Maharashtra

Kolhapur

CC/13/71

Mrs. Kalpana Namdev Chougale - Complainant(s)

Versus

Main Manager, HDFC Bank, - Opp.Party(s)

Mr.Sandeep V. Jadhav

20 Mar 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, South Side, Second Floor,
Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. 0231-2651327, Fax No. 0231-2651127
Email- confo-ko-mh@nic.in, Website- www.confonet.nic.in
 
Complaint Case No. CC/13/71
 
1. Mrs. Kalpana Namdev Chougale
At post Murgud, Tal.Kagal,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Main Manager, HDFC Bank,
1st floor, new Vijay cinema,
Chembur, Mumbai
2. Main Manager, HDFC ERGO General Insurance Co.Ltd.
6th floor, Lila Business Park, Andheri-Kurla Road, Andheri-East,
Mumbai-400 059
3. Manager, HDFC Bank, Branch Shilphata Khopoli,
Tal.Khalapur,
Dist.Raigad
4. Branch Manager, HDFC Bank,
Murgud, Tal.Kagal,
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
PRESENT:
Adv. Sandip Jadhav for Complainant
 
 
Adv. D.M. Patil for O.P. No. 1,3, & 4
Adv. P.R. Kolekar for O.P. No. 2
 
ORDER

नि का ल प त्र :- (मा. सौ. रुपाली डी. घाटगे, सदस्‍या) (दि .20-03-2014) 

(1)   प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्‍वये वि.प. एच.डी.एफ. सी. बँक लि. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केल्‍याने नुकसान भरपाई मिळणेसाठी या मंचात दाखल केला आहे. 

     प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला.  वि.प.  यांनी  वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्‍यांनी म्‍हणणे दाखल केले.  तक्रारदार तर्फे व वि.प. तर्फे वकिलांचा तोंडी अंतिम युक्‍तीवाद ऐकला.  तसेच  उभय पक्षकारांतर्फे  लेखी युक्‍तीवाद दाखल केला.  

(2)   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की,

यातील वि.प. नं. 1 ग्राहकांना अॅटो लोन कर्ज पुरविणारी आर्थिक संस्‍था असून वि.प. नं. 3 व 4 हया  वि.प. नं. 1 यांच्‍या शाखा आहेत.  वि.प. नं. 2 हे वि.प. 1 यांचेकडून ग्राहकाने घेतलेल्‍या कर्ज रक्‍कमेच्‍या परतफेडीची विम्‍याचे स्‍वरुपाने सुरक्षितता देण्‍याचे कार्य करतात.  तक्रारदार यांचा मुलगा मयत निखिल नामदेव चौगले हा वार्टसिला इंडिया लि खोपोली या कंपनीमध्‍ये सिनि. एक्‍झुक्‍युटिव्‍ह  म्‍हणून नोकरीस होता.  मयत निखिल याने नोकरीच्‍या दरम्‍यान वि.प. 3 यांचेकडून दि. 11-08-2012 रोजी अॅटो लोन  घेऊन  फोर्ड फीगो या मॉडेलची मोटर कार खरेदी घेतलेली होती.   सदर कारचा रजि. नं. एम.एच. 09-सीएम. 2133 असा आहे.

तक्रारदार तक्रारीत नमूद करतात, निखिल यांचे हयातीमध्‍ये कर्ज फेडीच्‍या दरम्‍यान निखील याचा मृत्‍यू झालेस किंवा त्‍यास कायमचे अपंगत्‍व  आलेस  त्‍याचे वि.प. नं. 3 यांचेकडील कर्जाचे हप्‍ते अदा करणेची जबाबदारी वि.प. 2 यांनी घेतलेली होती.  त्‍याकरिता वि.प. नं. 2 यांनी मयत निखिल यांचेकडून प्रिमियम स्विकारुन सर्व सुरक्षा पॉलिसी नं. 295020032534030300000  अशी पॉलिसी मयत निखील यास अदा केलेली असून सदर पॉलिसीचा कालावधी दि. 31-08-2012 ते 30-08-2017 असा असून पॉलिसीधारकाचा मृत्‍यू झालेस पॉलिसीधारकाने घेतलेल्‍या कर्ज रक्‍कम रु. 5,00,000/- पर्यंतची बाकी रक्‍कम अदा करणेची हमी व खात्री वि.प.नं. 2 यांनी पॉलिसीधारकास  दिलेली होती व आहे.

     तक्रारदार यांचा मुलगा निखील याचा अचानक दि. 9-12-2012 रोजी हृदयविकाराच्‍या झटक्‍याने  अपघाती  मृत्‍यू झाला.  त्‍यामुळे मयत निखिल याची  वि.प. नं. 2 यांचेकडील सर्व सुरक्षा पालिसी अंतर्गत असणारी रक्‍कम रु. 5,00,000/- वि.प. नं. 3 यांचेकडील खात्‍यावर वर्ग करणेच्‍या उद्देशाने  तक्रारदार यांनी  वि.प.  नं. 2 यांचेकडे दि. 4-02-2013 रोजी  क्‍लेम फॉर्म भरुन दिला होता परंतु  सदर वि.प. नं. 2 यांनी कोणत्‍याही संयुक्तिक कारणाशिवाय दि. 14-02-2013 रोजीच्‍या पत्राने तक्रारदार यांचा  क्‍लेम नाकारला आहे.  सदर वि.प. यांनी त्‍यांचे पॉलिसी कलम 5 अन्‍वये  Credit Shield  नुसार विमाधारकाची वि.प. नं. 3 कडील शिल्‍लक कर्ज बाकी  जमा करणेची सर्वस्‍वी जबाबदारी वि.प.  नं. 2 यांची आहे.  परंतु वि.प. यांनी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारुन तक्रारदार यांना सेवा देणेत कसूर केली आहे.  वि.प. 1 हे तक्रारदार यांना वारंवार फोन करुन मयत निखील यांचे कर्जाचे हप्‍ते त्‍वरीत अदा करणेबाबत धमकावत आहेत.  व तक्रारदार यांचे पुत्र निधनाने त्‍यांन प्रचंड मानसिक धक्‍का बसला आहे.   वि. प. नं. 1,3 व 4 हे तक्रारदार यांना त्रास देत आहेत.   वि.प. नं. 1 यांचे मार्फत वि.प. नं. 4 हे तक्रारदार यांना कर्ज रक्‍कमेची परतफेड करणेचा तगादा करु लागलेले आहेत.  त्‍यामुळे तक्रारदार यांनी दि. 22-02-2013 रोजी वि.प. नं. 4 यांचेकडे रक्‍कम रु. 4,870/- चा हप्‍ता जमा केलेला आहे.  सबब, तक्रारदाराची तक्रार  मंजूर करणेत यावी व पॉलिसी प्रमाणे रक्‍कम रु. 5,00,000/- व मानसिक त्रासाची रक्‍कम  रु. 10,000/-  व तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु. 5,000/-   तसेच कलम 8 मध्‍ये नमूद केलेली रक्‍कम वि.प. 2 यांनी तक्रारदार यांना अदा करणेचे आदेश व्‍हावेत. सदरची रक्‍कम वि.प. 2  जोपर्यंत अदा करीत नाहीत तो पर्यंत वि.प. नं. 1,3, व 4 यांनी तक्रारदार यांना मयत निखिल यांचे कर्जाचे रक्‍कमेबाबत मागणी किंवा कोणतीही कारवाई करणेची नाही याबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती तक्रारदार यांनी तक्रार अर्जात केली आहे       

(3)    तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत  7 कागदपत्रे दाखल केली असून अ.क्र. 1 ला  वि.प. नं. 2 यांनी दि. 14-02-2013 रोजी क्‍लेम नाकारलेले पत्र, अ.क्र. 2  ला दि. 4-02-2013 रोजी तक्रारदार यांनी वि.प. नं. 2 यांचेकडे दाखल केलेला क्‍लेम फॉर्म, अ. क्र. 3 मयत निखील चौगले यांचे वि.प. बँकेकडील कर्ज खाते स्‍टेटमेंट, अ.क्र. 4 ला तक्रारदार यांनी वि.प. नं. 4  यांचेकडे पैसे जमा केलेली पावती, अ.क्र. 5 ला तक्रारदारांचे मयत मुलाने वि.प. नं 2 यांचेकडे पॉलिसी भरलेलेचा तपशिल, वि.प. नं. 2 यांचेकडील सदर पॉलिसीचे अटी व शर्तीची प्रत, तक्रारदारांचे मयत मुलाचा मृत्‍यू दाखला, तक्रारदार यांचे ता. 29-01-2014 रोजीचे पुराव्‍याचे शपथपत्र तसेच तक्रारदार यांनी श्री. नामदेव भाऊसो चौगले  यांना दि. 5-12-2013 रोजी करुन दिलेले वटमुखत्‍यापत्र.         

 (4)  वि.प. 1, 3 व 4  यांनी तक्रादारांचे तक्रार अर्जास दि. 30-07-2013 रोजी तक्रार अर्जास म्‍हणणे दाखल केले  असून त्‍यांनी तक्रारदाराची तक्रार परिशिष्‍टनिहाय नाकारलेली आहे.   तक्रारदार व वि.प. यांचेमध्‍ये ग्राहक, विक्रेत्‍याचे नाते नाही. वि.प. यांनी कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नाही.  सदरचे तक्रारीस कारण ता. खालापूर, जि. रायगड येथे घडलेने सदरची तक्रार या मंचात चालणेस पात्र नाही.  पॉलिसीतील अटी व शर्ती प्रमाणे वि.प. नं. 2 यांची जबाबदारी आहे.  तक्रारदार  यांचे मुलाने दि.  24-08-2012 रोजी  रक्‍कम रु. 5,54,000/-  इतके रक्‍कमेचे कर्ज वाहन तारण ठेवून घेतलेले होते. जो पर्यंत सदरचे कर्जाचे वाहनाचे हप्‍ते  कर्जदार पुर्णफेड करीत नाही.  सदरचे वाहनाची मालकी कर्जदाराला देता येत नाही. वि.प. नं. 2 इन्‍शुरन्‍स कंपनी  यांचे सदरचे कर्जफेड  करणेची जबाबदारी  इन्‍शुरन्‍स कंपनीच्‍या पॉलिसीतील  अटी व शर्ती प्रमाणे आहे. तक्रारदाराच्‍या मयत मुलावरही सदरचे पॉलिसीतील अटी व शर्ती बंधनकारक आहेत  तक्रारदार यांचा  मयत मुलगा निखिल यांचा मृत्‍यू  हार्ट अॅटॅकने दि. 9-12-2012  रोजी झाला.  तथापि वि. प. चा सदरचा विमा मंजूर अथवा नामंजूर करणेबाबत कोणताही हस्‍तक्षेप नाही.  वि.प.नं. 2 यांनी कर्जे  परतफेड केले पाहिजे हे वि.प. ना मान्‍य नाही.  तक्रारदार हे खोटी तक्रार दाखल करुन आपल्‍या मयत मुलाचे मृत्‍यूचा गैरफायदा घेत आहेत.  सदचे वाहन हे तक्रारदार यांचे ताब्‍यात असून, सदरील वाहनाचे हप्‍ते कर्जे करारपत्राप्रमाणे फेड न केलेने बँकेला सदचे वाहन कब्‍जे घेणे गरजेचे आहे.  तथापि  कर्जे फेड न करता तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.  वि.प. नं. 2 यांनी तक्रारदारांचा क्‍लेम नाकारलेने, वि.प. ना सदरचे वाहन कर्जे फेडीपोटी ताब्‍यात घेणे व्‍यतिरिक्‍त कोणताही पर्याय नाही.  तसेच Loan Agreement मधील 10.9 प्रमाणे  “ The bank shall not be liable for any loss on account of Non-Renewal of insurance of the Vehicle and/or delay/non-payment by the  insurance company/or any settlement claim by the Borrower.”     सबब, तक्रारदारांची तक्रार नामजूर करणेत यावी.  व वि.प.  नं. 1, 2 व 4 यांनी यांना  रक्‍कम रु. 10,000/- कॉम्‍पेनसेटरी कॉस्‍ट तक्रारदार  यांचेकडून मिळावी असे वि.प. नी म्‍हणणे दाखल केले आहे.   वि.प. नं. दि. 30-07-2013 रोजी अ.क्र. 1   दि. 6-08-2012 रोजीचे Loan Application  अ.क्र. नं. 2 ला Loan Agreement व अ.क्र. 3 ला ता. 9-07-2013 रोजीचे Account Statement इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

(5)   वि.प. नं. 2 यांनी दि. 9-07-2013 रोजी तक्रारदारांचे तक्रार अर्जास म्‍हणणे दाखल केलेले असून तक्रारदारांची तक्रार परिशिष्‍टनिहाय नाकारलेली आहे. मयत निखिल नामदेव चौगले यांनी वि.प. यांचेकडून सर्व सुरक्षा पॉलिसी घेतली होती तथापि निखिल  चौगले याचा मृत्‍यू हृदयविकाराचे झटक्‍याने झाला नसून त्‍याचा  मृत्‍यू हा दृदयक्रिया बंद पडून म्‍हणजे कार्डिओ रिस्‍पॉरिटरी अॅरेस्‍टने झाला असलेने सदर आजार हा सर्व सुरक्षा पॉलिसीमध्‍ये समाविष्‍ट होत नाही.  पॉलिसीमध्‍ये समाविष्‍ठ आजारपणासाठी देखील  पॉलिसीचे अटी व नियमाप्रमाणे आजारपण उदभवतील विमाधारक 30 दिवसांपेक्षा जास्‍त काळ जिवंत राहीलेने त्‍याला Critical Illness  चे सुविधेचा फायदा मिळतो.  तथापि मयत निखिल चौगले यांचा दि. 9-12-2012  रोजी कार्डिओ रिस्‍पेरिटरी अॅरेस्‍टने झालेला मृत्‍यू नैसर्गिक असलेने तो पॉलिसीतील अटी व शर्ती येत नाही.  त्‍याकारणाने सदर  सर्व सुरक्षा पॉलिसी  क्‍लेम देय होत नाही.  सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी.        

(6)   तक्रार अर्ज, तक्रारीसोबत दाखल कागदपत्रे,  वि.प. 1, 2, 3 व 4 यांचे म्‍हणणे, दाखल कागदपत्रे,  तक्रारदारांचे पुराव्‍याचे शपथपत्र व उभय पक्षकारांचे वकिलांचा तोंडी  व लेखी युक्‍तीवादाचा विचार करता पुढील मुद्दे निष्‍कर्षासाठी मुद्दे उपस्थित होतात.

               मुद्दे                                        उत्‍तरे 

1    वि.पक्ष विमा कंपनीने  तक्रारदारांना द्यावयाच्‍या

     सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?                              --- होय.

2    तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी

    रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?                      -----होय.

3.   आदेश काय ?                                  -----   अंतिम निर्णयाप्रमाणे.

                      

कारणमीमांसा:-

मुद्दा क्र. 1 :     

        तक्रारदारांचा  मुलगा मयत निखिल चौगले यांनी वि.प. नं. 3 यांचेकडून दि. 11-08-2012 रोजी वाहन कर्जे घेऊन फोर्ड फीगो या मॉडेलची मोटारकार घेतली होती व आहे. मयत निखिल यांनी वि.प. 2 यांचेकडे सुरक्षा पॉलिसी नं. 295020032534030300000 उतरविली असून सदर पॉलिसीचा कालावधी दि. 31-08-2012 ते दि. 30-08-2017 असा आहे.  विमा पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही.  सदरचे पॉलिसीनुसार पॉलिसीधारकाचा मृत्‍यू पॉलिसी कालावधीमध्‍ये  झालेस पॉलिसीधारकाने घेतलेल्‍या कर्ज रक्‍कमेपैकी रक्‍कम रु. 5,00,000/- पर्यंतची बाकी रक्‍कम अदा करणेची  हमी व खात्री यातील वि.प. नं. 2 यांनी पॉलिसीधारकास दिलेली होती व आहे.  तक्रारदार यांचा मुलगा निखिल दि. 9-12-2012 रोजी हृदयविकाराचे झटक्‍याने मयत झाला. तदनंतर  तक्रारदार यांनी  वि.प. 2 कडे दि. 4-03-2013 रोजी वि.प. नं. 2  यांचेकडील  सर्व सुरक्षा पॉलिसी अंतर्गत असणारी रक्‍कम वि.प.  नं. 3 यांचेकडील खातेवर वर्ग होणेसाठी क्‍लेम फॉर्म भरुन दिला असता वि.प. यांनी  The ailment suffered, pulmonary Infarct its treatment or complication are not covered under  sarv surksha policy as a coverage. या कारणाने विमा कंपनीने  तक्रारदारांचा क्‍लेम   नाकारलेला आहे. सबब, प्रस्‍तुत प्रकरणात वि.प. विमा कंपनी मयत निखिल चौगले यांचा मृत्‍यू  कार्डिओ रिस्‍पॉरिटरी अॅरेस्‍टने डयूटू pulmonary Infraction ने झालेने  सदरचा आजार सुरक्षा पॉलिसीचे अटी व नियमांमध्‍ये समाविष्‍ट  नसलेने, तक्रारदाराचा क्‍लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे का ?   हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  त्‍याअनुषंगाने या मंचाने तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्रांचा सखोलतेने अवलोकन केले असता तक्रारदाराचे मयत मुलाने पॉलिसी नं. 295020032534030300000  ही पॉलिसी उतरविलेली आहे.  तक्रारदारांचे मुलाचा मृत्‍यू  हा सदर पॉलिसी कालावधीमध्‍ये दि. 9-12-2012 रोजी झालेला आहे.   तक्रारदारांनी दाखल केलेले अ.क्र. 3 कडील वि.प. बँकेकडील खाते उतारा पाहता त्‍यावर मयत निखिल चौगले यांचे नाव नमूद आहे.  Product :   Amount Finance :  Rs. 5,54,000/- Amount Disbursed:  Rs. 5,38,717/-  E.M.I. Amount Rs. 12001/-  Company Name- HDFC Bank Ltd.,   सदरचे खाते उता-यावरुन मयत निखिल चौगले यांचेकडून वि.प. नं. 3 यांनी घेतलेले चेक्‍स व्‍दारे  वि.प. नं. 3 यांचेकडे नियमित हप्‍ते चेकव्‍दारे  जमा केलेचे नमूद आहे.   अ.क्र. 5 कडील सर्व सुरक्षा पॉलिसीमध्‍ये   Sum Insured Rs 5,00,000/-, Total Premium Rs. 6,438/-, Agent Name: HDFC Bank Ltd,  असे नमूद आहे.  वि.प. विमा कंपनी तक्रारदारांचे मुलाचा  मृत्‍यू हा कार्डिओ रिस्‍पॉरिटरी अॅरेस्‍टने डयूटू पल्‍मोनरी इन्‍फ्रॅक्‍शन ने झाला.  सदरचा आजार सदर पॉलिसीमध्‍ये समाविष्‍ट होत नाही असे नमूद केले आहे.  तथापि, वि.प. विमा कंपनी  तक्रारदारांचे मुलाचा मृत्‍यू सदर आजाराने झाला त्‍याअनुषंगाने कोणतेही कागदपत्रे  या मंचात  दाखल केलेली नाहीत. अथवा  सदरचे आजारामुळे मृत्‍यू झालेस सदरचा आजार पॉलिसीमध्‍ये समाविष्‍ठ होत नाही असे पॉलिसीमध्‍ये स्‍पष्‍टपणे नमूद नाही. त्‍यामुळे पॉलिसीतील नमूद अटींचा भंग होतो हे वि. प. यांचे म्‍हणणे हे मंच मान्‍य करीत नाही.   तथापि तक्रारदार यांनी दाखल केलेली वि.प. नं. 2 यांचेकडील पॉलिसीमध्‍ये :-   Section 5 : Credit shield insurance- coverage-   The company will pay the balance outstanding loan amount in the manner agreed in the  name of insured person  subject to maximum sum insured specified in schedule असे नमूद आहे. 

       तसेच वि.प. 1, 3 व 4 यांनी दाखल केलेले दि. 6-08-2012 रोजी Loan Agreement  मधील 10-  Insurance and Maintenance – 10-1  Insurance Policy  has been taken out  by bank on behalf of Barrower from insurance co. approved by bank with specific instruction and authority by borrower to such  insurance co. that in case of any loss reported  under this sec. ‘ Outstanding amount of loan to Bank’ the loss will be paid to bank by  such insurance co.  असे नमूद आहे.  म्‍हणजे कर्जाची उर्वरीत रक्‍कम अदा करणेची सर्वस्‍वी जबाबदारी वि.प. नं. 2 यांनी सदर कर्जदाराचे मृत्‍यूचे पश्‍चात  पॉलिसीनुसार स्विकारलेली होती व आहे.  वरील सर्व कागदपत्रांचे या मंचाने बारकाईने अवलोकन केले असता वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून  प्रिमियमची रक्‍कम स्विकारुन  देखील कोणतेही सबळ  कारण नसताना तक्रारदारांचा क्‍लेम नाकारुन  तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे.  सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर  हे मंच होकारार्थी देत आहे. 

मुद्दा क्र. 2 :-

     प्रस्‍तुतची तक्रार ही वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराची विमा क्‍लेम नाकारल्‍यामुळे दाखल करावी   लागली.  त्‍यामुळे त्‍यांना मानसिक त्रास झाला.  तसेच त्‍यांना सदरची तक्रार  दाखल करण्‍यासाठी खर्च  करावा लागला.  त्‍यामुळे  तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु. 2,000/- मिळण्‍यास पात्र आहे.  सबब, .  सबब, मुद्दा क्र 2 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे. 

मुद्दा क्र.  3 :  

      वर नमुद मुद्दे क्र. 1 व 3 यातील विवेचनाचा विचार करता तक्रारदार यांचा मयत  मुलगा निखील चौगले याचे खातेवरील कर्जाची उर्वरीत रक्‍कम क्रेडीट शिल्‍ड इन्‍शुरन्‍स  पॉलिसीनुसार रक्‍कम रु. 5,00,000/-  पर्यंत वि.प.नं. 2 यांनी वि.प. नं. 3 यांचेकडे जमा करावी या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  हे मंच  पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. सबब, आदेश. 

                              दे

1.    तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.

2.   तक्रारदार यांचा मयत मुलगा निखील चौगले याचे खातेवरील कर्जाची उर्वरीत रक्‍कम क्रेडीट शिल्‍ड इन्‍शुरन्‍स पॉलिसीनुसार रक्‍कम रु. 5,00,000/- (अक्षरी रुपये पाच लाख फक्‍त) पर्यंत वि.प.नं. 2 यांनी वि.प. नं. 3 यांचेकडे जमा करावी  तसेच तक्रारदारांना वि.प. यांनी  मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त ) अदा करावेत.

3.    वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत   पूर्तता करावी.

4.    सदर आदेशाच्‍या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.