ग्राहक तक्रार क्र. : 35/2014
दाखल तारीख : 01/03/2014
निकाल तारीख : 23/04/2015
कालावधी: 01 वर्षे 01 महिने 23 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. भालचंद्र सिताराम पाटील,
वय - 52, धंदा – स्वयंरोजगार,
रा.भ्किार सारोळा, ता. जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. मुख्य विभागीय व्यवस्थापक,
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.,
पुणे मंडल कार्यालय, 885/1,
भांडारकर इन्स्टिट्यूट रोड, पुणे 411004.
2. श्री. शशिकांत दासराव फाटक,
वय- 45 वर्षे, धंदा – व्यापार,
रा. कळंब, ता. कळंब, जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री. आर एस. मुंढे.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे : श्री.ए.आर.देशपांडे.
विरुध्द पक्षकार क्र.2 विरुध्द एक्सपार्टी आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते, यांचे व्दारा.
अ) 1. तक्रारदार हे सारोळा (भि) ता. जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी असून मे. पाटील हायवे सर्व्हिसेस चे प्रो.प्रा. असून सदर नावाने ते मौजे कळंब येथे foiविप क्र.1 व 2 यांच्याकडून पेट्रोल व डिझेल घेऊन पेट्रोल व डिझेल विकून पेट्रोल पंप चालवून त्यातून मिळणा-या उत्पन्नातून स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते. विप क्र. 1 यांनी विप क्र. 2 यांना सध्य स्थितीत सदर जागीच तक्रारदार चालवित असलेला पेट्रोलपंप हस्तांतरीत करण्यात आलेला आहे.
2. तक हे विप क्र.1 यांनी दिलेली डिलरशीप मार्फत उत्कृष्टपणे करत होते असे असतांना डिसेंबर 2002 मध्ये चुकीच्या व बेकायदेशीर पध्दतीने तक्रारदार यांना विचारात न घेता सदरची डिलरशीप विप क्र.1 यांनी काढून घेतली व पेट्रोल पंपाचा ताबा घेतला सदर पेट्रोल पंपाचा ताबा घेतेवेळी सदर पंपातील पेट्रोल टँक मध्ये 2990 लिटर पेट्रोल शिल्लक होते व डिझेल टॅंक मध्ये 8,898/- लिटर डिझेल शिल्लक होते. त्यापोटी रु.2,64,619/- व्याजासह मिळणेबाबत विप यांना वारंवार लेखी पत्राव्दारे मिळण्यास विनंती केली असता विप ने दुर्लक्ष केले म्हणून विधिज्ञामार्फत नोटिस पाठविण्यात आली असता विप ने दुर्लक्ष केले. म्हणून सदरची तक्रार दाखल केली असून विप क्र. 1 व 2 यांच्याकडून तक्रारदाराचे उदर्निवाहाचे साधन बेकायदेशीरपणे हिरावून घेतलेले असून ते नुकसान भरपाई रु.50,000/- सह परत मिळावे तसेच तक्रारदाराची रक्कम रु.2,64,619/- दि.11/12/2002 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याज दराने व झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- देण्यात यावे अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत विप क्र. 1 यांना दिलेले 5 अर्ज, विप क्र. 2 यांना दिलेले पत्र, स्टेटमेंट, विप यांना पाठविलेल्या नोटिसची प्रत, पोहोच पावती.
ब) 1) मंचामार्फत विप क्र.1 यांना नोटिस पाठविली असता त्यांनी आपले म्हणणे दि.20/01/2015 रोजी आपले म्हणणे दाखल केले असून ते पुढीलप्रमाणे.
2) विप क्र.1 ने त्यांच्या म्हणण्यामध्ये हा वाद ग्राहकवाद होत नाही म्हणून तक्रार रद्द करण्यात यावी असे म्हंटले आहे. तसेच या आाधी कळंब या दिवाणी कोर्टात 558/2002 नुसार दावा चालू असून योग्य न्यायनिर्णयासाठी सदरचे प्रकरण लवादाकडे सोपवले आहे तसेच दावा हा कालमर्यादेच्या मुद्यावरही फेटाळण्यात यावा असे म्हंटले आहे व यासाठी तक ने विलंबामाफीचा अर्ज दाखल केला नसल्याने विलंबमाफी देण्यात येऊ नये असे म्हंटले आहे. विषय दुस-या कोर्टात चालू आहे रेस ज्युडीकेटा हे तत्व या ठिकाणी लागू होते असे विप चे म्हणणे आहे त्यामुळे इतर काही हीशोबाचा रकमांचा उल्लेख करुन त्या रकमा सेट ऑफ करुन मिळाव्यात अशीही मागणी केली आहे.
क) मंचामार्फत विप क्र. 2 यांना नोटिस पाठविली असता त्यांनी मंचात उपस्थित राहून आपले म्हणणे दिले नाही म्हणून दि.12/05/2014 रोजी त्यांच्या विरुध्द एक्सपार्टी चा आदेश पारीत करण्यात आला.
ड) तक्रारदाराची तक्रार व त्यानी दाखल केलेली कागदपत्रे तसेच विप यांचे म्हणणे व त्यंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले तसेच उभयतांचा युक्तिवाद ऐकला असता आमचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्ये उपस्थित होतात.
मुदये उत्तर
1) सदरची तक्रार चालविण्याचा या न्यायमंचास
अधिकार आहे काय ? नाही.
2) तक्रादार व गैरतक्रारदार यांचे मधील ग्राहक व
सेवा पुरवठादार नाते आहे काय ? नाही.
3) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? प्रयोजन उरत नाही.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
इ) मुद्दा क्र. 1 :
1. तक्रारदार हा पाटील हायवे सर्व्हिसेसचा स्वत: मालक असून पेट्रोलपंपाच्या उत्पन्नवरुन स्वत:चा व स्वत:च्या कुटुंबाच उदरनिर्वाह करतो. विप क्र. 1 व 2 यांच्याकडून पेट्रोल विकत घेऊन पेट्रोलपंप चालवित होता असे त्यांचे म्हणणे आहे. सदरची डिलरशीप विप क्र. 1 यांनी काढून घेतली त्यामुळे विप क्र. 1 यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला असून तक्रारदाराचे नुकसान झाल्याबाबत त्याचे म्हणणे आहे.
2. विप क्र.1 ने त्यांच्या म्हणण्यामध्ये हा वाद ग्राहकवाद होत नसून या कारणांवरून तक्रार रद्द करण्यात यावी असे म्हंटले आहे. तसेच या आाधी कळंब या दिवाणी कोर्टात 558/2002 नुसार दावा चालू असून योग्य न्यायनिर्णयासाठी सदरचे प्रकरण लवादाकडे सोपवले आहे असेही म्हणणे दिले आहे. तसेच दावा हा कालमर्यादेच्या मुद्यावरही फेटाळण्यात यावा असे म्हंटले आहे व यासाठी विलंबामाफीचा अर्ज दाखल नसल्याने विलंबमाफी देण्यात येऊ नये असे म्हंटले आहे. रेस ज्युडीकेटा हे तत्व या ठिकाणी लागू होते असे विप चे म्हणणे आहे याचे कारण हा विषय दुस-या कोर्टात चालू आहे त्यामुळे इतर काही हीशोबाचा रकमांचा उल्लेख करुन त्या रकमा सेट ऑफ करुन मिळाव्यात अशीही मागणी केली आहे. तक्रारदाराने ग्राहकवाद संदर्भात 212 एस.टी.पी.एल. (सीएल) 1631 NC अशोक अग्रवाल ग्रेन सिंडीकेट विरुध्द शासकीय वसाहत ग्राहक संस्था मर्यादित हे न्यायनिर्णय दाखल केले आहेत. परंतु त्याचा संदर्भ या ग्राहक तक्रारीशी लावता येणार नाही. तक्रारीतील तक्रादार हा ग्राहक अथवा बेनीफिशीअरी कोणत्याही स्वरुपात म्हणता येणर नाही कारण तक्रारदार हा विप क्र.1 व 2 यांच्याकडून डिझेल व पेट्रोल खेरदी करतो व डिझेल व पेट्रोल पुन्हा विक्री करतो त्यामुळे सदरचा वाद हा दोन सेवा पुरवठादार यांमधील वाद असून तो चालविण्याचा अधिकार या मंचास अधिकारक्षेत्र नाही तसेच तो ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 नुसार तक्रारदार हा ग्राहक ठरत नाही म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देतो म्हणून मुद्दा क्र. 3 चे उत्तर देण्याचे प्रयोजन उरत नाही व प्रकरणाच्या या व्यतीरिक्त इतर मुद्यावर गुणवत्तेबाबत कोणतेही भाष्य न करता कार्यक्षेत्र व न्यायीक मुद्यावर तक्रार फेटाळण्यात येते.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.