DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR | New Administrative Building | 5th Floor, Civil Lines, | Nagpur-440 001 | 0712-2548522 |
|
|
Complaint Case No. CC/5/2017 | ( Date of Filing : 03 Jan 2017 ) |
| | 1. Shri Vijay Chandaran Bajaj | R/o. 6/6A, New Colony, Maya Villa, Opp. Saurabh Apartment, Nagpur | Nagpur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Make My Trip India Pvt. Ltd., Through its Director Shri Adil Ajmeri | Office- Tower A, SP Infocity, 243, Udyo Vihar, Phase-1, Gurgaon 122016 | Gurgaon | Haryana | 2. Make My Trip India Pvt. Ltd. | Office- Tour Agency, 277, Mona Enclave, W.H.C. Road, Opp. Pyramid Mall, Gokulpeth, Nagpur 440010 | Nagpur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
|
BEFORE: | | | HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT | | HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER | | HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER | |
|
For the Complainant: | For the Opp. Party: | |
Dated : 27 Aug 2019 |
Final Order / Judgement | (मा. सदस्या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्या आदेशान्वये) - तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली असून त्यात असे नमूद केले की, तक्रारकर्त्याने दिनांक 20/05/2016 रोजी तक्रारकर्ते, त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा, मुलगी व पुतण्या या सर्वांचे नागपूर ते इंग्लड जाण्याकरिता व तेथुन दिनांक २८/०५/२०१६ ते ३०/०५/२०१६ रोजी स्कॅाटलॅंड येथे दोन दिवस व दोन राञी राहण्याकरीता ४९,६३५/- इतकी रक्कम विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना क्रेडीट कार्ड मार्फत अदा केली. विरुध्द पक्ष क्रं. 1 – हा एजंट असून तो मेक माय ट्रीप इंडिया प्रा.लि. , गुडगाव, हरियाणा या राज्यात यांचे मुख्य ऑफिस आहे व विरुध्द पक्ष क्रमांक 2, मेक माय ट्रीप इंडिया प्रा.लि. यांचे ऑफिस गोकुलपेठ येथे आहे.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराचे स्कॉटलंड येथील हॉटेल ID-MH 7114025416148 या नंबर द्वारे आरक्षित करण्यात आले होते व तसे त्यांनी तक्रारदारास कळविले होते. त्यानंतर तक्रारदारांना नागपूर सोडल्यापासून ते इंग्लंड च्या प्रवासात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवली नाही परंतू तक्रारदारानी दिनांक २८/५/२०१६ ला स्कॉटलंड कडे प्रयाण केले असता विरुध्द पक्ष ने त्यांना स्कॉटलंड येथील हॉटेल चे आरक्षण रद्द झाले असल्याचे कळविले. त्यामुळे तक्रारदाराने त्यांना पर्यायी व्यवस्था करण्यासंबंधी सांगितले. तक्रारदाराने विरुध्द पक्षाला त्याच हॉटेलमध्ये पर्यायी व्यवस्था करण्याकरीता सुचविले. परंतू विरुध्द पक्षाने त्यांची व्यवस्था दुस-या हॉटेल मध्ये केले व त्या हॉटेल मध्ये केवळ एकच खोली उपलब्ध होती. त्यामुळे तक्रारदारास दोन खोल्यांच्या ऐवजी एकाच खोलीत दोन दिवस काढावे लागले व ही उपलब्ध असलेल्या खोलीमध्ये व्यवस्थीत सुविधा उपलब्ध नव्हत्या व राञी १२ ते ६ पर्यंत तक्रारकर्त्यास खोली रिकामी होण्याकरीता तब्ब्बल सहा घंटे वाट बघावी लागली. या खोली चे स्टॅंडर्ड पूर्व आरक्षित केलेल्या खोल्यांप्रमाणे नव्हते ते वाईट स्तराचे होते व या एका खोलीकरीता तक्रारदारास अतिरीक्त ३८,०००/- रुपये इतकी रक्कम भरावी लागली. या प्रमाणे तक्रारदारास भयंकर मानसिक, शारीरीक व आर्थिक ञास सहन करावा लागला.
- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दिनांक ३/९/२०१६ रोजी कायदेशीर नोटीस पाठविली व विरुध्द पक्षाकडे जमा रक्कम रुपये ४९,६३५/- वापस करण्यासंबंधी सूचविले परंतू विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्त्यास केवळ रुपये २३,८९९/- इतकी रक्कम ३/६/२०१६ रोजी R.R.N. 615601565374 द्वारे परत व उरलेली रक्कम तक्रारकर्त्यास लवकरच वापस करणार असे आश्वासन दिले परंतू आजतागायत विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास उर्वरीत रक्कम परत केली नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाने आपल्या सेवेत ञुटी केल्याचे निष्पन्न होते.
- तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली की, विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 ने सेवेत त्रुटी केली असल्याचे घोषित करावे. तसेच विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला रक्कम रुपये ४९,६३५/- , द.सा.द.शे २४ टक्के दराने परत करावे, तसेच विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 1500000/- द्यावे व तक्रारीचा खर्च रुपये ३०,०००/- देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
- विरुध्द पक्ष क्रं.1 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. १२ वर दाखल केला असून त्यात नमूद केले की, विरुध्द पक्ष हे ग्राहकांच्या त्यांचे देशातील व विदेशातील याञांचे आयोजन करुन देतात. म्हणजेच ते मध्यंस्थांचे कार्य करतात. ते रेल्वे, बस, विमानाचे टिकीट काढून देतात त्याचप्रमाणे कार किरायावर आयोजीत करुन देतात, हॉटेल चे आरक्षण करुन देतात व याञेकरुंचे हॉलिडे पॅकेज चे प्रोग्राम चे आयोजन करुन देतात. तक्रारकर्त्याने देखील विरुध्द पक्षाकडे इंग्लंड व तेथुन स्कॉटलँड येथे जाण्याकरीता विरुध्द पक्षाकडून याञा आयोजीत केली होती. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे विरुध्द पक्षाने इंग्लंड व स्कॅाटलॅड येथे हॉटेल आरक्षित करुन दिले होते व त्याची माहिती तक्रारकर्त्यास दिली होती. विरुध्द पक्षाने स्कॉटलॅंड येथील Brook Queens Ferry Hotel, येथील हॉटेल दोन दिवस व दोन राञी करीता आरक्षित केले होते व या हॉटेल ने त्याचे पक्के आरक्षण पावती देखील दिली होती परंतू तक्रारकर्ते या हॉटेलमध्ये पोहोचण्याच्या थोडया वेळापूर्वी या हॉटेलवाल्यांनी तक्रारदाराचे आरक्षण रद्द केले असल्याचे तक्रारदाराला कळविले. यामध्ये विरुध्द पक्षाचा कोणताही दोष नाही कारण ते हॉटेल विरुध्द पक्षाचे नाही. त्यामुळे उपरोक्त हॉटेल ने तक्रारकर्त्याचे आरक्षण रद्द केले हा विरुध्द पक्षाचा दोष नाही. त्याचप्रमाणे उपरोक्त हॉटेल ने तक्रारकर्त्याचे बुकींग रद्द केल्याचे कळताच विरुध्द पक्षाने त्यांना जेथे मिळाले त्या पर्यायी हॉटेल मध्ये व्यवस्था करुन दिली व तक्रारकर्त्यास रुपये २५,७३६/- परत केले. त्यामुळे विरुध्द पक्षाचा यात कोणताही दोष नाही व तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून जास्तीचे पैसे मिळविण्याकरीता सदरची तक्रार मंचात दाखल केली आहे करीता तक्रारकर्त्याची ही तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती विरुध्द पक्षाने केली आहे.
- उभय पक्षाने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तावेज, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद इत्यादीचे अवलोकन केले असता खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे उत्तर - तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय? होय.
- विरुध्द पक्षाने सेवेत त्रुटी केली आहे काय? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा - मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ कडून इंग्लंड व स्कॉटलॅंड येथील याञेचे आयोजन केले होते. तक्रारकर्त्याला नागपूर ते इंग्लंड या प्रवासात कोणतीही समस्या उद्भवली नाही परंतू इंग्लंड ते स्कॉटलॅंड येथील प्रवासात ऐन वेळेवर विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 द्वारा उपरोक्त हॉटेल द्वारा दोन खोल्यांचे आरक्षण रद्द करण्यात आल्याने तक्रारकर्त्यास भारी मनस्तापाचा सामना करावा लागला. वेळेवर तक्रारकर्त्यांना संपूर्ण परिवारासहीत २ खोल्यांऐवजी एकाच खोलीत दोन दिवस मुक्काम करावा लागला. त्याचप्रमाणे इंग्लंड ते स्कॉटलॅंड येथील 10 तासाचा प्रवास तक्रारकर्त्यांना बाय रोड करावा लागला होता व स्कॉटलॅंड येथे पोहचल्यानंतर देखील संपूर्ण परिवाराला ६ तास हॉटेलच्या बाहेर वाट बघावी लागली होती. त्यामुळे तक्रारकर्त्यांचा निर्धारीत वेळापञक बिघडले. त्यामुळे स्कॉटलॅंड येथील प्रेक्षणिय स्थळे तक्रारकर्ते व त्यांचा परिवार बघु शकला नाही. याप्रमाणे तक्रारकर्त्याचा स्कॉटलॅंड येथील प्रवास वाया गेला व त्यांना शारीरीक, मानसिक व आर्थिक ञास सहन करावा लागला. ऐन वेळेवर ३८,०००/- रुपये खर्च करुन तक्रारकर्त्यास निम्न स्तराच्या दोन खोल्यांऐवजी एकाच खोली मध्ये दोन दिवस व दोन राञी निवास करावा लागला. विरुध्द पक्षाला स्वतःची चुक उमगल्यामुळे व त्यांनी सेवेत ञुटी केली असल्यामुळे त्यांनी तक्रारकर्त्यास रुपये २३८९९/- इतकी रक्कम दिनांक ३/६/२०१६ रोजी R.R.N. 615601565374 द्वारे परत केली असल्याचे निशानी क्रमांक ७ वरील दाखल दस्ताऐवजाप्रमाणे दिसून येते. त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे इंग्लड ते स्कॉटलॅंड येथील प्रवासाकरीता जमा केलेली रक्कम रुपये ४९६३५/- मधील उर्वरीत रक्कम रुपये २५७३६/- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास 12 द.सा.द.शे. व्याज दराने तक्रारकर्त्यास परत करावे. व तक्रारकर्त्यास व त्याच्या परिवाराला तत्काळ स्कॉटलॅंड येथे निम्न स्तराच्या खोलीमध्ये रुपये ३८०००/- मध्ये दोन खोल्यांएवजी एकाच खोलीत वास्तव्य करावे लागले. यावरुन तक्रारकर्त्यास बाहेरदेशात अपरिचीत ठिकाणी अत्यंत मनस्ताप सहन करावा लागला. तक्रारकर्ता यांची अत्यंत गैरसोय झाली आहे. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याला आर्थिक, शारीरीक व मानसिक ञास सहन करावा लागला. त्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास या ञासाकरीता रुपये ८००००/- द्यावे व तक्रारीचा खर्च रुपये १००००/- द्यावा असे मंचाचे मत आहे. सबब मंचाद्वारे खालिप्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्द पक्ष १ व २ यांच्या विरुध्द संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्ष १ व २ यांनी तक्रारकर्त्याला संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या तक्रारकर्त्यास रुपये २५७३६/- द.सा.द.शे. १२ टक्के दराने दिनांक ३/६/२०१६ पासून रकमेच्या संपूर्ण अदायगीपर्यंत व्याज अदा करावे.
- विरुध्द पक्ष १ व २ यांनी संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये ८००००/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये १००००/- द्यावे.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत विरुध्द पक्ष १ व २ यांनी संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |
|
| [HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL] | PRESIDENT
| | [HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS] | MEMBER
| | [HON'BLE MR. SUBHASH R. AJANE] | MEMBER
| |