जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 184/2011 तक्रार दाखल तारीख – 04/01/2012
तक्रार निकाल तारीख– 15/02/2013
अंकुश पिता मोतीराम गिते,
रा.गिते हॉस्पिटल, बस स्टँडजवळ,
पाटोदा ता.पाटोदा जि.बीड. ... अर्जदार
विरुध्द
1) महेंद्रा अण्ड महेंद्रा लि.,
अटोमोटीव्ह सेक्टर, महेंद्रा टॉवर्स,
तिसरा मजला, कांदीवली (पूर्व)
मुंबई- 400 101
2) मॅनेजर,
श्रीराम अटोमोबाईल्स, बार्शी रोड, बीड.
3) मॅनेजर, सबलोक कार्स
नगर-मनमाड रोड, अहमदनगर,
ता.जि.अहमदनगर. ... गैरअर्जदार
समक्ष - श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
तक्रारदारातर्फे - अँड.आर.एम.गिते,
गैरअर्जदार क्र.1 ते 3 गैरहजर.
--------------------------------------------------------------------------------------- निकाल
दिनांक- 15.02.2013
(द्वारा- श्रीमती माधूरी विश्वरुपे, सदस्य)
तक्रारदारांची थोडक्यात तक्रार अशी की,
तक्रारदारांनी गैरअर्जदार क्र.1 कंपनीने उत्पादित केलेली स्कॉर्पिओ जीप गैरअर्जदार क्र.1 यांनी दिलेल्या खात्रीनुसार श्री गणेश अटो सर्व्हिसेस मुकंद नगर पूणे यांचेकडून खरेदी केली. गैरअर्जदार क्र.1 कंपनीचे गेरअर्जदार क्र.2 हे सबडिलर असून गाडी
(2) त.क्र.184/11
दुरुस्तीसाठी दि.15.2.11 रोजी कुशल मॅकनिक व टूल्स उपलब्ध नाही. या कारणास्तव गाडी दुस-या गॅरेजला लावून सामान व पार्ट तक्रारदारांना घेवून येण्यास सांगितले.
तक्रारदारांनी स्कॉर्पिओ गाडी व्यंकटेश कार केअर्स, जालना रोड बीड यांचेकडे दुरुस्तीसाठी दिली व सुटया पार्टसची यादी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे दिली. गैरअर्जदार क्र.2 यांनी सदर यादी मधील टायमिंग बेल्ट हा पार्ट उपलब्ध नसल्यामुळे अहमदनगर येथील मुख्य डिलर “सबलोक कार्स अहमदनगर” यांचेकडून मागवून घेण्यात येईल असे सांगितले परंतू अद्याप पर्यंत सदर पार्टस उपलब्ध करुन दिला नाही. गैरअर्जदार क्र.3 मुख्य डिलर यांचेकडे सदर पार्ट बाबत चौकशी केली असता गाडीचे पार्ट गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पंधरा दिवसात मिळतील असे सांगितले. गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे चौकशी केली असता त्यांचेकडे सदर पार्ट उपलब्ध नसल्याबाबतच्या पावतीची संगणकीय प्रत देण्यात आली. तक्रारदारांच्या गाडीचे रजिस्ट्रेशन दि.15.8.2019 पर्यंत असून सदर कालावधीत गाडीचे पार्टस उपलब्ध करुन देण्याची गैरअर्जदार क्र.1 यांची मुख्य जबाबदारी असून गैरअर्जदार क्र.2 व 3 प्रतिनिधी या नात्याने सहजबाबदार आहेत. तक्रारदार व्यवसायाने डॉक्टर असून सिरीयस पेशन्टकडे उपचाराकरीता जाण्या-येण्याकरीता गाडीची आवश्यकता असून तक्रारदार टिवींकल स्टार क्लब लि. चा सदस्य असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे टिम सोबत गाडीचे सहाय्याने फिरुन क्लबचे कार्य करत असत. तक्रारदारांना सदर गाडीचे पार्ट उपलब्ध न झाल्यामुळे मानसिक, शारिरिक, आर्थिक त्रास झाली अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र.1 ते 3 न्यायमंचात हजर असून ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनूसार विहीत मुदतीत लेखी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द ‘नो से’ चा आदेश पारीत केला. तसेच गैरअर्जदार क्र.2 यांनी न्यायमंचाचे नोटीस घेण्यास नकार दिल्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश दि.2.5.12 रोजी घेण्यात आला.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.आर.एम.गिते यांचा युक्तीवाद ऐकला.
(3) त.क्र.184/11
तक्रारदारांच्या स्कॉर्पिओ गाडी उत्पादनाची (Manufacturing date) तारीख ऑगस्ट 2004 असून दि.15.8.19 पर्यंत रजिस्ट्रेशन असल्याचे आर.टी.ओ.बीड येथील कागदपत्रानुसार दिसून येते.
तक्रारदारांची गाडी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे दि.15.2.11रोजी दुरुस्तीसाठी दिली असता गाडीचा टायमिंग बेल्ट हा पार्ट बदलणे आवश्यक असल्यामुळे सदरचा पार्ट गैरअर्जदार क्र.1 कंपनीकडून मागविण्यात आला परंतू गेरअर्जदार क्र.2 यांनी दिलेल्या वॉरंटी पार्ट ऑर्डर डिटेल्स नुसार सदर पार्ट उपलब्ध नसल्याचे (NIA-Not available) दिसून येते. सदरचा पार्ट उपलब्ध न झाल्यामुळे तक्रारदारांच्या गाडीची दुरुस्ती झाली नाही, हे स्पष्ट होते. तक्रारदारांच्या गाडीचे रजिस्ट्रेशन दि.15.8.19 पर्यंत असून सदर कालावधीत गाडीचे सुटे पार्ट उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी गेरअर्जदार क्र.1 उत्पादित कंपनीची आहे असे न्यायमंचाचे मत आहे. सदरचा पार्ट गैरअर्जदार क्र.1 कंपनीने उपलब्ध करुन न दिल्यामुळे तक्रारदारांना गाडीचा उपयोग करता येत नाही. त्यामुळे तक्रारदारांना निश्चितच मानसिक त्रास झाला, गैरसोय झाली. अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्र.1 कंपनीने गाडीचा सदर पार्ट उपलब्ध करुन देणे उचित होईल. तक्रारदारांची गाडी वापरात नसल्यामुळे निश्चितच गाडीचे नुकसान झाले आहे. तरी गैरअर्जदार क्र.1 उत्पादित कंपनीने तक्रारदारांच्या गाडीचा टायमिंग बेल्ट हा पार्ट त्वरीत उपलब्ध करुन देवून मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/-, तक्रारीचा खर्च रु.2,000/- तक्रारदारांना देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
आदेश
1) गैरअर्जदार क्र.1 उत्पादित कंपनीला आदेश देण्यात येतो की,
तक्रारदारांच्या स्कॉर्पिओ गाडीचा टायमिंग बेल्ट हा पार्ट आदेश
मिळाल्यापासून 90 दिवसात उपलब्ध करुन द्यावा.
2) गैरअर्जदार क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची
रक्कम रु.5,000/-(अक्षरी रु.पाच हजार) तक्रारीचा खर्च रु.2,000/-
(अक्षरी रु.दोन हजार) आदेश मिळाल्यापासून 30 दिवसात द्यावा.
(4) त.क्र.184/11
3) वरील आदेश क्र.2 मधील रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास
9 टक्के व्याजदरासहीत द्यावी.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड