ठाणे अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग
रु.नं.428/429, कोकण भवन इमारत,चौथा मजला,
सी.बी.डी.बेलापूर,नवी मुंबई-400 614.
आर बी टी. ग्राहक तक्रार क्रमांक- 37/2019
तक्रार दाखल दिनांक -04/02/2019
अंतिम आदेश दिनांक - 20/09/2022
- महेश बसवराज शेडबळ,
वय - 55 वर्षे, व्यवसाय – नोकरी.
रा. फ्लॅट नंबर 201, बिल्डींग नंबर 3,
सेक्टर – 6, केसर हार्मोनी को.ऑप.हौ.सो. लि.,
- अर्चना महेश शेडबळ,
वय - 48 वर्षे, व्यवसाय,
रा. फ्लॅट नंबर 201, बिल्डींग नंबर 3,
सेक्टर – 6, केसर हार्मोनी को.ऑप.हौ.सो. लि.,
- , महाराष्ट्र – 410 210. ............. तक्रारदार
विरुध्द
- मेकमाय ट्रीप इंडिया प्रा. लिमिटेड,
ए 334/5, बालाजी भवन, प्लॉट नंबर 42/ए,
सेक्टर 11, सीबीडी, बेलापूर,
नवी मुंबई – 400 614.
- लुफथान्सा जर्मन एअरलाईन्स ,
2रा मजला,नोव्होटेल पुल्लमन हॉटेल,
कमर्शिअल ब्लॉक, अॅसेट नंबर 2,
आयजीआय एअरपोर्ट दिल्ली110 037.
- युनायटेड एअरलाईन्स इन्क.,
2रा मजला, टॉवर सी, सायबर ग्रीन्स,
डीएलएफ फेज – 3, गुरगांव 122 002. .............. सामनेवाले.
कोरम – मा. श्री. रविंद्र पां. नगरे, प्रभारी अध्यक्ष.
मा. श्रीमती गौरी मा. कापसे, सदस्या.
मा. श्रीमती शितल अ. पेटकर, सदस्या.
उपस्थिती – तक्रारदार स्वतः हजर.
सामनेवाले क्रमांक 1 तर्फे अॅड प्रणिता केळकर
सामनेवाले क्रमांक 2 तर्फे अॅड चैताली जाधव.
सामनेवाले क्रमांक 1 तर्फे अॅड कपिल शेट्टे.
निकालपत्र
(दिनांक - 26/08/2022)
द्वारा - मा. सदस्या, श्रीमती शितल अ. पेटकर
- प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने सामनेवाले यांच्याविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा1986 च्या कलम 12 प्रमाणे सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा देऊन सेवा देताना अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असा आरोप करून तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांच्या तक्रारीचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे आहे:-
- तक्रार क्रमांक 2 व त्यांचे दोन मुले हे सन 2013 मधील उन्हाळी सुट्यांमध्ये U.SA मध्ये त्यांच्या नातेवाईकाकडे जाण्याची योजना बनवली. त्याकरिता त्यांनी U.S.A. व्हिसा घेतला. तो मिळाल्यानंतर तक्रारदार क्रमांक 1 यांनी मुंबई ते सं फ्रान्सिस्को व यु एस ए ते मुंबई याप्रमाणे प्रवास करण्याकरिता सामनेवाले क्रमांक 1 यांच्याकडून रक्कम रुपये 2,05,469/- अदा करून दिनांक 27/01/2013 रोजी ऑनलाईन तिकीट बुक केली. त्याप्रमाणे दिनांक 21/03/2013 रोजी तक्रारदार यांची मुलगी व दिनांक 26/04/2013 रोजी तक्रारदार क्रमांक 2 व त्यांचा मुलगा हे मुंबई ते सं फ्रान्सिस्को प्रवास करणार होते. तर परतीच्या प्रवास यु एस ए ते मुंबई तिघेही एकत्रपणे 08/06/2013 रोजी करणार होते.
- वरील प्रवासादरम्यान त्यांचा इतर कोणत्याही देशामध्ये जाण्याचा बेत नव्हता. सामनेवाले क्रमांक 1 यांच्या वेबसाईट वर कुठेही वरील देशांमध्ये कंनेक्टींग फ्लाईट घेण्याकरिता ट्रांझिट विसाची गरज असते याबाबत कुठेही नमूद नव्हते. तसेच सामनेवाले यांनी सुद्धा सांगितले नाही.
- तक्रारदर क्रमांक 2 व त्यांच्या दोन्ही मुलांचा जाताना प्रवास सुखरूप झाला परंतु परतीच्या वेळेस सामनेवाले क्रमांक 1 यांनी दिलेल्या दोषयुक्त सेवेमुळे खालील प्रमाणे समस्या ना सामना करावा लागल्या.
- तक्रारदाराने Lufthansa Airways ची तिकीट घेतले होती. परंतु दिनांक 08/06/2013 रोजी सं फ्रान्सिस्को एअरपोर्ट वर आल्यानंतर Lufthansa Airways चे काउंटर मिळून आले नाही तर बऱ्याच प्रयत्नानंतर असे कळले की Lufthansa Airways यांचे टाइअप युनायटेड एअरलाइन्स सोबत झालेले आहे. याबाबतची कल्पना सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदार यांना दिलेली नव्हती, तसेच तिकीट वर सुद्धा कुठेही नमूद नाही.
- सामनेवाले यांनी सदर प्रवासामध्ये प्रवासादरम्यान सोबत दोन बॅग घेऊ शकतो असे सांगितले होते परंतु एअरपोर्ट वर गेल्यानंतर फक्त एक बॅग नेण्याची परवानगी होती, तर इतर भागकरिता अधिकची रक्कम मोजावी लागली.
- सं फ्रान्सिस्को मधून लंडन येथे पोहोचल्यानंतर लंडन मधील Heathrow या एअरपोर्ट वरून Gatwick या एअरपोर्ट वरील frankfurt flight वर पोहोचण्याकरताचा transit चा कालावधी फक्त 2 तास 40 मिनिटे एवढाच आहे. जो कि खूप कमी आहे. जेव्हा की कमीत कमी 5 तास असणे गरजेचे आहे. याबाबत सामनेवाले क्रमांक 1 यांनी संपर्क साधला असता कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यास ते असमर्थ ठरले त्यामुळे तक्रारदार यांना त्यादिवशी प्रवास करण्यापासून नाकारण्यात आले. त्यामुळे सदर तिकीट रद्द करून वेळेवर 09/06/2013 रोजी 1,60,980/-एवढ्या रक्कमेला लुफ्टहांसा एअर्वेज चि. सं फ्रान्सिस्को ते मुनीच व मुनीच ते मुंबई अशी टिकीट काढली.तसेच दिनांक 08/06/2013 रोजीची तिकीट रद्द करणे करिता तक्रारदारांना रक्कम रुपये 47,584/- एवढी रक्कम मोजावी लागली.
- सदर घटनेमुळे तक्रार क्रमांक 2 व त्यांच्या मुलांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना बराच त्रास झाला. सामनेवाले क्रमांक 1 हे दीर्घकाळापासून सदर व्यवसायांमध्ये आहेत, तसेच त्यांना सदर बाबींची माहिती सुद्धा आहे,परंतु त्यांच्या साईट वर स्पेसिफिक transit विसा बाबत आता माहिती देण्यात आली आहे.जेव्हाकी internatinal प्रवासामध्ये transit विसा हा महत्वाचा असतो याबाबत सूचना सामनेवाले क्रमांक 1 यांच्याकडून देणे गरजेचे आहे.परंतु याप्रकारच्या सूचना तक्रारदार बुकिंग करतेवेळेस साईट वर नव्हत्या.
- तसेच सामनेवाले यांनी दिलेली इ तिकीट ही दोषपूर्ण होती.याप्रकारे सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारास दोषयुक्त व त्रुटीयुक्त सेवा दिली.
- तक्रारदार यांना आलेल्या अतिरिक्त खर्चाची रक्कम परत मिळणे करिता तक्रारदाराने सामनेवाले क्रमांक 1 याना मागणी केली असता तक्रारदार यांच्या कडे ट्रान्झिट विजा नसल्यामुळे सदर प्रकार घडला, असे खोटे कारण सांगून रक्कम देण्याकरिता नकार दिला. जेव्हा की प्रवासी यांनी transit without Visa concession हा criteria निवडला असेल तर UK बॉर्डर एजन्सी प्रवाशांना UK लँडसाईट वर विसा नसतानासुद्धा transit करू देतात. तसेच बराच स्वतंत्र लंडन ट्रॅव्हल गाईड यांच्या मते Heathrow ते Gatwick हे अंतर 3 ते 4 तासांमध्ये सुद्धा पूर्ण करू शकतो. तसेच याबाबत सामनेवाले ने सुद्धा त्यांच्या वेब पोर्टल वर फ्लाईट ऑप्शन transit विसा बाबतची माहिती काही दिवसापूर्वी दिलेली आहे. ह्यावरून ट्रान्सलेट विसा बाबतची माहिती सामनेवाले तर्फे ग्राहकास देणे गरजेचे आहे जेकी तक्रारदार बुकिंग च्या वेळेस सदर माहिती उपलब्ध नव्हती.
- तक्रारदार यांना आलेल्या अतिरिक्त खर्चाची रक्कम परत मिळणे करिता तक्रारदार यांच्या वारंवार विनंती वरून सुद्धा सामनेवाले क्रमांक 1 यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. ज्याचा तक्रारदारांना बराच मानसिक व शारीरिक त्रास झाला.
- रक्कममेचे मागणी करण्याकरिता कायदेशीर नोटीस पाठवून सुद्धा रक्कम परत केली नाही. याप्रमाणे सामनेवाले यांनी दोषयुक्त सेवा दिली असल्यामुळे प्रस्तुत तक्रार माननीय आयोगामध्ये दाखल करून विनंती कलमांमध्ये मागितलेल्या मागण्या सामनेवाले यांच्याकडून मंजूर होऊन मिळणे कामी विनंती केलेली आहे –
- सामनेवाले क्रमांक 1 यांनी रक्कम रुपये 1,33,396/- दिलेल्या पावती पासून 18 टक्के व्याजाने तक्रारदारास परत द्यावे.
- सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदार व तक्रारदार यांच्या फॅमिलीला झालेला मानसिक त्रासाचा करिता नुकसान भरपाईची रक्कम म्हणून रक्कम रुपये3,00,000 तक्रारदारास अदा करावी.
- तक्रारीच्या खर्चाकरिता रक्कम रुपये 10,000/- तक्रारदारांना द्यावी.
- सामनेवाले क्रमांक 1 यांनी त्यांच्या वेब पोर्टल मध्ये ग्राहकांच्या हितासाठी बदल करावा तसेच जर का ग्राहकाच्या प्रवासामध्ये एअरपोर्ट बदली करायचा असेल तर त्रांसित पॅसेंजर्सला आवश्यक तेवढा वेळ देण्यात यावा.
- तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्राच्या यादीप्रमाणे कागदपत्राच्या छायांकित प्रती दाखल केल्या आहेत.
- प्रस्तुतच्या तक्रारी मधील मूळ तक्रार क्रमांक 40/14 मध्ये सामनेवाले हजर झाले नाही. दिनांक 10 /09 /2015 रोजी प्रकरणात अंतिम आदेश पारित करण्यात आले. सामनेवाले क्रमांक 1 यांनी सदर आदेशात माननीय राज्य आयोगामध्ये अपील दाखल करून आव्हान इत केले. ज्यामध्ये दिनांक 12/12/ 2018 रोजी अपील मंजूर करून सदर प्रकरण पुन्हा गुणवत्तेवर आदेश होणेकामी तसेच Luftansa German Airlines यांना आवश्यक पार्टी नमूद करून सदर प्रकरण पुन्हा गुणवत्तेवर निकाल होनेकामे प्रकरण परत पाठविले त्याप्रमाणे सामनेवाले क्रमांक 1, 2 व 3 प्रकरणांमध्ये हजर होऊन त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे खालील प्रमाणे दाखल केलेले आहेत.सामनेवाले क्रमांक 1 यांच्या लेखी म्हणण्यानुसार:-
- सामनेवाले हे प्रवाशांना प्रवास करणेकरीता सर्व प्रकारच्या वाहतुक बुकिंग बाबत ची सेवा देण्याचे काम करतात त्याप्रमाणे त्यांच्या कस्टमरद्वारे एयर टिकिट बुकिंग करण्याकरिता सांगितल्याप्रमाणे सदर बुकिंग कन्फर्मेशन करून देण्याचे काम सामनेवाले वेबसाइट द्वारे करतात व सदर वेबसाईट www.makemytri..com द्वारे करण्यात आलेल्या ऑनलाइन ट्रांजेक्शन हे वेबसाइट्स यूजर एग्रीमेंट प्रमाणे त्यातील अटी व नियम प्रमाणे सर्वांनाच लागू आहे. त्याप्रमाणे त्यामधील force majùre circumstances ही महत्त्वाची आहे. त्याप्रमाणे सामनेवाले हे आवश्यक ते रक्कम वजा करून फक्त refund करण्याकरिता जबाबदार आहे
- तक्रारदाराला दिलेल्या तिकीटमध्ये ट्रॅव्हल डॉक्युमेंट कॉलमध्ये विसा तसेच त्रांसिट विसा बाबत नमूद केले होते. तसेच युजर एग्रीमेंट मधील अटी व शर्ती मध्ये सुद्धा नमूद केले आहे. असे असताना सुद्धा सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना प्रवासासाठी आवश्यकते कागदपत्रे तपासून घेण्याबाबत सांगितले होते तसेच तिकीट मधील एका बाजूस अटी व नियमांमध्ये त्याबाबत नमूद केलेले होते.
- सदर तक्रारीची माहिती मिळाल्यानंतर सामनेवाले क्रमांक 1 यांनी चौकशी केली असता असे समजले की उद्भवलेली समस्या ही transit मध्ये time उपलब्ध नाही याबाबत नसून त्रांसिट विसा उपलब्ध नव्हता त्याकरिता उद्भवली आहे. व त्याकरिताच तक्रारदार यांची लंडन येथील बोर्डिंग नाकारण्यात आली. याची माहिती सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारासE mail पाठवून कळवले आहे.
- सामनेवाले क्रमांक 1 यांनी सदर समस्येबाबत दिनांक 08/06/2013 रोजी lufthansa एअरलाइन यांच्याद्वारे त्रांसिट विसा नसल्याबाबतची माहिती मिळाली त्यावेळेस तक्रारदार यांना त्यांच्याद्वारे नवीन तिकीट काढण्याबाबत सांगण्यात आले, तसेच सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना दिलेली तिकीट रद्द करून airline cancelation policy प्रमाणे रिफंड देण्याची प्रक्रिया केली. व याची माहिती तक्रारदारांना आहे. तरीसुद्धा दिनांक 14/06/2013 रोजी तक्रारदाराने 1,37,000/- करिता सामनेवाले क्रमांक 1 यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
- सामनेवाले क्रमांक 1 हे फक्त एअरलाईन टिकीट बुकिंग करून देण्याचे एक साधन आहे तक्रारदाराने एअरलाईन टिकीट ऑनलाइन बुकिंग करणेकरिता उपलब्धता तपासली असता त्याप्रमाणे ती त्यांना सांगणे या प्रकारचे काम सामनेवाले क्रमांक 1 यांनी केले आहे. एअरलाइन ने प्रवास करताना व्हॅलिड विजा ठेवणे ही जबाबदारी तक्रारदाराची आहे त्यामुळे सदर विजा घेण्यास तक्रारदार असमर्थ ठरले किंवा तक्रारदार यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या दोष निर्माण झाल्यास तसेच एअरलाइन्स ने त्यांना बोर्डिंग करू दिले नसल्यास यासाठी सामनेवाले क्रमांक 1 यांनी दोषी ठरवता येणार नाही. तसेच तक्रारदारांना मुंबई येथून sun Francisco via munich and toronto ला प्रवास करताना ट्रान्झिट विजाची आवश्यकता असते याची माहिती होती त्यामुळे परत येताना सुद्धा ट्रान्झिट विजा आवश्यक आवश्यकता भासेल याची कल्पना नक्कीच तक्रारदारांना होती.
- सामनेवाले क्रमांक 2 यांच्या लेखी म्हणण्यानुसार....
- तक्रारदार यांची पत्नी व दोन मुलांना दिनांक 08/06/2013 रोजी फ्लाइट no.UA- 901 ( ALSO LH-9375) या फ्लाईट मध्ये बोर्डिंग करण्यापासून सं फ्रान्सिस्को येथील युनायटेड एयरलाइंस( oprating carrier) च्या स्टाफ ने नाकारले होते. त्यामुळे सामनेवाले क्रमांक 2 ( operating carrier) तक्रारदाराच्या तक्रारीस कारणीभूत नाहीत.
- तक्रारदाराची सामनेवाले क्रमांक 2 यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही तसेच मागणीही नाही तसेच दिनांक 08/06/2013 रोजी घडलेल्या घटनेबद्दल एकदाही तक्रारदाराने सामनेवाले क्रमांक 2 ह्यांना सांगितले नाही तर युनायटेड एअरलाइन कडे गेले.
- तक्रारदार यांची पत्नी व दोन मुले यांना फ्लाईट मध्ये बोर्डिंग करण्यापासून सं फ्रान्सिस्को येथील युनायटेड एअरलाइन्स यांच्या स्टाफने सं फ्रान्सिस्को येथील लंडन फ्लाईट ही लंडन हेटरो एअरपोर्ट वर येणे तसेच त्यानंतर लंडन गेटविक एअरपोर्ट वरून लंडन फ्रांकफुर्त फ्लाईट पकडणे या combining flights पकडण्यासाठी सामनेवाले क्रमांक 1 यानी फक्त 2 तास 40 मिनिट प्रवासाचा चा कार्यक्रम आखला होता. जेव्हा की एका एअरपोर्ट वरून दुसऱ्या एअरपोर्टवर connecting फ्लाइट पकडण्यासाठी करीता जाण्याकरिता 62 किलोमीटर एवढे अंतर पार करावे लागते तसेच फ्रांक फ्लाईट डिपार्चर होण्याआधी किमान 60 मिनिटे अगोदर तेथे उपस्थित राहणे गरजेचे आहे जॅकी दोन तास चाळीस मिनिटात मध्ये एवढं सर्व करणे शक्य नव्हते त्यासाठी एवढा वेळ पुरेसा नव्हता.तसेच immigration clearing व transit visa मिळवण्यासाठी सुधा काही वेळ लागतो. 2 तास 40 मिनिट एवढा वेळ हा जेव्हा कनेक्टिंग लाईट हे त्याच एअरपोर्टवर म्हणजे inside transit असते, त्यावेळेस एवढा वेळ पुरेसा असतो परंतु landside transit साठी एवढा वेळ पुरेसा नाही.
- परंतु सामनेवाले क्रमांक 1 यांनी असा डिफेन्स घेतला आहे की तक्रारदार ह्यांच्याकडे valid travel documents म्हणजेच त्रांसिt व्हिजा नसल्यामुळे युनायटेड एअरलाइन यांनी त्यांचा फ्लाईट बोर्डींग ला नकार दिला तक्रार क्रमांक 1 यांच्या या विधानामुळे माननीय राज्य आयोगाने दिनांक 12/ 12 /2018 रोजी lufthansa एअर्वेज म्हणजेच सामनेवाले क्रमांक 2 यांना प्रकरणामध्ये आवश्यक पार्टी म्हणून समाविष्ट करण्याचा आदेश दिला. त्यामुळे या गोष्टीचा उलगडा करण्याकरिता युनायटेड एअरलाइन ही आवश्यक पार्टी आहे.
- सामनेवाले क्रमांक 1 हे IATA Accredited agent असून त्यांच्याकडे सर्व IATA airline सदस्यांचे inventory access आहे. ज्यामध्ये ती सर्व फ्लाईट मध्ये उपलब्ध असलेल्या सिटची तपासणी करू शकतात. तसेच त्याची बुकिंग करू शकतात त्याचप्रमाणे सामनेवाले क्रमांक 1 हे एअर कॅरियर्स कंबाईन करून स्वतःचे इटर्निटी तयार करू शकतात यावरून सामनेवाले क्रमांक 1 यांना सामनेवाले क्रमांक 2 यांची सं फ्रान्सिस्को ते लंडनला जाणारी फ्लाईट हे युनायटेड एअरलाइन oprate करीत होते याची माहिती होती तरीसुद्धा त्यांनी तसे नमूद केले नाही.
- तसेच सामनेवाले क्रमांक 2 च्या जनरल कंडिशन ऑफ कॅरेज मधील आर्टिकल 2.3 च्या अटी व शर्तीप्रमाणे तसेच code-shares मधील कलम 7 प्रमाणे सामनेवाले क्रमांक 2 हे तक्रारीस कारणीभूत ठरत नाहीत.
- साधारणता विसा ऑफिसर हे इमिग्रेशन व बॉर्डर कंट्रोल ऑफिशियल्स रुल्स यांच्याकरिता एकदाचा विचार केला जाऊ शकतो परंतु एका देशांमधून दुसऱ्या देशांमध्ये त्रांसित विसा शिवाय प्रवेश करण्याकरिता मनाई केली जाते. त्यामुळे प्रवाशांनी नेहमीच आवशक्य तो व्हिजा संपूर्ण प्रवासामध्ये जवळ ठेवणे गरजेचे आहे व त्या करिता एअरलाइन जबाबदार नाही.
- तसेच सामनेवाले क्रमांक 2 यांच्या काँडिशन्स ऑफ कॅरेज आर्टिकल 7.1.7 प्रमाणे झाली ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स जवळ ठेवणे ही पूर्णतः प्रवाशांची जबाबदारी आहे तर त्याकरिता एअरलाइन ला जिम्मेदार ठरवता येणार नाही
- तसेच तक्रारदार यांची पत्नी व दोन मुले हे त्रांसिट विदाऊट व्हिजा कन्सेशन याकरतासुद्धा पात्र होते.
- तक्रारदार आणि त्यांच्या तक्रारी सोबत लंडन येथील इंडिपेंडेंट ट्रॅव्हलर गाईड दाखल केलेली आहे ज्यामध्ये मेट्रो ते ग्रीक वीक एअरपोर्ट मध्ये तीन ते चार तासाचे अंतर आहे त्यामुळे सामनेवाले क्रमांक 1 यांनी दिलेला वेळ हा त्या दृष्टीने कमी आहे.
- सामनेवाले क्रमांक 3 यांच्या लेखी म्हणण्यानुसार....
- तक्रारदाराने त्यांच्या तक्रारी मध्ये फक्त सामनेवाले क्रमांक 1 यांनी दोष युक्त सेवा दिलेली आहे तसेच सामनेवाले क्रमांक 1 यांनी वेब पोर्टल वरून ऑनलाईन बुकिंग करताना हेटरो ते गेट वीक च्या प्रवासा दरम्यान ट्रान्झिट टाईम हा खूप कमी वेळ होता. त्यामुळे यावरून सामनेवाले क्रमांक 3 यांची यामध्ये कोणतीही भूमिका नाही.
- तसेच तक्रारदाराने हेसुद्धा त्यांच्या तक्रारी मध्ये ऍडमिट केले आहे की त्यांच्याजवळ त्रांसित विसा नव्हता प्रवासादरम्यान त्रांसित व्हिजा असन्याबाबत IATA च्या जनरल कंडिशन ऑफ carriage च्या article 14.1 मध्ये सुद्धा सांगितले आहे. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी त्यांच्याजवळ प्रवासादरम्यान लागणारे सर्व प्रकारचे कागदपत्र आहेत किंवा नाही याची खात्री करून घेणेचि जिम्मेदारी ही तक्रारदाराचे आहे.
- तक्रारदाराने व सामनेवाले क्रमांक २व 3 यांनी पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले. तर सामनेवाले क्रमांक 1 यांनी दाखल केलेले लेखी म्हणने हेच त्यांचा पुरावा म्हणून वाचण्यात यावा अशी अर्ज/पुर्सीस दाखल केली.तक्रारदार व सामनेवाले यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला.तक्रारदार व सामनेवाले यांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला.
- तक्रारीचा गुणवत्तेवर निकाल होणेकामी तक्रारीचा निवारणार्थ खालील प्रमाणे मुद्दे या आयोगाच्या विचारार्थ उद्भवल्याने त्यावर खालील प्रमाणे कारणमीमांसा व निष्कर्ष देण्यात आले.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1. | सामनेवाले यांनी तक्रारदारास दोषयुक्त सेवा दिली हे तक्रारदाराने सिद्ध केले आहे काय? | नाही. |
2. | तक्रारदार मागितलेली दाद मिळण्यास पात्र आहेत काय? | नाही. |
3.. | आदेशाबाबत काय? | अंतिम आदेशाप्रमाणे. |
कारण मिमांसा
विवेचन मुद्दा क्रमांक 1 –
- सन 2014 मध्ये प्रस्तुत तक्रार सामनेवाले क्रमांक 1 यांच्याविरुद्ध तक्रारदाराने दाखल केली होती, ज्यामध्ये दिनांक 10/11/2015 रोजी अंतिम निकाल जाहीर करून तक्रार अंशतः मंजूर करण्यात आली. सदर निकालाला सामनेवाले क्रमांक 1 यांनी आव्हानित करून दिनांक 10/09/2015 रोजी माननीय राज्य आयोग, मुंबई येथे अपील दाखल केला. दिनांक 12/12/2018 रोजी सदर अपील मंजूर करून माननीय राज्य आयोगाने सामनेवाले क्रमांक 2 यांना आवशक्य पार्टी म्हणून तक्रारीमध्ये शामिल करण्याचे व गुणवत्तेवर निकाल देणेचे निर्देश देण्यात आले. तसेच सामनेवाले क्रमांक 2 यांनी दाखल केलेल्या रिविजन पिटीशन मध्ये दिनांक 12/12/2019 रोजी आदेश पारित करून सामनेवाले क्रमांक 3 यांना तक्रारीमध्ये आवशक्य पार्टी म्हणून शामिल करण्याचा आदेश पारित केला.
- त्याप्रमाणे सामनेवाले क्रमांक 2 व 3 यांना तक्रारीत शामिल केल्यानंतर तक्रारीमध्ये दोन मुद्दे उपस्थित झाले ते म्हणजे ट्रान्झिट टाईम व ट्रान्झिट व्हिसा, सदर मुद्द्यांचे निराकरण करणेकामी उभयपक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला.
- तक्रारदाराने युक्तिवाद केला की, तक्रारदार यांची पत्नी व मुले यांचा प्रवास मुंबई ते सं फ्रान्सिस्को हा सुखरूप झाला परंतु सं फ्रान्सिस्को वरून मुंबईला परत येताना दिनांक 08/06/2013 रोजी सं फ्रान्सिस्को एअरपोर्टवर तक्रारदार यांच्या परतीच्या टिकीटमध्ये दोष असल्यामुळे त्यांना फ्लाइटमध्ये बोर्डिंग करण्यास नाकारले, ज्यामुळे त्यांना वेळेवर रक्कम देऊन नवीन टिकीट खरेदी करावी लागली. तर सामनेवाले क्रमांक 2 व 3 त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांची पत्नी व दोन मुले यांना फ्लाईट मध्ये बोर्डिंग करण्यापासून सं फ्रान्सिस्को येथील युनायटेड एअरलाइन्स यांच्या स्टाफने सं फ्रान्सिस्को येथील लंडन फ्लाईट ही लंडन हेटरो एअरपोर्ट वर येणे तसेच त्यानंतर लंडन गेटविक एअरपोर्ट वरून लंडन फ्रांकफुर्त फ्लाईट पकडणे या कम्बाईन फ्लाईट पकडण्यासाठी सामनेवाले क्रमांक 1 यानी फक्त 2 तास 40 मिनिट प्रवासाचा चा कार्यक्रम आखला होता. जेव्हा की एका एअरपोर्ट वरून दुसऱ्या एअरपोर्टवर कनेक्टिंग फ्लाइट पकडण्यासाठी जाण्याकरिता 62 किलोमीटर एवढे अंतर पार करावे लागते तसेच फ्रांकफुर्त फ्लाईट डिपार्चर होण्याआधी किमान 60 मिनिटे अगोदर तेथे उपस्थित राहणे गरजेचे आहे जेकी 2 तास 40 मिनिटात मध्ये एवढं सर्व होणे शक्य नव्हते. त्यासाठी एवढा वेळ पुरेसा नव्हता. परंतु सामनेवाले क्रमांक 1 यांनी सदर मुद्द्याचा साफ नकार दिला आहे.
- प्रकरणामध्ये उद्भवलेल्या दोन मुद्यापैकी पहिला मुद्दा बाबत पुराव्याचे अवलोकन केले असता, तक्रारदाराने पुरावा म्हणून निशाणी क्रमांक “बी” वर तिकीट दाखल केले आहे त्यानुसार दिनांक 8 /6/ 2013 रोजी फ्रान्सिस्को वरून London flight ही 13.00 hrs वाजता डिपार्चर होऊन लंडन हायड्रो येथे 09/06/2020 रोजी 7.10 hrs वाजता arrival होईल असे नमूद आहे. तर पुढची फ्लाईट ही लंडन गेट विक येथून 9.50 hrs वाजता पकडायची होती. जी की Frankfurt येथे 2.25 hrs ने arrival होणार होती. व त्या पुढे मुंबई करिता प्रवास करायचा होता.
- लंडन हाटरो एअरपोर्ट येथून लंडन गेटविक एअरपोर्ट येथे जाण्याकरिता साधारण 3 ते 4 तास लागते. याबाबतचा पुरावा तक्रारदाराने तक्रारीसोबत निशाणी क्रमांक “जी” वर दिनांक 03/01/2014 रोजीच्या The London Toolkit the independent traveler guide to London दाखल केले आहे. त्याप्रमाणे हेटरो ते गेटविक येथे प्रवास करण्याकरिता कमीत कमी 3 तास लागते असे त्यात नमूद आहे. सामनेवाले क्रमांक 1 यांनी सदर पुरावा नाकारलेला नाही,तसेच दिनांक 08/ 09 /2013 रोजीच्या तिकीटवर हेटरो येथे 7.10 hrs वाजता पोहोचते व गेटविक वरुन 9.50 hrs ने सुटते असे नमूद आहे.यावरून 7.10 ते 9.50 या दरम्यानचा कालावधी फक्त 2.40 hrs असा आहे. जो कि गेटवीक वर पोहोचून पुढील फ्लाइट पकडण्याकरिता पुरेसा वेळ नाही हे सिद्ध झाले. तर सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदाराला दिनांक 4/7/2014 रोजी पाठवलेल्या ईमेल मधील मजकूर बाबत ठोस पुरावा नाही, तसेच सामनेवाले क्रमांक 2 व 3 यांच्या कथनाच्या विरुद्ध आहे, त्यामुळे ते ग्राह्य धरता येणार नाही.
- दुसरा व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तक्रारदारकडे हेटरो ते गेटवीक दरम्यान प्रवास करण्याकरिता नियमाप्रमाणे ट्रांजिट व्हिजा नव्हता हे तक्रारदारास मान्य आहे परंतु सदर व्हिजाबाबत सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारास माहिती देणे गरजेचे होते जे कि, त्यांनी दिली नाही असा आक्षेप तक्रारदाराने घेतला आहे.
- सामनेवाले क्रमांक 1 यांच्याकडून तक्रारदाराने बुक केलेल्या तिकीटवर,
इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मध्ये
*Before the commandment of your travel kindly check that you have collect it all the valid documents required for travel such as passport air tickets valid visa's etc
* Please ensure that your passport is valid (does not expire) for at least 6 month at the time of your travel to check the visa requirement of your destination country and any country you are transiting from (some countries require passengers to obtain a transitive visa असे नमूद केलेले आहे, यावरून transit विजा बाबतची माहिती सामनेवाले क्रमांक 1 ने तिकीट वर नमूद केली आहे, यावरून सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना प्रवासादरम्यान ट्रांझिट विजा आवशक्य असल्याबाबतची माहिती तक्रारदारास दिली होती असे स्पष्ट होते.
20. ट्रांझिट टाइम कामी असला तरीही प्रवासामध्ये ट्रांझिट व्हिजा असणे महत्वाचे आहे.सामनेवाले क्रमांक 2 व 3 यांच्याद्वारे फ्लाईट मध्ये बोर्डिंग न करू देण्याचे कारण ट्रांझिट टाइम सोबत ट्रांझिट व्हिजा तक्रारदाराकडे उपलब्ध नव्हता असे आहे, व सामनेवाले क्रमांक 1 ने ट्रांझिट व्हिजा बाबत तक्रारदार ला पूर्व सूचना देऊन सुद्धा तक्रारदार ने ट्रांझिट व्हिजा स्वतः जवळ ठेवला नाही हे सिद्ध झाल्याने सामनेवाले ने तक्रारदाराला दोषयुक्त सेवा दिली हे तक्रारदार सिद्ध करू शकले नाही.सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देऊन खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात आला.
- आर.बी.टी./ग्राहक तक्रार क्रमांक 37/2019 खारीज करण्यात येते.
- खर्चा बाबत आदेश नाही.
- आदेशाची प्रत तक्रारदारांना निःशूल्क पाठविण्यात यावी.
- तक्रारीचे कागदपत्र अभिलेख कक्षात पाठविण्यात यावेत.
ठिकाण – कोकण भवन, नवी मुंबई.
दिनांक – 20/09/2022.
सही/- सही/- सही/-
( शितल अ. पेटकर ) ( गौरी मा. कापसे ) ( रविंद्र पा.नगरे )
सदस्या सदस्या अध्यक्ष
ठाणे अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग.