::: निशाणी क्र.1 वर अंतिम आदेश :::
( पारित दिनांक : 28/06/2017 )
आदरणीय सदस्य, श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, विरुध्द पक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून तक्रारकर्तीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी ही तक्रार दाखल केली आहे.
सदर प्रकरणात तक्रारकर्तीला संधी देवूनही युक्तिवाद करण्यात आला नाही. सदर प्रकरणातील रोजनाम्यावरुन असे दिसते की, तक्रारकर्ती युक्तिवाद करण्याकरिता प्रत्येक तारखेवर हजर नसते किंवा हजर असली तर पुढील तारीख मिळण्याचा अर्ज करते. दिनांक 25/10/2016 रोजी सदर प्रकरण डीसमीस इन डिफॉल्ट आदेशासाठी ठेवले होते. परंतु तक्रारकर्तीचे नविन अधिवक्ता यांनी मेमो ऑफ अॅपीरन्स दाखल करुन, युक्तिवादासाठी वेळ मिळणेबाबतचा अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावर प्रकरणातील परिस्थिती पाहता मंचाने तक्रारकर्ती यांना, त्यांनी दिनांक19/11/2016 रोजी त्यांचा लेखी युक्तिवाद न चुकता दाखल करावा, असे निर्देश दिलेले असतांना, तेंव्हापासून तक्रारकर्तीतर्फे पुन्हा प्रत्येक तारखेवर वेळ मिळण्याचा अर्ज करण्यात आला. म्हणून दिनांक 30/05/2017 रोजी मा. सदस्य यांनी प्रकरणातील निशाणी-1 वर हस्तलिखीत डीसमीस इन डिफॉल्ट आदेश लिहून त्यावर सही केली होती. परंतु मा. अध्यक्षा यांनी सदर आदेशावर सही न करता न्यायाच्या दृष्टीने तक्रारकर्तीला पुन्हा एक संधी देवूनही आज दिनांक 28/06/2017 रोजी तक्रारकर्ती युक्तिवाद करण्यास असमर्थ ठरली आहे. या सर्व परिस्थितीचा गांभिर्याने विचार करुन, आज रोजी दुपारी 5.00 वाजता सदर डीसमीस इन डिफॉल्ट चा आदेश पारित केला.
सबब अंतिम आदेश पुढीलप्रमाणे .. .
अंतिम आदेश
- तक्रारकर्ती यांची तक्रार, खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri