Maharashtra

Nagpur

CC/93/2020

YASH DILIP SENGAR - Complainant(s)

Versus

MAKE MY TRIP THROUGH ITS MANAGER - Opp.Party(s)

ADV Y. M. RAHATE

16 Feb 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/93/2020
( Date of Filing : 11 Feb 2020 )
 
1. YASH DILIP SENGAR
PLOT NO 146, NILKANTH NAGAR HUDKESHWR ROAD, NAGPUR 440034
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. MAKE MY TRIP THROUGH ITS MANAGER
227, MONA ENCLAVE, WEST HIGH COURT ROAD, OPP PYRAMID MALL, GOKULPETH NAGPUR 440010
NAGPUR
MAHARASHTRA
2. MAKE MY TRIP
19TH FLOOR TOWER C BUILDING NO 5, DLF CYBER CITY GURUGRAM 122002
GURUGRAM
3. HOTEL RAJ REGENCY THROUGH ITS MANAGER
OPP. M.I.D.C. NAGAR, MANMAD ROAD, AHMEDNAGAR, TAH & DIST AHMEDNAGAR 414111
AHMEDNAGAR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV Y. M. RAHATE, Advocate for the Complainant 1
 ADV. SWAPNIL S. SHINGANE & KRUSHNA PATEL, Advocate for the Opp. Party 1
Dated : 16 Feb 2023
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजणे यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,   विरुध्‍द पक्ष 1 व 2 हे ऑनलाईन द्वारे ग्राहकांना सेवा देण्‍याचा व्‍यवसाय करतात. यामध्‍ये विमान तिकीट, आंतरराष्‍ट्रीय आणि घरगुती हॉलीडे पॅकेज, हॉटेल आरक्षण, रेल्‍वे आणि बस सेवा तिकीट बुक करुन देणे इत्‍यादी सेवा देतात. विरुध्‍द पक्ष 3 हे अहमदनगर मधील नामांकित हॉटेल एजन्‍सी आहे व ते विरुध्‍द पक्ष 1 व 2 मार्फत ग्राहकांनी हॉटेल मधील आरक्षित केलेले कक्ष देण्‍याची सेवा स्‍वीकारतात.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने आपल्‍या कुटुंबासह नागपूर ते गोवा आणि गोवा ते औरंगाबाद आणि त्‍यांनतर औरगांबाद वरुन नागपूर असा पर्यटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तक्रारकर्ता हा कुटुंबासह गोव्‍यावरुन औरंगाबाद येथे परत येतांना रात्रीची वेळ असल्‍यामुळे रस्‍त्‍यावर थांबा घेण्‍याच्‍या उद्देशाने वि.प. 1 व 2 मार्फत विरुध्‍द पक्ष 3 च्‍या हॉटेल मधील 3 कक्ष 7 व्‍यक्‍तीकरिता दि. 05.06.2019 ला रात्री 20.27 मि. ऑनलाईन द्वारे आरक्षित केले होते व याकरिता रुपये 2,530/- अदा केले होते. विरुध्‍द पक्ष 3 यांनी सदर हॉटेल मधील आरक्षण हे एका रात्रीकरिता निश्चित केले होते व आरक्षणाची वेळ ही दि.05.06.2019 च्‍या रात्री 12 पासून ते दि.06.06.2019 च्‍या सकाळच्‍या 11.00 वा. पर्यंतची होती.  
  3.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, तो त्‍याच्‍या कुटुंबासह दि. 05.06.2019 ला रात्री 10.15 मि. हॉटेल मध्‍ये पोहचले त्‍यावेळी वि.प. 3 च्‍या मॅनेजरने हॉटेल मधील 2 रुम मध्‍ये शॉर्ट सर्किट झाल्‍यामुळे ते हॉटेलमधील आरक्षित कक्ष देऊ शकत नसल्‍याचे सांगितले असतांना सुध्‍दा तेव्‍हा तक्रारकर्ता हा रात्रीच्‍या 12.15 मि. पर्यंत आरक्षित कक्ष मिळण्‍याकरिता वाट बघत होता. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 3 यांच्‍या हॉटेल मधील रुम  आरक्षीत केल्‍यानंतर ही त्‍यांना रुम देण्‍यात आल्‍या नाही, परंतु सत्‍यतः विरुध्‍द पक्ष 3 यांनी सदरच्‍या आरक्षित रुम हया दुस-या ग्राहकाला दिलेल्‍या होत्‍या.  विरुध्‍द पक्ष 3 यांनी तक्रारकर्त्‍याला ऑनलाईन द्वारे बुक केलेल्‍या रुम उपलब्‍ध करुन न दिल्‍याने तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या कुटुंबासह मध्‍यरात्री दुस-या हॉटेलचा शोध घ्‍यावा लागला व त्‍याकरिता अधिकचे रुपये 4,000/- खर्च करावे लागले. तसेच तक्रारकर्त्‍याला कुटुंबासह दि. 06.06.2019 चे औरंगाबाद येथील कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थिती राहता आले नाही.  विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांनी योग्‍य सेवा न पुरविल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला नाहक शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावा लागला. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे घोषित करावे. तसेच तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे रुम आरक्षण पोटी जमा केलेली रक्‍कम रुपये 2,530/- अदा केल्‍यापासून द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह परत करण्‍याचा आदेश द्यावा. तसेच दुस-या हॉटेल मध्‍ये राहण्‍याकरिता करावा लागेला खर्चाची रक्‍कम रुपये 4,000/- व अधिकच्‍या खर्चाची रक्‍कम रुपये 10,470/- व्‍याजासह परत देण्‍याचा आदेश द्यावा. त्‍याचप्रमाणे शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.
  4.      विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या द्वारे दि.05.06.2019 ला विरुध्‍द पक्ष 3 च्‍या हॉटेल मध्‍ये 7 व्‍यक्‍तीच्‍या राहण्‍याकरिता 3 कक्ष आरक्षित केले होते व सदरच्‍या आरक्षणाची Booking ID NH7501019216830 द्वारे निश्‍चित करण्‍यात आली होती व याकरिता तक्रारकर्त्‍याने  रुपये 2,530/- अदा केले. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडे पोहचला त्‍यावेळी तेथील मॅनेजरने हॉटेलमधील 2 रुम मध्‍ये शॉर्टसर्किट झाल्‍यामुळे कक्ष पुरविता येत  नसल्‍याबाबत तक्रारकर्ता व इतर लोकांना सांगितले. विरुध्‍द पक्ष 3 ने हॉटेलमधील कक्ष न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मध्‍यरात्री 12.15 मि. पर्यंत वाट बघत बसल्‍याबाबतचा आरोप केला आहे, परंतु याबाबत विरुध्‍द पक्षाकडे 1 व 2 कडे यांच्‍याकडे तक्रार केली नाही.  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे तक्रार केली असती तर तक्रार प्राप्‍त झाल्‍यावर त्‍यांनी त्‍वरित सदरच्‍या तक्रारीचे निराकरण करण्‍याकरिता संबंधित सेवा देणा-या वि.प.कडे सदरची तक्रार पाठविली असती. त्‍यामुळे संबंधित सेवा देणा-याने सेवा दिली नाही याकरिता वि.प. 1 व 2 ला जबाबदार धरण्‍यात येऊ नये. तसेच तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍याकडे कोणतीही तक्रार केलेली नाही.  वि.प. 1 व 2 यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसतांना सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍या विरुध्‍द तक्रार दाखल केली आहे. म्‍हणून वि.प. 1 व 2 विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

 

  1. विरुध्‍द पक्ष 3  यांना आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर देखील ते आयोगा समक्ष हजर झाले नाही अथवा आपला लेखी जबाब दाखल न केल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 3 विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा दि. 02.03.2021 रोजी आदेश पारित करण्‍यात आला.
  2.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

1.  तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ               होय

2.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ॽ          होय

3.  काय आदेश ॽ                                      अंतिम आदेशाप्रमाणे  

 

                                                           कारणमिमांसा   

  1. मुद्दा क्रमांक 1, 2 व 3 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 व 2 मार्फत  दि.05.06.2019 ला विरुध्‍द पक्ष 3 च्‍या हॉटेल मध्‍ये 7 व्‍यक्‍तीच्‍या राहण्‍याकरिता 3 कक्ष आरक्षित केले होते व सदरच्‍या आरक्षणची Booking ID NH7501019216830 अशी असून याकरिता तक्रारकर्त्‍याने  रुपये 2530/- अदा केले होते हे नि.क्रं. 2(1 व 2) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष 1 ते 3 चा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याची विरुध्‍द पक्ष 3 कडे एका रात्रीकरिता म्‍हणजेच दि.05.06.2019 च्‍या रात्री 12.00 वा. पासून ते दि.06.06.2019 च्‍या सकाळच्‍या 11.00 वा. पर्यंतची होती हे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्ता हा दि. 05.06.2019 रोजी रात्री 10.15 मि. हॉटेल मध्‍ये पोहचला असता विरुध्‍द पक्ष 3 च्‍या हॉटेल मधील दोन रुम मध्‍ये शॉर्ट सर्किट झाले असल्‍यामुळे ते तक्रारकर्त्‍याला रुम उपलब्‍ध करु शकत नाही व तक्रारकर्ता हा रात्री 12.15 वा. पर्यंत थांबलेला होता असे विरुध्‍द पक्ष 3 यांनी लिहून दिलेले आहे हे नि.क्रं. 2(3) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष  1 व 2 मार्फत ऑनलाईन ने वि.प. 3 यांच्‍या हॉटेल मध्‍ये आरक्षित केलेल्‍या 3 रुम पैकी 2 उपलब्‍ध झालेले नाही हे स्‍पष्‍टपणे दिसून येते. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याकडून  3 कक्ष आरक्षित करण्‍याकरिता रक्‍कम स्‍वीकारुन ही त्‍याला योग्‍य सेवा पुरविली नाही ही विरुध्‍द पक्षाची दोषपूर्ण सेवा असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष 1 व 2 मार्फत विरुध्‍द पक्ष 3 च्‍या हॉटेल मध्‍ये कक्ष आरक्षणकरिता अदा केलेली रक्‍कम रुपये 2,530/- परत मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच विरुध्‍द पक्ष 3 यांनी तक्रारकर्त्‍याला योग्‍य सेवा न पुरविल्‍यामुळे मध्‍यरात्री तक्रारकर्ता व त्‍याच्‍या कुटुंबाला नाहक शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला हे निश्चितपणे दिसून येते.  
  2.      तक्रारकर्त्‍याने दुस-या हॉटेल मध्‍ये रुम बुक केल्‍याबाबतचे दस्‍तावेज अभिलेखावर दाखल न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने रुपये 10,470/- ची केलेली मागणी अमान्‍य करण्‍यात येते.   

  सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.     

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍याकडून हॉटेल बुकिंग पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 2530 /- व त्‍यावर दि. 05.06.2020 पासून म्‍हणजेच रुम बुकिंग दिनांकापासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम द्यावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1  ते 3 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या उपरोक्‍त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.  
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.