जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 324/2008. प्रकरण दाखल तारीख - 30/09/2008 प्रकरण निकाल तारीख - 13/01/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. विठठल श्रीराम कदम वय, 48 वर्षे, धंदा,शेती रा. चीखली ता. कंधार जि. नांदेड. अर्जदार विरुध्द. 1. मालक/मॅनेजर श्री बळीरामा कृषी केंद्र, नवा मोंढा, नांदेड. 2. मॅनेजर, संचारेश्वर कृषी सेवा केंद्र गैरअर्जदार नवा मोंढा, नांदेड. 3. मॅनेजर, महिको सिडस लि., 78, रेशन भवन वीन नरीमन रोड, मुंबई-40020. अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.एम.रावणगावे. गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार सिड कंपनी यांनी अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब करुन फसवणूक केली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रकारे तक्रार नोंदविली आहे. अर्जदार स्वतः पंरपरागत व कुशल शेतकरी असून चांगल्या पध्दतीने शेती करतात. त्यांनी दि.18.06.2008 रोजी गैरअर्जदार यांचेकडून एमआरसी 7351 जातीचे महिकोचे कापसाचे बियाणे दोन बँग ज्यांचा लॉट नंबर 101009 व 100817 असून नगदी रक्कम देऊन पावती नंबर 1560 व 9254 द्वारे विकत घेतले. शेत सर्व्हे नंबर 45/बी मध्ये दि.24.7.2008 रोजी लागवड केली असता 50 टक्के रोपे ही पिवळी पडून वाळून गेली व उर्वरीत 50 टक्के पिके सूध्दा नष्ट होण्याचे मार्गावर आहेत. शेतक-याच्या देखभालीत कोणताही कसूर नाही.केवळ बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याकारणाने असे झाले आहे. गैरअर्जदारांच्या सांगण्याप्रमाणे एका बॅगला 15 क्विंटल उत्पन्न होते म्हणजे 30 क्विंटल उत्पन्नाचे रु.90,000/- चे उत्पन्न बूडाले म्हणून गैरअर्जदाराकडून नूकसान भरपाईपोटी, मानसिक व शारीरिक ञासापोटी व झालेल्या नूकसानीपोटी रु.1,00,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून एक बॅग घेतली आहे व गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून काहीही खरेदी केलेले नाही. त्यांनी पेरलेले कापसाच्या सर्व्हे नंबर हा खोटा दिलेला आहे. या सर्व्हे मध्ये अर्जदाराने कोणतेही पिक घेतलेले नाही. घटनास्थळाचा पंचनामा बनावट आहे. गैरअर्जदार हे मूख्य वितरक यांचेकडून कंपनीचा माल खरेदी करुन विकतात. त्यामूळे त्यांनी बियाण्यात काहीही केलेले नाही. अर्जदाराची तक्रार खोटी असल्याकारणने खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले म्हणणे दाखल केले आहे. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार खोटी आहे. अर्जदारास सदरची तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही म्हणून सदर तक्रार फेटाळावी अशी मागणी केली आहे. अर्जदार हे ग्राहक कायदयाचे ग्राहक या व्याख्येत बसत नाहीत. अर्जदाराने महिको कंपनीला पार्टी केलेले नाही म्हणून सदर तक्रार फेटाळावी असे म्हटले आहे. 7351 हया वाणाचं उत्पादक महिको कंपनीच आहे व त्या वाणांचा व गैरअर्जदार क्र.2 यांचा काहीही संबंध नाही. गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादन केलेले बियाणे हे आरसीएच 2 बीटी लॉट क्र.224824 हे असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. सदर बियाणे अतिउच्च प्रतिच्या प्रयोगशाळेत तपासले असून त्यांचा अहवाल मंचात दाखल केलेला आहे. रोपे पिवळी पडण्याचे वेगळे कारणे असून शकतात जसे की, खताचे प्रमाण जास्त होणे, वेळेवर पाणी न मिळणे किंवा पाणी जास्त झाल्याने, कमी अधिक प्रमाणात किटकनाशके व जंतू नाशकांची फवारणी होणे, चूकीचे तूणनाशक वापरामूळे किंवा औषधी वेळेवर न वापरल्यामूळे पिके पीवळी पडू शकतात. कृषी अधिका-याने स्थळ पाहणीच्या वेळी गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीस दिलेली नाही. त्यामूळे त्या पाहणीचा अहवाल गैरअर्जदार क्र.2 यांना मान्य नाही. कृषी अधिका-यांचा अहवाल हा तर्कावर अवलंबून आहे. बियाण्याचा नमूना घेऊन त्यांची शास्ञोक्त पध्दतीने तपासणी करुन घेणे जरुरीचे होते तसे न केल्यामूळे बियाणे निकृष्ट दर्जाचे होते असे म्हणता येणार नाही. सदर बियाणे निकृष्ट दर्जाचे होते हे सिध्द न झाल्यामूळे सदरचे प्रकरण खारीज करावे अशी मागणी गैरअर्जदार क्र.2 ने केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून स्वतःचे शपथपञ दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेला दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचेकडून अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब झाला किंवा फसवणूक झाली हे अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदारांनी गैरअर्जदार क्र.1 बळीराजा कृषी सेवा केंद्र यांचे दि.18.6.2008 रोजी एमआरसी 7351 जातीचे महिको कंपनीचे कापसाचे बियाणे दोन बॅग ज्यांचा लॉट नंबर 101009 व 100817 चे खरेदी केल्याचे बिल दाखल केले आहे. तसेच पेरा केल्याबददल 7/12 दाखल केलेला आहे, पण त्यामध्ये सर्व्हे नंबर 45 (ऐ) मध्ये कापसाची लागवड केलेली दिसते व अर्जदाराने आपल्या तक्रारीत 45(बी) मध्ये कापसाची लागवड केली आहे जे की 45(बी) हे शेतक-याचे नांवाने आहे नेमके कोणत्या शेतात कापसाची लागवड केली हे ते सिध्द करु शकत नाहीत. दि.22.8.2008 रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 श्री बळीराजा कृषी सेवा केंद्र यांचे नांवे एक अर्ज दिला होता यात आपण मला विक्री केलेले बियाण्याची उगवण झाली नसून असा उल्लेख केलेला आहे. तक्रार अर्जात त्यांनी 50 टक्के उगवण झाली व 50 टक्के रोपे वाळली असे म्हटले आहे. या अर्जात व तक्रारीमध्ये विसंगती आढळून येते. बी.टी. कॉटनचा पेरा केल्याबददल अर्जदाराने आपल्या नांवे शेत असल्याचा 7/12 व पेरा दाखल केलेला आहे. याप्रमाणे 2 एकर कापूस पेरलेला दिसून येतो. कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार केल्याचे नंतर त्यांनी लगेच दि.23.8.2008 रोजीला स्थळ पाहणी केली व त्यांचा अहवाल दिला तो अर्जदाराने दाखल केलेला आहे. यात देखील दि.24.8.2008 रोजी पेरलेल्या कापसाची उगवण समाधानकारक झाली आहे असे म्हटले आहे परंतु उगवण झाल्यानंतर 40 ते 50 टक्के रोपे ही पिवळी पडली आहे व या बाबत बियाण्याच्या गूणवत्ते बाबत शंका व्यक्त केली आहे. शेतकी अधिका-याने पंचासमक्ष पंचनामा केल्यानंतर खाञीपूर्वक न सांगता शक्यता नाकारता येत नाही असा शब्द वापरलेला आहे व यांची खाञी जर करायची असेल तर सीडस अक्ट 2006 प्रमाणे नमूना बियाणे हे शासकीय प्रयोगशाळेत पाठवीणे आवश्यक आहे व शेतक-याने त्या रिकाम्या सिडसच्या बॅग दिलेल्या नाहीत व ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले नाही. म्हणून या पंचनाम्यावरुन बियाणे खराब प्रतिचे आहेत हे सिध्द होऊ शकत नाही. शिवाय अशा प्रकारचा पंचनामा करताना गैरअर्जदार यांना नोटीस पाठवून बोलावणे आवश्यक आहे, पंचनामा हा त्यांचे माघारी केलेला आहे. अशा प्रकारचा पंचनामा हा जिल्हास्तरीय कमिटीचा आवश्यक असतो. अर्जदार यांची तक्रार दि.18.8.2008 रोजीची असताना दि.18.8.2008 रोजीच गैरअर्जदारांच्या प्रतिनीधीनी पाहणी केली त्यात त्यांनी रोपाची उगवण सामान्य आहे परंतु जमिन ही कोरडी आहे व उशिरा लागवड केली होती त्यामूळे ही पिके वाळण्याची शक्यता आहे. त्यामूळे लागवडीची पध्दत व त्यातील अंतर, दिलेले खताची माञा, दिलेले पाणी, किटकनाशक औषधी फवारणी या सर्व गोष्टीचा संबंध येतो. या सर्व गोष्टी जर बरोबर अंमलात आल्या नसतील तर उगवलेली रोपे पिवळी पडू शकतात, वाळू शकतात. यात अर्जदार यांची कोठेतरी चूक होते आहे. सदर जी तक्रार केलेली आहे यातही भिन्नता आहे. एकदा म्हणतात की उगवण झाली नाही व एकदा म्हणतात की उगवण झाली पण रोपे वाळली. त्यामूळे बियाण्यातील दोषा बाबत स्पष्टता सिध्द होत नाही. गैरअर्जदाराने त्यांचे मान्यता प्राप्त प्रयोग शाळेत बियाण्याचे परीक्षण केलेले आहे त्यात या लॉटला जॅर्मिनेशन 99.88 टक्के असे दाखवलेले आहे व ते प्रमाणीत केलेले आहे. त्यामूळे बियाण्यात काही दोष असला पाहिजे हे सिध्द करण्यासाठी ते बियाणे शासकीय प्रयोगशाळेत तपासल्याशिवाय खरे काय कारण आहे ते समोर येऊ शकत नाही व या प्रकरणात असे झालेले नाही. यावर मा. राष्ट्रीय आयोगाचे सायटेशन I 2007 CPJ 266, यांचे महाराष्ट्र हायब्रीड सिडस कंपनी लि. विरुध्द गौरी पैडांन्ना व इतर यांचा आधार घेता येईल. यातही दोषयूक्त बियाणे पूरविल्याचा आरोप आहे. परंतु हे बियाणे प्रयोगशाळेत तपासण्यात आले नाही. परंतु त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते 99.6 टक्के शूध्द आढळले. त्यामूळे सेवेतील ञूटी सिध्द होऊ शकत नाही. मा. राज्य आयोग, महाराष्ट्र राज्य I 2007 CPJ 258 महाराष्ट्र राज्य सिडस कार्पोरेशन लि. व इतर विरुध्द नरेंद्र मोतीरामजी बूरांडे व इतर यात बियाण्याची तक्रार असून ती उगवणीवीषयी होती. पंचनाम्यामध्ये असे स्पष्ट म्हटले आहे की, उगवण चांगल्या प्रतीची आहे. बियाण्यात दोष नसल्याकारणाने अपीलामध्ये जिल्हा ग्राहक मंचाचा नीर्णय रदद ठरविण्यात आला. II 2007 CPJ 148 NC मा. राष्ट्रीय आयोग, दिल्ली यात इंडो अमेरीकन हायब्रीड सिडस व इतर विरुध्द विजयकूमार शंकरराव व इतर यात उगवण ही समाधानकारक झाली नाही यात रिपोर्ट 10 टक्के उगवणीचा होता पण बियाण्याचे दोषा बददल काहीही सांगितलेले नाही. कोणत्याही प्रकारचा पूरावा रेकार्डवर नव्हता की बियाणे हे दोषयूक्त आहे. तज्ञाचा रिपोर्टच्या गैरहजेरीत बियाणे दोषयूक्त आहेत असे म्हणता येणार नाही. अनूचित व्यापार पध्दती ही सिध्द होऊ शकत नाही असे म्हटले आहे. यासर्व सायटेशनचा आधार घेतला असता अर्जदार हे स्वतःची तक्रार सिध्द करु शकलेले नाहीत हे स्पष्ट होते म्हणून अर्जदार यांची तक्रार खारीज करण्यात येते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जे.यु.पारवेकर लघूलेखक. |