Maharashtra

Nagpur

CC/807/2015

DR. SWARNA NARESH GAIKWAD - Complainant(s)

Versus

MAKE MY TRIP, THROUGH , MANAGING DIRECTOR - Opp.Party(s)

A P J P DUBEY

10 Nov 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/807/2015
 
1. DR. SWARNA NARESH GAIKWAD
R/O. A2-104, BEHIND KHURANA TRAVELS, CIVIL LINES, NAGPUR.
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. MAKE MY TRIP, THROUGH , MANAGING DIRECTOR
243, S P INFO CITY, UDYOG VIHAR, PHASE-I, GURGAON, HARYANA -122016
GURAON
HARYANA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 
For the Complainant:A P J P DUBEY, Advocate
For the Opp. Party:
Adv. Anuja Anil Telang.
 
Dated : 10 Nov 2017
Final Order / Judgement

 (मंचाचा निर्णय : श्री. विजय प्रेमचंदानी - मा. अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये)  

1.     तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाविरुध्‍द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्ताचे तक्रारीतील कथन असे आहे की, दि.01.06.2015 रोजी विरुध्‍द पक्षाकडून दोन विमानाची टिकीटे व राहण्‍यासाठी होटल तसेच परत येण्‍याकरीता विमानाची टिकीटे IDNP2802453387220  मधून नोंदणी केली. सदर नोंदणीबाबत विरुध्‍द पक्षांकडून कोणतेही हमीपत्र किंवा अहवाल आला नसल्‍यामुळे परत IDNP2803153391142 मधून नोंदणीकृत करावे लागले, त्‍याचा नोंदणी अहवाल तक्रारकर्तीस ई-मेलवर पाठविण्‍यांत आला. त्‍याच दिवशी दि.01.06.2015 रोजी तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षांकडे विमान व हॉटलची नोंदणी करतांना काहीतरी चूक झाली व तक्रारकर्तीचे नोंदणी मंजूर न होता तक्रारकर्तीचे खात्‍यातून पैसे कपात करण्‍यांत आले, अशी तक्रार करण्‍यांत आली. दि.24.06.2015 रोजी तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षास वरील नमुद कपात करण्‍यांत आलेली रक्‍कम परत करण्‍याची ई-मेलव्‍दारे विनंती केली. दि.23.07.2015 रोजी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीस चुकीच्‍या मेलव्‍दारे उत्‍तर पाठवुन सदर रक्‍कम देण्‍यांस नकार दिला. म्‍हणून दि.13.10.2015 रोजी तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षास वकीलामार्फत नोटीस पाठविला. सदर नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा विरुध्‍द पक्षांनी त्‍याची कोणतीही दखल घेतली नाही व उत्‍तरही पाठविले नाही. म्‍हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. 

2.  तक्रारकर्तीने तक्रारीत पुढे मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीस टिकीट करता कपात करण्‍यांत आलेली रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍याचा आदेश व्‍हावा. तसेच तक्रारकर्तीस झालेल्‍या शारीरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्‍याचा आदेश व्‍हावा. 

3.   तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन विरुध्‍द पक्षांना नोटीस काढण्‍यांत आला, विरुध्‍द पक्षास नोटीस मिळाल्‍यावर त्‍यांनी निशाणी क्र.7 वर आपले लेखीउत्‍तर दाखल केले. विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी उत्‍तरात असे कथन केले आहे की, तक्रारकर्तीने विमानाची टिकीटे व हॉटेलच्‍या नोंदणी संदर्भात श्री. नरेश गायकवाड यांचे ई-मेल पत्‍त्‍यावर देण्‍यांत आलेला होता. त्‍यानंतर विमानाची व हॉटेलच्या नोंदणी confirmation (पुष्‍टीकरण) श्री. नरेश गायकवाड यांचे ई-मेलवर देण्‍यांत आले होते. तक्रारकर्तीने स्‍वतःचा चुकीचा ई-मेल बॉक्‍स पाहीला असल्‍याने विरुध्‍द पक्षांनी त्‍यात कोणतीच चुक केलेली नाही. तसेच पहील्‍यांदा नोंदणी करतांना जर संगणकावर दर्शवित असलेले पान संपुष्‍टात आले असेल तर तक्रारकर्तीला तिची ई-मेल आयडी बघुन त्‍या संदर्भात नोंदणी मंजूर झाली किंवा नाही याची चौकशी करावयास पाहीजे होती, परंतु त्‍यांनी तसे केले नाही ही बाब लपवुन सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. म्‍हणून सदरची तक्रार खारिज होण्‍यांस  पात्र आहे. विरुध्‍द पक्षांनी पुढे असे कथन केले आहे की, तक्रारकर्तीने तक्रारीत लावलेले सर्व आरोप त्‍यांना नाकबुल आहे, म्‍हणुन सदर तक्रार खारिज करण्‍यांत यावी, अशी विनंती केली आहे.

 

4.  तक्रारकर्तीतर्फे दाखल तक्रार, दस्‍तावेज, विरुध्‍द पक्षांनी दाखल केलेले लेखीउत्‍तर तसेच लेखी व तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यांत आला असता मंचासमक्ष खालिल मुद्दे विचारार्थ घेण्‍यांत आले.

                     मुद्दे                                                                                    निष्‍कर्ष

  1. तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षांची ग्राहक आहेत काय ?                       होय.
  2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीप्रती अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा

        अवलंब केला आहे काय ?                                                        होय.

  1. अंतिम आदेश काय ?                                                   अंतिम आदेशाप्रमाणे.                           

                                    - //  कारणमिमांसा // - 

5. मुद्दा क्र. 1 बाबतः-  तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षांकडे दि.01.06.2015 रोजी तिचे IDNP2802453387220 मार्फत विमान व हॉटेचली नोंदणी केली होती व तक्रारकर्तीचे खात्‍यातून त्‍याबाबत रक्‍कम कपात करण्‍यांत आली होती, ही बाब दोन्‍ही पक्षांना मान्‍य असुन तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षांची ग्राहक आहे हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यांत येते. 

6. मुद्दा क्र. 2 बाबतः-  तक्रारकर्तीने सदर तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या ई-मेलव्‍दारे विरुध्‍द पक्षासोबत खालिल पत्र व्‍यवहारांची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे वादातील व्‍यवहारा संदर्भात तक्रार केली होती व त्‍या व्‍यवहाराची मान्‍यता विरुध्‍द पक्षांकडून मिळाली नसल्‍यामुळे त्‍याबाबत कपात करण्‍यांत आलेली रक्‍कम परतही मागितली होती. परंतु विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्तीच्‍या तक्रारीवर बरेच दिवस घेतले व  शेवटी तक्रारकर्तीस सदर रक्‍कम परत देण्‍यांस नकार दिला. विरुध्‍द पक्षाने त्‍याच्‍या बचावात्‍मक अशी बाजू मांडली आहे की, तक्रारकर्तीचा वादातील व्‍यवहाराचे मंजूरीबाबत मेल पाठविण्‍यांत आला होता, याबाबत  कोणताही पुरावा दस्‍तावेजांव्‍दारे सादर केलेला नाही. म्‍हणून विरुध्‍द पक्षांनी आपलया बचावास्‍तव आणलेले तथ्‍य  ग्राह्य धरता येत नाही. तक्रारकर्तीस नोंदणी संदर्भात मंजूरी मेलव्‍दारे न पाठवता व त्‍याच संदर्भात तक्रार केल्‍यावरही दूर्लक्ष करणे ही बाब तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या नोटीस दि.11.10.2015 वरुन सिध्‍द होते. तसेच विरुध्‍द पक्षाने कोणतीही दखल न घेता तसेच कोणतेही उत्‍तर  तक्रारकर्तीस दिले नाही, म्‍हणून तक्रारकर्तीने तक्रारीत विरुध्‍द पक्षांविरुध्‍द लावलेले आरोप सिध्‍द करते असे मंचाचे मत झाले आहे. सबब विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्तीकडून विमानाची व हॉटेलचे नोंदणीबाबत रक्‍कम स्विकारुन त्‍याचे स्विकृतीचे पत्र (पुष्‍टीकरण) पाठविले नाही व त्‍या संदर्भात तक्रारकर्तीकडून रक्‍कम कपात करुन तक्रारकर्तीप्रति अनुचित व्‍यापार पध्‍दतीची अवहेलना केल्‍याचे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यांत आलेले आहे. 

7..   मुद्दा क्र.3 बाबतः-  मुद्दा क्र. 1 व 2 चे विवेचनावरुन खालिल प्रमाणे अंतिम आदेश पारित करण्‍यांत येत आहे..

- // अंतिम आदेश // -

1.    तक्रारकर्तीची ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल तक्रार विरुध्‍द पक्षाविरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यांत येते.

2.    विरुध्‍द पक्षाने वादातील पत्रव्‍यवहाराबाबत तक्रारकर्तीचे खात्‍यातून रु.29,675/- विमान टिकीट व हॉटेलबाबत कपात केलेली रक्‍कम तक्रारकर्तीस दि.01.06.2015 पासुन ते अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% व्‍याजासह परत करावी.

3.  विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्तीस झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,500/- अदा करावे.

4.   विरुध्‍द पक्षांनी वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत करावी.

5.    उभय पक्षास सदर आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

6.    तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.