Complaint Case No. CC/540/2017 | ( Date of Filing : 29 Nov 2017 ) |
| | 1. SHRI. KAILASH ASHOK SATIJANI | R/O. PLOT NO. 10, KHUSHI NAGAR, NEAR SAI MANDIR, JARIPATKA, NAGPUR-440014 | NAGPUR | MAHARASHTRA | 2. SHRI. OMPRAKASH HARIRAM HARIRAMANI | R/O. C/O. HARIRAMANI ASSOCIATES, NMC COMPLEX, JB WING, 12 12A, 3RD FLOOR, MANGALWARI COMPLEX, SADAR, NAGPUR-440001 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. MAKE MY TRIP INDIA PRIVATE LIMITED | DLF BUILDING 5, TOWER C, DLF CYBER CITY, DLF PHASE 2, SECTOR 25, GURUGRAM, HARYANA-122002 | GUDGAON | HARYANA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्ते क्रं. 1 व 2 यांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली असून त्यात नमूद केले की, त्यांनी त्यांच्या कुटुंबासह दि. 24 ते 26 जुन 2017 या 3 दिवसाची पचमढी येथे जाण्याकरिता सहलीचे आयोजन केले व असे सर्व मिळून एकूण 15 व्यक्ती होते, त्यामुळे तक्रारकर्त्यांनी 17 सिटर बसचे आरक्षण केले. विरुध्द पक्षाचा हॉटेल व रिसोर्ट बुक करण्याचा व्यवसाय आहे, यासंबंधीची तक्रारकर्ते यांनी जाहिरात बघितलेली होती. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्षाशी ऑनलाईन वरुन संपर्क साधून पचमढी येथील वनस्थली या हॉटेल मधील एकूण 5 वातानुकूलित कक्ष 15 व्यक्तिंच्या सकाळच्या न्याहारीसह दिनांक 24 ते 25 जुन 2017 या कालावधीकरिता आरक्षित केले होते. त्याकरिता तक्रारकर्ता क्रं. 2 ओमप्रकाश हरिरामानी यांनी त्यांचे बॅंक ऑफ महाराष्ट्र, सदर, नागपूर येथील बचत खाते क्रं. 60163940633 अन्वये रुपये 71,038/- दि. 20.06.2017 ला विरुध्द पक्षाला ऑनलाईन मार्फत अदा केले होते. त्याप्रमाणे विरुध्द पक्षाने सदरची रक्कम प्राप्त झाल्याचे त्यांचे ID No. NH2003854139669 द्वारे निश्चित केले आहे, याकरिता विरुध्द पक्षाचे प्रतिनिधी विशाल गोस्वामी हे तक्रारकर्त्यांशी संपर्क साधून होते व त्याने तक्रारकर्त्यास चांगली सुखसोयी देण्याचे आश्वासन दिले होते.
- तक्रारकर्त्याने पुढे नमूद केले की, दि. 23.06.2017 (शनिवार) रोजी ठरल्याप्रमाणे तक्रारकर्ते 15 व्यक्तींसह पचमढी येथील वनस्थली कॉटेजला पोहचले असता त्यांना कळले की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यांच्या नांवाने कोणत्याही प्रकारचे आरक्षण केलेले नाही व त्यांच्याकडे वेळेवर आरक्षण करण्याकरिता कक्ष उपलब्ध नव्हते. अंदाजे 8 तासांचा प्रवास केल्यानंतर तक्रारकर्ते यांना महिला व मुलांसह एकूण 15 व्यक्तींसह रात्रीच्या 10.00 वाजता पर्यंत केवळ बस मध्ये बसून राहावे लागले. तक्रारकर्त्याने 5 कक्ष आरक्षण करण्याकरिता रुपये 71,038/- एवढी रक्कम खर्च करुन सुध्दा त्यांना अत्यंत मनस्ताप भोगावा लागला. तसेच सलग आलेल्या सुट्टयांचे दिवस (शनिवार, रविवार व सोमवार) असल्यामुळे तक्रारकर्त्यास इतर ठिकाणी देखील कक्ष आरक्षण मिळण्याकरिता भरपूर त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारकर्त्यास पुन्हा पचमढीच्या मागे 60 कि.मी. अंतरावर असलेली पिपरीया गावाला जाऊन रुपये 40,000/- अतिरिक्त खर्च करुन MNR या रिसोर्ट मध्ये रात्र काढावी लागली व उर्वरित दोन दिवस सुध्दा विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास वनस्थली कॉटेज मध्ये कक्ष उपलब्ध करुन दिले नाही. तसेच तक्रारकर्त्याची जमा रक्कम रुपये 71,038/- सुध्दा परत केली नाही. अशा प्रकारे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची फसवणूक करुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन सेवेत त्रुटी केलेली आहे, म्हणून तक्रारकर्त्यांनी प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन तक्रारीत अशी मागणी केली की, त्याने विरुध्द पक्षाकडे ऑनलाईन द्वारे जमा केलेली रक्कम रुपये 71,038/- परत करण्याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च असे एकूण रुपये 16,66,038/- देण्याचा आदेश व्हावा.
- विरुध्द पक्षाने आपला लेखी जबाब नि.क्रं. 5 वर दाखल केला असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील आक्षेप नाकारलेला आहे. विरुध्द पक्षाने पुढे असे नमूद केले की, तक्रारकर्त्याने आरक्षित केलेले वातानुकूलित कक्ष हे आरक्षित नसून प्रतिक्षा यादीत होते व विरुध्द पक्षाने दि. 24 जुन ते 26 जुन 2017 या कालावधीत कोणत्याही प्रकारचे कक्ष उपलब्ध नसल्याचे कळविले होते. तरी सुध्दा तक्रारकर्त्यांनी जाणूनबुजून उपरोक्त कालावधीत महिला व मुलांसह पचमढी येथे पर्यटनाचा कार्यक्रम आयोजित केला. तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला माहिती देऊन अन्य रिसोर्ट मध्ये कक्ष आरक्षित करण्याकरिता विचारले होते. परंतु तक्रारकर्ते यांनी केवळ वनस्थली कॉटेज मध्येच कक्ष आरक्षित करण्याकरिता दबाव टाकीत होते. तक्रारकर्त्याने वनस्थली कॉटेज यांनाच ऑनलाईनवरुन पेमेंट केले होते व हे पेमेंट विरुध्द पक्ष मेक माय ट्रीप यांना प्राप्त न होता सदरचे पेमेंट वनस्थली कॉटेज यांना (Direct) प्रत्यक्ष करण्यात आले आहे. वनस्थली कॉटेज यांनी आपल्या स्टेटसमध्ये दिनांक 24 जुन ते 26 जुन 2017 या कालावधीकरिता “Sold out” असे आपल्या वेब साईडवर नमूद केलेले होते. त्यामुळे वनस्थली कॉटेज यांनीच तक्रारकर्त्यांना त्यांची जमा रक्कम ऑनलाईन द्वारे परत करणे आवश्यक होते. विरुध्द पक्ष मेक माय ट्रीप हे तक्रारकर्ते व वनस्थली कॉटेज यामध्ये मध्यस्थीचे कार्य करीत होते. विरुध्द पक्षाने वारंवांर तक्रारकर्त्यास पचमढी येथे आयोजित केलेल्या पर्यटनांच्या तारखांमध्ये बदल करण्याचे सूचविले होते, परंतु तक्रारकर्त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सदरच्या घटनेकरिता विरुध्द पक्ष मेक माय ट्रीप जबाबदार नसून तक्रारकर्ते स्वतः जबाबदार आहे. तक्रारकर्त्याने वनस्थली कॉटेज यांच्याकडे प्रत्यक्ष रक्कम जमा केली असल्यामुळे वनस्थली कॉटेज यांनीच तक्रारकर्त्याची रक्कम परत करणे आवश्यक आहे. याकरिता विरुध्द पक्षाने “Civil Appeal 1560 of 2004 Sonic Surgical Vs. National Insurance Company Ltd. (reported in 2010 CTJ 2 (Supreme Court) CPJ. तसेच “Synco Industries Vs. State Bank of Bikaner & Jaipur & Ors” (reported in (2002) 2 SCC 1 ) यातील न्यायनिवाडे नमूद केले. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.
- उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज, लेखी युक्तिवाद व त्यांच्या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेतले व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.
अ.क्रं. मुद्दे उत्तर - तक्रारकर्ते विरुध्द पक्षाचे ग्राहक आहे काय ? होय
2. विरुध्द पक्षाने दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला काय ? होय - काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
- मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत - तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या वेब साईटवरुन पचमढी येथील वनस्थली कॉटेज मधील 5 वातानुकूलित कक्ष 15 व्यक्तींकरिता दि. 24 जुन 2017 ते 26जुन 2017 या कालावधीकरिता आरक्षित केले होते व 5 कक्ष आरक्षित झाल्याचे (confirmation) पुष्टीकरण झाल्याचे दर्शविलेले दस्तऐवज नि.क्रं. 2(1) वर दाखल केलेले आहे. तसेच नि.क्रं. 2(2) वर दाखल दस्तऐवजावरुन स्पष्ट होते की, तक्रारकर्ता क्रं. 2 यांच्या बॅंक ऑफ महाराष्ट्र, सदर नागपूर येथील खात्यामधून दि. 20.06.2017 रोजी रुपये 71,038/- अदा केलेले होते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास दिनांक 20 जुन 2017, रोजी सध्यांकाळी 5.55 मि. वर ई- मेल पाठविला आहे, त्यात तक्रारकर्त्याचे नांवे 5 वातानुकूलित कक्ष confirmation झाल्याचे कळविले आहे. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने यासंबंधी वनस्थली कॉटेज सोबत संपर्क करणे आवश्यक नाही असे स्पष्ट कळविले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी वनस्थली कॉटेज यांच्याशी संपर्क न साधता प्रत्यक्ष दि. 23.06.2017 रोजी वनस्थली कॉटेज येथे महिला व मुलांसह एकूण 15 व्यक्तींसह पोहचले. या मेल नुसार तक्रारकर्त्याने वनस्थली कॉटेज यांना विरुध्द पक्ष मेक माय ट्रीप द्वारे रक्कम रुपये 71,038/- अदा केले असल्याचे मेल मध्ये देखील स्पष्ट नमूद आहे.
- तक्रारकर्त्याने वनस्थली कॉटेज यांना सदरच्या प्रकरणात पक्षकार केलेले नाही. तसेच वनस्थली कॉटेज यांच्याकडून त्यांची जमा रक्कम रुपये 71,038/-परत मागणे आवश्यक आहे असे विरुध्द पक्षाने आपल्या लेखी जबाबात नमूद केले असले तरी वास्तविकतः विरुध्द पक्ष यांनी स्वतः तक्रारकर्ते यांच्या मेलवर दि. 20.06.2017 रोजी 5 वातानुकूलित कक्ष (confirmation) आरक्षित असल्याचे कळविले आहे व तक्रारकर्त्यास वनस्थली कॉटेज यांच्याशी संपर्क साधू नये असे ही मेल मध्ये नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने वनस्थली कॉटेज येथे कुणाशी ही संपर्क न साधता प्रत्यक्ष दि. 23.06.2017 रोजी महिला व लहान मुलांसह पचमढी येथे प्रयाण केले. तक्रारकर्ते व त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींनी 8 तासांचा कठीण प्रवास केल्यानंतर तक्रारकर्ते व त्यांच्या सोबतच्या सहप्रवाश्यांना सायंकाळी 6.00 वा. पचमढी येथे पोहचल्यानंतर सुध्दा रात्री 10.00 वाजता पर्यंत बस मध्येच बसून राहावे लागले व त्यानंतर पुन्हा 60 कि.मी. मागे जाऊन पिपरिया सारख्या छोटया गावांत रुपये 40,000/- वेळेवर खर्च करुन निृकष्ट दर्ज्याच्या कक्षांमध्ये वास्तव्य करावे लागले. त्यानंतरचे दोन दिवस सुध्दा विरुध्द पक्षाने तक्रारकर्ते यांना वनस्थली कॉटेज मध्ये कक्ष उपलब्ध करुन दिले नाही. उपरोक्त घटनेवरुन तक्रारकर्त्या सोबत फसवणूक झाल्याचे दिसून येते. सदरचे आरक्षण विरुध्द पक्ष यांच्या वेब साईटवरुन केले असल्यामुळे सदरच्या घटनेकरिता विरुध्द पक्ष मेक माय ट्रीप हेच जबाबदार असल्याचे स्पष्ट होते.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या नांवे पाठविलेल्या मेल मध्ये असे नमूद आहे की, काही कारणास्तव सदरचे आरक्षण कायम (confirmation) न झाल्यास विरुध्द पक्ष हे 7 दिवसांच्या आंत स्वीकारलेली रक्कम परत करतील आणि विरुध्द पक्षाने 3 हप्त्यापर्यंत तक्रारकर्त्यास रक्कम परत न केल्यास विरुध्द पक्ष मेक माय ट्रीप हे तक्रारकर्त्याकडून घेतलेल्या रक्कमेच्या दुप्पट रक्कम परत करतील. असे असतांना सुध्दा विरुध्द पक्षाने आजतागायत तक्रारकर्त्याकडून स्वीकारलेली रक्कम रुपये 71,038/- परत केलेली नाही, ही विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला असल्याचे स्पष्ट होते. तसेच उपरोक्त घडलेल्या घटनेवरुन स्पष्ट दिसून येते की, विरुध्द पक्षाच्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्ते व त्यांच्या सहप्रवाश्यांना नाहक शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागले. याकरिता देखील तक्रारकर्ते यांना नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च मिळणे आवश्यक आहे असे मंचाचे मत आहे.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्ष मेक माय ट्रीप यांनी तक्रारकर्त्याकडून 5 वातानुकूलित कक्ष आरक्षणाकरिता स्वीकारलेली रक्कम रुपये 71,038/- परत करावी व सदरच्या रक्कमेवर दि. 20.06.2017 पासून ते रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजसह रक्कम तक्रारकर्त्याला परत करावी.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांना शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- अदा करावे.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत विरुध्द पक्षाने करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
| |