे. तसेच अपिल नं. 1207/2008 गोल्डन सिडस् प्रा. लि., विरुध्द भिकाजी भवनाथ वगैरे या प्रकरणात निर्वाळा देताना जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीच्या पदाधिका-याचे शपथपत्र आवश्यक असल्याचे घोषित केले आहे. त्याचप्रमाणे अपिल नं. 490/2010 अजित सिडस् विरुध्द गणपतराव गायकवाड या प्रकरणात निर्वाळा देताना तक्रार निवारण समितीने विक्रेत्याकडून बियाणाचे नमूने घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करुन बियाणातील सदोषपणा सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारदाराची असल्याचे नमूद केले आहे. या तिन्ही न्यायनिवाडयाशी आम्ही पूर्णतः सहमत आहोत. त्यामुळे मुद्दा क्र. 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते. 7. मुद्दा क्र. 3 - या निकालपत्रातील मुद्दा क्र. 1 व 2 मध्ये विवेचन केल्यानुसारविरुध्द पक्षाने ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत कोणतीही त्रुटी केल्याचे सिध्द झाले नसल्यामुळे व तक्रारदाराने खरेदी केलेले बियाणे सदोष असल्याचा कोणताही परिक्षण अहवाल प्रकरणात सादर न केल्यामुळे आम्ही तक्रारदाराची तक्रार नामंजूर करीत असून त्यादृष्टीकोनातून खालील अंतिम आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2. खर्चाबद्दल काही हुकूम नाही. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.11/10/2011 सही सही (श्री.महेंद्र एम गोस्वामी) (श्रीमती.सुचेता मलवाडे) अध्यक्ष सदस्या
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |