Maharashtra

Satara

cc/15/02

Vikas Shrirang Shirke - Complainant(s)

Versus

Malaidevi Patsanstha - Opp.Party(s)

19 Nov 2015

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. cc/15/02
 
1. Vikas Shrirang Shirke
At post Adulpeth, Tal Patan, Dist Satara
...........Complainant(s)
Versus
1. Malaidevi Patsanstha
malkapur, Tal Karad, Dist Satara
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
  HON'BLE MRS.SUREKHA HAJARE MEMBER
 
For the Complainant:
Adv.Kadam
 
For the Opp. Party:
ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

           मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                             मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

             तक्रार अर्ज क्र.2/2015.

                     तक्रार दाखल दि.01-01-2015            

                           तक्रार निकाली दि.19-11-2015. 

 

 

श्री. विकास श्रीरंग शिर्के,

रा.अडूळ पेठ, ता. कराड, जि.सातारा.               ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

 

1. श्री. मळाईदेवी ना.सह.पतसंस्‍था मर्या.,जाखिणवाडी

   ता. कराड, जि.सातारा, तर्फे

   नं. 2 चेअरमन, श्री. गणपतराव किसनराव थोरात तर्फे

2. चेअरमन, श्री. गणपतराव किसनराव थोरात

   रा. थोरात मळा, मलकापूर, ता.कराड,जि.सातारा

3. व्‍हा.चेअरमन, श्री.सौ. अरुणादेवी विठ्ठल गायकवाड,

   रा. विद्यानगर, सैदापूर,ता.कराड,जि.सातारा

4. संचालक, श्री.शामराव बाबूराव पवार,

   रा. कटबान, कापील, ता.कराड,जि.सातारा

5. संचालक, श्री.शामराव सखाराम पवार,

   रा. वडोली-निळेश्‍वर, ता.कराड,जि.सातारा

6. संचालक, श्री.शिवाजीराव महादेव जाधव,

  रा. विद्यानगर, सैदापूर, ता.कराड,जि.सातारा

 

7. संचालक, श्री.प्रकाश रघुनाथ यादव,

   रा. जिल्‍हापरिषद कॉलनी, आगाशीवनगर,

   ता.कराड,जि.सातारा

8. संचालक, श्री.अरुण हणमंतराव पवार,

   रा. पवारमळा, इमरसन कंपनीसमोर,

   आगाशिवनगर, ता.कराड,जि.सातारा

9. संचालक, श्री.नंदकुमार गरपती सन्‍मुख,

   रा. मु.पो. वाठार, ता.कराड,जि.सातारा

10. संचालक, श्री. संपतराव शामराव पाटील,

    रा.मु.पो.जाखिणवाडी, ता.कराड,जि.सातारा

11. संचालक, श्री.चंद्रजित पांडूरंग पाटील,

    रा. सोमवार पेठ,पाण्‍याचे टाकीजवळ,कराड,

    ता.कराड,जि.सातारा

12. संचालक, श्री. अनिल कृष्‍णत शिर्के,

    रा.नांदलापूर, ता.कराड,जि.सातारा

13. संचालक, विठ्ठील दादू येडगे,

    रा.मु.पो.जाखिणवाडी, ता.कराड,जि.सातारा

14. संचालक, श्री.संभाजी शंकर वाघमारे,

    रा.आगाशिवनगर, ता.कराड,जि.सातारा.               ....  जाबदार

 

                   

                     तक्रारदारातर्फे अँड.ए.आर.कदम.

                     जाबदार क्र.1 ते 18 तर्फेअँड.यू.एल.पाटील.   

                                    

                                                         

                       न्‍यायनिर्णय

 

(सदर न्‍यायनिर्णय मा.श्री. श्रीकांत कुंभार, सदस्‍य यानी पारित केला)

                                                                                     

1.  प्रस्‍तुत तक्रारदार याने त्‍याची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे यातील जाबदारांचेविरुध्‍द त्‍यांनी दिलेल्‍या गंभीर स्‍वरुपाच्‍या सदोष सेवेबद्दल दाखल केलेली आहे.

     यातील तक्रारदार यांचे तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालीलप्रमाणे,-

     यातील तक्रारदार हे अडूळ पेठ, ता. पाटण, जि.सातारा येथील रहिवाशी असून तो शेती व्‍यावसायिक आहे.

     यातील जाबदार क्र. 1 ही सहकार कायद्याप्रमाणे स्‍थापन झालेली पतसंस्‍था असून जाबदार क्र. 2 ते 14 हे जाबदार क्र. 1 चे संचालक आहेत.  संबंधीत ग्राहकाकडून ठेवीस्‍वरुपात पैसे गोळा करुन संस्‍थेच्‍या भांडवली गुंतवणूकीसाठी वापर करुन, सहकार कायदा व रिझर्व्‍ह बँक नियम व अटीला अधीन राहून व्‍याजाने कर्जाऊ रक्‍कम देणे व ती सव्‍याज कर्जदारांकडून वसूल करणे हा जाबदारांचा सेवा व्‍यवसाय आहे.  यातील जाबदार क्र. 2 ते 14 हे प्रस्‍तुत जाबदार यांचे संचालक असून ते  जाबदार क्र. 1 संस्‍थेचे बाबतीत ठेवी स्विकारणे, भांडवल वृध्‍दी करणे, कर्जाऊ रकमा देण्‍याचे धोरण ठरवणे व संस्‍थेचे संचलन करुन संस्‍थेचा कारभार कायदेशीर तरतूदींना धरुन करणे अशाप्रकारची जबाबदारी जाबदार क्र. 2 ते 14 यांची असून त्‍यांचे योग्‍य धोरणाअभावी होणा-या नुकसानीची जबाबदारी प्रस्‍तुत संचालकांची असते.  यातील जाबदार क्र. 2 ते 14 हे जाबदार क्र. 1 चे संचालक आहेत. 

    सन 2006 मध्‍ये प्रस्‍तुत तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या घरगूती गरजेनुसार प्रापंचिक कारणासाठी त्‍यांच्‍या पत्‍नीचे सोन्‍याचे दागिने स्‍त्रीधन गहाण ठेवून जाबदारांचे नियमाप्रमाणे तक्रारदार यांनी दि.31/10/2006 रोजी कर्ज खाते क्र. 138 व्‍दारा रक्‍कम रु.20,000/- (रुपये वीस हजार मात्र) सोनेतारण कर्ज जाबदारांनी तक्रारदारास अदा केले.  त्‍यापोटी प्रस्‍तुत तक्रारदार यांनी जाबदारांकडे खालीलप्रमाणे सोन्‍याचे जिन्‍नस गहाण ठेवले त्‍याचा तपशील खालीलप्रमाणे,-

अ.नं.

कर्जखाते क्रमांक.

 

कर्ज घेतलेचा दिनांक

दागिन्‍यांचा प्रकार

दागिण्‍यांचे वजन

ग्रॅम   मिलीग्रॅम

दिलेले कर्ज

1

138

31/10/2006

बदाम,अंगठी,गळयातील चेन(प्रेस),लक्ष्‍मी हार

24.516

20,000/-

 

    येणेप्रमाणे वरील सर्व तपशिलाप्रमाणे सोने जिन्‍नस जाबदारांकडे गहाण ठेवून त्‍यावर एकूण रक्‍कम रु.20,000/- (रुपये वीस हजार मात्र) चे कर्ज घेतले होते. त्‍याप्रमाणे कर्जाचे हप्‍ता भरणा प्रस्‍तुत तक्रारदार हे जाबदारांकडे करीत होते.  परंतु जाबदारांचे एकरकमी सर्व कर्ज फेडण्‍याचे उद्देशाने प्रस्‍तुत तक्रारदार हे दि.16/11/2009 मध्‍ये तक्रारदार हे पैसे घेऊन जाबदारांकडे गेले असता जाबदार व त्‍यांच्‍या कर्मचा-यांनी उडवाउडवीची उत्‍तरे देवून वेळ मारुन नेली व कर्ज रक्‍कम भरुन घेण्‍यास नकार दिला.  सदरचा प्रकार दोन महिने चालू होता व तक्रारदार हे पैसे भरण्‍यासाठी जाबदारांकडे हेलपाटे मारित होते. याबाबतचा जाब प्रस्‍तुत तक्रारदाराने जाबदाराना विचारले असता त्‍यांनी सांगितले की, तक्रारदार यांचे कर्ज प्रकरणास शिफारस करणारे शंकर महादेव सुर्वे यांचे एकूण रक्‍कम रु. 28,78,150/- चे कर्ज थकीत आहे त्‍यामुळे सुर्वे यांनी त्‍यांची सर्व येणेबाकी कर्ज भरल्‍यानंतर तुमचा कर्ज भरणा करुन घेऊन तारण सुवर्णालंकार त्‍यांना परत करण्‍यात येतील असे सांगितले.  वास्‍तविक तथाकथीत श्री. शंकर सुर्वे यांच्‍या कर्जाशी या तक्रारदारांचा कोणताही कायदेशीर संबंध नसताना जाबदारांचा हा बेकायदेशीर व अजब युक्‍तीवाद ऐकूण तक्रारदारांना धक्‍का बसला. केवळ तक्रारदार यांना अशाप्रकारे त्रास देवून त्‍यांचेकडून भितीपोटी जादा रक्‍कम उकळणे व जाबदारांनी वारंवार मागणी करुन तक्रारदार यांनी संस्‍थेची कर्ज रक्‍कम भरण्‍याची टाळाटाळ केली असे भासवून व त्‍याव्‍दारे कर्जाचे तारण सोने कवडीमोल किंमतीने विकून संबंधीतांचा फायदा करणे अशा अनेक बेकायदेशीर उद्देशाने वरील कृत्‍ये या जाबदारांनी तक्रारदाराचे कर्ज प्रकरणाचे बाबतीत केली असून प्रस्‍तुत जाबदार हे कायद्याचे नितीनियमाप्रमाणे  न वागता, कारभार पारदर्शी न करता, त्‍यांच्‍या व्‍यवसायामध्‍ये अनुचित व्‍यापारी प्रथेचा वापर करुन प्रस्‍तुत तक्रारदार यांना त्रास देत आहेत याची खात्री तक्रारदार यांना झाली व त्‍यांनी जाबदारांचे बेकायदेशीर कृत्‍यास कंटाळून यातील जाबदारांविरुध्‍द  मा. उपनिबंधकसो, सहकारी संस्‍था, कराड यांचेकडे  दि. 20/12/2011 रोजी लेखी तक्रार अर्ज देवून तारण सोने परत मागितले.  सहा. निबंधक, सहकारी संस्‍था, कराड यांनी  प्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन दि. 23/1/2012 रोजी निर्णय देवून, “कर्ज रक्‍कम कर्जदार यांचेकडून भरुन घेवून तारण सोनेचे सर्व दागिने परत करावेत” असा आदेश जाबदारांना दिला. त्‍याप्रमाणे सर्व कर्ज रक्‍कम व्‍याजासह भरणेसाठी तक्रारदार हे जाबदार संस्‍थेत गेले व “मा. निबंधकसो, यांचे हुकूमाप्रमाणे सर्व कर्ज भरुन घ्‍यावे व कर्जास घेतलेले सर्व सोनेचे दागिने परत द्यावेत अशी मागणी जाबदारांकडे केली”. त्‍यावेळी त्‍यातील जाबदार संस्‍थेच्‍या कर्मचा-यांनी “आम्‍ही फक्‍त चेअरमनचे ऐकतो, सहकार खात्‍याचे नाही. सहकार खाते आम्‍ही खिशात घालून फिरतो.” असे सांगून पैसे भरुन घेण्‍यास नकार दिला.  त्‍यामुळे शेवटचा पर्याय म्‍हणून प्रस्‍तुत तक्रारदार यांनी मे. उपनिबंधकसो सहकारी संस्‍था, कराड यांचे आदेशाप्रमाणे दि. 30/1/2012 रोजी जाबदार संस्‍थेच्‍या कराड अर्बन बँक (सायंकाळ शाखा) मधील खाते क्र. 6995 मध्‍ये रक्‍कम रु. 36,760/- एवढी रक्‍कम  सोनेगहाण कर्ज प्रकरणापोटी मुद्दल अधिक व्‍याज अशी कर्जासाठी भरली व याप्रमाणे जाबदारांना त्‍यांची सर्व कर्ज रक्‍कम संपूर्ण व्‍याजासह त्‍यांचे खातेवर भरलेचे सांगितले व तारण सोनेचे दागिने परत मागितले तरीसुध्‍दा यातील जाबदारांनी दागिने तक्रारदार यांना परत दिले नाहीत.

   वरील प्रकारानंतर पुन्‍हा यातील तक्रारदार यांनी मा.  उपनिबंधकसो, सहकारी संस्‍था, कराड यांचेकडे जाबदारांचा कर्ज भरुन घेण्‍यामध्‍ये केलेला बेकायदेशीरपणा, बेजबाबदारपणा दाखवून देवून जाबदाराचे संपूर्ण कर्ज भरले असलेने कर्ज तारणासाठी घेतलेले सोन्‍याचे दागिने परत करण्‍याचा जाबदारांना आदेश होण्‍याबाबत विनंती केली.  त्‍यावर मा. उपनिबंधक, कराड यांनी दि. 23/1/2012 रोजी जाबदारांना पुन्‍हा आदेश देवून  तक्रारदार यांचे सर्व ते स्‍त्रीधन असलेने सर्व सुवर्णालंकार त्‍वरित परत देण्‍याचे आदेश केले.  त्‍यावर यातील जाबदारांनी मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्‍था यांचेकडे खोटे मजकूराचा अर्ज करुन या तक्रारदाराकडून कायदेशीर खर्च रक्‍कम रु.5,000/- अर्ज खर्च रु.500/- अद्याप येणे बाकी असलेची मागणी केली होती. त्‍यावर मे. सहा. निबंधक सहकारी संस्‍था, कराड यांनी जाबदारांचा अर्ज निकाली काढला होता.  त्‍या आदेशावर यातील जाबदार संस्‍थेने मा. जॉईंट रजिस्‍टार, को-ऑप. सोसायटीज, कोल्‍हापूर विभाग, कोल्‍हापूर यांचेकडे रिव्‍ही. अर्ज नं. 610/2012 चे रिव्‍हीजन दाखल केले व सहा. निबंधक सहकारी संस्‍था यांचा वरील आदेश रद्द करुन मागितला.  त्‍यावर चौकशी होवून मा. जॉइंट रजिस्‍टार, कोल्‍हापूर यांनी दि. 9/4/2013 रोजी जाबदार संस्‍थेचे रिव्‍हीजन फेटाळून लावले व सहकारी निबंधकसो, सहकारी संस्‍था, कराड यांचा आदेश कायम केला.  या निर्णयाच्‍या प्रती यातील तक्रारदार यांनी जाबदार संस्‍थेला पाठवल्‍या.  तरीसुध्‍दा प्रस्‍तुत जाबदारांनी तक्रारदार यांना तारण सोने जिन्‍नस परत दिले नाही.  या सर्व प्रकारातून प्रस्‍तुत जाबदार हे अनाधिकाराने, प्रचलित न्‍यायालयाचे आदेश धाब्‍यावर बसवून, न्‍यायीक आदेशांचा अवमान करुन ते दुर्लक्षित करुन खोटया मजकूराच्‍या नोटीसा पाठवून कायदेशीर तरतूदी डावलून, व तक्रारदार यांनी संपूर्ण कर्ज जाबदारांकडे भरुनही त्‍यांचे सोनेचे दागिने परत केले नाहीत व वेगवेगळया कोर्ट केसीस करण्‍यासाठी तक्रारदार यांना भाग पाडले.  या सर्व बाबी जाणीवपूर्वक तक्रारदार यांचे दागिने हडप करण्‍याच्‍या एकमेव उद्देशाने जाबदारांनी त्‍यांच्‍या व्‍यवसायामध्‍ये अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन केल्‍या व यातील तक्रारदार यांना अत्‍यंत टोकाची गंभीर स्‍वरुपाची सदोष सेवा दिली आहे.  त्‍यामुळे ग्राहक या नात्‍याने प्रस्‍तुत तक्रारदार यांनी मे. मंचात दाद मागून जाबदारांकडून त्‍यांचे या न्‍यायनिर्णयात नमूद केलेल्‍या तपशिलाप्रमाणे सोने गहाण कर्जासाठी तारण ठेवलेले संपूर्ण सुवर्णालंकार (स्‍त्रीधन) तात्‍काळ परत मिळावेत.  जाबदारांनी तक्रारदार यांना दिलेल्‍या अत्‍यंत टोकाच्‍या गंभीर स्‍वरुपाच्‍या सदोष सेवेबद्दल त्‍यांना करावी लागलेली कोर्ट कचेरी दावे व त्‍याचा कोर्ट खर्च यासाठीची नुकसानी रु.2,00,000/- (रुपये दोन लाख मात्र) व त्‍यावर द.सा.द.शे.18 टक्‍के दराने होणार व्‍याज, मानसिक,शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) व अर्ज खर्च रक्‍कम रु.20,000/- जाबदारांकडून मिळावेत अशी विनंती मागणी मे मंचास केली आहे.

2.    प्रस्‍तुत तक्रारदार यांनी त्‍यांचे तक्रारीसाठी नि. 1 कडे तक्रार अर्ज, त्‍याचे पृष्‍ठयर्थ नि. 2 कडे तक्रारदार यांचे शपथपत्र, नि. 4 कडे तक्रारदारातर्फे अँड. आनंदा रा. कदम यांचे वकीलपत्र, नि. 5 कडे नि. 5/1 कडे यातील तक्रारदारांना यातील जाबदारांनी सोन्‍याचे सुवर्णालंकार कर्जापोटी मिळालेची सोने भरणा पोहोचपावती, नि. 5/2 कडे या तक्रारदार यांनी मा. उपनिबंधक, सहकारी संस्‍था, कराड यांचेकडे दिले तक्रार अर्जाची स्‍थळप्रत त्‍यावर मे. उपनिबंधकसो, कराड यांनी  “जाबदारांना कर्ज भरुन घेऊन तक्रारदारांचे तारण दागिने परत करणेबाबतचे आदेश वजा जाबदारांना पत्र दिलले असून ते नि. 5/3 कडे आहे, नि. 5/4 कडे  सोने तारणपोटीचे संपूर्ण कर्ज रक्‍कम भरुन घेवून तक्रारदार कळविलेबाबतचा जाबदारांकडे केलेल्‍या अर्जाची स्‍थळप्रत, नि. 5/5 कडे प्रस्‍तुत तक्रारदार यांनी जाबदारांचे दि कराड अर्बन बँक लि., सायं. शाखेत खाते क्र. 6995 वरती संपूर्ण कर्ज प्रकरणापोटी रु.36,760/- (रुपये छत्‍तीस हजार सातशे साठ मात्र) रोखीने भरलेची पावती, नि. 5/6 कडे यातील जाबदारांनी अर्जदारांविरुध्‍द केलेल्‍या अर्जावर मा. उपनिबंधकसो, कराड यांनी दिलेला दि.27/8/2012 चा निर्णय, नि. 5/7 कडे जाबदारांना तक्रारदार यांनी विषयांकित सोने वरील संपूर्ण कर्ज मागणीपेक्षा जादा पैसे भरुन केली असलेने तारण सुवर्णालंकार परत करावेत या आशयाची दिलेली नोटीस, नि. 5/8 कडे जाबदारांनी जॉईंट रजि.,कोल्‍हापूर यांचेकडे केलेल्‍या रिव्‍हीजन अर्ज क्र. 610/2012 वरील झाले आदेशांची सत्‍यप्रत, नि. 5/9 कडे तक्रारदार यांनी जाबदारांना पाठवलेल्‍या दि. 13/05/2013 च्‍या नोटीसीची स्‍थळप्रत, नि. 28 कडे पुराव्‍याचे शपथपत्र, नि. 33 चे कागदयादी सोबत नि.33/1 कडे सन 2008-2009 ते 2011-12 ची वैध संचालक यादी, नि. 33/2 कडे सन 2012-13 ते 2016-17 ची वैध संचालक यादी, नि. 36 चे कागदयादी सोबत नि.36/1 कडे पुराव्‍याचे कागद, नि. 34 कडे लेखी युक्‍तीवाद, नि. 42 चे कागदयादीसोबत उपनिबंधक सहकारी संस्‍था कराड यांनी जाबदार यांना पाठवले पत्राची प्रत इत्‍यादी कागदपत्रे, दस्‍तऐवज प्रकरणी तक्रारदार यांनी पुराव्‍यासाठी दाखल केलेली आहेत. 

3.  प्रस्‍तुत प्रकरणाची नोटीस यातील जाबदार क्र.1 ते 14 यांना मे मंचामार्फत रजिस्‍टर पोष्‍टाने पाठविण्‍यात आली. या नोटीसा यातील सर्व जाबदारांना मिळाल्‍या. त्‍याबाबतचे पोष्‍टाच्‍या पावत्‍या नि. 8 ते नि.19 कडे प्रकरणी दाखल आहेत.  यातील जाबदार क्र. 1 ते 14 तर्फे अँड. यू.एल.पाटील हे नि. 21 कडे वकिलपत्राने हजर झाले.  प्रस्‍तुत जाबदारांनी नि. 24 कडे म्‍हणणे नि. 25 सोबत एकूण पुराव्‍याची 5 कागदपत्रे त्‍यामध्‍ये नि.25/1 कडे सहकार दावा क्र. 844/2009 च्‍या दाव्‍याची झेरॉक्‍स प्रत नि. 25/2 कडे या दाव्‍यास जाबदारानी दिलेली कैफीयत नि. 25/3 कडे मे. उपनिबंधक सहकारी संस्‍था, कराड यांचे वसुली प्रमाणपत्र नि. 25/4 कडे तक्रारदार यांची मा.ना. हायकोर्ट, मुंबई कडे दाखल रिट पिटीशन नं.5454/2010 वे निकालपत्र, नि.25/5 कडे सोनेतारण कर्जाबाबत बोजा ठेवून मिळणेचा सहकारी न्‍यायालयातील दावा नं. 332/2013 ची झेरॉक्‍स प्रत इ. कागदपत्रे, नि. 26  व 29 कडे पुराव्‍याचे शपथपत्र,  नि. 20 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि. 44 कडे लेखी युक्‍तीवाद, नि. 45 कडे AIR 2002 पेज नं. 568,  MLJ  2009 (6) पेज 925, AIR 1999 (S.C.) 1341,(1999) C.J. S.C. 506 इत्‍यादी केसलॉज दाखल केले आहेत.

     जाबदारांचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद व त्‍यांचे म्‍हणणे यातील कथनांचा विचार करता, प्रस्‍तुत जाबदारांनी तक्रारदार यांचे तक्रार अर्जास खालीलप्रमाणे आक्षेप नोंदलेले आहेत.

     प्रस्‍तुत तक्रारदार यांनी शंकर सुर्वे यांच्‍या शिफारशीने सोनेतारण कर्ज घेतलेले आहे.  प्रस्‍तुत तक्रारदार हा शंकर सुर्वे यांचेकडे कामगार म्‍हणून काम करीत होता.  शंकर सुर्वे यांनी या जाबदारांकडून मोठे कर्ज घेतले असून सहकार कायदा कलम 101 प्रमाणे शंकर सुर्वे यांचेकडून रक्‍कम रु.28,78,150/- ची येणेबाकी आहे. ते त्‍यांनी फेडलेले नाही.  प्रस्‍तुत तक्रारदारांच्‍या सोने तारण कर्जाबाबत जाबदारांनी चौकशी केली असता तारण सोने हे शंकर सुर्वे यांचे असून प्रस्‍तुत तक्रारदारांनी घेतलेल्‍या कर्जाची रक्‍कम ही शंकर सुर्वे यांनी घेतलेली आहे.  प्रस्‍तुत तक्रारदारकडून अद्याप रक्‍कम रु.5,500/- येणेबाकी आहे. त्‍यामुळे ती भरल्‍याशिवाय त्‍यांना सोनेगहाण परत देता येणार नाही.  तक्रारदाराची मागणी ही दिवाणी स्‍वरुपाची आहे.  त्‍यामुळे त्‍यांना या ग्राहक मंचात दाद मागता येणार नाही.  जाबदारांनी कोणतीही सेवा त्रुटी केली नाही.  निष्‍काळजीपणा केला नाही.  त्‍यामुळे तक्रारदारांनी मागणी केलेली नुकसानीची रक्‍कम रु.2,00,000/-, शारिरीक मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/-, अर्जाचा खर्च रक्‍कम रु.20,000/- या मागण्‍या चुकीच्‍या आहेत. शंकर महादेव सुर्वे यांना या प्रकरणी सामील पक्षकार केलेले नाही.  या सर्व कारणास्‍तव तक्रारदारांचा अर्ज फेटाळावा असे आक्षेप प्रस्‍तुत जाबदार यांनी प्रकरणी नोंदलेले आहेत. त्‍याचप्रमाणे प्रस्‍तुत जाबदार यांनी नि. 31 कडे मंचामध्‍ये अर्ज देवून असे कथन केले की, तक्रारदारकडून येणे बाकी असलेली रक्‍कम रु.5,500/- ही संस्‍थेच्‍या गंगाजळी रकमेत टाकून सदर प्रकरणासाठी तारण असलेले सोने जिन्‍नस सामनेवाले संस्‍था तक्रारदारांना कर्जासाठी तारण असलेले सोन्‍याचे दागीने तक्रारदारांना कोर्टात जमा करीत आहेत तरी मे. कोर्टात सदरचे सोने जिन्‍नस जमा करुन घेवून तक्रार अर्ज निकाली काढावा असा अर्ज दाखल केला.  परंतु तक्रारदारांनी त्‍यावर म्‍हणणे द्यावे असा आदेश मे. मंचाने केला.  तक्रारदारांना जाबदारांच्‍या अर्जातील मजकूर हा मान्‍य नाही त्‍यामुळे तो नामंजूर करावा असे म्‍हणणे दाखल केला.  याचा विचार करुन मंचाने जाबदारांचे अर्जावर सदर अर्जाचा विचार अंतीम निकालावेळी करण्‍यात येईल असा आदेश करुन जाबदारांचा अर्ज नामंजूर केला.  यातील जाबदारांनी प्रस्‍तुत प्रकरण निकालासाठी ठेवले असताना नि.43 कडे अर्ज देवून प्रकरण बोर्डावर घेणेचा अर्ज देवून नि. 44 कडे लेखी युक्‍तीवाद दाखल केला व वरील आक्षेप या लेखी युक्‍तीवादामध्‍ये पुर्नउल्‍लेखीत केले.         

4.  तक्रारदारांची तक्रार त्‍यातील आशय व जाबदारांचे आक्षेप यांचा विचार करता प्रस्‍तुत प्रकरणाच्‍या न्‍यायनिर्गतीसाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

अ.नं.                मुद्दे                            निष्‍कर्ष

1. प्रस्‍तुत  तक्रारदार व जाबदार यांचेमध्‍ये ग्राहक व

   सेवापुरवठादार असे नाते आहे काय ?                             होय.

2. प्रस्‍तुत जाबदारांनी तक्रारदार यांना सोनेतारण दोन्‍ही कर्जाची

   संपूर्ण रक्‍कम जाबदारांकडे भरुनही त्‍यांना कर्जापोटी घेतलेले

   (स्‍त्रीधन) सोनेतारण जिन्‍नस परत न करुन तारण सोने परत करण्‍याचे

   आदेश सहकार कायद्याने स्‍थापित अधिका-यांनी या जाबदारांना देवूनही

   त्‍यांनी त्‍यांची अंमलबजावणी न करुन प्रस्‍तुत तक्रारदार यांना

   तारण सोने परतीसाठी वेगवेगळया अँथॉरिटीकडे अर्ज करावयास लावले.

   व त्‍यांचे आदेश न पाळून, त्‍यांना वेगवेगळया मार्गाने उपद्रव देवून

   शेवटपर्यंत त्‍यांचे सोने जिन्‍नस परत न करुन त्‍यांचे व्‍यवसायामध्‍ये

   अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदार यांना सदोष सेवा

   दिली आहे काय?                                              होय.

3. प्रस्‍तुत मंचास सदर तक्रार न्‍यायनिर्गत करण्‍याचा अधिकार 

   आहे काय ?                                                 होय.

4.  प्रस्‍तुत जाबदारांनी तक्रारदार यांच्‍या सोनेतारण कर्जाबाबत ती

    पूर्ण परतफेड करुनही तारण सोने देण्‍याचे नाकारले ते प्राप्‍त

    करणेसाठी तक्रारदार यांना सहाय्यक निबंधक सहकारी संस्‍था,

    कराड ते जॉईट रजिस्‍टार सहकारी संस्‍था, कोल्‍हापूर यांच्‍यापर्यंत

    न्‍यायालयीन प्रक्रियेचा आधार घ्‍यावा लागला त्‍यासाठी

    विनाकारण खर्च करावा लागला, त्‍यामुळे तक्रारदारांनी

    मा‍गितलेल्‍या नुकसानीची रक्‍कम मिळणेस तक्रारदार

    पात्र आहे काय?                                        अंशतः होय.

5.  अंतिम निर्णय काय?                              तक्रार अंशतः मंजूर.                                                                                             

 

5.                      कारणमिमांसा

                   मुद्दा क्र. 1 ते 5

     प्रस्‍तुत तक्रारदार हे अडुळ पेठ, ता.पाटण, जि.सातारा येथील रहिवाशी असून ते शेती व्‍यावसायिक आहेत.  प्रस्‍तुत जाबदार क्र.1 ही सहकारी कायद्याने स्‍थापन झालेली (वित्‍तीय) संस्‍था) पतसंस्‍था असून गरजू ग्राहकांना त्‍यांच्‍या गरजेनुसार ठराविक व्‍याजाने कर्जपुरवठा करणे व ते कर्जावरती व्‍याज आकारुन उत्‍पन्‍न मिळवणे असा जाबदारांचा सेवा व्‍यवसाय आहे.  प्रस्‍तुत जाबदारांनी यातील तक्रारदार यांना जाबदारांचे कर्जाचे निरनिराळे प्रकारापैकी सोनेतारण योजनेखाली कर्ज खाते क्र. 138 ने दि. 31/10/2006 रोजी बदाम, अंगठी, गळयातील चेन (प्रेस), लक्ष्‍मीहार यांचे एकूण वजन 24.516 ग्रॅम इतके त्‍यांच्‍या पत्‍नीचे दागीने तारण ठेवून रक्‍कम रु.20,000/- (रुपये वीस हजार मात्र) चे कर्ज प्रस्‍तुत जाबदारांकडून घेतले.  ह्या बाबी उभयताना मान्‍य व कबूल आहेत. त्‍याची संपूर्ण व्‍याजासह परतफेड प्रस्‍तुत तक्रारदार यांनी दि. 30/1/2012 रोजी जाबदारांच्‍या कराड अर्बन बँक (सायंकाळ शाखा) मधील खाते क्र. 6995 मध्‍ये रक्‍कम रु.36,760/- (रुपये छत्‍तीस हजार सातशे साठ मात्र)  ची रक्‍कम कर्जापोटी जाबदार यांचे वरील नमूद बँक खातेवर भरले आहेत. असे एकूण तक्रारदाराचे विषयांकित कर्जापोटी जाबदारांकडे एकूण रक्‍कम रु.36,760/- भरणा करुन जाबदारांची संपूर्ण कर्जफेड तक्रारदार यांनी केली आहे. वरील जाबदार व तक्रारदार यांचेतील कर्जप्रकरण व्‍यवहारावरुन तक्रारदार व जाबदार यांचेमध्‍ये ग्राहक व सेवा पुरवठादार असे नाते असलेचे निर्विवादरित्‍या शाबित होते त्‍यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देतो.

5 (1)   प्रस्‍तुत  प्रकारणातील तक्रारदारांच्‍या नि. 5 कडील पुराव्‍याची कागदपत्रे पाहीली असता त्‍यामध्‍ये नि. 5/1 कडील कागदपत्र पाहीला असता, त्‍यामध्‍ये प्रस्‍तुत जाबदारांनी विषयांकित सोने तारण कर्जासाठी प्रस्‍तुत तक्रारदारकडून बदाम, अंगठी, सोन्‍याची चेन (प्रेस), व लक्ष्‍मी हार इत्‍यादी सोने जिन्‍नस जाबदारांच्‍या ताब्‍यात मिळालेबाबतची पोहोच पावती तक्रारदारांना दिली आहे.  निर्विवादरित्‍या हे स्‍पष्‍ट होते की, प्रस्‍तुत जाबदारांना तक्रारदारांच्‍या कर्जापोटी वर नमूद सोन्‍याचे सुवर्णालंकार जाबदारांना मिळालेले होते व ते त्‍याच्‍या ताब्‍यात आजअखेर आहेत.  तक्रारदार यांनी सोने तारण घेतल्‍यानंतर एकरकमी संपूर्ण कर्जाच्‍या रकमेची परतफेड करण्‍याच्‍या हेतूने दि.16/11/2009 रोजी व त्‍यानंतर वारंवार जाबदारांच्‍या कार्यालयामध्‍ये हेलपाटे मारले. परंतु प्रस्‍तुत जाबदारांनी तक्रारदारांच्‍या कर्ज रकमेचा भरणा करुन घेतला नाही.

5(2)   प्रस्‍तुत तक्रारदार यांनी जाबदारांकडून एकूण रक्‍कम रु.20,000/- (रुपये वीस हजार मात्र) चे कर्ज घेतले व त्‍यांच्‍या पत्‍नीचे स्‍त्रीधन असलेले एकूण 24.516 ग्रॅमचे सोने विषयांकित कर्जास तारण दिले या बाबी जाबदारांना व तक्रारदार यांना मान्‍य आहेत याबाबत दुमत नाही.  सदरचे कर्ज घेतलेनंतर प्रस्‍तुत तक्रारदार याने विषयांकीत सोनेतारण कर्जाची संपूर्ण परतफेड एकरकमी करणेसाठी प्रस्‍तुत तक्रारदार हे जाबदार क्र. 1 यांना भेटले व त्‍यांनी त्‍यांची एकरकमी कर्ज फेडण्‍याची तयारी दर्शविली.  त्‍यावेळी जाबदारांचे कर्मचा-यांनी उडवाउडवीची उत्‍तरे देवून तक्रारदारकडून पैसे न भरुन घेऊन त्‍यांचे स्‍त्रीधन असलेले सुवर्णालंकार परत करण्‍यास नकार दिला व हीच जाबदारांची कृती, बेकायदेशीर प्रचलीत कायदेशीर तरतूदींना हरताळ फासणारी असलेचे स्‍पष्‍ट झाले व वास्‍तविक प्रामाणिकपणे एकरकमी कर्ज भरणा-यांचे स्‍वागतच करुन प्रस्‍तुत जाबदारांनी तक्रारदार यांचे कर्ज भरुन घेवून त्‍यांना कर्ज मुक्‍तीचा दाखला व त्‍यांचे सोनेतारण जिन्‍नस त्‍वरित परत करणे आवश्‍यक होते.  परंतु वरील जाबदारांचे कृतीवरुन हे स्‍पष्‍ट होते की, त्‍यानी त्‍यांच्‍या व्‍यवसायात अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन ते व्‍यवसाय करतात व व्‍यवहारात पारदर्शकता न ठेवून कर्जदार ग्राहकाला अडचणीत टाकतात, त्‍यांना उपद्रव देतात, तात्‍काळ व पारदर्शी सेवा देत नाहीत व त्‍यांनी तक्रारदार यांना सदोषसेवा दिली आहे हे पूर्णतः वरील घटनेवरुन शाबीत होते. 

5 (3) प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदार यांच्‍या सोनेगहाण कर्जाविषयी तक्रारदार यांना जाबदार यांनी दिलेल्‍या उपद्रवामुळे, तक्रारदारांचे कर्ज भरुन न घेण्‍याच्‍या जाबदारांचे वरील कृतीमुळे त्रासून जाऊन प्रस्‍तुत तक्रारदार यांनी जाबदारांचे विरुध्‍द न्‍यायासाठी मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्‍था कराड यांचेकडे डिसेंबर, 2011 रोजी तक्रार अर्ज दाखल केला व त्‍यामध्‍ये त्‍यांनी सोनेतारण कर्जापोटी ठेवलेले दागिने परत मिळावेत अशी मागणी केली. सहा. निबंधक, कराड यांनी दि. 23/1/2012 रोजी निर्णय देवून यातील तक्रारदार यांचेकडून जाबदारांनी त्‍यांची नमूद कर्ज रक्‍कम व्‍याजासह तक्रारदार यांचेकडून भरुन घेवून तारण घेतलेले सर्व सोन्‍याचे दागिने तक्रारदार यांना परत करावेत असा आदेश दिला.  त्‍या आदेशाला अनुसरुन प्रस्‍तुत तक्रारदार हे जाबदार पतसंस्‍थेत संपूर्ण कर्जाची देय रक्‍कम व्‍याजासह भरण्‍यासाठी गेले असता, जाबदार क्र. 1 पतसंस्‍थेच्‍या कर्मचा-यांनी पैसे भरुन घेण्‍यास नकार दिला व दागिनेही परत देण्‍यास नकार दिला. “आम्‍ही फक्‍त चेअरमनचेच ऐकतो, सहकार खात्‍याचे नाही. सहकार खाते आम्‍ही खिशात घेवून फिरतो” असे सांगून तक्रारदार यांनी चेअरमन यांना भेटण्‍यास सांगितले.  त्‍याप्रमाणे तक्रारदार हे जाबदार संस्‍थेचे चेअरमन यांना भेटले असता वकीलांशी बोलून काय ते ठरवू असे सांगून त्‍यांनीही तक्रारदाराचे पैसे भरुन घेण्‍यास नकार दिला.  त्‍यामुळे कंटाळून प्रस्‍तुत तक्रारदार यांने मा. उपनिबंधक सहकारी संस्‍था यांनी दिलेल्‍या आदेशाप्रमाणे दि.21/1/2012 रोजी जाबदार पतसंस्‍थेच्‍या कराड अर्बन बँक, सायंकाळ शाखा येथील जाबदारांचे खाते क्र. 6995 मध्‍ये रक्‍कम रु.36,760/- एवढी रक्‍कम सोनेतारण कर्जापोटी भरली.  त्‍यामुळे जाबदारांचे सर्व कर्ज पूर्ण फेड झाले.   त्‍यानंतर प्रस्‍तुत तक्रारदाराने कर्ज पूर्ण फेड केलेची पावती जाबदारांना दाखवून कर्ज तारणापैकी घेतलेले सुवर्णालंकार परत मागितले तरीसुध्‍दा ते त्‍यांनी परत दिले नाही.  पुन्‍हा या जाबदारांच्‍या बेकायदेशीर कृत्‍यांविरुध्‍द प्रस्‍तुत जाबदार यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्‍था, कराड यांचेकडे दि.30/5/2012 रोजी प्रस्‍तुत तक्रारदार यांचेकडून अद्याप रु.5,550/- येणेबाकी असून ती भरावी व जिन्‍नस घेवून जावे अशा स्‍वरुपाचा अर्ज निबंधकांच्‍या कार्यालयात दाखल केला.  त्‍याचा निकाल संबंधीत उपनिबंधकांनी दि. 27/8/2012 रोजी देवून ‘ कर्ज रक्‍कम व्‍याज व इतर अनुषंगीक बाबींबाबत संस्‍था व कर्जदार यांच्‍यामध्‍ये वाद असल्‍यास आपण याबाबत सक्षम न्‍यायालयात दाद मागून दावा दाखल करावा व निर्णय घ्‍यावा असे कळविले आहेत’ त्‍याची प्रत यातील निबंधकांनी तक्रारदार यांना पाठविलेली आहे.  या सहा.निबंधक सहकारी संस्‍था कराड यांच्‍या दि.27/8/2012 च्‍या निर्णयावरती प्रस्‍तुत जाबदार यांनी मा.डिव्‍हीजनल जॉईंट रजिस्‍टार, को-ऑप. सोसायटीज, कोल्‍हापूर विभाग, यांचेकडे रिव्‍हीजन अँप्‍लीकेशन नं. 610/2012 दाखल केले.  सदरचे रिव्‍हीजन अपील जॉईट रजिस्‍टार कोल्‍हापूर यांनी फेटाळून लावले.  वरील निर्णय जाबदारांच्‍याविरुध्‍द गेल्‍यानंतर यातील जाबदारांनी नि. 31  कडे मे. मंचात अर्ज दाखल केला व त्‍यात असे कथन केले की, प्रस्‍तुत तक्रारदारकडून जाबदारांचे रक्‍कम रु. 5,500/- येणे आहे.  परंतु तक्रारदारामुळे संस्‍था व तिच्‍या कर्मचा-यांचे होणारे नुकसान व त्रास टाळणेसाठी सामनेवाला संस्‍था ही अर्जदाराकडून येणेबाकी असणारी कर्ज रक्‍कम रु.5,500/- ही संस्‍थेच्‍या गंगाजळीमध्‍ये टाकणेचे ठरवून तक्रारदाराकडून काही येणे नाही असे समजून सदर प्रकरणासाठी तारण असलेले सोने जिन्‍नस जाबदार संस्‍था तक्रारदार यांना देणेसाठी मे. मंचात जमा करीत आहोत तरी मे. कोर्टानी सदरचे सोने जिन्‍नस जमा करुन घेवून तक्रारदारांचा अर्ज निकाली काढावा असा अर्ज दिला आहे.  मे. मंचाचे निरिक्षणाप्रमाणे प्रस्‍तुत जाबदारांनी या प्रकारचा अर्ज  मंचात दाखल केला परंतु त्‍यांना वारंवार विचारुनही मंचासमोर त्‍यांनी दागिने सादर केले नाहीत.  त्‍यामुळे या जाबदारांनी मंचाकडे नि. 31 चा अर्ज हा मंचाची सहानुभूती मिळविण्‍यासाठी दिले असलेचे स्‍पष्‍ट झाले.  त्‍यामुळे अंतीम निकालाचे वेळी या अर्जाबाबत मंच निर्णय घेईल असे आदेश करुन नि. 31 चा जाबदारांचा अर्ज नामंजूर केला.  त्‍यानंतर तत्‍पूर्वी प्रस्‍तुत जाबदारांनी तक्रारदारांना पाठवलेल्‍या नोटीसीची स्‍थळप्रत प्रकरणी नि.  नि. 37 सोबत नि.37/1 कडे नोटीसीची प्रत दाखल केली आहे.  त्‍यामध्‍ये त्‍यांनी तक्रारदार यांनी त्‍यांचे सोने जिन्‍नस परत घेवून जावे अशी विनंती केली आहे.  त्‍याचप्रमाणे यातील  मा. उपनिबंधक सहकारी संस्‍था कराड यांनी सप्‍टेंबर, 2015 रोजी यातील जाबदारांनी सह. उपनिबंधकांना दिलेल्‍या पत्राला अनुसरुन यातील जाबदारांना असे कळविले होते की, प्रस्‍तुत जाबदार यांनी संस्‍थेचे थकबाकीदार सभासद श्री. विकास श्रीरंग शिर्के रा. अडूळ पेठ, ता. पाटण यांचे सोने जिन्‍नस मा. ग्राहक न्‍यायालयात जमा केलेबाबत कळविले आहे.  सदरची बाब न्‍यायप्रविष्‍ट असलेने याबाबत मा. न्‍यायालयाचे आदेशाप्रमाणेच कार्यवाही करणेत यावी असे कळविले आहे.  परंतू प्रत्‍यक्षात तक्रारदाराचे सोने कर्ज तारण दागिने मे. मंचात प्रत्‍यक्षात दाखल केलेलेच नाहीत.  एकंदरीत वरील बाबींचा विचार केला असता, प्रस्‍तुत जाबदार संस्‍था ही प्रचलीत सहकार कायदे व इतर कायद्यांना धाब्‍यावर बसवून, प्रसंगी कोर्टाची दिशाभूल करुन, त्‍यांच्‍यासमोर खोटी माहिती सादर करुन, तक्रारदारांचे सोने तारण जिन्‍नस परत करण्‍यास ते उत्‍सुक असलेचे भासवून त्‍याप्रमाणे नोटीस देते परंतु प्रत्‍यक्षात नोटीसीतील कथनांच्‍या विरुध्‍द कृती करते, पूर्ण कर्ज फेड होवूनही तारण सुवर्णालंकार परत न करणे या सर्व गोष्‍टी प्रस्‍तुत जाबदार यांनी त्‍यांच्‍या व्‍यवसायात अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन, अपारदर्शी व्‍यवसाय करुन, प्रस्‍तुत तक्रारदार यास अत्‍यंत गंभीर स्‍वरुपाची सदोष सेवा दिलेचे स्‍पष्‍ट होते. होतात.  त्‍याचप्रमाणे प्रस्‍तुत तक्रारदार यांचे पूर्ण कर्जफेड झाल्‍यानंतरसुध्‍दा त्‍याचे सोने तारण जिन्‍नस परत मिळविणेसाठी प्रस्‍तुत तक्रारदाराला जाबदारांनी निरनिराळया न्‍यायधिकरणाकडे दाद मागण्‍यास भाग पाडले.  या सर्व कृती या जाबदारांनी तक्रारदार यांना दिलेल्‍या गंभीर स्‍वरुपाच्‍या सदोष सेवा आहेत ही बाब तक्रारदार यांनी ठोस पुराव्‍यानिशी मंचात शाबीत केली आहे.  त्‍यामुळे मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.  मुद्दा क्र. 1 व 2  हे मुद्दे तक्रारदारांनी पुराव्‍यानिशी शाबीत केले असलेने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या तरतूदीप्रमाणे  ग्राहक व सदोष सेवा या मुख्‍य घटकांवरती तक्रारदाराची तक्रार आधारीत असलेने  प्रस्‍तुत तक्रार चालविणेचा पूर्णपणे अधिकार या मंचास आहे या निष्‍कर्षाप्रत आम्‍ही आलो आहोत. त्‍यामुळे मुद्दा  क्र. 3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिलेले आहे.

5(4)    प्रस्‍तुत प्रकरणातील नि. 42/1 कडील जाबदारांच्‍या सप्‍टेंबर,2015 च्‍या जाबदारांनी सहकार उपनिबंक कराड यांना लिहीलेल्‍या पत्राच्‍या अनुषंगाने मा. उपनिबंधक सहकारी संसथा कराड यांनी दि. 1/10/2015 रोजी दिलेले उत्‍तर पाहीले असता प्रस्‍तुत जाबदारांनी त्‍यांच्‍या अर्जामध्‍ये उपनिबंधकांना असे कळविलेचे स्‍पष्‍ट होते की, जाबदार पतसंस्‍थेने कर्जदार श्री. विकास शिर्के यांचे सोने जिन्‍नस त्‍यांना परत देणेसाठी ग्राहक कोर्टात जमा केले आहे.  परंतु या ग्राहक मंचात यातील जाबदारांनी प्रत्‍यक्षात असे कोणतेही कर्ज तारणाचे सोने जिन्‍नस जमा केलेले नाहीत.  त्‍यामुळे या खोटया कथनावर आधारीत प्रस्‍तुत जाबदार हे कोर्टाची फसवणूक व बेअदबी करतात हे शाबीत होते.  त्‍यामुळे प्रस्‍तुत जाबदार हे  फौजदारी गुन्‍हयास पात्र आहेत याही निष्‍कर्षास हा मंच आला आहे.  प्रस्‍तुत जाबदार यांनी त्‍यांच्‍या व्‍यवसायामध्‍ये अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन अपारदर्शीपणे ग्राहकांच्‍या हिताच्‍या विरुध्‍द जावून संस्‍थेचा कारभार बेकायदेशीरपणे चालविलेला आहे हे या प्रकरणी पूर्णतः शाबीत होते.

5(5)     या सर्व बाबींचा विचार करता प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांच्‍या दाखल पुराव्‍यावरुन हे स्‍पष्‍टपणे शाबित झाले की, प्रस्‍तुत जाबदारांनी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करुन सोने तारण कर्जाची जाबदारांचे मागणीपेक्षा अधिक रक्‍कम कर्जापोटी जाबदाराकडे भरुन त्‍यांचे सर्व सोने तारण कर्ज पूर्ण अदा केले असताना त्‍यांचे सोनेतारण जिन्‍नस (सुवर्णालंकार स्‍त्रीधन)व कर्ज पूर्ण पेड दाखला न देणे, तक्रारदारांना त्‍यासाठी नि‍रनिराळया न्‍यायासनाकडे दाद मागून त्‍याद्वारे उपनिबंधकसो.कराड, रजिस्‍ट्रार, सह.संस्‍था कोल्‍हापूर, जॉईंट रजिस्‍ट्रार सहकारी संस्‍था कोल्‍हापूर, सहकार न्‍यायालय सातारा यानी एकमुखी निर्विवादपणे निर्णय देऊन जाबदाराला आदेशित केले की, “प्रस्‍तुत तक्रारदाराने जाबदाराचे सोने गहाण कर्जाची संपूर्ण रक्‍कम जाबदारला अदा केली असून विषयांकित सोने अन्‍य कर्जास वर्ग करता येणार नाही व कर्जास तारण सर्व सुवर्णालंकार तक्रारदाराना त्‍वरीत परत करावेत” असा आदेश होऊनही प्रस्‍तुत जाबदार म्‍हणतात की, सहकार कोर्टाचे अधिका-यांचे निर्णय आम्‍ही मानीत नाही असे म्‍हणून जाबदारानी सर्व प्रचलित कायदे नियम याना पायदळी तुडवून त्‍यांच्‍या व्‍यवसायामध्‍ये अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन पारदर्शकता, तत्‍पर नियमानुसार सेवा देणे याना हरताळ फासून व प्रस्‍तुत जाबदाराला संपूर्ण कर्जफेड केलेचा दाखला व सोने तारण प्रकारातील तारणाचे सर्व सुवर्णालंकार परत न करुन प्रस्‍तुत तक्रारदारास अत्‍यंत टोकाची, अत्‍यंत गंभीर स्‍वरुपाची सदोष सेवा दिली असल्‍याचे निर्विवादरित्‍या शाबित होते.  प्रस्‍तुत प्रकरणी जाबदार संस्‍था लोकाना कर्जाने पैसे देते व त्‍यावर संबंधित तक्रारदाराकडून व्‍याजापोटी शुल्‍क आकारणी करते व त्‍याव्‍दारे संस्‍थेला नफा मिळवणे हा त्‍यांचा व्‍यवसाय आहे व तो करारबध्‍द असतो त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रारदार हा जाबदारांचा ग्राहक असून प्रस्‍तुत तक्रार सदोष सेवेची असलेने ती चालवणेचा या मे.मंचास पूर्ण अधिकार असल्‍याचे तक्रारदारानी पूर्णतः शाबित केलेले आहे”.  त्‍यामुळे सदर तक्रार ही अंशतः मंजुरीस पात्र असल्‍याच्‍या निष्‍कर्षाप्रत मंच आला आहे.

5 (6)   यातील जाबदार संचालक हे संस्‍थेचे धोरण ठरवतात, कर्ज,ठेवी, व वसुली याबाबत नियंत्रण करतात. ते संस्‍थेच्‍या सर्वांगिन कारभारास जबाबदार असतात.  त्‍यामध्‍ये सर्व संचालकांचा सहभाग असतो.  परंतु, या प्रकरणातील बकायदेशीरपणा व जाबदारांचे/कर्मचा-यांचे चुकीचे वर्तन त्‍यांच्‍या लक्षात आले नसेल असे संभवत नाही.  म्‍हणजेच या सर्व प्रकारास त्‍यांचे संमत्‍ती होती हे स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे प्रस्‍तुत प्रकरणाबाबत त्‍यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी आहे हे स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे सर्व संचालकांना प्रस्‍तुत कामात मंचाने वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार धरले आहे.   

5(7)   यातील जाबदारांनी त्‍यांचे आक्षेप पुराव्‍यानिशी शाबित केलले नाहीत.  त्‍यांचे कैफियतीतील कथने ही पुरावा होऊ शकत नाहीत.  त्‍या कथनाशिवाय त्‍यातील आक्षेपाच्‍या शाबितीसाठी प्रस्‍तुत जाबदार कोणताही ठोस पुरावा मंचात जाबदार दाखल करु शकलेले नाहीत.  तसेच प्रस्‍तुत जाबदारानी नि.49 कडे दाखल केलेले AIR 2002 SC. Page 568, MLJ 2009(6) page 525, AIR 1998 Karnataka State page 185, AIR 1999 SC. Page 1341, CJ 1999 (SC)page 506 हे मा.ना.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निर्णयातील दंडकांचा आधार घेऊ इच्छितात परंतु प्रस्‍तुत तक्रारीतील वस्‍तुस्थिती व वरील न्‍यायनिवाडयातील वस्‍तुस्थिती ही पूर्णतः भिन्‍न असल्‍याने वरील न्‍यायनिर्णय प्रस्‍तुत प्रकरणी लागू पडत नाही असे आमचे निरीक्षण आहे.  कारण मुळातच किंचितही पुराव्‍याने यातील जाबदारांनी त्‍यांचे आक्षेप ठोस पुराव्‍याने शाबित केलेले नाहीत त्‍यामुळे मूलभूत पुराव्‍याअभावी नाशाबित झालेली कैफियत केवळ वरिष्‍ठ कोर्टाचे न्‍यायनिवाडे सादर करुन शाबित होत नाही.  तर आक्षेप पुराव्‍यानिशी शाबित केले तरच त्‍याच्‍या आधारासाठी व मान्‍यतेसाठी वरिष्‍ठ कोर्टाचे तत्‍सम न्‍यायनिवाडे सहाय्यभूत ठरतात.  मुळात पुराव्‍याअभावी जाबदारानी शाबित न केलेले आक्षेप वरिष्‍ठ न्‍यायालयांचे निर्णयातील न्‍यायनिर्णय शाबितीसाठी सादर करणे योग्‍य नाही असे आमचे मत आहे. 

5(8)       प्रस्‍तुत जाबदार यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये घेतलेली कथने व इतर सर्व आक्षेप मंचामध्‍ये पुराव्‍यानिशी शाबीत केलेली नाहीत.  उदा. द्यावयाचे झाल्‍यास प्रस्‍तुत तक्रारदार हे तथाकथीत शंकर सुर्वे यांच्‍या हॉटेलमध्‍ये काम करतात.  तथाकथीत शंकर सुर्वे यांच्‍या येणे बाकी कर्ज रक्‍कम रु.28,78,150/- या कर्जाची जबाबदारी प्रस्‍तुत तक्रारदारांच्‍या वरती असून या कर्जाच्‍या वसूलीसाठी प्रस्‍तुत तक्रारदाराची तारण वस्‍तु संस्‍थेला तारण ठेवण्‍याचा अधिकार आहे.  त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रारदार यांना या प्रकरणातील सोने तारण जिन्‍नस परत मागण्‍याचा अधिकार नाही.  प्रस्‍तुतची तक्रार दिवाणी स्‍वरुपाची आहे.  प्रस्‍तुतची तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडलेले नव्‍हते.  प्रस्‍तुत जाबदार यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही या महत्‍वाच्‍या जाबदारांच्‍या आक्षेपांचा विचार करता, प्रस्‍तुत जाबदार यांनी त्‍यांचे हे आक्षेप ठोस पुराव्‍यानिशी मंचात शाबीत केलेले नाहीत.  जाबदारांच्‍या म्‍हणण्‍यामधील त्‍यांच्‍या पुराव्‍याच्‍या शपथपत्रामधील घेतलेली कथने व आक्षेप ही भारतीय पुराव्‍याच्‍या कायद्यातील तरतूदीनुसार जाबदारांनी शाबीत केलेले नाहीत वा शाबीत होत नाही. ती केवळ कथनेच असतात. व जाबदारांनी ती ठोस पुराव्‍यानिशी शाबीत करावी लागतात.  जाबदारांची कथने ही पुरावा होवू शकत नाहीत.  त्‍यामुळे जाबदारांनी  घेतलेले त्‍यांचे सर्व आरोप मंचाने फेटाळून लावलेले आहेत.  वरील वस्‍तुस्थितीवरुन तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यास पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हा मंच येत आहे.  त्‍याचप्रमाणे प्रस्‍तुत जाबदारांनी या तक्रारदार यांना दिलेल्‍या अत्‍यंत टोकाच्‍या गंभीर स्‍वरुपाच्‍या सदोष सेवेमुळे जाबदारांकडून त्‍यांचे तारण सोन्‍याचे दागीने परत मिळविणेसाठी सहकार कायद्याने स्‍थापीत न्‍याय तक्रारदार यांना यंत्रणेकडे दाद मागावी लागली.  जाबदारांनी मा. जॉईंट रजिस्‍टार सहकारी संस्‍था, कोल्‍हापूर यांचेकडे केलेल्‍या रिव्‍हीजन कामी वकील देवून काम चालवावे लागले.   त्‍यासाठी प्रसंगी त्‍यांचा व्‍यवसाय/कामधंदा बंद करुन कोर्टकचेरी व त्‍यापोटी खर्च करावा लागला. साहजिकच प्रस्‍तुत तक्रारदाराला याकामी नुकसान सोसावे लागले  ही गोष्‍ट पूर्णतः स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यास पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत आम्‍ही आलो आहोत त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रारदार हा यातील जाबदारांकडून विषयांकीत कर्जासाठी जाबदारांनी कर्जाला तारण  घेतलेले  एकूण सुवर्णालंकार सोन्‍याचे बदाम, आंगठी, गळयातील चेन (प्रेस), लक्ष्‍मीहार, एकूण वजन 24.516 ग्रॅम  चे सुवर्णालंकार जाबदारांकडून तात्‍काळ परत मिळणेस व  तक्रारदारांना  झालेल्‍या नुकसानीपोटी रक्‍कम रु.40,000/-, मानसिक शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु. 5,000/- जाबदारकडून मिळणेस प्रस्‍तुत तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हा मंच येत आहे.                    

6.  त्‍यामुळे वरील सर्व विवेचन व कारणमीमांसा याना अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येतात-

                                 आदेश

1.  तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2. प्रस्‍तुत जाबदारांनी तक्रारदार यांना  दिलेल्‍या सोनेतारण कर्जाची संपूर्ण परतफेड तक्रारदारांनी करुनही तक्रारदाराचे सोने जिन्‍नस त्‍यांना तात्‍काळ परत न देवून त्‍यांना त्‍यासाठी वेगवेगळया न्‍यायालयाकडे दाद मागण्‍यास भाग पाडून संबंधीत न्‍यायालयांच्‍या आदेशांचे पालन न करुन वरिष्‍ठ न्‍यायालयांच्‍या आदेशानुसार तक्रारदारांचे सोने तारण दागिने (स्‍त्रीधन) तक्रारदारांना परत न देवून  प्रस्‍तुत जाबदार यांना तक्रारदारास अत्‍यंत गंभीर स्‍वरुपाची सदोष सेवा दिली आहे असे घोषीत करण्‍यात येते.

3.  यातील जाबदार क्र. 1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तिरित्‍या प्रस्‍तुत तक्रारदार यांचे न्‍यायनिर्णयामधील तपशिलात दर्शविलेप्रमाणे एकूण सोनेगहाण तारण घेतलेले सुवर्णालंकार, सोन्‍याचे बदाम, आंगठी, गळयातील चेन(प्रेस) आणि लक्ष्‍मीहार याचे एकूण सोने 24.516 ग्रॅम वजनाचे दागिने ज्‍या स्थितीत ठेवले होते त्‍या स्थितीत तक्रारदार यांना सदर आदेश प्राप्‍त झालेपासून चार आठवडयांचे आंत तक्रारदारांना अदा करावेत‍. या जाबदारांनी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस प्रस्‍तुत जाबदार यांनी प्रस्‍तुत तक्रारदार यांना आदेशाची मुदत संपले तारखेपासून प्रतिदिन रु.500/- कॉस्‍ट तक्रारदार यांना दागिने परत करेपर्यंत द्यावी.

4. यातील जाबदार क्र. 1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तिरित्‍या यातील तक्रारदार यांना त्‍यांच्‍या कर्जाची पूर्ण फेड झाली असूनसुध्‍दा तारण सोने मिळविण्‍यासाठी वेगवेगळया न्‍यायालयीन लढयांना तोंड द्यावे लागले. साहजीकच व्‍यवसायाकडे दुर्लक्ष झाले या सर्व बाबींच्‍या नुकसानभरपाईपोटी रक्‍कम रु.40,000/- (रुपये चाळीस हजार मात्र) सदर आदेश प्राप्‍त झालेपासून चार आठवडयांचे आत तक्रारदारांना अदा करावी. 

5. यातील जाबदार क्र. 1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तिरित्‍या यातील तक्रारदार यांना जाबदारांनी दिलेल्‍या अत्‍यंतिक टोकाच्‍या शारिरीक मानसिक त्रासापोटी रक्‍कम  रु.25,000/- (रुपये पंचवीस हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) सदर आदेश प्राप्‍त झालेपासून चार आठवडयांचे आत तक्रारदारांना अदा करावी.

6.  यातील जाबदार क्र. 1 ते 14 यांनी या तक्रारदार यांना त्‍यांचे सोनेतारण कर्ज पूर्ण पेड झाल्‍याचा दाखला सदर आदेश प्राप्‍त झालेपासून चार आठवडयांच्‍या आत तक्रारदार यांना द्यावा.

7. सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

8. विहीत मुदतीत आदेशाचे पालन प्रस्‍तुत जाबदार यांनी न केलेस तक्रारदार यांना जाबदारांविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.

9.  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत   याव्‍यात. 

ठिकाण- सातारा.

दि.19 -11-2015.

 

(सौ.सुरेखा हजारे)   (श्री.श्रीकांत कुंभार)    (सौ.सविता भोसले)

सदस्‍या          सदस्‍य             अध्‍यक्षा

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 
 
[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[ HON'BLE MRS.SUREKHA HAJARE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.