मा. सदस्या श्रीमती चंद्रिका बैस, यांच्या आदेशान्वये - तक्रारदाराने सदर ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे.
- वि.प.क्रं.1 व 2 ही कंपनी असुन आनलाईन ट्रॅव्हलींगचा व्यवसाय करतात त्याअंतर्गत ते देंशाअंतर्गत व देशाबाहेर जाण्याकरिता विमानाची तिकीटे, हॉलीडे पॅकेज बुकींग, हॉटेलचे बुकींग, रेल्वे व बसचे आरक्षण इत्यादी कामे करतात.
- तक्रारकत्याचा वैद्यकीय व्यवसाय असुन ते टावरी हॉस्पीटल मधे रिसर्च कन्स्लटंट असुन स्पायनल स्कॉटचे सर्जन आहेत. तक्रारदाराने साऊथ आफ्रीका मधील डर्बन येथे दि.४.८.२०१७ रोजी होणा-या सभेभागघेण्याकरिता मुंबई ते डर्बन, मेक माय ट्रीप या कंपनी कडुन दोन तिकीटे आरक्षीत केली. ठरल्याप्रमाणे तक्रारकर्ता मुंबई विमानतळावर दुपारी 4.00 पोहोचला. त्याकरिता तक्रारकर्ता एक तास जेट एअरवेजच्या काऊंटरवर तिकीट मिळण्याकरिता उभे होते. त्यानंतर तक्रारदाराला हे ऐकुन धक्काच बसला की तक्रारदारावे केवळ मुंबई ते सियाचिल पर्यतचे तिकीट आहे व पूढे सियाचिल ते डर्बन या प्रवासाचे तिकीट तक्रारदाराजवळ नाही. जेव्हा की तक्रारदाराने संपूर्ण प्रवासाचे पैसे वि.प.ला आगाऊ दिले होते. त्यामूळे तक्रारदाराने वेळेवर मुंबई ते डर्बन जाण्याकरिता रुपये 62,124/- एवढया रक्कमेचे तिकीट काढले. डर्बन वरुन परत आल्यावर तक्रारदाराने वि.प.शी संपर्क साधला असता वि.प.ने आपली चुक कबुल न केल्याने वि.प.ला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली.
- तक्रारदाराने आपल्यातक्रारीत पूढील मागणी केली आहे. वि.प.क्रं.1,2, व 3 यांनी संयुक्तीकरित्या रुपये 1,16,680/-(५४,५३४+६२,१४६), तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 10,00,000/- व तक्रारीचा खर्चापोटी रुपये 1,00,000/- ची मागणी केलेली आहे.
- तक्रादाराची तक्रार दाखल करुन वि.प.नोटीस काढण्यात आली. तक्रारीची नोटीस मिळाल्यानंतर वि.प. तक्रारीत हजर झाले व त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले. वि.प. आपले उत्तरात नमुद करतात की, त्यांचे कार्यालय हरियाणा येथे असुन ते आनलाईन ट्रॅव्हल कंपनीचा व्यवसाय करतात हे मान्य केले आहे. श्री एकांत मेहरा हे दिनांक 1.9.2017 पासुन या कंपनीचा अधिकृतरित्या कार्यभार पाहतात. तकारदाराचे म्हणण्याप्रमाणे 2.8.2018 रोजी मुंबई ते डर्बनचे श्री लोकेन्द सिंग व श्रीमती मधुबाला यांचे नावे आरक्षण केले होते त्याकरिता आरक्षणाची रक्कम रुपये 45,814/- व त्याचा बुकींग आयडी क्रं.MN7301119332246 असा होता. सदरचा वाद हा ETIHAD AIRLINES चा असल्यामूळे तो भारतातील ग्राहक वाद कायद्याअंतर्गत येत नाही. तसेच तक्रारदाराने त्या देशातील ट्रेन व टॅक्सीने प्रवास केला असल्याने हा वाद या देशाअतंर्गत येतो. तसेच तक्रारदाराने या वादाशी संबंधीत ETIHAD AIRLINES यांना तक्रारीत पक्षकार केलेले नाही. तसेच तक्रारदाराचे म्हणण्यानुसार विमानाचे आरक्षणाबाबत जो त्रास सहन करावा लागला तो ETIHAD AIRLINES यांचे विमान उपलब्द नसल्याने तक्रारदारास हा त्रास सहन करावा लागला. त्याकरिता त्यांनी वि.प.ने Agreement between user and make my trip अभिलेखावर दाखल केलेले आहे. तसेच वि.प.ने पूढे Bharathi Knitting Co. Vs. DHL Worldwide Express Courier [(1996) 4 SCC 704] हा न्यानिवाडा दाखल केला आहे. त्याकरिता वि.प. 1,2 हे जबाबदार नाही. त्यामूळे वि.प.क्रं.1 व 2 विरुध्द तक्रार खारीज करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. तसेच वि.प.क्रं.1 व 2 यांना तक्रारदाराचे जबाबदारीतुन मुक्त करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांना वि.प.क्रं.1 व 2 मुळे शारिरिक व मानसिक त्रास झाला हे सुध्दा अमान्य आहे.
- सदर प्रकरणात वि.प.क्रं.3 ला पक्षकार केल्यावर त्यांनी नोटीस मिळताच हजर झाले व आपले लेखी उत्तर सादर केले. वि.प.क्रं.3 आपले लेखी उत्तरात नमुद करतात की, तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासाकरिता वि.प.क्रं.1 हे जबाबदार आहेत. कारण तक्रारदाराने वि.प.क्रं.1-मेक माय ट्रीप यांचेकडुन मुंबई ते डर्बन (via Abji Dhabi and Mahe (one way)) तिकीट काढले होते व तिकीटाची रक्कमही वि.प.क्रं.1 यांना दिलेली होती. तक्रारदारास Abu Dhabi वरुन Mahe चे तिकीट Air Seychelles आणि Mahe ते Durban हे तिकीट साऊथ आफ्रीकन एअरवेजव्दारे काढण्यात आले होते. तक्रारदाराने या प्रवासाकरिता जे आरक्षण केले होते ते तिकीट विमानाच्या उपलब्धीवर अवलंबुन होते त्यामूळे वि.प.क्रं.3 ला याकरिता जबाबदार धरता येणार नाही. तक्रारदाराने प्रत्यक्षात वि.प.क्रं.1 यांचेशीच व्यवहार केल्यामुळे सदरची बाब ही वि.प.क्रं.1 शी निगडीत आहे. सदर प्रवासादरम्यान तकारदारास 3 वेगवेगळया विमानाने प्रवास करावयाचा होता परंतु सदरचा प्रवास हा स्वस्त असल्याने सदर प्रवासाचे तक्रारदाराने आरक्षण केले. तक्रारदार हा मुंबईला प्रवासाकरिता पोहचला असता त्यांनी मुंबई ते अबु धाबी या जेट एअरवेजच्या काऊंटरवर चौकशी केली असल्याचे तक्रारदाराने दाखल तिकीटाचे विमानाच्या क्रमांकावरुन स्पष्ट होते. परंतु त्यावेळी अबु धाबी येथे जाण्याकरिता ETIHAD AIRLINES कोणतेही विमान उपलब्ध नव्हते. तक्रारदाराचे तिकीट केवळ माहे पर्यतच होते. त्यामूळे सदरच्या प्रकरणात वि.प.क्रं.3 वर विनाकारण दोषरोपण करण्यात आलेले आहे. वि.प.क्रं.3 यांना तक्रारदाराने कतार एअरवेजचे वेळेवर रुपये ६२१२४/- तिकीट खरेदी केल्याबाबतची माहिती नाही. त्याकरिता वि.प.क्रं.3 ला जबाबदार धरता येणार नाही. तक्रारदाराने वि.प.क्रं.1 व 2 कडुन घेतलेले तिकीट हे नापरतावा (Non refundable ) तिकीट असल्याचे तिकीटावर नमुद होते. तसेच वि.प.क्रं.1 व 2 यांनी तक्रारदाराकडुन सदर प्रवासाकरिता कीती रक्कम घेतली हे सुध्दा वि.प.क्रं.3 यांना कल्पना नाही. त्यामुळे तक्रारदाराने सदर प्रवासाची रक्कम वि.प.क्रं.1 लाच दिली असल्यामूळे ते वि.प.क्रं.1 चे ग्राहक आहे कारण वि.प.क्रं.3 ने त्यांचेशी संबंधीत असणा-या विमान प्रवासाचे भाडे वि.प.क्रं.1 व 2 यांना परत केलेले आहे. त्यामुळे सदरच्या प्रकरणात वि.प.क्रं.3 यांना कोणत्याही प्रकारे जबाबदार धरता येणार नाही. करिता त्यांच्या विरुध्द सदर तक्रार खारीज करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.
- वरील विश्लेषणावरुन असे दिसून येते की,तसेच वि.प.क्रं.3 हा तक्रारदारचा ग्राहक नाही. तसेच वि.प.क्रं.3 ने तक्रारदाराचे प्रती कोणतीही अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. तसेच दिनांक ५.९.२०१७ रोजी तक्रारदाराने वि.प.क्रं.1 यांनाच कायदेशीर नोटीस पाठविली आहे व वि.प.क्रं.3 यांना कोणतीही कायदेशीर नोटीस मिळालेली नाही यावरुन वि.प.क्रं.1 व 2 ने तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिल्याचे दिसून येते. त्यामूळे सदर तक्रारीतून वि.प.क्रं.3 ला दोषमुक्त करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे.
- तक्रारदाराची तक्रार व दाखल दस्तऐवज तसेच विरुध्द पक्षाचे लेखी उत्तर व कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थीत होतात.
मुद्दे उत्तरे - तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय? होय
- विरुध्द पक्षाने तक्राराचे सेवेत त्रुटी व अनुचित
व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे काय ? होय - आदेश? अंतीम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा - तक्रारदाराने वि.प. साऊथ आफ्रीका मधील डर्बन येथे दि.04.08.2017 रोजी होणा-या सभेमधे भाग घेण्याकरिता मुंबई ते डर्बन, मेक माय ट्रीप या कंपनी कडुन दोन तिकीटे आरक्षीत केली होती. तसेच ठरल्याप्रमाणे तक्रारकर्ता मुंबई विमानतळावर दुपारी 4.00 पोहोचला. त्यानंतर तक्रारदाराला कळले की, त्यांचे केवळ मुंबई ते माहे- सियाचिल पर्यतचेच तिकीट आहे व पूढे सियाचिल ते डर्बन या प्रवासाचे तिकीट तक्रारदाराजवळ नाही. तक्रारदाराने वि.प. ला प्रवासाची संपूर्ण रक्कम आगाऊ देऊन सुध्दा तक्रारदारास वेळेवर मुंबई ते डर्बन येथील सभेमधे भाग घेण्याकरिता रुपये 62,124/- एवढया रक्कमेचे तिकीट काढावे लागले. तसेच डर्बन वरुन परत आल्यावर तक्रारदाराने वि.प.शी संपर्क साधला असता वि.प.ने आपली चुक कबुल न केल्याने वि.प.ला कायदेशीर नोटीस पाठविली. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत की, वि.प.क्रं.1,2, व 3 यांनी संयुक्तीकरित्या रुपये 1,16,680/-(५४,५३४+६२,१४६),तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 10,00,000/- व तक्रारीचा खर्चापोटी रुपये 1,00,000/- ची मागणी केलेली आहे.
- वि.प. क्रं.1 व 2 ने आपल्या उत्तरात नमुद केले की, त्यांचे कार्यालय हरियाणा येथे असुन ते आनलाईन ट्रॅव्हल कंपनीचा व्यवसाय करीत असुन श्री एकांत मेहरा हे दिनांक 1.9.2017 पासुन या कंपनीचा अधिकृतरित्या कार्यभार पाहतात. तकारदाराचे म्हणण्याप्रमाणे दिनांक 2.8.2018 रोजी मुंबई ते डर्बनचे श्री लोकेन्द सिंग व श्रीमती मधुबाला यांचे नावे आरक्षण केले होते. वि.प.क्रं.1 व 2 ने तक्रारदारासोबत Agreement between user and make my trip अभिलेखावर दाखल केलेले आहे. परंतु सदरचा करार तक्रारदारास स्वाक्षरी करण्यापूर्वी त्यांना वाचण्याकरिता देण्यात आला नव्हता. तसेच वि.प.ने पूढे Bharathi Knitting Co. Vs. DHL Worldwide Express Courier [(1996) 4 SCC 704] हा न्यानिवाडा दाखल केला आहे. सदरचा न्यायनिवाडा या प्रकरणात लागू होत नाही.
- वि.प.क्रं.3 ने आपल्या लेखी उत्तरात नमुद केले की, तक्रारदाराने वि.प.क्रं.1 व 2 -मेक माय ट्रीप यांचेकडुन मुंबई ते डर्बन (via Abji Dhabi and Mahe (one way) तिकीट काढले होते व तिकीटाची रक्कम सुध्दा तक्रारदाराने वि.प.क्रं.1 व 2 यांना दिलेली होती. तक्रारदारास Abu Dhabi वरुन Mahe चे तिकीट Air Seychelles आणि Mahe ते Durban हे तिकीट साऊथ आफ्रीकन एअरवेजव्दारे काढण्यात आले होते. तक्रारदाराने या प्रवासाकरिता जे आरक्षण केले होते ते तिकीट विमानाच्या उपलब्धीवर अवलंबुन होते त्यामूळे वि.प.क्रं.3 ला याकरिता जबाबदार धरता येणार नाही. तक्रारदाराने प्रत्यक्षात वि.प.क्रं.1 व 2 यांचेशीच आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाकरिता आरक्षण व त्यांसंबंधी रक्कमेबाबतचा व्यवहार वि.प.क्रं.1 व 2 यांचे सोबतच निगडीत आहे. परंतु वि.प.क्रं.3 कडे त्यावेळी अबु धाबी येथे जाण्याकरिता ETIHAD AIRLINES कोणतेही विमान उपलब्ध नव्हते. तक्रारदाराचे तिकीट केवळ माहे पर्यतच होते. त्यामूळे सदरच्या प्रकरणात वि.प.क्रं.3 वर विनाकारण दोषरोपण करण्यात आलेले आहे. कारण वि.प.क्रं.3 ने त्यांचेशी संबंधीत असणा-या विमान प्रवासाचे भाडे त्यांनी वि.प.क्रं.1 व 2 यांना परत केलेले आहे. यावर वि.प.क्रं. 1 व 2 यांनी कोणतीही हरकत घेतलेली नाही त्यामुळे वि.प.क्रं.3 चे हे म्हणणे ग्राहय धरण्यात येते. त्यामुळे सदरच्या प्रकरणात वि.प.क्रं.3 यांना कोणत्याही प्रकारे जबाबदार धरता येणार नाही. करिता त्यांच्या विरुध्द सदर तक्रार खारीज करण्यात येते.
- वरील विश्लेषणावरुन असे दिसून येते की, तक्रारदाराने त्याच्या व्यवसायाशी निगडीत अत्यंत महत्वाच्या वैद्यकीय सभेमधे भाग घेण्याकरिता वि.प.क्रं.1 व 2 यांचे कडुन वि.प.क्रं.3 च्या सहयोगाने मुंबई ते डर्बन या विमानप्रवासाचे आरक्षण केले होते ही बाब अभिलेखावर दाखल दस्तऐवजावरुन सिध्द होते. असे असुन सुध्दा तक्रारदाराला वेळेवर रुपये ६२,१२४/- वेळेवर खर्च करुन तिकीट काढावे लागले.त्यामूळे तक्रारदारास सहाजिकच विदेशात जाण्याकरिता मानसिक,शारिरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला यावरुन वि.प.क्रं.1 व 2, यांनी तक्रारदाराला अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन सेवेत त्रुटी दिल्याचे दिसून येते. सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
अंतीम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- वि.प.क्रं.1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या तक्रारदाराला त्याने वेळेवर विमान प्रवासाकरिता तिकीटापोटी खर्च केलेली रक्कम रुपये ६२,१४६/- व त्यावर दिनांक-03.08.2017 पासून ते प्रत्यक्ष रक्कमेच्या अदायगी पावेतो द.सा.द.शे.09 टक्के व्याजदराने मिळुन येणारी रक्कम अदा करावी.
- वि.प. क्रं.1 व 2 यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक,शारिरिक व आर्थिक नुकसानापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/- तकारदारास द्यावे.
- सदर आदेशाचे पालन वि.प.क्रं.1 व 2 ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
- सदर आदेशाचे पालन वि.प.क्रं.1 व 2 यांनी संयुक्तीक अथवा वैयक्तीकरित्या करावे.
- उभयपक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क देण्यात यावी.
- तक्रारीची ब व क प्रत तक्रारकर्त्यास परत करण्यात यावी.
|